समकालीन सामाजिक आणि राजकीय वस्तुस्थितीमध्ये भारतीय प्रजासत्ताकाची मूल्ये आणि आदर्शांचा वारसा सापडत नाही!
ग्रंथनामा - झलक
निर्मला लक्ष्मन्
  • ‘भगवे ध्वज आणि गोल टोप्या -  हिंदुत्व, मुस्लीम अस्मिता आणि भारत नावाची कल्पना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 19 June 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक भगवे ध्वज आणि गोल टोप्या Of Saffron Flags and Skullcaps जिया उस सलाम Ziya Us Salam भारत नावाची संकल्पना Idea of India

‘फ्रंटलाईन’ या पाक्षिकाचे साहाय्यक संपादक, साहित्य व सामाजिक भाष्यकार जिया उस सलाम (Ziya Us Salam) यांच्या ‘Of Saffron Flags and Skullcaps: Hindutva, Muslim Identity and the Idea of India’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भगवे ध्वज आणि गोल टोप्या -  हिंदुत्व, मुस्लीम अस्मिता आणि भारत नावाची कल्पना’ या नावाने नुकताच प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाचे मूळ प्रकाशक सेज भाषा, नवी दिल्ली यांनीच हा मराठी अनुवादही प्रकाशित केला आहे. श्वेता देशमुख यांनी हा अनुवाद केला असून सुनिधी पब्लिशर्स, पुणे यांच्याकडे या पुस्तकाचे वितरण आहे. या पुस्तकाला ‘हिंदू’ समूहाच्या संचालिका डॉ.निर्मला लक्ष्मन् यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

झिया उस सलाम हे एक लेखक, चित्रपट आणि साहित्य समीक्षक, सामाजिक विषयांवरील भाष्यकार आणि भेदक पत्रकार असे बहुढंगी/आयामी व्यक्तिमत्त्व आहे. गेली दोन दशके त्यांच्या संकल्पना आणि भवतालाचे भान ठेवून केलेल्या परिपूर्ण लेखनाने ‘द हिंदू’ आणि ‘फ्रंटलाईन’  उजळून निघालीत. झिया उस सलाम यांचे ‘ऑफ सॅफ्रन फ्लॅग्ज अॅण्ड स्कलकॅप्स’ हे पुस्तक त्यांच्या विचारप्रवर्तक संकल्पनांची मेजवानी आहे. या लेखनाच्या वाङ्मयीन उंचीबरोबरच भारताच्या सद्य परिस्थितीविषयी जो वैचारिक उहापोह सुरू आहे, त्यामध्ये त्याचे भरीव योगदान आहे. लेखक आजच्या भारतातील अस्वस्थ करणारी तथ्ये वाचकासमोर मांडत असताना भारताचे मूळ अर्कचित्र काय होते, याची उजळणी करतात. जसे की, भारत हे त्याच्या सर्व नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्याची हमी देणारे प्रजासत्ताक आहे.

लेखकाच्या ‘द हिंदू’ आणि ‘फ्रंटलाईन’मधील लेखनाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवांतून जागृत झालेल्या अंत:प्रेरणेतून केलेले लेखन अभिजात आणि अकृत्रिम आहे. प्रस्तुत पुस्तक धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णुता, विविधता आणि बहुलता या देशाच्या गाभाभूत मूल्यांना स्पर्श करते. विविध संकल्पना आणि प्रत्यक्ष अनुभव यांचे मंथन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांची पत्रकारिता यांतून उमटलेली प्रतिबिंबे आणि दृष्टान्त या ग्रंथामध्ये आहेत, हे तर उघडच आहे. लेखकाच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘पत्रकारिता म्हणजे ‘तपास, संशोधन, सर्व बाजूंनी चाचपणी, वस्तुस्थितीचा तपास आणि त्या आधारे तपशीलवार मांडणी.’

