‘संपादन प्रकाश’ हा जगन्मित्र रविप्रकाश कुलकर्णी यांचा गौरव नाही, एका साहित्यसेवेचा गौरव आहे!
ग्रंथनामा - झलक
प्रदीप निफाडकर
  • ‘संपादन प्रकाश’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 16 May 2023
  • ग्रंथनामा झलक संपादन प्रकाश Sampadan Prakash रविप्रकाश कुलकर्णी Raviprakash Kulkarni

साहित्यप्रेमी, स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त १ एप्रिल २०२३ रोजी पुण्यात ‘संपादन प्रकाश’ या त्यांच्यावरील गौरवग्रंथाचे प्रकाशन समारंभपूर्वक करण्यात आले. पत्रकार व ग़ज़लकार प्रदीप निफाडकर यांनी संपादित केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन दिलीपराज प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे. या ग्रंथाला संपादकांनी लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...

................................................................................................................................................................

‘सगळ्यांची सुख-दुःखे त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेली असतात, माणूस नाही ते आमच्या शहराचे वृत्तपत्रच आहे’, अशीच ज्यांची ख्याती आहे, ते जगन्मित्र रविप्रकाश कुलकर्णी यांच्या एक्काहत्तरीनिमित्त हा ग्रंथ साकारताना मला मनस्वी आनंद होत आहे. आनंद याचा अजिबात नाही की, कुण्या माणसाचा गौरव होत आहे, आनंद याचा आहे की, एका साहित्यसेवेचा गौरव होत आहे. आपल्या महाराष्ट्रात अशी निखळ, निर्मळ आणि काहीही अपेक्षा न ठेवता काम करणारी मंडळी आहेत. रविप्रकाश यांच्यावर दिवाळी अंकातून एखादा लेख लिहावा, ही माझी खूप वर्षांची इच्छा होती, पण दिवाळी अंकांच्या कोणत्याही संपादकाला तो विषय रुचला नाही. अखेर त्यांची एकाहत्तरी आली आणि मी सहज माझा बालमित्र, खरोखरचा बालमित्र, कारण आम्ही माँटेसरीपासून मित्र आहोत, राजीव बर्वेला ही गोष्ट सांगितली. त्याला मी म्हटले, “हा सोहळा व त्यानिमित्ताने एक गौरव ग्रंथ तू कर. मी मदतीला आहे. मला कोणतेही पद नको की मला कोणताही मंच नको.”

राजीव हुशार असल्याने त्याने हे काम माझ्याकडेच सोपवले. भराभर चक्र फिरवली आणि हा ग्रंथ साकार झाला. या ग्रंथातील चुकांना मी जबाबदार आहे, चांगला वाटला तर ते श्रेय मी राजीवला देतो. त्याने स्थापलेल्या समितीला देतो. कारण त्यांनी या ग्रंथातील कोणत्याही लेखाबाबत आग्रह धरला नाही. रविप्रकाश आणि समितीला किती आनंद आहे माहिती नाही, पण मी आनंदी आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आता या ग्रंथाबाबत. जेव्हा या ग्रंथाची कल्पना सुचली, तेव्हाच ‘संपादन’ या विषयावर एक चांगला ग्रंथ करण्याचे समितीच्या बैठकीत ठरले. अर्धा भाग रविप्रकाश यांच्या गौरवाचा, तर अर्धा भाग संपादनाचा. त्यासाठी मग नावे निश्चित करण्यात आली. एखाददुसरा अपवाद वगळता सर्वांनी ही कल्पना उचलून धरलीच, पण ताबडतोब लेख पाठवले. मी कधीही लेखकाला शब्दमर्यादा घालत नाही. कारण मग लेख लिहिताना त्याची तंद्री (हल्ली त्याला मराठीत ‘लिंक’ म्हणतात!) सतत तुटली जाते. तो सतत त्या भीतीखाली असतो की, संपादकाने सांगितलेले शब्द झालेत का? नाही, मग अजून लिही किंवा अरे, जास्त झाले का? आता कोणता भाग कापू? असे सारखे होत असते. त्यामुळे मी सर्वांना सांगितले होते की, मनसोक्त लिहा, पण एक लक्षात असू द्या, माझ्या हातात कात्री आहे. मी कात्री निर्दयपणे चालवली नाही. पण जिथे काही पुन्हा पुन्हा संदर्भ येत होते असा भाग काढला आहे. त्याला लेखकाची परवानगी घेतली. खरे असे करावे का? तर हो. कारण शेवटी आपल्या सर्वांचा उद्देश पुस्तक चांगले झाले पाहिजे हा असतो. ते पुस्तक संपादकाला जेवढे समाधान देणारे असते, तेवढेच त्या लेखकाला असले पाहिजे. पण दोघांचा उद्देश एकच असला पाहिजे की, आपल्या भाषेतील एक सुंदर कलाकृती आपण निर्माण करत आहोत. मी कात्री चालवताना अगदी संपादनाचा भरपूर अनुभव असलेल्या भानू काळेंसारख्या दिग्गजांनीही हट्ट केला नाही की, मृदुला जोशीजींनीही. मी केलेल्या सूचना, मी चालवलेली कात्री त्यांना आवडली. त्यांनी सानंद होकार दिला, अशा साऱ्याच लेखकांच्या ऋणात मी राहू इच्छितो.

