सध्याच्या विखारी आणि हिंसक पुरुषत्वाच्या काळात ‘लिंगभावसमानता’ आणण्यासाठीच्या प्रयत्नांना हे पुस्तक हातभार लावणारं आहे!
ग्रंथनामा - झलक
मनीषा गुप्ते
  • ‘चाकोरी मोडणारे पुरुष’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 28 December 2021
  • ग्रंथनामा झलक चाकोरी मोडणारे पुरुष Chakori Modnare Purush हरीश सदानी Harish sadani मावा MAVA मेन अगेन्स्ट व्हायलन्स ॲन्ड अब्युज Men Against Violence and Abuse

‘मावा’चे हरीश सदानी यांनी जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत दै. ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीत ‘जोतीबांचे लेक’ हे पाक्षिक सदर लिहिले. ‘लिंगभेदविरहित समाज हाच आधुनिक जगण्याचा पाया आहे’ हे समजलेल्या आणि त्यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीची चाकोरी मोडत स्त्रीला सामर्थ्य देणाऱ्या देशभरातील विविध क्षेत्रांतील पुरुषांच्या कहाण्या या सदरातून त्यांनी मांडल्या. ते नुकतेच ग्रंथालीने ‘चाकोरी मोडणारे पुरुष’ या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला ‘महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ’ (मासूम)च्या डॉ. मनीषा गुप्ते यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

..................................................................................................................................................................

हरीश सदानी यांची दैनिक ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीत ‘जोतीबांचे लेक’ ही पंधरवड्याने प्रकाशित होणारी लेख-मालिका आता पुस्तकाद्वारे संकलित होत असल्याकारणाने पुरोगामी समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पडली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत हे सदर छापल्याबद्दल, आणि ते आता  पुस्तकरूपात प्रकाशित केल्याबद्दल प्रथम अनुक्रमे दै. ‘लोकसत्ता - चतुरंग’ आणि ग्रंथाली यांचे मनःपूर्वक आभार, आणि हरीशचे अभिनंदन.

जेव्हा हरीशने मला हे सदर लिहिणार आहे, असे सांगण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी फोन केला तेव्हा हरीशने हे सदर लिहावे असे ज्या कारणांसाठी ‘लोकसत्ता – चतुरंग’ला वाटलं असेल, ते उद्दिष्ट हरीशने लेखमालिकेतून पूर्ण केले पाहिजे, असा माझा प्रेमळ आग्रह होता. पुरोगामी चळवळीच्या अंगाने ही मालिका प्रेरणादायी ठरली पाहिजे, असं मला वाटलं होतं. प्रत्येक व्यक्तीची अतिशय मोलाची कामगिरी वाचकांपुढे आणणे, आणि त्यापलीकडे जाऊन सर्व लेखांना एकत्र गुंफणारे एक वैचारिक सूत्र असणे, हे महत्त्वाचे ठरेल, असं मी म्हटलं होतं. आज मागे बघता, हरीशने आपल्या मेहनतीद्वारे आणि साध्या-सोप्या शैलीमार्फत जे काही साध्य केले आहे ते अप्रतिम आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या पुस्तकातील लेखन मला अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. पारंपरिक वातावरणात लहानाचं मोठं होऊन नवी, पुरोगामी मानसिकता स्वतःमध्ये जाणीवपूर्वक रुजवणाऱ्या आणि त्यानुसार प्रत्यक्ष जीवनात बदल करणार्‍या पुरुषांची ओळख लेखांद्वारे होत आहे. या पुरुषांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात लिंगभावाच्या- लिंगभेदाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेण्याबरोबरच अवतीभोवतीच्या जनसमुदायामध्ये, वस्त्यांतील किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांमध्ये प्रभाव टाकून त्यांनाही त्यांची पारंपरिक प्रवृत्ती तपासून बदलण्यासाठी प्रेरित केलेले आहे. सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या, अनेकदा प्रतिकूल वातावरणाशी लढत, धडपडणाऱ्या पुरुषांच्या कहाण्या आहेत. प्रसिद्धी, पैसा वा इतर कुठल्याही प्रलोभनांपासून दूर सामाजिक बांधीलकीनं विधायक, रचनात्मक कार्य करणाऱ्या यांतील तरुणांच्या कथा या मला विशेष दखल घेण्यासारख्या वाटतात. अशा प्रकारचं लेखन दिलासा देतं, आश्वासक वाटतं. पुरोगामी मानसिकता थोडीफार जागृत झालेल्या तरुण पुरुषांना प्रेरणा देतं. ‘अशीही माणसं आपल्या समाजात आहेत’ ही जाणीव आधार आणि उभारी देते.

