भोसले यांची दृष्टी अत्यंत जाणीवपूर्वक राजकीय आणि बाजू घेणारी आहे. भटक्या-विमुक्तांचा इतिहास हा चोर-लफंग्यांचा इतिहास नसून तो ‘शोषितां’चा इतिहास आहे!
ग्रंथनामा - झलक
हरिश्चंद्र थोरात
  • ‘भटक्या-विमुक्तांच्या इतिहासाची साधने : शोध, अन्वयार्थ आणि मीमांसा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 26 April 2023
  • ग्रंथनामा झलक भटक्या-विमुक्तांच्या इतिहासाची साधने Bhatkya Vimuktanchya Itihasachi Sadhane नारायण भोसले Narayan Bhosle

‘देशोधडी’ या चर्चित आत्मचरित्राचे लेखक नारायण भोसले यांचे ‘भटक्या-विमुक्तांच्या इतिहासाची साधने : शोध, अन्वयार्थ आणि मीमांसा’ हे इतिहासपर पुस्तक नुकतेच मैत्री पब्लिकेशन, पुणेतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक प्रा. हरिश्चंद्र थोरात यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

..............................................................................................................................................................

नारायण भोसले यांचा ‘भटक्या-विमुक्तांच्या इतिहासाची साधने : शोध, अन्वयार्थ आणि मीमांसा’ हा लेखसंग्रह मराठी भाषेत भटक्या-विमुक्तांवरील उपलब्ध साहित्यामध्ये भर घालणारा आहेच, शिवाय तो आजवर झालेल्या लेखनापेक्षा वेगळाही आहे. भटक्या-विमुक्तांवर मराठीमध्ये काही मानवशास्त्रीय व समाजशास्त्रीय मजकूर लिहिला गेल्याचे वाचले आहे. त्यांच्या जीवनावर वेगवेगळ्या दृष्टीकोनांमधून लिहिलेल्या कथा-कादंबऱ्याही मराठीत लिहिल्या गेल्या आहेत. इतिहास या ज्ञानशाखेचे संदर्भ असलेले लेखन मात्र आजपावेतो वाचायला मिळाले नव्हते.

लेखक स्वतः नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातीत जन्माला आलेले आहेत, हे आता ‘देशोधडी’ या त्यांच्या आत्मचरित्रामुळे मराठी भाषकांना ठाऊक झाले आहे. याचा अर्थ असा की त्यांची दृष्टी बाहेरून, सुरक्षित अंतरावरून संशोधकीय निरीक्षण करणारी नसून ती आतून, जमातीचा एक जिवंत घटक म्हणून आपल्या जमातीला जाणून घेण्याचा प्रयत्न करणारी आहे. तथापि ती केवळ आत्मचरित्रात्मक स्वानुभवावर अवलंबून न राहता समष्टीला भिडते आणि शक्य तेवढी वस्तुनिष्ठ होण्याचा प्रयत्न करते.

अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रांमध्ये ही आतूनची दृष्टी महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे. विशेषतः भटक्या-विमुक्तांमध्ये शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे या आतूनच्या विश्लेषणासाठी आवश्यक असणारी तज्ज्ञता अपवादानेच आढळते. भोसले हे असे अपवाद आहेत, असे म्हणायला हरकत नाही.  

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भटक्या-विमुक्तांचे जीवन शब्दांत पकडण्यास अवघड आहे. त्यात वर्णन आणि विश्लेषण करू पाहणाऱ्या अभ्यासकाला हतबुद्ध करून टाकणारी विविधता आहे. भटके स्थिर नसल्यामुळे त्यांची ओळख संदिग्ध आहे, असे वाटू शकते आणि विमुक्तांच्या बाबतीत त्यांच्यावर ओळख लादलीच गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भटक्या आणि विमुक्त जमातींमधील आंतरिक संबंध स्पष्ट करत त्यांच्या इतिहासाची संकल्पना उभारणे, हे अत्यंत अवघड काम आहे.

