खाद्यसंस्कृती आणि घरगुती वापरातील वस्तू-उपकरणं हे विषय आणि लेखक कोण, तर डॉ. अरुण टिकेकर, हे समीकरण गोंधळात टाकणारं वाटावं
ग्रंथनामा - झलक
प्रदीप चंपानेरकर
  • अरुण टिकेकर आणि ‘इति-आदि’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 February 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक इति-आदि ITI-AADI अरुण टिकेकर Arun Tikekar

‘इति-आदि : दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास’ हे ‘लोकसत्ता’चे माजी संपादक अरुण टिकेकर यांचं पुस्तक नुकतंच रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला चंपानेरकर यांनी लिहिलेलं हे प्रकाशकीय...

.............................................................................................................................................

अनेक वेळा लेखकाला त्याच्या लेखनप्रकारासाठी एक ओळख प्राप्त होऊन जाते. वाचकाचा ‘ओळखी’ला अनुसरूनच त्या लेखकाकडून पुढच्या लेखनाची अपेक्षा करतो. मात्र, अनेक लेखकांनी आजवर त्यांच्या लेखन-प्रकृतीशी फारकत घेऊन वेगळ्या ढंगाचं लेखन केलं आहे आणि वाचकांना चकीत केलं आहे. अरुण टिकेकर यांनी प्रामुख्याने गंभीर प्रकृतीचं लेखन केलं आहे. प्राथमिकत: वैचारिक लेखन ही त्यांचा मुख्य प्रांत असला, तरी लेखनाचे विविध फॉर्म्स, विविध बंध त्यांनी आपल्या  लेखनासाठी अनेकदा वापरले आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांना त्या लेखनातून जे काही सांगायचं होतं, ते त्यांनी त्या ‘फॉर्म्स’मधून प्रभावीपणे व्यक्त केलं आहे.

‘कालचक्र’ हे त्यांचं पुस्तक त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीच आम्ही प्रकाशित केलं. तर ‘कालांतर’ हे पुस्तक त्यांच्या निधनानंतर आम्ही प्रकाशित केलं. या दोन्ही पुस्तकांच्या लेखनावर नजर टाकली, तर लक्षात येतं की लेखनाचा ‘ललितबंध’ ही त्यांनी किती लिलया पेलला आहे ते. मात्र, या लघुलेखनातूनही ते बरंच काही सांगून जातात, आणि त्यांची लेखनाची शिस्त आणि लेखनातला टोकदारपणाही त्यांनी कुठे गमावला नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रस्तुत ‘इति-आदि’ हे पुस्तकही असाच अनुभव देणारं आहे. या पुस्तकातील लेखांचे विषय जर वरचेवर नजरेखालून घातले तर तर थोडं गोंधळून जायला होईल. खाद्यसंस्कृती आणि घरगुती वापरातील वस्तू-उपकरणं हे विषय आणि लेखक कोण, तर डॉ. अरुण टिकेकर, हे समीकरण गोंधळात टाकणारं वाटावं. परंतु हे लेख वाचल्यावर लक्षात येतं या लिखाणामागचा दृष्टिकोन आणि त्याचा बाज अगदी ‘टिकेकरीय’ आहे. अनेक पदार्थांचा, जिन्नसांचा आणि दैनंदिन जीवनातील वस्तूंचा अनेक शतकं मागे जाऊन घेतलेला हा धांडोळा आहे. म्हणजेच मानवी संस्कृतीचा हा एक इतिहासच आहे. आणि इतिहास व टिकेकर हे समीकरण तर घट्टच आहे. मात्र, या लेखनाची भाषा ठरावीक इतिहासलेखनाची नाही. ती भाषा सर्वसामान्यांच्या पचनी पडेल अशी आहे. पण हे लेखन कसदार आहे. त्या त्या विषयातले विविध पैलू शैलीदार पद्धतीने सांगितल्याने सर्वसामान्य वाचक त्यात सहजी रंगून जाईल. त्याची काही कुतूहलं शमतील, तर काही नवी कुतूहलं निर्माण होतील, त्याचं रंजन होईल आणि तो समृद्ध होत जाईल.

