असा सापडला फास्टर फेणे!
ग्रंथनामा - झलक
लिलावती भागवत
  • फास्टर फेणे पुस्तक संच
  • Fri , 03 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक फास्टर फेणे Faster Fene भा. रा. भागवत B. R. Bhagwat

फास्टर फेणे हा अनेक मुलांचा लाडक साहसवीर. भा. रा. भागवत यांनी वीस पुस्तकांच्या माध्यमातून फास्टर फेणे आबालवृद्धापर्यंत पोचवला. नुकताच त्यावर चित्रपट आला असून तोही लोकप्रिय होतो आहे. त्यानिमित्ताने फास्टर फेणेच्या पुस्तक संचाची मागणी वाढते आहे. या पाश्वभूमीवर फा.फे. कसा जन्मला, त्याचं बारसं झालं, याविषयी लिलावती भागवत यांनी सांगितलेली कथा.

.............................................................................................................................................

१.

मला पुष्कळदा लोक विचारतात, “अहो, भागवतांना फास्टर फेणे कसा सुचला? असा कुणी मुलगा होता का? की एकदम कल्पनेतच त्यांनी बघितला?”

आणि मग तो कसा सुचला याचं उत्तर मला सापडलं. बरेच दिवस त्यांच्या मनात घोळणारा हा पोरगा त्यांना प्रत्यक्ष एक दिवस त्याची चुणूक दाखवून गेला.

आम्ही मुंबईला गिरगावात एका चाळीत राहात होतो. त्या वेळी एकदा ‘जगबुडी’ची अफवा पसरली होती. आमचा धाकटा मुलगा चंदर, त्याची घरातून बाहेर, बाहेरून घरात धावपळ चालू होती. काहीबाही वस्तू घेऊन जात-येत होता. आम्ही गॅलरीत त्याच्या मित्रांची काही तरी गडबड बघितली आणि गॅलरीत गेलो. तर, चंदर आणि त्याची चार-पाच मित्रांची गँग चाळीच्या जिन्यासमोरच्या छोट्या चौकात जमली होती. भोवती दगड, बत्ते, काठ्या अशा बऱ्याच वस्तू होत्या, दोरखंडाचं एक बंडल होतं.

“हे काय चाललंय?” विचारल्यावर चंदर म्हणाला, “जगबुडी झाली, तर आम्ही ही फरशी फोडून पाताळात जाऊन लपणार आहोत.” आणि भागवतांना त्यांच्या कल्पनेतला किडकिडीत, तुडतुडीत, अचाट साहसाची कल्पना करणारा पोरगा सापडला.

अर्थात, पुढे तो स्वत:चं स्वतंत्र, वेगळं रूप घेऊन प्रत्यक्षात आला. भाराभर पुस्तकांतून आपल्या सर्वांना भेटला.

२.

आता बहुतांशी, नव्हे सर्वस्वीच शहरी मुलगा, फुरसुंगीचा कसा, असा प्रश्न पडतोच. त्याचं उत्तर आहे भागवतांच्या लहानपणीच्या जुन्या आठवणीत. फुरसुंगीजवळच्या लोणी गावात त्यांच्या काकांचं शेत होतं. तुम्हाला खोटं वाटेल; पण दादांना आपण आता सगळ्यांसारखं ‘दादा’च म्हणू या, शेतकरी व्हायचं होतं. बरं झालं, ते शेतकरी न होता लेखक झाले. नाही तर आपल्याला फा.फे. कसा भेटला असता? तर, या लोणी गावाला जायला पुण्याहून मिरजेला जाणारी एक छोटी आगगाडी होती. तिच्यातून जावं लागे आणि उतरायचं स्टेशन होतं फुरसुंगी. तिथून पुढे दहा-पंधरा मिनिटं पायवाटेनं चालत गेलं, की लोणी गाव. त्या गावात दर सुट्टीत दादा आणि त्यांची आते-मामे भावंडं सगळी जमायची शेतावर. प्रचंड धम्माल करायची. ते गाव, तिथला परिसर, गाई, म्हशी, घोडे ही त्यांची मित्रमंडळी. पुढे एका पुस्तकात तुम्ही वाचलेली, ‘भागी गाय चुलाण्यात पडली’, ती तिथलीच. तिथले थैमान्या, जर्मन्या ही बैलजोडी; सोमाजी, गोमाजी पाटील आणि पोरांना हवं तसं हुंदडायला देणारा शेतावरचा गंगाराम आणि उसाचं गुऱ्हाळ लागलं, की ताजा गूळ आणि नंतर गुळाची पुरणपोळी खायला घालणारी त्याची बायको. हे सगळं या पोराला अनुभवायला मिळावं, तर तो एकदम उडून फुरसुंगीला कसा जाईल? म्हणून मग दादांनी त्याला जन्मालाच घातला फुरसुंगीला.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

३.