इतिहासविद्येचे पारंपरिक पद्धतिशास्त्र येथे पुरेसे पडत नाही आणि सयुक्तिकही ठरत नाही. इतिहासविद्येला अलीकडे फुटलेल्या काही नव्या धुमाऱ्यांचा उपयोग करून घेत, भोसले या क्षेत्रात काही नवी मांडणी करू पाहत आहेत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. भटक्या-विमुक्तांच्या विविधतेमधून त्यांना एकमेकांशी जोडणारे आंतरिक बंध स्पष्ट करण्यासाठी त्यांचे लोकसाहित्य, जगण्याची रीत, त्यांच्या जीवनाचे संस्थात्मक अंग, त्यांच्या भाषा यांसारख्या गोष्टींचा उपयोग करून घ्यावा लागतो. या लेखसंग्रहामध्ये या दिशेने विवेचन करू पाहणारे लेखही समाविष्ट केले गेले आहेत.

लेखक जसा इतिहासविद्येचा अभ्यासक आहे, तसाच तो भटक्या-विमुक्तांच्या चळवळीत कार्यरत असलेला कार्यकर्ताही आहे. त्याचे हे रूप स्पष्ट करणारे, चळवळीची अपरिहार्यता मांडणारे आणि आपल्या बांधवांना चळवळीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करणारे काही लेखही या संग्रहात समाविष्ट झाले आहेत.

लेखकाची ज्ञानसाधना ही शेवटी त्याच्या चळवळीचा एक भाग असल्याने आणि त्याची चळवळीची धारणा त्याच्या ज्ञानसाधनेतून संस्कारित झाली असल्यामुळे चळवळीवरचे लेख येथे येणे अपरिहार्य ठरते. थोडक्यात, भटक्या-विमुक्तांच्या इतिहासाची साधने, भटक्या विमुक्तांचा समाज व संस्कृती तसेच भटक्या-विमुक्तांची चळवळ, ही तीन सूत्रे परस्परांना स्पष्ट करत येथील लेखनात एकत्र आली आहेत.

भटक्या-विमुक्तांचा इतिहास लिहिला गेला नाही, याचे कारण इतिहासलेखनासाठी आवश्यक असलेली साधनेच उपलब्ध नाहीत. तेव्हा प्रथम ही साधने शोधावी लागतात. मात्र साधने शोधताना इतिहासाकडे पाहण्याची काहीएक दृष्टी आपल्याजवळ असणे गरजेचे असते, याची उत्कट जाणीव लेखकाला आहे. इतिहासाकडे पाहण्याची लेखकाची दृष्टी इतिहासाच्या साधनांविषयी लिहिलेल्या अनेक लेखांमधून सतत जाणवत राहते. ही दृष्टी तथाकथित अलिप्त, वस्तुनिष्ठ वगैरे नाही. तसेच ती मुख्य प्रवाहाच्या अनुषंगाने विचार करणारी किंवा ग्रामव्यवस्थेच्या संरचनेला केंद्रस्थानी ठेवणारी नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भटके-विमुक्तांची लोकसंख्या कितीही असली तरी मुख्य प्रवाहातील लेखकांच्या ती विशेष खिजगणतीत नसते. जास्तीत जास्त भटक्या-विमुक्तांचा विचार भूतदयेच्या दृष्टिकोणातून होईल. ग्रामव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून भटके-विमुक्त म्हणजे परिघावरचे फुटीर फटिंग असतात. त्यांचा विचार कसा केला जातो हे आपल्याला त्रिं. ना. आत्रे यांच्या ‘गावगाडा’मध्ये पाहायला मिळते.

भोसले यांची दृष्टी अत्यंत जाणीवपूर्वकतेने राजकीय आणि बाजू घेणारी आहे. भटक्या-विमुक्तांचा इतिहास हा चोर-लफंग्यांचा इतिहास नसून तो ‘शोषितां’चा इतिहास आहे, याविषयीची त्यांची जाणीव पक्की आहे. मध्ययुगीन मिथकांच्या प्रभावाखाली अन्याय पोसणाऱ्या संरचना, वासाहतिक कालखंडाने विकसित केलेली समाजाचे विघटन करणारी भांडवलवादी तंत्रे, जातिव्यवस्थेचा वेगवेगळ्या काळातील वेगवेगळा आविष्कार या सर्व गोष्टींनी हा शोषिला जाणारा माणूस घडवण्याचे कार्य केले आहे. या शोषिताचे सर्वाधिक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे भटके-विमुक्त लोक याची खात्री पटवून देण्याचे प्रयत्न भोसले यांनी केले आहेत.