या कथा २२ पुरुषांचा माणूसपणाचा प्रवास सांगणाऱ्या स्वतंत्र कथा असल्या तरी त्यांची गुंफण करताना हरीशने एक समान धागा ठेवला आहे. पुरुष म्हणून आपल्याला मिळालेले विशेषाधिकार त्याज्य करून आपल्या आयुष्यातील स्त्रिया - मग ते आई, बहीण, काकी, मैत्रीण वा जोडीदार असो, त्यांच्यावर पुरुषप्रधान व्यवस्थेने घातलेले निर्बंध जाणून ते दूर करण्यासाठी ठोस पाऊल, या सर्वांनी आपल्यापरीनं उचलली आहेत, सन्मानानं, सुरक्षितपणं, स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्त्रियांनी जगावं, यासाठी शक्य तिथे हस्तक्षेप करत आहेत, अनेक अडथळे आले तरी ते न डगमगता विवेकी, संवादी व्यक्ती म्हणून सतत कार्यरत आहेत. पितृसत्ता व्यवस्था जशी स्त्रियांचं दमन करते, तशी ती पुरुषांनाही माणूस म्हणून जगण्यापासून दूर नेणारी अन्याय्य व्यवस्था आहे, याचे भान या बदलकर्त्यांना आहे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

एकूण २२ पुरुषांच्या आयुष्याचा प्रवास, त्यांच्या कर्तृत्वाची थोडीशी झलक लेखांच्या द्वारे आपल्यापुढे आलेली आहे. हे पुरुष देशभरातील विविध प्रांतातले आहेत, वेगवेगळ्या वयोगटातील (अगदी २९ पासून ७० वर्षं गाठलेले), विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत, वेगवेगळ्या जाती-जमाती आणि धर्मातील आहेत, आणि त्यांचे कामसुद्धा विविध पातळ्यांवरील आहे. ग्रामीण, आदिवासी क्षेत्र, शहरी आणि निम्न-शहरी अशा ठिकाणचे कार्यकर्ते आहेत, समाजकार्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेले आहेत. कोणी शिक्षणाच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींबरोबर काम करत आहे, तर कोणी समानतेची मूल्यं जोपासण्यासाठी वेगवेगळी माध्यमे तयार करत आहेत. कोणी मासिक पाळीसंदर्भात, लैंगिकतेच्या संदर्भात आणि निकोप नाती कशी निर्माण करून जोपासावी, यावर आरोग्य-संवादाचे काम करत आहे, कोणी खेळाच्या माध्यमातून मुलींमध्ये स्वतःची अस्मिता निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहे, तर कोणी दुखावलेल्या मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे, तर कोणी रोजगाराची आणि स्वयंरोजगारासाठीची संधी उपलब्ध करून देत आहे. पितृसत्तेचा आविष्कार विविध मार्गांनी होत असल्याकारणाने कोणी बालविवाह रोखण्याचे काम करत आहे, कोणी कौमार्य-परीक्षणाविरुद्ध बंड पुकारत आहे, तर कोणी लैंगिक शिवीगाळाच्या विरोधात अभियान राबवत आहे. कोणी मानवी तस्करी थांबवण्यासाठी धडपड करत आहे, कोणी वंचित घटकांमधील महिलांचे प्रश्न उचलत आहे, तर कोणी सामाजिक परिवर्तनाशी बांधीलकी असलेल्या आंदोलंनांमध्ये महिलांचे नेतृत्व उभारत आहे. वेगवेगळ्या रंगांच्या आणि सुवासाच्या फुलांचा सुंदर गुच्छ आपल्यापुढे आणून ठेवल्याचा अनुभव या लेखांमधून सतत मिळत राहतो.  

