सीमाभागातील मराठीपण
ग्रंथनामा - झलक
दिलीप प्र. बलसेकर, सायली प्र. पिंपळे
  • ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा सीमावर्ती भागासह
  • Wed , 24 March 2021
  • ग्रंथनामा झलक सीमाप्रश्न बेळगाव-कारवार-निपाणी दीपक पवार Deepak Pawar महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प दाजीबा देसाई Dajiba Desai

‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ हे सीमाप्रश्नाबाबतचे पुस्तक नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे संपादन दीपक कमल तानाजी पवार यांनी केले आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिना’पासून रोज ‘अक्षरनामा’वर क्रमश: प्रकाशित करत आहोत...

..................................................................................................................................................................

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली व मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली. या महाराष्ट्राच्या एका बाजूस अथांग समुद्र, तर अन्य बाजूस गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, कर्नाटक व गोवा ही शेजारील राज्ये आहेत. एकूणच या राज्यांच्या महाराष्ट्राशी जोडून असलेल्या सीमा लक्षात घेता, महाराष्ट्राच्या मराठी भाषेने आपला ठसा शेजारील कर्नाटक राज्यावर कसा उमटवला आहे, याबाबत संक्षेपाने सदर लेखामध्ये प्रामुख्याने दोन्ही राज्यांतील जिल्हा गॅझेटिअर व जनगणना अहवाल, राज्य गॅझेटिअर व अन्य महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या आधारे, आढावा घेण्यात आला आहे.

सीमाभागाचा भौगोलिक दृष्टिक्षेप

महाराष्ट्र राज्याची निर्मिती, पुनर्रचना व राज्यातील विविध ठिकाणी झालेले आमूलाग्र बदल खालीलप्रमाणे पाहावयास मिळतात :

या देशात, १९५१-६१ या दशकातील राज्यांची पुनर्रचना ही एक महत्त्वाची घटना होती, यामुळे भारताचा राजकीय नकाशा पूर्णपणे बदलून गेला व अनेक नव्या राज्यांची निर्मिती झाली. यातच १९६० मध्ये महाराष्ट्राची एक नवीन राज्य म्हणून निर्मिती झाली. दोन टप्प्यात हा बदल घडून आला.

१. पहिला होता, भाषावार प्रांत रचनेतून तयार झालेला मुंबई प्रांत, ज्याचे क्षेत्रफळ होते, १,९०,६६८ चौ.मैल आणि १९५१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४८२.६५ लाख एवढी होती.

२. दुसरा टप्पा होता, १९६० मध्ये मुंबई प्रांताचे विभाजन होऊन दोन राज्यांची निर्मिती झाली,  ज्यामध्ये  २६ जिल्ह्यांचा महाराष्ट्रात, तर १७ जिल्ह्यांचा  गुजरातमध्ये अंतर्भाव होता.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

महाराष्ट्र् व कर्नाटक सीमाभागाचा अभ्यास करताना या ठिकाणी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी-सावंतवाडी, लातूर; तर कर्नाटकमधील बेळगाव, विजापूर, गुलबर्गा, बिदर, या एकमेकांशी संबंधित असलेल्या जिल्ह्यांचा अभ्यास करणे अनिवार्य ठरते. त्या दृष्टीने विचार करता १९५६ साली झालेल्या राज्यांच्या पुनर्रचनेमुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर, उस्मानाबाद, नांदेड आणि चांदा या जिल्ह्यांमध्ये, तर १९६० मध्ये ठाणे आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये आमूलाग्र बदल दिसून आले.

ऐतिहासिक वारसा

इतिहासाकडे पाहत असताना इ.स.च्या पहिल्या शतकात, महाराष्ट्रातील पैठण येथे राजधानी असलेले सातवाहनांचे राज्य कर्नाटकच्या उत्तरेस पसरलेले पाहावयास मिळते. तर मध्ययुगीन कालखंडाचा विचार करता, कर्नाटक व महाराष्ट्राशी संबंध असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीचे प्रभुत्व, कोकण प्रांतात असलेल्या टाकसाळी, शिलालेख या आधारे पाहावयास मिळते. तसेच, मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराचा परिणाम मराठी राज्य स्थापन झाल्यापासून पाहावयास मिळतो. जसे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदुर्ग, नरगुंड, परसगड, गजेंद्रगड, काटकोल, हे गड धारवाड व बेळगाव जिल्ह्यांत बांधले. दक्षिणेत मराठ्यांची बंगलोर जहागिरी होती, ज्यावर आधी शहाजी (१६३७-६३) व नंतर त्यांचा मुलगा एकोजी यांनी राज्य केले.