टिकेकरांची या पूर्वीही काही पुस्तकं मी प्रकाशित केली आहेत. पुढील पुस्तकं मीच प्रकाशित करावीत अशी त्यांची इच्छा होती. मात्र, पहिल्या नकाराचा विकल्पही माझ्यापुढे खुला ठेवला होता. टिकेकरांची पुस्तकं प्रसिद्ध करणं हा एक वैयक्तिक आनंदाचा आणि व्यावसायिक समाधानाचा भाग होता. त्यामुळे नकाराधिकाराचा वापर करण्याचा बहुतांश वेळा प्रसंगच आला नाही. आणि त्यातूनच ‘इति-आदि’ प्रसिद्ध करण्याची संधी प्राप्त झाली. मात्र, मजकूरावरचे काम पूर्ण झालं आणि काही दिवसांत टिकेकरांचं आकस्मिक निधन झालं. ‘कालचक्र’ या त्यांच्या पुस्तकासाठीचं प्रास्ताविक पाठवलं आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी फोन केला. त्यावेळी मी त्यांना ‘इति-आदि’च्या मनोगताचीही आठवण करून दिली... आणि नंतर चार दिवसांतच अघटित घडलं... ते फोनवरचं बोलणं अखेरचं ठरलं.

दुर्लभ खजिना असलेलं हे पुस्तक प्रसिद्ध करायचं तर होतंच, पण आत प्रस्तावना कोणाची हा प्रश्न होता. मात्र, या प्रश्नावर फार विचार करायची वेळ माझ्यावर आली नाही. सुहास कुलकर्णी हे टिकेकरांचे चाहते, स्नेही आणि एक प्रकारे चेलेही. ते माझेही उत्तम मित्र आहेत. आम्ही एकत्रितपणे काही मोठ्या प्रकल्पांवर कामही केलं आहे. त्यामुळे राजकारण-समाजकारण या त्यांच्या मुख्य विषयांव्यतिरिक्त त्यांना इतर विषयांतही गोडी आहे, रस आहे, जिज्ञासा आहे हे मी जाणून होतो. तेव्हा या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याची आदेशवजा विनंती मी त्यांना केली. टिकेकरांवरील (आणि काही प्रमाणात माझ्यावरील) प्रेमामुळे ही विनंती अव्हेरणं त्यांना शक्य नव्हतं. प्रेमाखातर लिहिलेली ही प्रस्तावना वाचली तर लक्षात यावं की प्रस्तावनेसाठीची माझी निवड किती योग्य होती. ही प्रस्तावना टिकेकरांचं लेखन आणि पुस्तकाचा विषय यांचा संतुलितपणे ऊहापोह करते. वाचकांना पुस्तक वाचनासाठी दृष्टिकोन प्रदान करते.

टिकेकरांच्या वाढदिवशी, म्हणजे १ फेब्रुवारीला हे पुस्तक एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई यांच्या सहयोगाने होत आहे. ‘एशियाटिक’ हा टिकेकरांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. तेव्हा हे पुस्तक ‘एशियाटिक’च्या वास्तुत प्रकाशित होणं याचा वेगळं महत्त्व प्राप्त होतं.

आज (१९-१-२०२०) टिकेकरांचं निधन होऊन चार वर्षं झाली. तेव्हा या पुस्तक प्रकाशनाला विलंब झाला ही बाब उघडच आहे. परंतु मनीषा टिकेकर यांनी या दरम्यान मला केवळ एकदाच आठवण करून दिली. तेव्हा त्यांच्या संयमित व्यक्तिमत्त्वाचा, त्यांचा सौजन्याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.

पुस्तक प्रकाशित होताना एका बाजूला समाधान आहे, तर दुसऱ्या बाजूला टिकेकर या प्रसंगी नसल्याची खंत आहे. या संमिश्र मनोवस्थेतच त्यांचं हे महत्त्वाचं पुस्तक रसिक वाचकांपुढे सादर करत आहे...

.............................................................................................................................................

‘इति-आदि’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5195/Iti-Ityadi

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......