या सर्व पुरुषांमध्ये लिंगभाव, लैंगिकतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघण्याची वृत्ती आहे, सातत्याने व चिकाटीने आपल्याला भावलेल्या लिंगभावाच्या मुद्द्यांवर ते काम करत आहेत. त्यांतील काही जणांचे  काम हे एखाद्या संस्थेइतके विशाल आहे आणि इतर तरुणांनी ध्येयवादाने दीर्घ काम करण्याच्या दिशेने गेल्या काही वर्षांत पावलं उचलली आहेत. सर्वांचे कार्य उल्लेखनीय आहे. सर्वच लिंगभाव समानतेच्या वाटेवरील प्रवासी आहेत, वाटाडे आहेत. प्रत्येकाच्या कामाला सलाम आणि त्यांच्या कार्याच्या पुढील वाटचालीसाठी अनंत सदिच्छा!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

लिंगभेद, पितृसत्तेचे आणि जातीव्यवस्थेचे राजकारण यांच्याबद्दल निर्माण झालेली अस्वस्थता, आणि त्यामध्ये बदल घडवून आणायचा संकल्प निर्माण करणारा व्यक्तीच्या आयुष्यातील ‘तो’ क्षण लेखांमध्ये अचूकपणे टिपून घेतलेला आहे. काहींना लहानपणी आलेले अनुभव, तर काहींना पुढे जाऊन एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली प्रेरणा आंतरिक बदलासाठी कारणीभूत ठरली. स्वतःमधील अहंकारी पुरुषत्व नाकारत असताना इतर अनेक पुरुषांना या समानतेच्या वाटेवर येण्यासाठी प्रोत्साहित करणे कसे जमले, कुठे अडचणी आल्या (किंवा अजून येतच आहेत), आणि आव्हानांना सामोरे जाताना येणारे अनुभव तर या लेखांमध्ये आहेतच, पण हे सर्व करत असताना कोणती कार्यनीती उपयोगी पडली आणि ती कशी अमलात आणली हेसुद्धा वाचायला मिळते. आपण आयुष्याच्या कोणत्याही क्षणी लिंगभेदाचे निर्मूलन करण्यासाठी सज्ज होऊ शकतो, हा विश्वास तरुण मुलांमध्ये त्यामुळे दृढ होण्यास मदत होईल, असं मला वाटतं.   

लिंगभावसमानता आणण्यासाठीच्या प्रयत्नांना हे पुस्तक हातभार लावणार आहे, हे निश्चित. शाळा-महाविद्यालयांमधून आणि विविध शिबिरांमधून या पुस्तकाच्या प्रती सर्वत्र उपलब्ध व्हायला हव्यात. सध्याच्या विखारी आणि हिंसक पुरुषत्वाच्या पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुले आणि तरुण पिढीपुढे सकारात्मक असे आदर्श कमीच आहेत, हे मान्य करायला हवे. अशा प्रेरणादायी पुरुषांचे कार्य आणि मनोगत आपल्यापुढे मांडून एक मोठी त्रुटी हरीशने दुरुस्त केली आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात अहिंसक असणे, पुरोगामी समाजपरिवर्तनाच्या मूल्यांशी बांधीलकी असणे, व्यक्तिगत किंवा व्यावसायिक जीवनात अन्यायाविरुद्ध निर्भयतेने भूमिका घेत राहणे, आणि पुरुष- स्त्रियांमध्ये निकोप आणि समानतेवर आधारित नाते घडवण्याचा ध्यास मनात असणे हा वेडेपणा किंवा स्वप्नरंजित कल्पना नसून आपण स्वतः तसे घडू शकतो, हे या पुस्तकाद्वारे उदाहरणांसहित आणि गोष्टींच्या रूपाने सिद्ध करून दाखवले आहे. आशादायी पहाट दाखवणारे बरेच संकेत इथे आहेत.

‘चाकोरी मोडणारे पुरुष’ : हरीश सदानी

ग्रंथाली, मुंबई

मूल्य - १५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......