प्रस्तुत पुस्तकामध्ये समाज, राजकारण, नागरिक आणि भारताचा बहुपदरी इतिहास यासंबंधी नोंदवलेल्या स्पष्ट आणि नेमक्या निरीक्षणांमधून लेखकाचे समकालीन भारताचे आकलन व्यक्त होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अन्य शिल्पकारांनी प्रजासत्ताकाचे अर्कचित्र ‘प्राचीन भारताच्या पार्श्वभूमीवर’ कोरले आणि त्यातून या धुरिणांनी भारतामध्ये बहुल राष्ट्र होण्याची क्षमता जोरकसपणे मांडली. म्हणजे एखाद्या पृष्ठभागावर कोरलेला मूळ मजकूर किंवा चित्र न खोडता त्यावरच नवीन मजकूर कोरला जातो.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

आज देशामध्ये या संकल्पनांची पायमल्ली होत आहे, देशाचा इतिहास नव्याने लिहिला जात आहे आणि भारताच्या इतिहासाचा विपर्यास होत आहे. लेखक याचे वर्णन ‘राजकारणाची नाळ इतिहासापासून तुटली आहे’ अशा समर्पक शब्दांत करतात. वास्तविक पाहता, समकालीन सामाजिक आणि राजकीय वस्तुस्थितीमध्ये भारतीय प्रजासत्ताकाची मूल्ये आणि आदर्शांचा वारसा सापडत नाही. या पुस्तकामध्ये दिशा हरवलेल्या या अस्वस्थ देशामध्ये हानी, परात्मभाव, नव्या अस्मितेचा शोध आणि ती बाळगण्याचा आग्रह, या प्रश्नांवरून ओढवलेले उद्वेगजनक प्रसंग कथन करून तो वारसा हरवल्याचे कटू सत्य मांडले आहे.

आज आपण कुणीतरी ‘परके’ आहोत, ही मुस्लिमांना बोचणारी भावना बहुसंख्याक समुदायाने त्यांना जाहीरपणे दिलेली पूर्वग्रहदूषित वागणूक आणि कट्टरता यामुळे तीव्र झाली आणि मुस्लीम असंतोषाचे हे मुख्य कारण होते. त्याहीपुढे जाऊन धोकादायक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या (रास्वसं) सत्ताधारी किंवा अभिजन हिंदू राष्ट्रवादी शक्ती सत्ताधारी पक्षाला उघडपणे भक्कम पाठिंबा देऊन या प्रवृत्तीमध्ये सहभागी करून घेण्याच्या उद्दिष्टाने थेट सत्ताधारी पक्षाच्या संस्कृतीमध्ये हस्तक्षेप करतात. लेखक या वृत्तीचा शोध मा.स. गोळवलकर, वि.दा. सावरकर आणि धर्म जागरण मंच या संस्थेच्या राजेश्वर सिंघसारख्या व्यक्तींचे पूर्वसुरी यांसारख्या हिंदू राष्ट्रवाद्यांची वक्तृत्वकला आणि लेखनामधून या पूर्वग्रहांचा मागोवा घेतो. राजेश्वर सिंघ यांनी २०१५ साली ‘२०२१ पर्यंत मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्म देशातून नाहीसा करू’ केलेल्या या वादग्रस्त विधानाचा उल्लेख लेखक करतो. पुढे त्यांनी ‘आम्ही तीन लाख मुस्लिमांची ‘घरवापसी’ करणार असून, ख्रिश्चनांचे हिंदूंमध्ये धर्मांतर करणार आहोत’ असा दावा करून १८ कोटी मुस्लीम आणि २७.८ कोटी ख्रिश्चन धर्मियांचा गड पादाक्रांत करण्यापूर्वी मातीचा ढिगारा सर केल्याचा आनंद व्यक्त केला. पुढे ‘हिंदूंचे दैवत/अध्वर्यू’ मानल्या जाणाऱ्या सावरकरांनी ‘गोपूजन करण्यापेक्षा गोरक्षण करा’ आणि मनुष्याने गायीस देव मानणे हा मनुष्यजातीचा अपमान आहे’, याकडे लेखक आपले लक्ष वेधतो.

