नास्तिक म्हणजे कोणी अनैतिक, पापी, दुर्जन व्यक्ती, या गैरसमजाला कमी करण्याचा हा प्रयत्न आहे...
ग्रंथनामा - झलक
डावकिनाचा रिच्या
  • पुण्यात झालेल्या आठव्या नास्तिक मेळाव्याचे बोधचिन्ह आणि ‘होय, आम्ही नास्तिक आहोत!’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 27 March 2023
  • ग्रंथनामा झलक नास्तिक मेळावा होय- आम्ही नास्तिक आहोत शहीद भगतसिंग विचारमंच

शहीद भगतसिंग विचारमंच, पुणेतर्फे पुण्यात १९ मार्च २०२३ रोजी ‘आठवा नास्तिक मेळावा’ झाला. या मेळाव्याला यंदा प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी, स्तंभलेखक संग्राम खोपडे यांच्या उपस्थिती लाभली. दोघांचाही भाषणांनी हा मेळावा रंगतदार आणि तर्कनिष्ठ केला. या मेळाव्यात ‘होय, आम्ही नास्तिक आहोत!’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याची ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

व्यक्तीचे नास्तिक्य हे जर त्याच्या विवेकाच्या मार्गाचे फलित असेल, तर मग नास्तिकता ही नक्कीच भूषणाची बाब असली पाहिजे. मात्र, आजही अनेक व्यक्ती समाजामध्ये उघडपणे नास्तिक असल्याचे सांगताना कचरतात. कळपामध्ये एकटे पडण्याची त्यांना भीती वाटते. आपण इतरांपेक्षा वेगळा विचार करतोय, याची त्यांना धास्ती वाटते. समाजामध्ये प्रतिगामी शक्ती प्रबळ होताना दिसत असताना आणि देशभरात असहिष्णुतेचे वातावरण वाढत चाललेले दिसत असताना, त्यांच्या मनावर प्रचंड तणाव येतोय. अशा वेळेस जर समविचारी मित्र लाभले, तर त्यांना दिलासा मिळतो. आपण एकटे नाही आहोत, आपण चुकीचे नाही आहोत, आपल्याप्रमाणेच अनेक लोक देवाधर्माच्या कालबाह्य कल्पनांचा त्याग करून आनंदी आयुष्य जगत आहेत, याचा त्यांना आनंद होतो. ‘नास्तिक मेळावा’ घेण्यामागे हाच हेतू असतो.

‘शहीद भगत सिंग विचारमंचा’मार्फत घेण्यात येणाऱ्या मेळाव्यात आम्ही आस्तिकांपेक्षा खूप शहाणे, असा कोणताही अभिनिवेष नसतो. व्यक्ती नास्तिक असणे म्हणजे ती कोणी अनैतिक, पापी, दुर्जन व्यक्ती असेल, या गैरसमजाला कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. व्यक्ती नास्तिक आहे म्हणजे नक्की काय? या जगावर आणि या जगातला एक घटक म्हणून तिच्यावर कोण्या दैवी शक्तीचे नियंत्रण आहे, आणि ती दैवी शक्ती व्यक्तीच्या आयुष्यात चांगले-वाईट बदल घडवू शकते, हे ती व्यक्ती नाकारते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

व्यक्तीला उपलब्ध सामाजिक संधी आणि त्या संधीचा फायदा करून घेण्याची व्यक्तीची क्षमता, या दोन घटकांमुळे कोणतीही व्यक्ती आयुष्यात घडते किंवा बिघडते. व्यक्तीच्या कर्तृत्वामध्ये कोणताही देव आणि दैव या घटकांचा यत्किंचित संबंध नसतो. म्हणजेच हे नास्तिक्य अपयशाच्या, निराशेच्या पराभवाच्या भावनेपोटी आलेले नसून विवेकाच्या वाटेवर चालताना विचारांच्या घुसळणीतून उजळलेला मार्ग आहे. मानवाच्या प्रगत बुद्धीचे ते फलित आहे.

