काळजी घेणे, जबाबदारी स्वीकारणे, सन्मान करणे आणि समजून घेणे हे प्रेमाचे चार पैलू आहेत.
ग्रंथनामा - झलक
एरिक फ्रॉम
  • ‘प्रेमसाधना’चे मुखपृष्ठ
  • Sat , 28 March 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक एरिक फ्रॉम द आर्ट ऑफ लव्हिंग प्रेमसाधना

जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ एरिक फ्रॉम यांचे ‘द आर्ट ऑफ लव्हिंग’ हे पुस्तक जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे आणि त्याच्या आजवर लक्षावधी प्रती खपल्या आहेत. प्रेमासाठी प्रत्येक माणूस आतून आसुसलेला असतो. कारण खरे प्रेम हाच मानवी अस्तित्वाच्या मूळ समस्येवर एकमेव तोडगा आहे, माणसाचे आंतरिक दुःख व एकाकीपणावरील उत्तर आहे. पण प्रेम म्हणजे तरी मुळात काय? वात्सल्य, बंधुप्रेम, वैषयिक प्रेम, स्वतःवरचे प्रेम व ईश्‍वरावरचे प्रेम या प्रेमाच्या विविध रूपांची वैशिष्ट्ये काय आहेत? खरे प्रेम करण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीत नसण्यामागे कोणती कौटुंबिक व मानसशास्त्रीय कारणे असावीत, यांसारख्या प्रश्‍नांची सखोल चर्चा या पुस्तकामध्ये आहे.

एरिक फ्रॉम यांच्या या पुस्तकाचे शरद नावरे यांनी ‘प्रेमसाधना’ या नावाने मराठीत रूपांतर केले आहे. नुकत्याच शब्द पब्लिकेन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

काळजी घेणे, जबाबदारी स्वीकारणे, सन्मान करणे आणि समजून घेणे हे प्रेमाचे चार पैलू आहेत. केवळ ‘देण्या’ची क्रिया ओलांडून प्रेमातील सक्रिय भाव स्थिर होताना, हे चारही पैलू दृग्गोचर होतात.

काळजी घेणे हा प्रेमाचा पैलू आईच्या वात्सल्यात स्वच्छपणे दिसतो. आई जर आपल्या तान्ह्या बाळाला पाजत नसेल, मऊ आणि ऊबदार अंथरुणात झोपवत नसेल, थोडक्यात, बाळाच्या शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करत असेल, त्याची नीट काळजी घेत नसेल तर तिने मातृप्रेमाबद्दल कितीही कविता केल्या किंवा लंब्याचवड्या बाता मारल्या तरी आपण तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. जेव्हा आपण आईला हे सर्व बाळासाठी करताना पाहतो, तेव्हाच तिच्यातील वात्सल्याची खूण आपल्याला पटते.

फुला-प्राण्यांविषयी हेच खरे. एखादी स्त्री आपल्याला फुले किती किती आवडतात हे सांगत असेल आणि बागेत काम करायला मात्र पतिदेवांना पिटाळत असेल तर तिचे पुष्पप्रेम शंकास्पद आहे. ‘फिरवण्यास हात तुमचे केसाळ कुत्रे’ पाळायचे झाले तर त्या कुत्र्याची निगादेखील स्वत: राखायला हवी.

जे फुला-प्राण्यांविषयी आणि तान्ह्या बाळाविषयी, तेच माणसांविषयी. कारण प्रेम आपण ज्याच्यावर करतो, त्याच्या जीवनाबद्दल आणि प्रगतीबद्दल सक्रिय काळजी वाहणे हेच तर प्रेमाचे लक्षण आहे. अशा प्रकारची काळजीवाहू वृत्ती जिथे नाही, तिथे प्रेम नाही. प्रेम करणे याचा अर्थ दुसऱ्यासाठी झिजणे, खस्ता खाणे, त्याचे सिंचन करणे आणि त्याला वाढताना पाहून आनंदित होणे. प्रेम आणि कष्ट यांचा संबंध अतूट आहे. ज्याच्यासाठी आपण कष्ट करतो, त्यावर आपण प्रेम करतो. ज्यावर आपण प्रेम करतो, त्यासाठी आपण कष्ट करतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