पुढील काळात मराठ्यांना चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मुघलांकडून छ. शाहूंना (शिवाजी महाराजांचे नातू) सन १७१९ मध्ये मिळाला. तर १७५३ मध्ये पेशवा बाळाजी बाजीराव यांनी धारवाड काबीज केले. तसेच, १७९१मध्ये पुन्हा धारवाड मराठ्यांच्या ताब्यात आले, जे १८१८ मध्ये इंग्रजांच्या अधिपत्याखाली आले. असे असतानाही पेशवाईच्या कालखंडात या दोन्ही राज्यांच्या सीमांलगत असलेल्या अनेक ठिकाणी, वर्षानुवर्षे मराठ्यांचे राज्य असल्याचे त्यांच्या व्यावहारिक चलनांमुळे, पुढील काही टाकसाळींच्या आधारे लक्षात येते. जसे, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मिरज, जमखिंडी, मुधोळ; तर कर्नाटकातील अथनी, चिकोडी, निपाणी, हुकेरी, गोकाक, कित्तुर, मेंदर्गी, लक्ष्मीश्वर, मलकापूर, मनोली, इ.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

सीमांलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील काही ऐतिहासिक स्थळी, मध्ययुगीन तसेच मराठा-पेशवा काळात स्थापन झालेल्या टाकसाळी व तेथून निघणारे चलन, हे त्या-त्या भागात मराठीपण रुजल्याचे व प्रसार-प्रचार झाल्याचे द्योतकच समजावे लागेल. यास पुष्टी देण्यासाठी म्हणून खालील काही प्रमुख मराठा-पेशवा टाकसाळींचा व चलनांचा आढावा घेण्यात येत आहे -

१. अथनी

विजापूरपासून ६६ कि.मी. अंतरावर असलेले हे स्थळ अदिलशाहीच्या, तर १७व्या शतकात मराठ्यांच्या अधिपत्यामध्ये होते. १७३० मध्ये छत्रपती राजा शाहू यांच्याकडे आल्यानंतर १८१८ म्हणजेच ब्रिटिश येईपर्यंत मराठी सत्तेचाच एक भाग होते. येथील चांदीचे रुपये विजापूर व बागलकोट यांप्रमाणे होते. या तीनही टाकसाळी मल्हार भिकाजी रास्ते यांनी स्थापन करून चालवल्या.

२. बागलकोट

विजापूरपासून ७८ कि.मी. अंतरावर असलेले हे गाव सुरुवातीस विजयनगर, १६व्या शतकात आदिलशाहीच्या ताब्यात होते. १७५५मध्ये हा भाग पेशव्यांनी हस्तगत करून रास्ते परिवाराकडे सोपवला. १७५७-५८ मध्ये मल्हार भिकाजी रास्ते यांनी येथे टाकसाळ स्थापन केली. येथील चांदीचे रुपये मल्हारशाही नावाने प्रचलित होते. १७७८ मध्ये काही काळ हैदरअलीच्या ताब्यात हा भाग गेला, पण लगेचच तो पेशव्यांकडून हस्तगत करण्यात आला. १८१०मध्ये श्री. निळकंठराव यांची सुभेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच प्रदीर्घ कालखंडापासून मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा भाग, मराठी राज्यकर्त्यांच्या स्थापलेल्या टाकसाळी व चलनाने, आपले मराठीपण जागवत होते असे दिसून येते. ब्रिटिशांच्या आधिपत्यात हा भाग आल्यानंतर सन १८३३मध्ये ही टाकसाळ बंद करण्यात आली.

३. बंकापूर

धारवाडपासून ६४ कि.मी. अंतरावर असलेले हे स्थळ १७५० मध्ये मराठ्यांच्या ताब्यात होते. सन १७७६ मध्ये म्हैसूरच्या हैदरअलीच्या आधिपत्यात गेले. तर १७९१ मध्ये पुन्हा मराठ्यांच्या राज्यात सामील झाले. यामुळे येथील टाकसाळ व मराठी चलन या संपूर्ण सीमांलगतच्या परिसरात परिचित होते. औरंगजेबाच्या शेवटच्या काळात येथे टाकसाळ स्थापन झाली. येथील मुघल राज्याची नाणी, सावनूर नवाबाची काही नाणी आणि मराठी सत्तेचेही चलन येथे प्रचलित होते.