आपल्याकडे संपादकांची मोठी परंपरा आहे. संपादक काही दुरुस्त करत नसतो, तो तंदुरुस्त करत असतो. हे मी माझ्या पत्रकारितेच्या ३५ वर्षांहून अधिक असलेल्या अनुभवावरून सांगतो. कारण आलेले लेखन मुळातच सुंदर असते. जे नसते त्याला संपादक अग्नीच्या मुखात ‘स्वाहा’ म्हणत टाकत असतोच. चांगले आहे तेच छापतो. मग ती कविता असो की लेख. ती मुळात कलाकृती असते. संपादक तिला सजवतो, आस्वादनात अडथळा आणणारा भाग बाजूला करतो. संपादक कसाई नसतो. तो चांगल्या कलाकृतीला अधिक देखणे करण्याचा प्रयत्न करतो.

संपादक लोकमान्य टिळक यांच्यासारखा सरकारला जाब विचारतो, आगरकरांसारखा सामाजिक सुधारणांचा ध्यास घेतो, गोविंद तळवळकरांसारखा वाचन करतो, माधव गडकरी यांच्यासारखा लोकांमध्ये जाऊन लोकांचेच वाचन करतो, तो कलाप्रेमी विजय कुवळेकर यांच्यासारखा ‘आतलं आकाश’ शोधतो, कुमार केतकर यांच्यासारखा ‘समाजभान’ ठेवतो आणि तो अरुण टिकेकरांसारखा ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ही जमवतो. त्याचा सर्वत्र संचार नसला तरी त्याचे भान त्याला असते. तो सुखदुःखात सामील होतो. या पुस्तकातही तुम्हाला हेच अनेक ठिकाणी दिसेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

डॉ. आशा भागवत तर संपादकाला वाचक व लेखक यांच्यामधील दुवाच मानतात. मृदुला जोशीजींनी संपादन करताना संपादकाचा कस कसा लागतो, हे स्पष्ट केले आहे. अविनाश पंडित यांनी लेखकच नव्हे तर विक्रेते, प्रकाशक यांची काळजी केली आहे. त्यांनी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. ज्याला मासिक काढायचे आहे, त्याने भानू काळे यांचा लेख वाचलाच पाहिजे. स्वानुभव सांगता सांगता त्यांनी बरीच उपयुक्त माहिती दिली आहे.

संपादन ही कला आहे, हे मान्यच आहे. भाषाविज्ञानाचे अभ्यासक रमेश धोंगडे यांनी साहित्यकृतीसाठी संपादक नको असे म्हणताना दिलेली कारणे वाचनीय आहेत. त्यांचा विरोध संपादकत्वाला नाही, तर ते कलाकृतीची काळजी करतात. कलाकृती नावाच्या अर्भकाच्या गळ्याला नख लागू नये, याची काळजी वाहतात. रवींद्र शोभणे यांच्यासारखा लेखक आपले अनुभव प्रामाणिकपणे मांडताना लेखकाला किती कष्ट घ्यावे लागतात, याचे सोदाहरण स्पष्टीकरणच देतो. पुस्तक, चित्रपट एवढेच कशाला ओटीटीसारख्या नव्या प्लॅटफॉर्मपर्यंत अंजली जोशी यांची लेखणी फिरली आहे.