काळजी घेण्याच्या बरोबरीनेच जबाबदारी हा प्रेमाचा दुसरा पैलू पुढे येतो. आजकाल जबाबदारी हा शब्द आपण कर्तव्याच्या संदर्भात वापरतो. उदाहरणार्थ, गाईडमधील उतारे वर्गात वाचून न दाखवता एखाद्या विषयाचा अभ्यास करून तो विद्यार्थ्यांना शिकवणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. जबाबदारी म्हणजे जणू कुणीतरी बाहेरून लादलेले कर्तव्याचे ओझे. पण जबाबदारी या शब्दाचा मूळ अर्थ स्वेच्छापूर्वक एखादे कृत्य करणे असे आहे. वर्तमानपत्री भाषेत हल्ली जबाबदारी या शब्दाला हिंसेचे आणि दुष्टपणाचे वलय प्राप्त झाले असले तरी तिथे शब्दाचा मूळ अर्थ थोडा-फार टिकवून ठेवल्यासारखे दिसते. उदाहरणार्थ, बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली. गुजरातमध्ये ख्रिश्चनांवर हल्ले केल्याची जबाबदारी विहिंप आणि बजरंग दलाने स्वीकारली. ओरिसामध्ये मिशनऱ्यांना जाळण्याची जबाबदारी अद्याप कुणी स्वीकारली नाही वगैरे.

जबाबदारीचे कृत्य म्हणजे पूर्णपणे स्वेच्छया केलेले कृत्य. दुसऱ्या व्यक्तीच्या प्रकट अथवा अप्रकट गरजेला मी दिलेला जबाब. जबाबदार असणे म्हणजे हा जबाब द्यायला सक्षम आणि तयार असणे. आई आणि बाळाच्या बाबतीत जबाबदारी ही शारीरिक गरजा पुरवण्याची प्रामुख्याने असते, तर प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात प्रेमातील जबाबदारी याचा अर्थ वर्चस्व गाजवण्यात होण्याची दाट शक्यता असते. पुन्हा आई आणि मुलाचे उदाहरण घेता येईल. लहानपणी खस्ता खाल्लेल्या असतात म्हणून मोठेपणी मुलाने आपल्या अर्ध्या वचनात राहावे अशी अपेक्षा आई बाळगायला लागते आणि प्रेमळ आईचे रूपांतर कजाग सासूमध्ये कसे होते, हे समजूनही येत नाही. लग्नापूर्वी एकमेकांचा शब्द झेलणारे प्रेमिक लग्नानंतर काही वर्षातच एकमेकाला मुठीत ठेवायला पाहतात. प्रेमाची पुष्पमाला मग गळ्यातील लोढणे, घोरपड काय वाट्टेल ते बनते. हे टाळायचे असल्यास तिथे प्रेमाचा तिसरा पैलू कार्यान्वित व्हायला हवा, तो म्हणजे ‘मान’.