४. बेळगाव (शहापूर-शहापेठ)

बेळगाव किल्ल्याजवळचे हे शहापूर बाजारपेठ म्हणून प्रचलित होते. १६८८मध्ये मुघलांनी, तर १७३०मध्ये सावनूरच्या नवाबाने येथे राज्य केले. १७४६ मध्ये मराठ्यांनी हा भाग हस्तगत केला. तर १८०२मध्ये बेळगाव व सभोवतालचा परिसर मराठा राज्याचे प्रधान सदाशिव पंडित यांच्याकडे सोपवण्यात आला. हा परिसर १८१८ मध्ये ब्रिटिशांनी ताब्यात घेईपर्यंत मराठा पेशव्यांच्या ताब्यात होता. येथील चांदीचे रुपये चलनात होते. पुढे इंग्रजांनी येथे छावणी उभारली आणि मराठी पायदळ सैन्याचे मुख्यालय येथे तयार करण्यात आले.

५. विजापूर

१४व्या शतकात या भागावर दिल्ली सुलतानांचे प्रभुत्व होते. तर १७व्या शतकात हा भाग मुघलांकडे होता. परंतु, १७६० पासून ते १८१८पर्यंत अधूनमधून प्रदीर्घ काळासाठी हा मराठा-पेशव्यांच्या ताब्यात होता. येथील मराठ्यांनी पाडलेले चांदीचे रुपये हे अथनी, बागळाकोट येथील रुपयांप्रमाणे होते.

६. चिकोडी

बेळगावपासून ६४ कि.मी. अंतरावर चिकोडी हे गाव असून, १८व्या शतकात मराठ्यांच्या ताब्यात होते. या ठिकाणी कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, तर काही वेळेस पेशवे घराण्याने राज्य केले. १७६५ मध्ये धारवाड येथे केंद्रीय टाकसाळ स्थापन झाल्यानंतर येथील टाकसाळ बंद पडली.

७. धारवाड

१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नरगुंड आणि धारवाड हा भाग आपल्या ताब्यात घेतला. तर १६८५ ते १७५३ या कालखंडात मुघल, तर काही वेळा मराठा, तर १७६४ मध्ये हैदरअली यांनी आपले अधिपत्य या परिसरात गाजवले. तद्नंतरच्या कालखंडात १८१७ पर्यंत हा भाग मराठ्यांच्या ताब्यात राहिला. पेशवा बाळाजी बाजीराव (१७४०-६१) यांनी १७५३मध्ये धारवाड येथे टाकसाळ स्थापन केली व आपले मराठी राज्याचे चलन प्रचलित केले. पांडुरंग मुरार यांना येथील टाकसाळीचे अधिक्षक म्हणून नेमून सर्व अधिकार प्रदान केले. येथून मोहोर, होन व रुपये पाडण्याची परवानगीही दिली. ही टाकसाळ १७६५ मध्ये केंद्रीय टाकसाळ म्हणून सुरू करून, लगतच्या परिसरातील अन्य ३१ टाकसाळी बंद करण्यात आल्या; ज्यामध्ये प्रामुख्याने मनोली, लक्ष्मीश्वर, तोरगल, अथनी, शहापूर, जामखिंडी, बागलकोट, चिकोडी या व अन्य टाकसाळींचा अंतर्भाव होता. धारवाडच्या टाकसाळीचे चलन कृष्णा व तुंगभद्रा नदीच्या संपूर्ण परिसरात प्रचलित होते.

८. नवलगुंद    

सुरुवातीला बहमनी सत्ता, १७व्या शतकात मुघल, १७८०मध्ये मराठा, तर काही काळ हैदरअली, आणि पुन्हा मराठा राज्यात हे स्थळ आले, ते अगदी १८१८पर्यंत मराठ्यांकडेच राहिले.

९. निपाणी

बेळगावपासून ६४ कि.मी. अंतरावर व्यापारी केंद्र असलेले हे शहर १८व्या शतकात कोल्हापूर राज्यात व तद्नंतर पेशव्यांच्या अधिपत्यात होते. सन १८०३ मध्ये सिद्धोजी नाईक यांनी येथील टाकसाळीत नाणी पाडली. येथील चांदीचे रुपये प्रचलित होते.