या शोषणाचे एक लक्षण म्हणजे विशिष्ट जमातीच्या इतिहासाची साधने उपलब्धच नसणे होय. पाश्चात्त्य देशांना इतिहासच नाही आणि हिंदू संस्कृतीला कसा हजारो वर्षांचा इतिहास आहे याचे विशेष कोडकौतुक असलेले विचारवंत याच देशातील अनेक जमातींची इतिहासाची साधने कशी निर्माणच होऊ दिलेली नाहीत, या वस्तुस्थितीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात.

एकाच देशाशी निगडित असलेल्या काही लोकसंख्येला प्राचीन आणि भव्यदिव्य इतिहास आहे व तो उभी करणारी साधने आहेत, आणि काही लोकसंख्येजवळ आपला इतिहास काय, हे समजून घेण्याची साधनेच उपलब्ध नाहीत. ही काही योगायोगाने घडणारी गोष्ट नव्हे, तर हा सर्वंकष शोषणाचा परिणाम आहे, याची कडवट जाणीव लेखकाला झालेली आहे. म्हणून प्रस्थापित इतिहासाची आणि प्रतिष्ठित साहित्यकृतींची विरचना करण्याच्या मार्गाने शोषितांना प्रवास करावा लागतो.

शोषकांनी निर्माण केलेली साधने शोषणाच्या प्रक्रियेवर उलटवावी लागतात. वसाहतवादी शोषकांनी दमनाच्या हेतूने भटक्या-विमुक्तांविषयी केलेल्या नोंदी, यामुळेच भटक्या-विमुक्तांच्या इतिहासाची साधने ठरतात. या साधनांच्या आरशात दिसणारे प्रतिबिंब उलटे असते, याचे भान भोसले यांना आहे, असे या पुस्तकातील त्यांच्या लेखनावरून दिसते.

................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भोसले यांच्या इतिहासाकडेच नव्हे तर वर्तमानाकडेही पाहण्याची दृष्टी वर्ग, जात आणि लिंगभाव या जाणिवांना आणि संरचनांना विवेचनाच्या मुळाशी ठेवणारी आहे. त्यामुळेच त्यांनी केलेले भटक्या-विमुक्तांच्या समाजरचनेचे आणि संस्कृतीचे विवेचन चिकित्सक झाले आहे. अस्मितेच्या प्रवाहात वाहत जात आपल्या जगण्यातील उणिवांचे उदात्तीकरण त्यांच्या लेखनात कुठेही आढळून येत नाही. उदाहरणार्थ, जात आणि जमात या दोन संकल्पनांमधील भेद स्पष्ट करत त्या दोहोंतील ऐतिहासिक आदानप्रदान स्पष्ट करण्याचा प्रयत्न भटक्या-विमुक्तांच्या समाजाला रूपांतरणाच्या प्रक्रियेत नेमकेपणाने पकडतो.

ते म्हणतात, “या भटक्या जमाती आहेत, त्या प्रायःकरून जाती नाहीत. जाती आणि जमातीच्या रचनेत फरक आहे. जातीत उच्च-नीचता आहे. शिवता-शिवत आहे, विटाळ आहे, व्यवसाय बंदी आहे. पुरुषप्रधानता आहे. जातीअंतर्गत विवाहबंदी आहे. ह्या साधारण बाबी जमातीमध्ये नसतात. पण साधारणतः ब्रिटिश काळापासून जमातीमधेही जातीची सारी लक्षणे दिसायला लागली आहेत.”

समाजरचनेत निर्माण झालेल्या दोषांवर नेमकेपणाने बोट ठेवत भोसले यांची इतिहासविषयक दृष्टी जागल्याचे कामही करते आहे. या दृष्टीमधूनच भटक्या-विमुक्त स्त्रियांच्या जगण्यातले संघर्ष, त्यांच्या परिस्थितीचे विदारक तपशील ते वाचकांसमोर मांडतात आणि त्यातून प्रस्थापित समाजातच नव्हे, तर शोषित समाजातही स्त्रिया शोषिताहूनही शोषित असतात, हे तथ्य पुढे येते.

