अल्लाहनं इतकी सुंदर दुनिया निर्माण केली आणि इन्सान कमिना निपजला
ग्रंथनामा - झलक
अभिराम भडकमकर
  • ‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 29 August 2020
  • ग्रंथनामा झलक इन्शाअल्लाह Inshallah अभिराम भडकमकर Abhiram Bhadkamkar

कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची ‘इन्शाअल्लाह’ ही नवी कादंबरी नुकतीच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. दारिद्रयात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी!  का झालं असं? का? का? का? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. तिच्यातल्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

इतक्यात शादाब आतून चहा घेऊन आला. रफिकजींनी घोट घेतला आणि, ‘फॅब्यूलस!’ म्हणत ते चित्कारले. इतक्यात जमिलाआपा बाहेर आली. अदबीनं उभी राहिली. रफिकजी उठले. “आपकी बनायी चाय तो मानो जन्नत हय जन्नत’’, म्हणत त्यांनी जमिलाआपाला सलाम केला. ती संकोचली. त्यांनी “बैटो ना’’, म्हटलं, पण ती “हय की’’ म्हणत उभीच राहिली. मग सगळ्यांनीच चहा घ्यायला सुरुवात केली. इतक्यात नदिमचा धारदार स्वरात प्रश्न आला, “तो तुमना मानतय जन्नत वगैरा?’’ झुल्फीला सुरुवातीलाच असा वाद नको होता. त्याला रफिकजींचं उत्तर माहीत होतं. ते बकवास वगैरे म्हणायचे या सगळ्याला. नदिम ठरवूनच आल्यासारखा पुढे झाला. सगळ्यांच्याच नजरेत एक उत्सुकता होती. अकबऱ्यानं तर ‘अल्लाबिल्ला कुच नसतय’ म्हणणारा माणूसच अजून पाहिला नव्हता.

“यार नदिम, क्या करींगा तू जन्नत जा के?’’ रफिकजींनी विचारलं आणि नदिम गोंधळलाच.

“की जाने का मतलब?’’ कुणालाच कळेना काही. झुल्फीलासुद्धा. अन्वर मात्र कूल दिसला.

“आँ? इथं मन नाही लागत का तुझं?’’ या प्रश्नावर नदिम जरा सावरला. म्हणाला, “इधर क्या अच्छा हय?’’

त्यानं इथल्या म्हणजे पृथ्वीवरच्या घाणीसकट सगळ्या प्रॉब्लेम्सची लिस्ट सांगितली. रफिकजींनी ती शांतपणे ऐकली. “कुणी केली ही गंदगी इथं?’’ विचारत त्यांनी परत सगळ्यांना बुचकळ्यात टाकलं. मग एक-दोन घोट घेत विचार करायला वेळ दिला आणि मग ते समजावू लागले. अल्लाहनं इतकी सुंदर दुनिया निर्माण केली आणि इन्सान कमिना निपजला. त्यानं या दुनियेचं वाटोळं केलं असेल, तर त्यानंच ते ठीक करायचं की हे सोडून जन्नतची वाट धरायची? मग हसत त्यांनी हेही विचारलं, की सगळे किंवा अगदी यातले निम्मे लोक जरी जन्नतमध्ये गेले आणि त्यांनी जन्नतचीही अशीच वाट लावून टाकली तर? अकबऱ्याचा दिवाच पेटला. खरंच की! इन्सान अल्लाहची बनवलेली दुनिया खराब करू शकतो, तर जन्नतची वाट लावायला त्याला किती उशीर? म्हणजे इथून उठून तिथे गेलं, तरी हीच हालत होणार. त्याला वाटून गेलं. त्या दुधामधाच्या नद्यात हागायला बसेल इन्सान. मग रफिकजींनी चहाचा कप बाजूला ठेवत सांगायला सुरुवात केली. इन्सान को अपनी नियत सुधारनी होगी. मग जन्नत काय किंवा ही धरती काय सगळं कसं सुंदरच बनेल? “गडबडी धरती में नहीं. हमारे भेजे में हय.’’