मुलांनी साहसी बनावं; नाही, बनलंच पाहिजे, नाही तर ती मुलं कसली? हे दादांचं मनापासूनचं मत. त्यांना साहसाची आवड होतीच; पण त्यांना ते कधी फारसं जमलं नाही. तसे ते किल्ले चढले. मुलांना घेऊन ट्रिपा काढल्या. त्या ट्रिपा सुरळीतपणे पार पडल्या नाहीत, की त्यांना जास्त मजा वाटायची, हे खरं; पण त्यांचा स्वभाव तसा कुणामध्ये फारसं मिसळण्याचा नव्हता. मग एकट्यानं काय करणार? तेव्हा बनेश फेणेच्या – हो, फा.फे. – जन्मल्यापासूनच्या पहिल्या दहा दिवसांतच त्याचं कापडात गुंडाळलेलं मुटकुळं बैलगाडीतून पडलं, नंतर सापडलं शिंदीच्या बनात, म्हणून तो बनेश फेणे – तेव्हा त्याला साहसाला साथ देणारी मित्रमंडळी नकोत का? मग दादा ज्या मुलांमध्ये मिसळायचे, गोष्टी सांगायचे, त्या मुलांमधूनच त्यांनी वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या वृत्तीची मुलं शोधायला सुरुवात केली आणि मग बनली त्यांची एक टोळी किंवा टोळकं. त्यातलाच शरद शास्त्री, सुभाष, थापाड्या पण फा.फे.शी स्पर्धा करणारा नंदू नवाथे, गर्विष्ठ श्रीमंत इंद्रू इनामदार वगैरे मंडळी. पण या सगळ्या दांडगटपणाला एक प्रेमळ, कोमलपणाची साथ असावी म्हणून त्यांनी फा.फे.ची बहीण माली त्यांच्यात आणली. ती मात्र त्यांना, उषा या आपल्या छोट्या चुणचुणीत बहिणीवरून सुचली, असं ते सांगायचे.

क्लिक करा - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

.............................................................................................................................................

४.

‘फास्टर फेणे’ हा एखाद्या इंग्रजी पुस्तकातून मराठीत अवतरला असावा असं काही लोकांना वाटायचं, पण तो परदेशी नाही. अगदी मराठी मातीतला देशी मुलगा आहे. मग त्याचं नाव ‘फास्टर’ कसं? कारण तो फास्ट धावतो म्हणून. त्याचं हे बारसं झालं आणि नवीन नाव ठेवलं गेलं त्यानं मारलेल्या विद्याभवनमधल्या उडीवरून. त्याला पुण्याच्या विद्याभवनात प्रवेश घ्यायचा होता. माला आणि ते दोघं निघाले, पण त्याचं शत्रुत्व करणारा इंद्रू इनामदार पण भावाला प्रवेश घ्यायला निघाला. इंद्रू ऐटीत वडिलांच्या गाडीतून निघाला. इंद्रूच्या आधी तर पोचायला हवं. वाटेत किती अडथळे आले, पण फा.फे. म्हणजे सगळ्या अडचणींवर मात करणारा. त्याच्या तुडतुड्या पायांनी त्याने वाटेतले सगळे अडथळे पार करून जी धाव मारली, ती एकदम शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीत उडी घेतली. इंद्रू आधीच पोचलेला, पण त्याच्या भावाला प्रवेश न मिळता आपल्या फा.फे.लाच मिळाला. कारण? कारण फा.फे.ची जिद्द, त्याची हुशारी हे तर होतंच, पण इंद्रूनं आणली होती गुळाची ढेप मुख्याध्यापकांना द्यायला. तिथेच नडलं आणि प्रवेश मिळाल्यावर मुलांनी जल्लोष करून त्याचं ‘फास्टर’ म्हणून स्वागत केलं. फा.फे.ला प्रवेश मिळाल्यावर जेवढा आनंद झाला, त्यापेक्षा त्याला गुळाच्या ढेपेची लाच न स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकांबद्दल आदर वाटला. शिवाय ते त्याच्या धाडसाबद्दल रागावलेही नव्हते. उलट त्यांनी ‘फास्टर’ म्हणून त्याचं कौतुकच केलं आणि मग त्याचं बनेश नाव जाऊन तो बनला – ‘फास्टर फेणे’. इंग्रजी नावाचा चक्क देशी मुलगा.

(‘फास्टर फेणेचा कंपू’ या लिलावती भागवत यांनी लिहिलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.)

.............................................................................................................................................

‘फास्टर फेणे’च्या २० पुस्तकांच्या संचाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4264

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......