‘मान’ या शब्दाचा एक अर्थ आदर, पूज्यबुद्धी वगैरेंशी संबंधित आहे. त्याचा आणखी एक अर्थ म्हणजे गणना, मान्यता. उदाहरणार्थ सुनील गावस्करला श्रेष्ठ फलंदाजाचा मान दिला जातो. म्हणजे श्रेष्ठ फलंदाज अशी त्याची मान्यता आहे किंवा श्रेष्ठ फलंदाज म्हणून तो गणला जातो. त्याची युक्तता, वाजवीपणा, औचित्य ओळखले जाते. प्रेमाच्या संदर्भात मान याचा अर्थ दुसरी व्यक्ती आहे त्या स्वरूपातच विकसित आणि मुकुलित व्हावी याचे भान. हे भान दुसऱ्या व्यक्तीचा मान ठेवते. तिच्या आत्मसन्मानाची बूज राखते. म्हणून प्रेमातील मान म्हणजे दडपणुकीचा, पिळवणुकीचा अभाव.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी जिच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती, तिच्या स्वत:साठी, तिच्या स्वत:च्या कलाने विकसित आणि मुकुलित होऊ देत. माझ्यासाठी, माझ्या उपभोगासाठी, माझी सेवा करण्यासाठी नव्हे. मी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा मी तिच्याशी एकरूप होतो. पण ती आहे त्या स्वरूपात स्वीकारून. एखादी वस्तू म्हणून, माझ्या उपयोगाची वस्तू म्हणून मी तिच्याकडे पाहत नाही.

‘मान’णे केव्हा शक्य होते? जर मी स्वत: स्वातंत्र्य मिळवले असेल तर. कुबड्या फेकून उभे राहणे आणि चालणे मला स्वत:ला शक्य असेल तर. दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्याची आणि पिळवणूक करण्याची गरज मला वाटेत नसेल तर. सन्मानाचा उगम स्वातंत्र्यात असते. एक फ्रेंच गीत आहे – प्रेम हे स्वातंत्र्याचे बाळ आहे, जुलूम-जबरदस्तीचे नव्हे.

एखाद्या व्यक्तीला जाणल्यावाचून तिला मानणे संभवत नाही. ही जाण अथवा समज हा प्रेमाचा चौथा पैलू होय. जाणण्याचा म्हणजेच ज्ञानाचा प्रकाश नसेल तर काळजी घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे आंधळेपणाचे ठरते आणि आत्मीयता नसेल तर नुसती समज पोकळ ठरते. ज्ञानाचे स्तर अनेक आहेत. प्रेमाच्या संदर्भातील ज्ञान हे पृष्ठीय पातळी भेदून खोलवर जाणारे असते. जेव्हा मी माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि माझ्या अपेक्षांच्या सीमारेषा ओलांडून दुसऱ्या व्यक्तीला तिच्या स्वत:च्या संदर्भात पाहू लागतो, त्याचवेळी मला तिचे ‘ज्ञान’ होते. उदा. एखादी व्यक्ती दाखवत जरी नसली तरी ती रागावली आहे, हे समजून येणे कठीण नसते. पण त्या पलीकडे जाऊन मला खरोखरी त्या व्यक्तीबद्दल सखोल समज असेल तर ती तणावाखाली आहे, काळजी करते आहे, तिला एकटे आणि असुरक्षित वाटते आहे, किंवा अपराधी वाटते आहे हे जाणवते. मग मला हेही कळते की, तिचा राग हा वास्तविक खोलवरील तणावांतून, कदाचित ते तणाव झाकण्यासाठी म्हणून उदभवला आहे. ती मग रागावलेली म्हणून न दिसता त्रास कंठणारी म्हणून मला दिसू लागते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रेमाच्या रहस्याशी ज्ञानाचा आणखी एक आणि अधिक मूलभूत संबंध आहे. दुसऱ्या व्यक्तीशी एकरूप होऊन आपल्या एकलेपणाचा तुरुंग फोडण्याची जशी माणसाची गरज असते, तशीच माणूसपणाचे रहस्य जाणण्याची एक उर्मीदेखील प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. एका बाजूला जीवन स्वत:च जीवशास्त्रीय पातळीवरील एक चमत्कार आहे. तसेच मानुष पातळीवर व्यक्ती ही स्वत:च एक गूढ रहस्य आहे. तिला स्वत:ला किंवा तिच्या भोवतालच्या माणसांना या गुढाचे आकलन होऊ शकत नाही. आपण स्वत:ला जाणतोदेखील आणि कितीही यत्न केला तरी आपण नाही स्वत:ला जाणत. आपण आपल्या भोवतालच्या व्यक्तींना जाणतो आणि तरीही जाणत नाही. या विरोधाभासाचे कारण असे की, आपण आणि त्या व्यक्ती वस्तू नसून माणसे आहोत. आपण स्वत:मध्ये किंवा इतरांमध्ये जितके खोलवर पाहू, तितकी आपल्या हातून जाण निसटत असल्याचे जाणवत राहते. आणि तरीही आपण माणसाच्या आत्म्याचे गूढ जाणण्याकरता तळमळत असतोच. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीपण शोधण्याचा अट्टाहास करत असतोच.