आणि मग हळूहळू त्यांनी माणसाच्या मनात कसे वाईट विचार येतात, तो सगळं कसं एकट्यानंच ओरबाडून खायला बघतो, दुसऱ्याला लुटायला बघतो, हे सांगायला सुरुवात केली. मुलांच्याच भाषेत. मग अमीर, गरीब भेदावरून ते औरत, मरद भेदावर आले. औरतजातीला आपण कसं आपली गुलाम समजतो, हे सांगितलं, त्यातही त्यांनी हळूच मरदलोकांसाठी जन्नतमध्ये बहात्तर हुरपरीयाँ आहेत. पण औरतजातीसाठी काय आहे? असंही मिस्कीलपणे विचारलं. तिथेही तिला बुरखा घेऊन मरदजातीसमोर नमतं घ्यावं लागणार असेल, तर तिला धरती काय न जन्नत काय? कशाला यायचं तिनं तिथं?

त्यांनी जन्नत ही इन्सानी डोक्यातूनच निघालेली कल्पना असल्याचं सांगितलं. जन्नत काय, किंवा जहन्नूम काय हे फक्त आपण चांगलं वागावं म्हणून सांगितलेल्या कल्पित कथा आहेत. दाखवलेली अमिषं आहेत. भीती आहे. यामागे सांगणाऱ्याच्या पाकसाफ मनात एकच मक्सद होता, तो म्हणजे माणसानं या दुनियेत चांगलं वागावं! एकमेकांना मदत करावी. पण झालं भलतंच. त्या जन्नतचं स्वप्न बघत त्यानं या दुनियेकडे दुर्लक्ष केलं. आणि जीते जी या धरतीला जहन्नूम करून टाकलं. आणि मग आपण त्या जन्नतमध्ये जायची स्वप्नं बघू लागला.

झुल्फीच्या लक्षात आलं, रफिकजींनी जन्नत आहे की नाही, याचं उत्तर टाळलं होतं. पण त्याहीपेक्षा वर्तमान जगण्याच्या लायकीचा उरला नसला की, कुठल्या तरी भलत्या स्वप्नाचा आधार वाटायला लागतो. ते हवं आहे, कारण हे नकोसं होऊन बसलंय, हे महत्त्वाचं त्यांच्या मनावर ठसवलं होतं. एव्हाना मुलांना रफिक ऐकलं होतं तसा काफीर का बच्चा किंवा इस्लामचा दुश्मन वगैरे नाहीये, असं वाटू लागलं होतं. अकबऱ्याला त्याचं बोलणं आवडलं. कय्यूमला पूर्ण पटलं, तर शादाबला यात काय चूक आहे असा प्रश्न पडला होता. नदिमच्या मनात मात्र गोंधळ उडाला होता. रफिकजींचं नाकारताही येत नव्हतं. पण आजवर ऐकलं, त्यापेक्षा हे काही वेगळंच होतं. मग त्यानं विचारलं, “अल्लाह हय क्या दुनिया में?’’

..................................................................................................................................................................

हेही वाचा : तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे!

..................................................................................................................................................................

रफिकजींनी परत शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “देख नदिम, मयने तो देख्या नहीं. मगर बडे बुजुर्गा बोलतई तो आचींगाच ना.’’ झुल्फी हे ऐकून दचकलाच. रफिकजी आणि ही भाषा? “पर एक बात बता...’’ म्हणत त्यांनी नदिमच्या नजरेला नजर भिडवली. आणि ते विचारू लागले. जर असेलच अल्लाह तर त्याच्या मनाला काय यातना होत असतील? त्याच्या नावानं चाललेल्या धांदलीची उदाहरणं त्यांनी दिली. जिथे तिथे त्याचं नाव घेऊन चाललेली भांडणं, बॉम्बस्फोट, दंगली. ते काश्मिरवर आले, तेव्हा नदिम उसळलाच. “कश्मीर में लोगां को जिंदा जलातई आर्मी.’’ मुस्लीम स्त्रियांवर बलात्कार, घराघरांत घुसून लूटपाट... आणि जे चाललंय, तो एक मोठा लढा आहे. काफर जमातच या सगळ्याच्या मुळाशी, त्यानं ठासून सांगितलं.

