या ‘जलनायिकां’नी आपल्या दुष्काळग्रस्त भागात पाणी आणलं. या परिणामाइतकाच या प्रत्येकीचा प्रवास सुंदर आहे. प्रेरणादायी आहे. आणि तो थांबलेला नाही...
ग्रंथनामा - झलक
सुजाता खांडेकर
  • ‘जलनायिका (गोष्ट पाण्याची… लोक नेतृत्वाची)’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 14 January 2023
  • ग्रंथनामा झलक जलनायिका Jalnayika कोरो इंडिया Coro India

व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’, ‘माणदेशी माणसं’ ही पुस्तकं ज्या परिसराचं चित्रण करतात, तो म्हणजे सातारा जिल्ह्यातला माण हा दुष्काळी तालुका. या तालुक्यातल्या काही महिला ‘कोरो’ (CORO) या स्वयंसेवी संस्थेच्या सोबतीनं उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या गावात बदल घडवून आणला. अशा १० महिलांच्या यशोगाथा त्यांच्याच शब्दांत सांगणारं ‘जलनायिका’ हे पुस्तक नुकतंच ‘कोरो’ने प्रकाशित केलंय. या पुस्तकाला ‘कोरो’च्या संस्थापक, संचालक डॉ. सुजाता खांडेकर यांनी लिहिलेलं हे प्रास्ताविक...

.................................................................................................................................................................

‘कोरो’च्या कामाची आणि परिणामांची (इम्पॅक्ट) चर्चा होत असताना आम्हाला एक प्रश्न नेहमी विचारला जातो- ‘तुम्ही एकल महिला, लिंगाधारित हिंसा, वन हक्क, दुष्काळग्रस्त भागातील पाणी टंचाई, दलितांवर होणारे अत्याचार, भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न, राईट टू पी (स्त्रियांसाठी सार्वजनिक ठिकाणी मुताऱ्या) अशा एकमेकांशी संबंध नसलेल्या मुद्द्यांवर काम का करता? तुमची नक्की व्हिजन काय? थिअरी ऑफ चेंज (बदलाबद्दलचं आकलन काय?) वगैरे, वगैरे’.

‘जलनायिका’ हे एका अर्थानं या प्रश्नाचं उत्तर आहे, असं मला वाटतं. कारण या सगळ्या कामांच्या मुळाशी ‘आंतरिक नेतृत्व’ (लीडरशिप विदिन) व्यक्तीतून आणि समूहातून व्यक्त झालेलं आहे. ‘जल नायिका’ने प्रक्रियेकडे पाहण्याची एक खिडकी उघडली आहे. ही प्रक्रिया कोणाची आहे? कोणासाठी आहे? लिंग, जात, वर्ग, धर्म, लैंगिक अभिमुखता (orientation) यांसारख्या मूलगामी किंवा अगदी शहरी ग्रामीण किंवा शिक्षण वगैरे यांसारख्या मुद्द्यांवर जे उपेक्षित आहेत, ज्यांना अव्हेरल गेलं आहे, अशा लोकांची, समाजाची त्यांच्यासाठी चालवलेली प्रक्रिया आहे.

या सगळ्या घटकांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे एकूण समाजाने, त्यातल्या प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे त्यांची तयार केलेली स्वतःची प्रतिमा, ओळख आणि स्वतःबद्दलची जाणीव. लोकांनी तयार केली आणि यांनी पूर्णपणे मान्य केली. ती ओळख ‘आपल्यात काहीतरी कमी आहे, आपण बिन-महत्त्वाचे आहोत, आपल्याला किंमत नाही, आपण काही बदल करू शकत नाही, आपली परिस्थिती ही आहे आणि अशीच राहणार...’ अशी न्यूनगंड आणि हतबलतेने पुरेपूर भरलेली स्व- प्रतिमा पद्धतशीरपणे बांधली जाते, जोपासली जाते. आणि हे अव्याहतपणे चालूच आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘कोरो’चा स्वतःचा प्रवास आणि अनुभव सांगतो की, उपेक्षितांच्या परिस्थितीत तेव्हाच बदल होईल, जेव्हा ही वाढवलेली मानसिकता, स्व-प्रतिमा मुळातून बदलेल. आपलं महत्त्व, आपली ताकद आणि आपल्या खच्चीकरणाचं षडयंत्र समजलं की, याच समुदायातून झळाळून नेतृत्व पुढे येतं. ते सर्वांना बरोबर घेऊन असाध्य वाटणाऱ्या गोष्टी घडवतं. कोणी आदिवासी समूहाचं नेतृत्व करत, आदिवासींच्या वन-हक्काचा मुद्दा घेऊन त्यांच्या जीवनमानाच्या बदलाचा प्रयत्न करतात. तर कोणी एकल महिला त्यांच्यावरची बंधनं, अन्याय, घृणा यांच्या विरोधात संघटित होतात.