मानवाचा मेंदू जेव्हा विकसित होऊ लागला आणि त्याला सृष्टी, अंतरीक्ष ऋतुचक्र यांचे कुतूहल निर्माण होऊ लागले, तेव्हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले. पृथ्वीवरील आणि अंतरिक्षातील नवलाई पाहून केवळ मानवालाच प्रश्न पडतात बरं का... इतर प्राण्यांना नाही. या साऱ्या नवलाईचा निर्माता कोण असेल, याची कल्पना प्रत्येक संस्कृतीतील मानवाने त्याच्या परीने केली आहे.

जशी ब्रह्म हा निर्माता, विष्णू हा पालनकर्ता आणि शिव हा अंतकर्ता अशी समजूत वैदिकांत निर्माण झाली, तशीच जगातील सर्वच आदिम संस्कृतीमध्ये दिसून येते. प्रत्येक प्राचीन संस्कृतीने विश्वाच्या निर्मितीचे कोडे त्यांच्या त्यांच्या बुद्धीने सोडवायचा प्रयत्न केला आहे. पुढच्या काळात धर्मांचे स्वरूप बदलत गेले, नवीन मिथके जोडली गेली. अब्राहमी तिन्ही धर्म (इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू) यांच्यात विश्व निर्माण होण्याची अलमायटी अल्ला कल्पना एकच आहे. अनेक देवांवरून एक देव असा हा प्रवास झाला आहे, या विश्वाचा किमान एक तरी निर्माता असावा, अशी भाबडी आशा त्यात असावी.

धर्माच्या ठेकेदारांचे एक वाक्य ठरलेले असते ‘विज्ञान जेथे संपते, तेथे अध्यात्म सुरू होते’. मग त्यांची मांडणी अशी- ‘आम्ही म्हणतो सृष्टी देवाने निर्माण केली. तुम्ही म्हणता बिग बँगने.... मग सांगा बिग बँग आधी काय होते?’ त्यांना वाटते आपण समोरच्याला निरुत्तर केले आहे. आता यांचे विज्ञान संपले, आता आपले अध्यात्म यांना पटेलच. बिग बँगच्या आधी काय होते, याचा शोध विज्ञान घेत आहे.

आजवरचे वैज्ञानिक पद्धतीचे यश पाहता त्यामागे आपण जाऊ शकू. पण त्याआधीदेखील काय असेल, हा प्रश्न तेव्हा असेल. जे एंडलेस आहे. मात्र, याच एका कारणासाठी कुणी देव संकल्पना मानायची काही गरज नाही. कारण त्या देवाच्या जन्माआधी काय होते, हा प्रश्न तेव्हा पण राहतोच! जर कोणी निर्मिक असेल, तर तो पण कुणाची तरी निर्मिती असेल ना? हे साधे तत्त्व आहे राव... त्यापेक्षा हे विश्व स्वकार्यकारणभावाने बद्ध आहे. कोणी निर्मिक नाही, असे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. लवकरच विश्वाच्या निर्मितीचे कोडे सोडवण्यात आपल्याला यश येईल आणि मग कदाचित देव ही संकल्पना बाद होईल.

डब्ल्यू जी ग्रेस यांना इंग्लंडमध्ये ‘क्रिकेटचे पितामह’ म्हटले जाते. इंग्लंडमध्ये क्रिकेट रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची बॅटिंग बघायला गर्दी जमायची. ते खेळायचे पण धमाल. अनेक किस्से मशहूर आहेत त्यांचे. पण त्यांची एक खोड होती. आपण आऊट झालो, हे मान्य करायला ते तयार नसत. एकदा पहिल्या बॉलवर पायचित आऊट दिल्यावर हा भाऊ अंपायरला जाऊन बोलला, “हे जे लोक आले आहेत, ते माझी बॅटिंग पाहायला आले आहेत. तुझी पंचगिरी बघायला नाही.” तर थोडक्यात अंपायर मंडळींवर पण दडपण असायचे, त्याला आऊट देताना चूक व्हायला नको, असे त्यांना वाटायचे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

एकदा हा बॅटिंगला आला. पहिल्या बॉललाच चेंडू याच्या बॅटचे पुसटसे चुंबन घेऊन कीपरच्या हातात... जोरदार अपील. मात्र, याचे हावभाव असे की, कट लागलाच नाही....