रफिकजी शांत होते. आतून जरासे वैतागलेलेही. पण त्यांनी शांतपणा सोडला नाही. “अच्छा, मग जिथे काफीर नाहीत किंवा संख्येनं कमी आहेत, तिथे का होतेय मारपीट? खूनखराबा? गोली बंबारी? पाकिस्तानात, अफगाणिस्तानात, बलुचिस्तान, येमेन, लिबीया...’’ त्यांनी विचारलं. त्यांनी घेतलेली काही नावं मुलांना माहीत होती, काही नवी होती. या सगळ्या देशांत का अशांती आहे? नदिमनं त्या सगळ्याचं खापर ख्रिश्चन काफरांवर फोडलं. विशेषत: अमेरिकेवर. रफिकजींनी मंद स्मित केलं. “बेटा, दंगे मजहबच्या नावाखाली होतात. जंग मजहबसाठी लढली जाते असं सांगतात, पण त्यामागे वेगळेच मतलब असतात. अल्लाहचा यात संबंधच नसतो.’’ असं म्हणत अल्लाहच्या नावाखाली हातात कुराण आणि मशीनगन घेऊन जे चाललंय, त्याचं विवेचन त्यांनी सुरू केलं.

झुल्फीला जाणवलं, एका क्षणात वातावरणच बदललंय. मुलांना सगळं समजत नसलं तरी काहीतरी वेगळं चांगलं ऐकायला मिळतंय. एकूण जगातली परिस्थिती थोडक्यात सांगून ते शिक्षणावर आले. “शिकल्याशिवाय मुसलमानांना पर्याय नाही. जगात विद्वत्ताच कामाला येते. बायकामुलींनाही शिकवा. त्यांनाही पंख फुटूद्यात. आपापलं काम नीट करावं, दुसऱ्याला मदत करावी हाच मजहब.’’ असं सांगून झुल्फीला सामोसे आणायला सांगितले. झुल्फीनी नाश्ता आणून ठेवला होताच. पण या सगळ्याचं बील माझ्याकडून घेणार असाल तरच मी खाईन, अशी प्रेमळ धमकी देत एक पाचशेची नोट झुल्फीच्या हातात कोंबली.

नाश्ता करतानाही सगळे प्रश्न करत होते. जमिलाच्या पडवीवर कितीतरी दिवसांनी उत्साहाचं वातावरण दिसत होतं. ती लांबूनच या सगळ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेसमोर जुनैदच येत होता.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

खाता खाता रफिकजी नदिमजवळ गेले. म्हणाले, “देख बेटा. मला कुराण, अल्लाह यांबद्दल फार माहीत नाही. पण माझी अम्मी सांगते, दिवसभरात अल्लाहसमोर माथा टेकायला समय नाही भेटला तरी चालेल, पण दिवसभरात असं काम करू नका की शर्म से सर झुक जाय. एकवेळ कुराणशरिफ नाही वाचलं तरी चालेल, पण किसी मजबूर का दिल जरूर पढ लेना... आणि आसपासच्या गरीब, मजबूर लोगोंमे खुशी बाँटो... अल्लाह अपने आप खूश हो जाता हय.’’

नदिमला त्यांचं सगळंच काही पटलं नसलं तरी हा माणूस म्हणावा तसा डेंजर नाही, असं त्याला वाटून गेलं.

हसतखेळत खाणं झालं. सगळे पांगू लागले. झुल्फीला जाणवलं, रफिकजी कुठलीही मैफील जिंकू शकतात. मोठमोठ्या इंटेलेक्च्युअल्सचीही आणि या पोरांमधलीही. सगळे ‘शब्बा खैर’ म्हणत बाहेर पडले.

..................................................................................................................................................................

‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5223/Inshallah

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......