‘जलनायिका’ सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागातला पाण्याचा मुद्दा घेऊन भिडल्या आहेत. त्यांच्यात स्वतःबद्दल जागृत झालेला विश्वास, वर्षानुवर्षं त्यांनी सहन केलेल्या घुसमटीची जाणीव आणि आपल्या अस्तित्वाला अर्थ देणारं काम करण्याचं मोटिवेशन आणि उर्मी, या सगळ्यांचा परिपाक आहे. त्यांनी स्वतः यापूर्वी कल्पनासुद्धा न केलेल्या कामाचं नेतृत्व आणि अंमलबजावणी करण्यात झालेला दिसतो. त्यांच्या बदलेल्या स्व-प्रतिमेच्या साक्षात्कार त्यांना त्यांच्या तहानलेल्या गावांमध्ये पाणी आणण्याच्या प्रक्रियेत करता आला.

आणि या पाणी प्रक्रियेत शिकलेल्या गोष्टी, समजलेला समाज, आलेलं सामाजिक प्रक्रियेचं भान, यांनी त्यांची ‘पॉवरफुल’ स्व-ओळख अधिक पक्की केली. असं हे चक्र आहे. म्हणूनच लोकांना गावाचे पाण्यासाठी नकाशे बनवताना, माणसाच्या जगण्याचे नकाशे समजले. असं सुरेखाताई त्यांच्या कथेत सांगतात. या प्रक्रियेत सामील झाल्यावर एक माणूस म्हणून आपल्याला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे, असं मनीषाताईंना वाटतं.

गावात पाणी आणण्यासाठी लोकांना कसं एकत्र केलं, तांत्रिक बाबी काय समजल्या/समजून घेतल्या, ‘ग्रामकोष’सारखी जबाबदारी कशी सहज पेलली वैगरे. तर पुस्तक वाचताना समजतंच, पण मला थोडा त्यांचा बदलणारा बदलेला दृष्टीकोन अधोरेखित करावासा वाटतो.

‘जिथं अगोदर पुरुष की बाई, मग बाई आहे तर तिची जात कोणती हे तिला बोलायला द्यावं की नाही, हे ठरवलं जातं. तिथं ती कशी सर्व क्षेत्रांत पुढे बघून जाणार?’ हा अस्मिताताईंना पडलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. ‘आज बोललो नाही, तर कधीच बोलू नाही शकणार. बोल स्वतःशी... मी निडर आहे, आणि मांड तुला जे दिसतंय, आणि समजतंय ते’, हे बेबीताईंनी स्वतः लाच समजावलं. आणि ग्रामसभेत निडरपणे बोलल्या, हे महत्त्वाचं आहे. बसायचं कसं, हसायचं किती (नाहीचं हसायचं), काय बोलायचं, काय घालायचं, कुठे जायचं आणि कुठं पर्यंत जायचं, हे ठाकून ठोकून शिकवलेल्या तालमीत तयार झालेल्या स्वातीताईंना ‘पाणीशाळे’चं चित्र ‘एकमेकांना टाळ्या देऊन, बिनधास्त, हसत खेळत शिकत, गावाच्या समस्या सोडवणाऱ्या बायकांच्या रूपात दिसतं’ हे महत्वाचं आहे.

१४व्या वर्षी ‘टाकलेली’ असं लेबल घेऊन पुढचं आयुष्य जगणाऱ्या कल्पनाताईंची भावना मार्मिक आहे. त्या म्हणतात, ‘आपल्याकडे कसं आहे बघा ना, मुलींचं आयुष्य किती स्वस्तय ना? कोणीतरी ठरवतं- लग्न करायचं, कोण ठरवतं- मुलगी येडी हाय. काही कळत नाही. मुलीला सोडून देऊन ते मुलाचं दुसरं लग्न लावतात, आणि त्यांना दुसऱ्या पोरीपण भेटतात. आणि आम्ही मात्र बसतो शोधत की, आमच्यात नक्की दोष काय व्हता?’ आयुष्यभर स्वीकारलेल्या परिस्थितीबद्दल हा प्रश्न पडणं, हे विशेष आहे, महत्त्वाचं आहे.