एखाद्या व्यक्तीला जाणण्याचा एक हताश मार्ग म्हणजे तिच्यावर पूर्ण ताबा मिळवणे. आपली सत्ता तिच्यावर गाजवणे. अशी सत्ता मिळवली म्हणजे ती व्यक्ती आपण सांगू तशी वागते. आपल्याला हवा तसाच विचार करते. या सत्तेमुळे आपण त्या व्यक्तीचे रूपांतर एका वस्तूमध्ये, आपल्या मालकीच्या वस्तूमध्ये करतो. एखाद्या व्यक्तीला जाणण्याच्या प्रयत्नाची ही दिशा आपल्याला परपीडन वृत्तीकडे घेऊन जाते. दुसऱ्या व्यक्तीला त्रास द्यावा, तिचा छळ करावा आणि त्यातून तिला तिचे रहस्य उघडे करायला भाग पाडावे असा तो प्रयत्न असतो. एखाद्या व्यक्तीचे गूढ जाणण्याची अशा प्रकारची दुर्दम्य इच्छा ही आपल्या क्रूरपणाच्या आणि हिंस्त्रपणाच्या मुळाशी असते. ज्ञान मिळवण्याचा हा क्रूर मार्ग लहान मुलांच्या बाबतीत ठळकपणे दिसून येतो.

...............................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मूल एखादे खेळणे, एखादी बाहुली घेते आणि तिला जाणण्यासाठी तिला ओरबाडून काढते, तिचे हातपाय विलग करते, तुकडे तुकडे करते किंवा फुलपाखराचे पंख तोडते, मुंगळ्यांना चिरडते. ही सगळी धडपड चाललेली असते ती त्या वस्तूंचे किंवा किटकांचे रहस्य समजून यावे म्हणून. परपीडन वृत्तीचे मूळ रहस्य जाणण्याच्या वृत्तीत आहे. पण या वृत्तीने प्रेरित होऊन मी दुसऱ्याच किंवा दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे तुकडे तुकडे केले तरी मी फक्त विनाशच घडवून आणतो. माझ्या हाती काहीच लागत नाही. रहस्य तर नाहीच नाही.

रहस्य जाणण्याचा दुसरा मार्ग प्रेमाचा आहे. प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तीत शिरणे, दुसऱ्या व्यक्तीत विलीन होणे. असे एकरूप होताना मला माझ्या शोधाचे उत्तर सापडते. ‘तेरी रूह में जिस्म डुबोने दे’ म्हणजे काय हे समजते. रहस्य जाणण्याच्या वृत्तीचे शांतवन एक होण्यात होते. मिसळून जाताना मी तुला जाणतो, मी स्वत:ला जाणतो, आणि मी कशालाच जाणत नाही. मी जाणतो की जीवन उमगण्याचा माणसाला शक्य असलेला एकमेव मार्ग आहे तो प्रेमाचा. परस्परात विलीन होण्याचा. हा मार्ग अनिर्वचनीय आहे, तो शब्दात सापडणारा नाही. विचारप्रक्रियेद्वारा पकडता येणारा नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-01@cloudtestlabaccounts.com

Thu , 02 April 2020

text

5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-01@cloudtestlabaccounts.com

Thu , 02 April 2020

text

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......