अंपायरने नाबाद दिले. दुसऱ्याच बॉलच्या वेळी याचा पाय स्टंपसमोर.... पायचितचे जोरदार अपील. मात्र, याने बॅट दाखवून सूचित केले की, बॅटलादेखील चेंडू लागला होता. अंपायरचा निर्णय अर्थात ‘नाबाद’. बॉलर तर इरेला पेटला... तिसरा बॉल असा टाकला की, याचा ऑफ आणि मिडल स्टंप गुल.... नाराज ग्रेस त्या उडालेल्या स्टंपकडे बघत असताना बॉलर जवळ आला आणि म्हणाला की, दोन स्टंप उडाले आहेत. कदाचित लेग स्टंप जागेवर आहे, हे पाहून तुम्हाला वाटत असेल, तुम्ही आऊट नाही.

देव संकल्पना पण अशीच हड्डी आहे. किती वेळा सपशेल आऊट झाली, तरी भक्त मानायला तयार होत नाहीत राव. याच मानसिकतेतून ‘बुद्धिमान अभिकल्प’ अर्थात ‘इंटेलिजंट डिझाईन’ यांसारख्या संकल्पना पुन्हा पुन्हा डोके वर काढत असतात. मात्र, पालकाच्या आधारावर या संकल्पना पुन्हा त्यांच्यासाठीच्या योग्य जागी, म्हणजेच कचऱ्याच्या पेटीमध्ये जातात.

जसे देव या संकल्पनेचे तसेच धर्म आणि धर्मग्रंथांबाबत आपल्याला म्हणता येईल. बंद घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर आहे असं वाटतं, तसे धर्मग्रंथांचे पण असते. चुकून कधी तरी त्यात समतेचे तत्त्व असल्याचं भासू शकतं, त्याचा दाखला देत ‘आमचा धर्म किती समतेचे तत्व मांडतो’ हे त्या धर्माचे ठेकेदार गर्जून सांगत असतात. अनेकदा त्यांचा प्रतिवाद करायला कोणी सरसावत नाही. बर्ट्रांड रसेल म्हणतो, ‘तरुण पिढीतील फारच थोड्यांना ‘धर्म’ पटत असतो आणि ज्यांना पटत असतो, ते बहुतेक वेळा सामान्य बुद्धिमत्तेचे आणि अत्यंत संभ्रमितच असतात. मात्र ज्यांना धर्म पटत नाही, ते पुढे येऊन बोलायची हिंमत करू शकत नाहीत. चिकिस्ता करायची सोय नसते.”

“स्त्रियांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांना सर्वात मोठा विरोध धर्माचा असतो. जगातील सर्वच समाजात धर्माचा आधार घेऊन खियांचे शोषण होत असते,” असे प्रसिद्ध साहित्यिका तस्लिमा नसरीन म्हणतात. उत्क्रांतीनंतर जगभरात मातृसत्ताक पद्धती असल्याचे सांगण्यात येते, मग असा पूर्णतः उलट बदल कसा झाला? कारण नंतरच्या काळात धर्म निर्माण होत गेले. सर्वच धर्म स्त्रियांना दुय्यम स्थान देणारे आहेत. कारण सर्वच धर्मसंस्थापक पुरुष होते. धर्मग्रंथांची रचना त्यांनी केली आणि स्वतःला सोयीस्कर अशी व्यवस्था तयार केली आहे. धर्मरक्षण करण्यासाठी, खरतर धर्म बंदिस्त करण्यासाठी योनीशुचिता हेच माध्यम निवडले गेले. त्यास अनुसरून स्त्रियांच्या हक्क आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आणणाऱ्या भाकडकथा रचल्या गेल्या.