या लेखसंग्रहात भटक्या-विमुक्त स्त्रियांविषयी चारपाच लेख आलेले आहेत, याचे रहस्य त्यांच्या जीवनविषयक दृष्टीमध्ये लिंगभावाच्या चिकित्सेला महत्त्वाचे स्थान आहे, हे आहे. ते लिहू पाहत आहेत, त्या भटक्या-विमुक्तांच्या सामाजिक इतिहासाला बळ पुरवण्याचे कार्य त्यांच्या समाज व संस्कृतीविषयीच्या या सामाजिक-राजकीय दृष्टिकोनाने केले आहे.

भोसले यांच्या येथे समाविष्ट असलेल्या अनेक लेखांमध्ये सांस्कृतिक अंगाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचे असे निबंध सर्वसाधारणपणे भटक्या-विमुक्तांच्या वर्तमानकालीन जीवनाला स्पर्श करतात. जगण्याच्या रितीभाती, जगण्यात अर्थपूर्ण होत जाणाऱ्या भाषेसहच्या काही चिन्हव्यवस्था, जगण्याच्या मुळाशी असलेल्या मूल्यव्यवस्था आणि कल्पनाप्रणाली अशा आशयसूत्रांचे स्पष्टीकरण करतात. भटक्या-विमुक्तांची संस्कृती या नावाचा संस्कृती या संकल्पनेचे सैद्धान्तिक स्वरूप स्पष्ट करणारा एक लेखही या संग्रहामध्ये समाविष्ट आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अलीकडच्या काळात संस्कृती या संकल्पनेचा उपयोग अनेकदा सामाजिक व आर्थिक व भौतिक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे साधन म्हणून केला जाताना दिसत आहे. एकदा का तुम्ही भौतिकवादी दृष्टिकोण स्वीकारला की जगण्याच्या मुळाशी असलेल्या संरचना पृष्ठस्तरावर येऊ लागतात. समूहचे समूह कोणत्या युक्ती योजून शोषणाचा विषय ठरतात हे मग दिसू लागते. या दृश्यामध्ये उदात्तीकरण करावे असे काहीही नसते. हुशार लोक इकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून संस्कृतीचे आवाहक, रंगीबेरंगी, उठावदार आणि लालित्यपूर्ण असे चित्र रेखाटतात. जगण्यातले संघर्षाचे संबंध दृष्टीआड लोटावेत म्हणून संस्कृतीचे उदात्तीकरण केले जाते.

भोसले संस्कृतीचा परामर्श घेताना या प्रवृत्तीला बळी पडण्याचे टाळतात. त्याऐवजी ते भटक्या-विमुक्तांच्या जीवनात घडून येऊ पाहणाऱ्या रूपांतरणाच्या प्रक्रियेत त्यांच्या संस्कृतीची मांडणी करतात. भटकती माणसे स्थिर आणि बंदिस्त जीवनाकडे वळताना कोणती परिवर्तने घडतात, याचा वेध घेऊ पाहतात. निसर्गाशी असलेल्या संबंधांमधून इतर माणसांनी जशी स्थिर आयुष्यापर्यंतची वाटचाल केली तशीच ती भटक्या-विमुक्तांनीही करण्याचा प्रयत्न केला असणार, असे ते गृहीत धरतात. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत याची जबाबदारी ते पितृसत्ताक आणि जातिव्यवस्थेने ग्रस्त, शोषक अशा प्रस्थापित समाजावर टाकतात.

भोसले यांचा संस्कृतिविचारही अंतिमतः समाजामधल्या शोषणाच्या राजकारणाशी संबंधित आहे. यामुळेच ते स्वतःच्या समूहाचे विश्लेषण करू पाहतात. ही कठोर आत्मपरीक्षण करण्याची वृत्ती त्यांच्या लेखनाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. आपापली जात-जमात टिकवून ठेवण्यासाठी, तिचे रितीरिवाज टिकवून ठेवण्यासाठी आणि विशेष म्हणजे जातीवर-जमातीवरची आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पंचायतीनं पितृसत्ताक कायदे केले होते. पारंपरिक अमानुषपणे त्यांची अंमलबजावणी कायम ठेवली होती, असे भोसले म्हणतात तेव्हा आधुनिकतेने दिलेल्या बळावर ते परंपरेपुढे मूलभूत प्रश्न उभे करत असतात.