हे सगळे लेख केवळ वाचनीय नाहीत, तर मोलाचे मार्गदर्शक आहेत. तरुणांना ते दिशा देतील, याची खात्री आहे. गती टिकवायची, धाडस करायचे तर जोखमीचा आनंद घ्यावाच लागतो, हेच या लेखांमधून कळत राहते. शुद्धलेखन मी त्या त्या लेखकाच्या शैलीनुसार ठेवले आहे; कारण ‘काही ‘दाते पंचांग’ मानतात, तर काही ‘टिळक पंचांग’ ’ या उक्तीनुसार काही वाळिंबे मानतात, तर काही सत्त्वशीला सामंत यांना.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या ग्रंथातील दुसरा भाग जिव्हाळ्याचा आहे, रविप्रकाश यांनी जमवलेल्या मैत्रचा आहे. तिथे दुग्धव्यवसायात रमूनही वाचनभूक असलेला चंद्रशेखर प्रधान यांच्यासारखा सामान्य वाचक आहे आणि मधु मंगेश कर्णिक, दिनकर गांगल यांच्यासारख्या नावाजलेल्या व्यक्तीसुद्धा आहेत. सगळ्यांच नावांचा उल्लेख केला, तर पुस्तकात तुम्ही काय वाचाल? त्यामुळे मी सर्वांच्या लेखांचे मतितार्थ सांगण्याचे टाळतो. सर्वांनी जिव्हाळ्याने लिहिले आहे.

रविप्रकाश यांच्या पत्नी व कन्यांनी तर प्रथमच हातात लेखणी घेतली आहे. भारत सासणे यांनी दोनच आठवणी सांगून रविप्रकाश यांच्या ‘अद्भुत’ वेगळेपणावर प्रकाश टाकला आहे. सुमेध वडावाला याचा लेख तर माझ्या लेखापेक्षा काकणभर सरस झाला आहे, हे मी मनमोकळेपणे मान्य करतो. एखादे व्यक्तिचित्र कसे रंगवावे, माहिती देतानाच कंटाळा न येता आपण एखादे ‘ललित’ वाचतो आहे, असे वाटावे असा हा सुंदर लेख.

अर्थात यामध्ये ज्यांचे लेख आहेत, तेच किंवा तेवढेच रविप्रकाश यांचे मित्र-गणगोत नाहीत. अनेकांशी आम्ही संपर्क साधू शकलो नाही, तर अनेकांनी आम्हाला बाकी सर्व, अगदी आर्थिकही, मदत केली, पण ‘आम्ही कार्यबाहुल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे लिहिणार नाही’, हे आवर्जून नम्रपणे सांगितले. त्यात विश्वास पाटील, अशोक कोठावळे, रवी बेहरे, विनोद शिरसाठ, मोनिका गजेंद्रगडकर, अरुण शेवते यांचा समावेश आहे. त्यांचाही मी आभारी आहे.

मधु मंगेशजींसारखा दर्जेदार साहित्यिक लेख मागितल्यावर शुभेच्छापर तातडीने लिहून देतो, ही रविप्रकाश यांची कमाई आहे. बरे, मधु मंगेशजी यांनी गुणगौरवच केलेला नाही, कारण त्यांचेच वाक्य आहे, ‘रविप्रकाश यांची काही किरणे (सुखद) पडली, पण काही वेळा रवीची उष्णताही जाचली.’ म्हणजे रविप्रकाश यांनी सडेतोड लिहून, कानपिचक्या देऊनही त्या केवळ साहित्यहितासाठी किंवा मराठी भाषेच्या भल्यासाठी आहेत, याची सर्वांना जाण आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

सच्चिदानंद शेवडे यांनी रविप्रकाश यांचे वर्णन ‘जे न देखे कोणी ते देखे रवी’, म्हणत रविप्रकाश यांच्या शोधक वृत्तीवर नजर टाकली, तर गांगलांनी ‘नारद’ म्हणत रविप्रकाश यांचा ‘पीआर’ किती चांगला आहे, याचे कौतुक केले आहे.

रविप्रकाश यांचा अत्यंत दुर्मीळ गुण जवळपास सर्वांनीच सांगितला आहे, तो म्हणजे रविप्रकाश ‘गॉसिपिंग’ (कुचाळक्या) करत नाहीत. त्यांना माहिती असते, पण ते सांगत नाहीत. त्याचे कारण त्यांना कुणाच्या वैयक्तिक वाईट गोष्टींवर चर्चा करण्यात रस नसतो. त्यांना फक्त महन्मंगल, उदात्त, सुंदर, शिव दिसत असते.

