‘मानवाचे अंती एक गोत्र’ हा आपला उत्क्रांती मंत्र असावयास हवा. आपण जैविक उत्क्रांतीबरोबरच सांस्कृतिक उत्क्रांतीची फलश्रुती आहोत!
ग्रंथनामा - झलक
सुनीती धारवाडकर
  • ‘मानवाचे अंती एक गोत्र’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 08 June 2021
  • ग्रंथनामा झलक मानवाचे अंती एक गोत्र सुनीती धारवाडकर Suniti Dharwadkar उत्क्रांती Evolution चार्ल्स डार्विन Charles Darwin

लेखिका डॉ. सुनीती धारवाडकर यांचे ‘मानवाचे अंती एक गोत्र’ हे जीवसृष्टीची वाटचाल आणि उत्क्रांतीची उकल करणारे पुस्तक नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाले आहे. त्याला लेखिकेने लिहिलेले हे मनोगत...

..................................................................................................................................................................

उत्क्रांती-तत्त्वाच्या ज्ञानाचा आता वटवृक्ष होऊ लागला आहे. त्यात अनेक प्रकारचे अभ्यास भर टाकत आहेत. उत्क्रांतीय आकलनाचा पाया असलेल्या विविध शाखा विकसित होत आहेत. उदा. उत्क्रांतीय- जीवशास्त्रीय विकास, उत्क्रांतीय  मानसशास्त्र, सांस्कृतिक उत्क्रांतीय सिद्धान्त, उत्क्रांतीय वर्तणूकशास्त्र इत्यादी. तसेच या तत्त्वाच्या उपयोजनाचीही व्याप्ती वाढत आहे. निरनिराळ्या संशोधन क्षेत्रांत आणि औषधांच्या विकसनासाठी ते कामी येत आहे. विषाणूंच्या उत्क्रांतीय अभ्यासातून त्यांच्या संसर्ग रोगांबद्दलचे ज्ञान आपल्या हाती येत आहे. सध्या जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंबंधीचे यच्चयावत ज्ञान मिळवताना आणि त्यावर लसी विकसित करताना या विषाणूच्या उत्क्रांतीबद्दलची माहिती उपयोगी पडत आहे. असे अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेल्या उत्क्रांती-तत्त्वाबद्दलचे विविध पैलू आपल्या समोर मांडावेत म्हणून हा लेखनप्रपंच!

या विश्वाचा पसारा अवाढव्य आहे. आपल्या आकाशगंगेसारख्या दोन अब्ज आकाशगंगा या विश्वात सामावलेल्या आहेत. आपल्या आकाशगंगेत सूर्यासारखे शंभर अब्ज तारे आहेत. आणि आपला सूर्य  आपल्या पृथ्वीच्या लाखोंपटीने मोठा आहे. अफाट मोठ्या विश्वाचा एक सूक्ष्म कण असलेल्या पृथ्वीवर आपली मानवजात एक अतिसूक्ष्म असा परमाणू ठरावी. तरी आपल्या श्रेष्ठत्वाच्या कल्पना किती उत्तुंग! 

आपल्याला नेहमी वाटत आले आहे की, आपण या सृष्टीत सर्वश्रेष्ठ आहोत आणि आपण जग जिंकण्याची भाषा बोलत आलेले आहोत. उत्क्रांतीवर दृष्टिक्षेप टाकला की, आपल्या लक्षात येते- निसर्गामध्ये ना कोणी श्रेष्ठ, ना कोणी कनिष्ठ! कोणाला जिंकण्याऐवजी, कोणाला कह्यात ठेवण्याऐवजी एकमेकांच्या सहकार्याने आपण उत्क्रांतीला सार्थकत्व प्राप्त करून देऊ शकतो. आणि असा विचार करण्यासाठी आपल्याला उत्क्रांतीने एक अनन्यसाधारण अशी ‘मेंदू’ नावाची अद्वितीय देणगी बहाल केली आहे!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तुम्ही जर कोट्यवधी वर्षे चालत आलेल्या उत्क्रांतीच्या आलेखावर नजर टाकली तर काय दिसेल? ही केवळ संघर्षांची कहाणी नाही तर सह-उत्क्रांतीच्या विविध धाग्यांनी विणलेली कथानके त्यात गुंफलेली आहेत.

निसर्गातील सर्व घटक आपापल्या जागी यथायोग्य आहेत आणि त्यांची कामे चोख बजावत आहेत, म्हणून निसर्गचक्र चालू आहे. उत्क्रांती एक प्रक्रिया आहे, हळूहळू बदलाची! ती समजून घेतली तर अनेक बाबी सोप्या होत जातील. 

उत्क्रांतीची प्रक्रिया आपल्याला सप्रमाण सांगते की, सर्व जीवमात्रांचे अंती एकच सामायिक सूत्र आहे. अनेक तत्त्ववेत्त्यांनी मांडलेली ‘सर्व चराचरात एकत्व’ ही संकल्पना उत्क्रांती सिद्धान्त अधोरेखित करते, आणि आपल्याला शास्त्रीय बळ मिळवून देते.

मानवी जनुकीय प्रकल्पासारखे अनेक जनुकीय/अनुवंशिक अभ्यास दर्शवतात की, जगातील विविध भौगोलिक भागांत राहणारे, विविध संस्कृतीचे, विविध भाषेचे, विविध धर्मांचे, विविध रंगाचे लोक जनुकीयदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. त्याची जनुकीय सामग्री-जीनोम-९९.९० टक्के एकसारखा आहे.

या पुस्तकाच्या सहा प्रकरणांतून उत्क्रांती-तत्त्वाची ओळख करून देत त्याचा मानवाच्या जगण्याच्या दृष्टीने अन्वयार्थ लावण्याचा मी प्रयत्न केला आहे.

चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडला आणि जीवसृष्टीतील विविध जीवजातीच्या आणि वंशवृक्षांच्या शाखांचे व वंशवेलींच्या विस्ताराचे चित्र स्पष्ट होऊ लागले. माणसाच्या उत्क्रांतीवरही त्याने प्रकाश टाकला. नवनवीन शोधांबरोबर नैसर्गिक निवड आणि जनुकीय बदल, यातील परस्परसंबंध उलगडत गेले. पहिल्या प्रकरणातून आपल्याला याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

दुसऱ्या प्रकरणात जीवोत्पत्ती ते माणसाचे पदार्पण अशा काही अब्ज वर्षांपासूनच्या प्रवासाचे विहंगमावलोकन केले आहे. तिसऱ्या प्रकरणात उत्क्रांतीचे टप्पे ठरवण्यासाठी वापरली जाणारी तंत्रे, जीवाश्मांची मध्यवर्ती भूमिका आणि या सर्वातून उत्क्रांती-कालदर्शिकेचे केले गेलेले अवलोकन रेखाटले आहे.

त्यानंतर आपण माणसाच्या उत्क्रांतीकडे वळतो (प्रकरण ४ थे). या प्रकरणात सस्तन प्राणी, नरवानर-गण, कपी आणि नंतर होमोचा – मानव - उदय ते टप्पे प्रवाह-तालिकेच्या मदतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अनेक प्रकारचे ‘होमो’ कधी एकानंतर एक, तर कधी साथ साथ उत्क्रांतीत होत होते. त्यातून ‘होमो सेपियन’ हा आजचा आधुनिक मानव उदयास आला. या सर्वांचा आलेख बघताना आपल्या पूर्वजांनी अनेक स्थित्यंतरे पचवून कशी नागमोडी वाटचाल केली असावी याची कल्पना येते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मानवी उत्क्रांतीचा इतिहास साधारण साडेपाच कोटी वर्षांपूर्वी नरवानर गणापासून – प्रायमेट्सपासून- सुरू झाला. त्यातून उदयास आलेल्या आजच्या मानवजातीला - सेपियनला पदार्पण करून अवघी दोन लक्ष वर्षे झाली आहेत. शेतीची सुरुवात साधारणत: दहा हजार हजार वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर मानवी सभ्यता व संस्कृती यांच्या विकासाला सुरुवात झाली. या आलेखावर नजर टाकताना प्रकर्षाने जाणीव होते की, साडेचार अब्ज वर्षे जुन्या असलेल्या आपल्या पृथ्वीच्या इतिहासापुढे मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती नगण्य आहेत. आणि आपल्या लक्षात येते की, पाणी बदलत बदलत, वळणे  घेत घेत, जीवनाचा प्रवाह हा अखंडपणे वाहत आहे!

उत्क्रांती सिद्धान्ताबद्दल काहीजणांना  मनात काही शंका आणि गैरसमज असतात. त्यांचे पुराव्यासहित साधार निरसन करण्याचा प्रयत्न पाचव्या प्रकरणात केला आहे.

माणसासाठी उत्क्रांती फक्त जैविक नसते. सेपियनच्या आगमनानंतर मानवाची उत्क्रांती ही जास्त करून सांस्कृतिक आणि सामाजिक राहिलेली आहे. यामध्ये आपली द्विपादवस्थेला आणि मेंदू-विकसनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे! आपल्या अनोख्या स्थानाबरोबरच आपल्या काही विलक्षण अशा क्षमता आपल्याला प्राप्त झाल्या. पण त्याचबरोबर एकप्रकारे जोड व वा दुय्यम परिपाक म्हणून अहंपणा, आक्रमकता, अशा काही नकारात्मक गोष्टीही उत्पन्न झाल्या. सकारात्मकतेचे सामर्थ्य बळकट करत आणि नकारात्मकतेतील विनाशकारकता पुसून टाकत आपण एकमेकाला साथ देत, सहकार्य भावनेने राहून आपली सांस्कृतिक आणि सामाजिक उत्क्रांती जास्त प्रगल्भ करायची आहे. उत्क्रांती-तत्त्वाने दिलेली जीवनाची गतिशीलता कवेत घेत, संवेदनशीलता जपत, सदसदविवेकबुद्धीच्या साथीने आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जात-पात, उच्च-नीच अशा कल्पना उत्क्रांतीमध्ये, निसर्गात नसतात. त्या माणसाने जन्माला घातल्या आहेत. त्यापासून लवकर सुटका करून घ्यावयास हवी. निसर्गातील प्रेरणा युगानुयुगे समान राहतात, मात्र मानवी प्रेरणा दर पिढीगणिक बदलतात, उन्नत होतात. आपला समाज आपण निर्माण केलेल्या समजुतींवर आणि धारणांवर आधारलेला आहे. त्या धारणा आपल्याला होणाऱ्या नवनवीन ज्ञानाने आणि गरजेने बदलणे आवश्यक असते. आणि मुख्य म्हणजे तसे बदल करत करत आपण इथवर मार्गक्रमण करत आलेलो आहोत. कारण ‘थांबला तो संपला’!

‘मानवाचे अंती एक गोत्र’ हा आपला उत्क्रांती मंत्र असावयास हवा. आपण जैविक उत्क्रांतीबरोबरच सांस्कृतिक उत्क्रांतीची फलश्रुती आहोत, जिची वाटचाल करताना मानवाला बुद्धीची आणि अनुभवाची शिदोरी कामी आली.

‘मानवाचे अंती एक गोत्र’ - डॉ. सुनीती धारवाडकर

लोकवाङ्मय गृह, मुंबई

मूल्य - २५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......