संस्कृतीच्या संदर्भात भाषाविषयक विचार महत्त्वाचा ठरतो, याची तीव्र जाणीव भोसले यांच्या सांस्कृतिक विचारव्यूहामध्ये समाविष्ट झालेली आहे. भटक्या-विमुक्तांच्या भाषेविषयी त्यांनी अनेक लेखांमधून विवेचन केले आहे. त्याचा अर्थ लावता त्यातून अनेक गोष्टी सुचवल्या जातात.

भटके-विमुक्त हे सामाजिक संपूर्णाच्या बाहेर ढकलले गेलेले लोक आहेत. विशिष्ट भूमीशी निगडित राहून विकसित झालेली व काही प्रमाणात स्थिर झालेली मानवी संस्कृतीची रूपे सर्वपरिचित आहेत. मानवी समूहाच्या अस्मितेमध्ये त्याचे भूमिसातत्य, विशिष्ट अवकाशाशी त्याचे निगडित असणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. माणसेच काय अनेक पशूही आपल्या भूभागाच्या सीमारेषा आखून घेतात आणि आपले भौतिक व सांस्कृतिक व्यवहार त्या विशिष्ट अवकाशाच्या संदर्भात करतो. तुमचे घर, तुमचा गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, प्रांत, देश तुमच्या अस्मितेच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या अवकाशांची ओळख ही तुमची ओळख होते. अक्षरशः हातपायही हलवावे न लागता विशिष्ट अवकाशात तुम्ही जन्माला येता तेव्हा त्या अवकाशाची परंपरा तुमची परंपरा होते.

................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भटक्यांना हे भूमिसातत्य उपलब्धच नाही. विशिष्ट अवकाशाची माती, तिच्यात येणारी पिके-फुले, तिथला विशिष्ट निसर्ग, त्यातून निर्माण होणाऱ्या मानवी विकासाच्या किंवा नाशाच्या निश्चित-अनिश्चित दिशा यांपैकी कोणतीही गोष्ट भटक्यांना प्राप्त झालेली नाही. भटक्यांना सर्व मुलूख हे परमुलूखच असतात. विमुक्तांची गोष्टही याहून फार वेगळी नाही. वसाहतकालीन व्यवस्थेने त्यांच्यावर तारांनी वेढलेला अवकाश लादला होता. त्यामध्येही एकप्रकारचे अनैसर्गिक तात्पुरतेपण होते.

या दोन्ही प्रवर्गांना भूमीपासून तोडण्याचे जे राजकारण प्रस्थापित व्यवस्थेने खेळले आहे, त्याचा खोलवरचा परिणाम त्यांच्या जगण्याच्या रीतीवर झाला आहे. भौतिक जगण्याला आधार देणारी भूमीच हरवली असल्यामुळ आपल्या जगण्याचे सांस्कृतिक अंग अधिक नेमके, इतरांपासून अधिक वेगळे, अधिक चिवट करण्याचा प्रयत्न भटक्या-विमुक्तांकडून केला जात असावा, असे म्हणण्यास खात्रीने जागा आहे.

प्रस्थापितांचे असतेपण गावच्या सीमारेषांच्या आत रचले जाते, त्यांनी गावातून बेदखल केलेल्या वंचितांचे असतेपण प्रतिगाव होऊ पाहणाऱ्या गावकुसाबाहेरच्या अवकाशाच्या संदर्भात रचले जाते. भटक्या-विमुक्तांच्या असतेपणाची विवक्षितता विशिष्ट अवकाशाशी फारशा निगडित नसलेल्या त्यांच्या संस्कृतीच्या सहाय्याने रचली जाते. इतरांच्या बाबतीत जमिनीचा तुकडा जे करतो ते भटक्या-विमुक्तांच्या बाबतीत त्यांच्या संस्कृतीमधून साधण्याचा प्रयत्न होतो, असे दिसते. यामुळेच विशिष्ट संकेत, प्रथा, नियम कटाक्षाने पाळले जातात. जातपंचायतेचे अधिकार हाही संस्कृतीला अग्रक्रम देण्याचा एक प्रकार आहे, असे म्हणता येते. परंपरेला आधार देणारी भूमीसहची इतर साधने उपलब्ध नाहीत म्हणून परंपरा मौखिक माध्यमातून जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न होतो.