“मुक्तपणे बोलणं, मुक्त विचार करणं आणि बंधनमुक्त महिला असणं, या तीन बाबींची धर्माला भीती वाटत असते... तिन्ही बाबी आपण एकत्र आल्या तर तुम्हाला अशी सॉलिड महिला दिसेल, जी बिनधास्त तिचे म्हणणे मांडू शकेल,” असं अयान हिरसी अली सांगते.

युरोप, अमेरिकेमध्ये काहीसं खुलं वातावरण आहे. मात्र, खिया स्वतःच स्वतःला पापपुण्याच्या संकल्पनेत अडकवून घेत आहेत. अशा वेळी अमांडा डोनोही सारखी कलाकार जेव्हा सिनेमामध्ये येशूवर थुंकण्याचा सीन देते, तेव्हा तिच्यावर महिलांकडूनच प्रचंड टीका केली जाते. मात्र, यावर नास्तिक विचारसरणीची अमांडा म्हणते, “हजारो वर्षांपासून स्त्रियांची लैंगिकता ताब्यात ठेवणारे, त्यांचा छळ करणारे पुरुषदेव मी मानत नाही... त्यामुळे येशूवर थुंकायचा सीन शूट करताना मला भीती वाटली नाही... उलट मी त्याचा आनंद घेतला.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अमांडाप्रमाणे कृती करायची गरज नाही, गरज आहे आपल्या धर्मात आपले स्थान शोधण्याची, आपल्याला आपला धर्म किती स्वातंत्र्य देतो हे तपासण्याची. हे खरे आहे की जोवर महिलांमधून एखादी धर्म संस्थापक येत नाही किंवा धर्मग्रंथांचे लेखन एखादी महिला करत नाही, तोवर तिला धर्माधारीत स्वातंत्र्य मिळणार नाही. अशा वेळी तिच्यासाठी एकच पर्याय सर्वोत्तम आहे. धर्म नाकारून, केवळ "माणूस" म्हणून जगणे. ना कोणी धर्मसंस्थापक, ना कोणता धर्मग्रंथ... जातीधर्माच्या भिंती पाडून, वंश आणि लिंगाचे बंधन मोडून, माणूस बनून मोकळेपणाने जगायचे. कोणतेही कर्मकांड करायचे नाही. मुक्त... मस्त... बिनधास्त जगायचे. माणूस म्हणून जगण्यास सुरुवात करायची.

नास्तिक मेळाव्याला येणाऱ्या साथींना “आपणदेखील देव आणि दैव या संकल्पना नाकारता का? आपलाही आपल्या मन, मेंदू आणि मनगट यावर विश्वास आहे? देवा-धर्माचा अहंकार बाळगण्यापेक्षा मानवता हे मूल्य जोपासणे आपणास महत्वाचे वाटते, तर मग आपले नास्तिकत्व बिनधास्त व्यक्त करा”, असे आवाहन करत या विषयावर त्यांचे अनुभव व्यक्त करण्यास सांगितले.

त्याला प्रतिसाद देत काही साथींनी आपले अनुभव, आपली भूमिका, आपले मनोगत मांडले, ज्यांचे संकलन करून आज ही पुस्तिका आपल्या हातात पडते आहे. मला येथे प्रस्तावना करायची संधी मिळाली, यासाठी या पुस्तिकेसाठी मेहनत घेणाऱ्या विवेक आणि मुस्तफा सरांचे आभार. आपण सर्व या विषयावर बिनधास्त बोलत राहू, एकमेकाशी संवाद साधत राहू.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......