वाचलीच पाहिजेत अशी काही पुस्तकं - भाग १
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 01 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक

‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी मराठी पुस्तकांची परीक्षणे, त्यातील काही भाग किंवा संबंधित लेखकांच्या मुलाखती प्रकाशित होतात. जानेवारी २०१८ या महिन्यात ‘अक्षरनामा’वर आलेल्या पुस्तकांविषयी...

.............................................................................................................................................

1) तोपर्यंत साने गुरुजी नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतीलचहेरंब कुलकर्णी

आज काळ तंत्रज्ञानाचा आहे. मग साने गुरुजी या पिढीला आपले वाटतील का? असं अनेक जण विचारतात. शाळा डिजिटल होताहेत. पण तरीही ‘मुलांवर प्रेम करण्याचं’ कोणतंही सॉफ्टवेअर येत नाही व ‘करुणा’ हे मूल्य अजूनही कोणत्याही वेबसाइटवरून डाउनलोड करता येत नाही. तोपर्यंत साने गुरुजी नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतीलच.......

शिक्षकांसाठी साने गुरुजी​ - हेरंब कुलकर्णी, ​मनोविकास प्रकाशन​, पुणे​, मूल्य​ -​ १६० रुपये​.​

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4341

.............................................................................................................................................

2) सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शनप्रा. लतिका जाधव

शिंदे अखेरपर्यंत ब्राह्मोसमाज व सत्यशोधक समाज यांच्या तत्त्वांना महत्त्व देत होते. त्यांच्या रूपानं व्रतस्थ जीवन जगणाऱ्या विचारवंत व सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शन हा लेखसंग्रह घडवतो. या पुस्तकाच्या वाचनातून तत्कालीन सुधारणावादी, धार्मिक व राजकीय घटनांचं स्पष्टीकरण होतं. या पुस्तकाची परिशिष्टं अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करताना दिसतात.......

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २) - रा. ना. चव्हाण, संपादक व प्रकाशक - रमेश चव्हाण, पुणे, मूल्य – ४५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4340

.............................................................................................................................................

3) महेशच्या कविता पोस्टमॉडर्न आहेत, तर प्रसादच्या गोष्टी अस्स्ल देशी वाणाच्या गावठी दारूसारख्या - जयंत पवार

महेशच्या कविता उत्तरआधुनिक किंवा पोस्टमॉडर्न आहेत, तर प्रसादच्या गोष्टी या अस्स्ल देशी वाणाच्या गावठी दारूसारख्या आहेत. 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या प्रसाद कुमठेकरच्या बारक्या गोष्टींचा पैस एका लघुकादंबरीचं अस्तित्व धारण करतो, असं माझं निरीक्षण आहे. आजच्या काळाचे गुंते मांडण्यासाठी नव्या भाषेच्या शोधात असलेल्या कवींपैकी महेश लीला पंडित हा एक आहे, हे तुम्हाला 'चष्मांतरे' वाचताना जाणवल्यावाचून राहात नाह.......

'चष्मांतरे' - महेशलीलापंडित, पार प्रकाशन, मुंबई, मूल्य - १६० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4338

.......

'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' - प्रसाद कुमठेकर, पार प्रकाशन, मुंबई, मूल्य - १८० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4339

.............................................................................................................................................

4) ‘बोरीभडकच्या चिकनमातीने वास्तवाचे भान आणले !’ – कल्पना दुधाळ

‘सिझर’च्या वेळी कविता नेमकी का असते, हे मला फार माहीत नव्हतं. परंतु ‘धग’च वेळी आपण कविता लिहितो, याची पुरेपूर जाणीव मला होती. टेंभुर्णीतल्या दगडाधोंड्यातल्या पायवाटांवरची चिकनमाती पुण्यातल्या रस्त्यांवर गळून पडली आणि पुन्हा बोरीभडकच्या चिकनमातीने चटके देत वास्तवाचे भान आणले. कवितेतला प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ याला काहीतरी अर्थ आहे.......

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4328

.............................................................................................................................................

5) ‘कहाणी पाचगावची’ ही फक्त एका गावाची गोष्ट नाही... - मिलिंद बोकील

‘कहाणी पाचगावची’ हे आधुनिक राज्यशास्त्र आहे. ‘स्वराज्य’ ही काही जुनाट संकल्पना नाही. ती खरे तर अति-आधुनिक संकल्पना आहे. शहरातले मध्यमवर्गीय लोक या संकल्पनेला पूर्ण पारखे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व कळत नाही. खरं तर ७३व्या आणि ७४व्या घटनादुरुस्तीचा हाच उद्देश आहे, पण आपण तो प्रत्यक्षात आणलेला नाही. प्रतिनिधींच्या हातात सत्ता सोपवून आपण लोकशाहीचे विडंबन हताशपणे बघत बसलेलो आहोत.......

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4345

.............................................................................................................................................

6) अँडरसनची विलक्षण दृष्टी साध्यासुध्या गोष्टींमध्ये साहस आणि अचाटपण शोधते - चैताली भोगले

अँडरसनला उथळपणाचा त्याला भारी राग. अशा गोष्टींना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्यांची तो आपल्या गोष्टींमधून पदोपदी खिल्ली उडवताना दिसला. मग ती गोष्ट धर्माची असो, कलेची किंवा हुशारीची. नायटिंगेलच्या गोष्टीमध्ये राजाचा उत्तराधिकारी बुलबुलच्या शोधात निघतो, तेव्हा गायीच्या हंबरण्याला आणि बेडकाच्या डराव डराव करण्यालाच तो बुलबुलचा आवाज समजतो.......

‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nilesh Pashte

Thu , 02 August 2018

test

Sourabh suryawanshi

Tue , 05 June 2018

यात "च" कशासाठी? वाचली पाहिजेत अशी असती तर आवडलं असतं! उगीच नको तेथे हेकेकोर पणा करायचा. सर्व प्रकारच्या विचारधारेचे पुस्तकं वाचून जे मानवतेला पूरक आहेत ते विचार निवडण्याचे स्वातंत्र्य असुदे की वाचकांना!

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......