भटक्या-विमुक्तांची भाषाही त्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि ती जमातीपुरती ठेवण्याचा कळत नकळत प्रयत्न होत असावा, असे दिसते. या प्रक्रियेमुळे ती जमातीच्या सांस्कृतिक अस्मितेचे एक चिन्ह ठरते. परभाषा शिकून घेण्याची अफाट क्षमता ज्यांच्यावर लादली गेली आहे त्या भटक्यांनी आपली भाषा आपल्यापुरती राखण्याचा प्रयत्न करावा हा इतिहासक्रमाचा भाग आहे, असेच म्हणावे लागते. यामुळेच या लेखसंग्रहामध्ये तीनचार लेख भटक्या-विमुक्तांच्या भाषेविषयीचे आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भटक्या-विमुक्तांच्या संस्कृतीच्या आधारे त्यांच्या भाषेचा शोध घेणे, हा उपक्रम डॉ. भोसले यांनी सुचवला आहे. ही संस्कृती हाच त्यांच्या भाषेचा संदर्भ असल्यामुळे हा उपक्रम वैध आहे, यात शंका नाही. असा शोध घेतला की मग भटक्या-विमुक्तांच्या भाषेतील सत्तेचे संबंध शोधावेत, अशी भोसले यांची योजना आहे. तीही त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोणातून अर्थपूर्ण आहे.

भटक्या विमुक्तांची भाषा ही वेगळी भाषा की मराठीचीच एक सांकेतिक भाषा, यांसारखे वाद बाजूला ठेवणे योग्य वाटते. त्यांच्या निर्णयातून काही साधत नाही. शेवटी प्रत्येक भाषा ही सांकेतिक चिन्हांची व्यवस्था असते आणि तिच्या चिन्हव्यवस्थेवर प्रभुत्व असलेले लोक कमी-अधिकपणे मर्यादितच असतात. कोणतीही भाषा ही कधीही एकच भाषा नसते. ती अनेक भाषांचा समूह असतो. ही तथ्ये लक्षात घेतली तर भटक्यांच्या भाषा इतर कोणत्याही भाषांसारख्याच असणार असा निष्कर्ष काढता येतो.

एक खरे की या भाषा आता वेगाने नाहीशा होऊ लागल्या आहेत. त्यांच्यातले सत्तासंबंध आता अर्थातच प्रचलित भाषांमध्ये प्रक्षेपित होत असणार. आपल्याला त्यांचा अभ्यास निश्चितच करता येईल. मात्र या मरू घातलेल्या भाषांचा शक्य तेवढा तपशील भाषाविज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ संशोधकांकडून जमा करून त्याचे विश्लेषण करणे ही अग्रक्रमाने करायची गोष्ट आहे.

................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हा तपशील जमा करणे म्हणजे काही फुटकळ शब्द जमा करणे नव्हे. व्यवस्था म्हणून ही भाषा कशी काम करते आणि ती जेव्हा प्रत्यक्ष वापरली जाते तेव्हा तिला कोणते सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ असतात, या दोन पातळ्यांवर हा अभ्यास होणे गरजेचे आहे. भाषाव्यवस्था आणि भाषिक व्यवहार यांचे नीट मांडणी केलेले ज्ञान उपलब्ध नसेल तर भाषेचा राजकीय अन्वयार्थ लावता येणे अवघड होईल.

या लेखसंग्रहातील काही लेख चळवळीतील कार्यकर्त्याच्या दृष्टीकोनातून लिहिले आहेत. ते भटक्या-विमुक्तांच्या भावनांना आवाहन करणारे आहेत. एकीचे बळ सांगणारे आहेत आणि पारंपरिक व्यवसाय त्यागायला सांगणारे आहेत. जगण्याच्या नव्या शक्यता, नव मूल्यभान त्यांच्यासमोर उभे करणारे आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की, भोसले या अभ्यासकाची सामाजिक बांधीलकी स्पष्ट करणारे आहेत. अकादमिक पातळीवरचा अभ्यास आणि समाजात बदल घडवून आणणाऱ्या चळवळी, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी त्यांची धारणा दिसते. ती स्तुत्य आहे.           

‘भटक्या-विमुक्तांच्या इतिहासाची साधने : शोध, अन्वयार्थ आणि मीमांसा’ - नारायण भोसले

मैत्री पब्लिकेशन, पुणे | मूल्य – ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......