उमा कुलकर्णी या ज्येष्ठ अनुवादिका, लेखिका आहेत. त्यांनी या ‘गॉसिपिंग’ मुद्द्यावर लिहून खरोखरच रविप्रकाश यांच्या निरागस, सुंदरतेचा ध्यास असलेल्या वृत्तीचा गौरवच केला आहे. एकूण हा ग्रंथ रविप्रकाशच्या मित्रांनी मित्रासाठी म्हणून, तरुणांनी मार्गदर्शक म्हणून आणि लेखकांनी चांगले साहित्य असे असू शकते, म्हणून यासाठी वाचलाच पाहिजे.

राजीव बर्वे यांनी रविप्रकाश हे ‘चौकीदार’ कसे आहेत, हे सांगितले आहे. प्रकाशकांकडे असे ‘चौकीदार’ असतात, मात्र कधीकधी ते प्रकाशकांपेक्षा जास्त शिरजोर होतात, तसे रविप्रकाश नाहीत, हे त्याने सुंदर पद्धतीने माडले आहे. एखादा रविमुकुल गेलेल्या अनिल बळेल यांच्यासारख्या साहित्यसेवकाची आठवण ठेवतो, तेव्हा आपण चाललो त्या रस्त्यावर अगदीच काळोख आहे असे नाही, हे पाहून प्रत्येक साहित्यसेवकाचा ऊर भरून येतो.

अर्थात हे सारे मी मनोगत लिहीत असताना संपादक सर्वांच्या मताशी सहमत आहे असे अजिबात नाही. याच ग्रंथात कुणीतरी म्हटले आहे की, प्रकाशनाने प्रस्ताव स्वीकारला नाही, तर त्याची कारणे देण्याची आवश्यकता नाही. माझ्या मते असे करू नये. कारण नाहीतर लेखकाला प्रस्ताव का स्वीकारला नाही, हे कळणार कसे? आपण त्यांना ‘तू कुठे चुकतोस’, हे सांगणार कधी? जर रविप्रकाश यांच्यासारखी साहित्यभलाईची वृत्ती असेल तर सांगायलाच हवे आणि लेखकांनेही ते तितकेच स्वतःच्या भल्यासाठी तरी ऐकले पाहिजे, असे माझे मत आहे व ते या लेखाशी सहमत नाही.

परंतु संपादक सर्वच मतांशी सहमत नाही, असेही नाही. बरीचशी मते पटलेली आहेत, नव्हे, ९९ टक्के पटली आहेत. कारण आपले साहित्य असो की, वृत्तपत्र सध्या कोणत्या तणावातून जात आहे, हे आपल्याला माहिती आहे. जीवघेणी स्पर्धा सर्वत्र आहे. अशा वेळी लिहिणारा काही लिहितो, तेव्हा त्याचे स्वागत तर केले पाहिजेच. न लिहिणाऱ्यांपेक्षा वाईट लिहिणारेही परवडतात, न बोलणाऱ्या मौनीबाबांपेक्षा स्पष्ट बोलणारा परवडतो. ते ऐकले असते, तर आजच्या वृत्तपत्रांची स्थिती अशी झाली नसती.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपण कुठून कुठे आलो आहोत, हे सांगणारे दोनच शेर मी ऐकवतो आणि थांबतो. आपण एकेकाळी अकबर इलाहाबादी यांच्या काळात असल्याने म्हणत होतो-

“खींचो न कमानों को न तलवार निकालो।

जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो।।”

(धनुष्याची प्रत्यंचा ताणू नका की, तलवार वापरू नका. समोर प्रतिस्पर्धी तोफ असेल, तेव्हा वृत्तपत्र सुरू करा.)

मग वृत्तपत्रे इतकी झाली आणि ती व्यवसायाकडून ‘धंदा’ शब्दाकडे गेली, आज अकबरजी असते, तर ते नक्कीच हबीब जालिब यांच्या शब्दांत उतरून म्हणाले असते, ‘अरेरे मी का वृत्तपत्रे सुरू करा सांगितले?’

“लुट गई इस दौर में अहल-ए-कलम की आबरू

बिक रहे हैं अब सहाफी बेसवाओं की जगह”

सहाफी म्हणजे पत्रकार, संपादक. यांची स्थिती अशी असताना हे पुस्तक म्हणजे ‘काळोखातील रविप्रकाश’ आहे. म्हणून मी म्हटले की हा रविप्रकाश यांचा गौरव नाही, एका साहित्यसेवेचा गौरव आहे.

‘संपादन प्रकाश’ - संपादक प्रदीप निफाडकर,

दिलीपराज प्रकाशन, पुणे | मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......