१०. रामदुर्ग

तोरगलच्या पूर्वेस १६ कि.मी. अंतरावर असलेले हे स्थळ. या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी किल्ला बांधला. १७६७ मध्ये हैदरअली व लगेचच हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात गेला. या ठिकाणी नाण्यांची टाकसाळ होती.

११. यादवड

गोकाकच्या पूर्वेस ३४ कि.मी. असलेले हे स्थळ विजापूर सुलतान, सावनूरचे नवाब यांच्या आधिपत्यात होते. तद्नंतर मराठा पेशव्यांनी १७६४ मध्ये मिरजेच्या पटवर्धनांना या भागातील संरजाम वसुलीसाठी प्रदान केले. येथेही मराठा पेशव्यांची टाकसाळ होती. हा भाग १८४९ मध्ये ब्रिटिशांनी ताब्यात घेतला.

१२. गोकाक

बेळगावपासून ८० कि.मी. अंतरावर असलेले हे स्थळ १७व्या शतकात मराठ्यांकडे होते. काही काळ सावनूरच्या नवाबाकडे, तर काही काळ पेशव्यांच्या आधिपत्यात होते.

१३. हुकेरी

हे स्थान १६८७ पासून मराठा राज्यात होते. तद्नंतर १७६२ मध्ये माधवराव पेशवे यांनी, तर काही काळ हुकेरीचे देसाई तसेच कोल्हापूर राज्याचे छत्रपती यांनीही या भागावर राज्य केले. येथील चांदीची नाणी मराठी घडणावळीची पाहावयास मिळतात.

१४. कागल    

कोल्हापूरपासून १९ कि.मी. अंतरावर, विजापूरच्या सीमाभागात असलेले हे ठिकाण १८व्या शतकाच्या सुरुवातीस मराठ्यांच्या अमलात होते. कोल्हापूरचे राजे  छत्रपती शंभू (१८१२ - १८२१) यांच्या काळात येथे टाकसाळ सुरू करून चलन प्रचलित करण्यात आले.

१५. कित्तूर

बेळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी १८व्या शतकात मराठा सम्राज्य, तर काही काळ हैदरअली व तद्नंतर १८१७-१८ मध्ये येथील देसाई यांच्या राज्याचा एक भाग होते. धारवाड येथे केंद्रीय टाकसाळ स्थापन झाल्यानंतर येथील टाकसाळ बंद पडली.

१६. लक्ष्मीश्वर

धारवाडपासून ६४ कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण विजापूरचे सूलतान, सावनूरचे नवाब, मराठा पेशवा, गोविंद पटवर्धन, यांच्या अधिपत्यात होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

१७. मनोली

चिकोडीपासून १९ कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण १७४६ मध्ये मराठा पेशव्यांकडे होते. ते प्रदीर्घ कालखंडानंतर निपाणीचे देसाई यांच्याकडे १८०१ मध्ये हस्तांतरित करण्यात आले. येथेही मराठ्यांची टाकसाळ होती.

१८. नरगुंद

१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी, तर १६९४ मध्ये मुघलांनी हा भाग आपल्या आधिपत्यात घेतला व याचे नाव बहादूरनगर असे ठेवण्यात आले. १७९० मध्ये हैदरअली यांनी येथे राज्य केले. येथेही टाकसाळ होती.

१९. खानापूर  

हे गाव गोव्यापासून ६५  कि. मी. अंतरावर असून एक व्यापारी केंद्र होते. १८१० मध्ये कित्तुरच्या देसाईंनी हे केंद्र नंदगडला स्थलांतरित केले. मराठी सत्तेत हा भाग आल्यानंतर मुघलांनी येथील लष्करी तळ हलवले.

याशिवाय मराठा-पेशवाईच्या काही टाकसाळी या खुद्द कर्नाटक प्रांतामध्ये पाहावयास मिळतात. जसे, हसकोट, नंदीदुर्ग, कोडीकोंडा, सीरा, गुटी, इ. होत; ज्या ठिकाणी मराठा-पेशवाईने हा भाग हस्तगत करून व येथे टाकसाळी स्थापन करून, आपले स्वतःचे चलन या संपूर्ण परिसरात प्रचलित केल्याचे दिसून येते.

..................................................................................................................................................................

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प - संपादक - दीपक कमल तानाजी पवार, महाराष्ट्र सरकार, मुंबई, मूल्य - २०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......