शाळेत जाताना तरण्याताठ्या मुली एवढं लांब कसं जाणार, असे भीतीवजा प्रश्न विचारून आई-वडिलांनी त्यांची शाळा सोडायला लावलेल्या विजयाताईंना, ‘आजूबाजूच्या लोकांची दांभिकता लक्षात येते. कारण ही मंडळी तरण्याताठ्या मुली शेतात काम करायला पाच किमी लांब जातात, त्या वेळी भीतिवजा प्रश्न विचारत नाहीत.’ किंवा ‘दुष्काळ हा फक्त आमच्या ताटात दिसत नाही, बाकी शरीरापासून मेंदूवर त्याचा परिणाम आहे’ असं पद्माताईंना वाटणं. किंवा ‘पुरुषांचा बायकांनी पुढे यायला विरोध होता असं नाही, पण बायकांनी पुढे यायला पाहिजे असं आवर्जून विचार कोणी केला नव्हता’, असं नंदाताईंना वाटणं हे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल बोलतं.

पाण्याच्या प्रश्नांची जाणवलेली दाहकता, अस्मितेची नव्यानं झालेली जाणीव. त्यातून सगळ्यांना पाणी प्रश्नावर एकत्र येऊन घेतलेला मोकळा श्वास... मग गावानं दिलेली नवी ओळख- लीडर म्हणून, सन्मानीय व्यक्ती म्हणून, सरपंच म्हणून, एक स्वतंत्र विचारी माणूस म्हणून…

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या जलनायिकांनी आपल्या दुष्काळग्रस्त भागात पाणी आणलं, या परिणामाइतकाच या प्रत्येकीचा प्रवास सुंदर आहे. प्रेरणादायी आहे. आणि तो थांबलेला नाही. आत्ता गावाबाहेर त्यांच्या पिकांचे पॅटर्न, समन्यायी पाणी वाटप याबद्दल चर्चा सुरू आहे. हे धाडसाचं काम आहे. कारण त्यात फार गुंतागुंतीचे हितसंबंध आहेत. पाणी आणण्याइतकंच पाणी टिकवणं, वाढवणं आणि न्याय पद्धतीनं वापरणं, यांवर आता या जलनायिकांचा भर आहे.

जे जलनायिकांबाबत घडलं, तेच इतर उपेक्षित समुदायातही घडत आहे. कोणाला लिंगाधारित रचनेच्या षडयंत्राचं भान येतंय… कोणाला जातीवर आधारित रचनेचं, कुठे आदिवासी समुदायाच्या अस्मिता, कुठे स्व ओळख फुलतेय, तर कुठे धर्मामुळे अव्हेरलं गेलेल्यांच्या स्वतः च्या शक्तीचं, गुणांचं, ताकदीचं…

ही या प्रक्रियेच्या ‘विविधतेतील एकता’ आहे. ही जोपासण्याची जितकी जबाबदारी या नायक-नायिकांइतकीच याच अवलोकन करणाऱ्यांची आहे. या उभरत्या नेतृत्वाला ओळखणं, त्याचा सन्मान करणं आणि त्याचा आनंदोत्सव (सेलिबरेशन) करणं, ही या प्रक्रियेची गरज आहे.

म्हणूनच ‘जलनायिका’ प्रकाशित करताना ‘कोरो’ ग्रासरूटमध्ये करत असलेली प्रक्रिया आणि त्याचे परिणाम, त्याचं अवलोकन याच्याकडे पाहण्याची एक खिडकी उघडली जात असल्याचा आनंद आहे.

हे घडवण्यासाठी सतत विचार करणारी, जागरूक असणारी ‘कोरो’ची टीम, यात सहभागी झालेल्या संस्था-संघटनांची टीम यांच्याबद्दल सहप्रवासी असल्याचीच भावना आहे. हे मनोगतही आमच्या सर्वांच्या वतीनेच आहे.

‘जलनायिका (गोष्ट पाण्याची… लोक नेतृत्वाची)’ - कोरो इंडिया, मुंबई

पाने – ९५ | मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......