सावरकर आणि गोळवलकर यांची नवीन हिंदू राष्ट्राची संकल्पना हिटलरच्या एकाधिकारशाही आणि फॅसिस्ट संकल्पनांची प्रतिकृती होती. या संकल्पनांमधून सध्याच्या उजव्या विचारसरणीतील विचारवंत निपजले असून त्यातून समाजाच्या मनातील गरळ ओकली जाते. उदाहरण द्यायचे तर, अभिनेता अनुपम खेर यांनी ट्विटरवर हिंदी भाषेत लिहिले की, ‘पेस्ट कंट्रोल वापरले की, झुरळे आणि उपद्रवी किडे आपल्या बिळांमधून बाहेर पडतात आणि घर स्वच्छ होते.’ खेर यांचे उद्गार इतकेही आडून आडून केलेले नाहीत. आणि त्यातून सध्याच्या काळात देशाची पेस्ट कंट्रोल प्रक्रिया सुरू आहे हे स्पष्ट होते. यावरून लेखक सांगतात, ‘खेर यांची टिप्पणी हिटलरच्या घोषणेचा पुनरुच्च्चारच आहे, कारण त्यांनी देखील ज्यू धर्मियांचा उल्लेख किडे, उंदीर, घुशी आणि सूक्ष्म जंतू असा केला होता!’ या समुदाच्या जखमा आजही उघड्या आहेत आणि ते लेखकाने सांगितलेल्या अनेक प्रसंगांतून प्रत्ययाला येते. या सर्व वेदनांची तीव्रता एका वाक्यातून व्यक्त होते - ‘गेली १४०० वर्षे मी याच मातीचा भाग आहे आणि तरीही मी इथे ‘उपरा’ आहे.’

प्रस्तुत पुस्तकामध्ये आज भारतामध्ये अल्पसंख्याक समुदाय सोसत असलेल्या या स्वरूपाच्या परात्मभावातून निर्माण होणारे प्रश्न हाताळणारे विषय हाताळले आहेत. लेखकाने वस्तुस्थितीची तुलना लोकांमध्ये मान्यता मिळालेल्या परंतु निराधार संकल्पनांशी केली आहे. मुस्लीम पुरुषांच्या तिहेरी तलाक या हक्काच्या मानाने मुस्लीम स्त्रियांना असणारा खुला या घटस्फोटाच्या हक्काबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. याबाबत अनेक चुकीच्या कल्पना आहेत. मुस्लिमांचा अनुनय करण्यापूर्वीपासून हिंदुत्व संकल्पना होती आणि ‘राजकीय अभिव्यक्तीचे सुरुवातीचे रूप होते’, आणि गीता प्रेसच्या ‘कल्याण’ या नियतकालिकामधून ते लाखो घरांमध्ये गेले. यातील आशय हा प्रतिगामी असून ते लिंगभाव समानता आणि समाजातील सर्व भागांना समान हक्क मिळावेत या तत्त्वावर आधारित बहुलवादी समाजनिर्मितीच्या विरोधी आहे. ‘अन्य घटकांविरोधी कारवायांसाठी जहालवादी संस्थांचा माध्यम म्हणून वापर करतात, जसे की मीरत, मुजफ्फरनगर, हनुमानगढी येथे रक्षा दले उभारण्यात आली, ही माहिती समाजमाध्यमांमधून पसरली. लेखक त्याची ऐतिहासिक पाळेमुळे खणून काढतो आणि बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक समुदायांमधील वाढती फूट आपल्या निदर्शनास आणून देतो. लेखकाने धर्मांतरावरून झालेले वादविवाद, भगत सिंग यांचा प्रतीक म्हणून गैरवापर, रास्वसं आणि तिरंगा हे विषय निष्पक्षपातीपणे मांडले आहेत. याशिवाय इतिहासाचा आणि धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून आपल्या विचारांना धार मिळते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yxsk9jgd

.............................................................................................................................................

आजही अनेक अग्रणी माणसांची उदाहरणे घेता येतील, जसे की, कॅनडास्थित शिक्षक फरहत हाश्मी यांनी त्याच त्याच कंटाळवाण्या अभ्यासापेक्षा सनातनवाद्यांचा विरोध पत्करून खास करून स्त्रियांना कुराणचे उत्तम आकलन व्हावे यासाठी अभ्यासक्रम सुरू केला. स्त्रियांना परंपरेने घरी बसून शिकण्याचे निर्बंध तोडून या व्याख्यानांना उपस्थित राहण्यासाठी उत्तेजन देण्यात आले, तसेच सीडी आणि पेनड्राईव्ह यांचा वापर करून त्यांचे अध्ययन अधिक समृद्ध केले. एका प्रकरणामध्ये महम्मद आमीर खान यांनी नंदिता हक्सर यांच्या समवेत लिहिलेल्या ‘फ्रेम्ड अॅज अ टेररिस्ट’ या पुस्तकामध्ये त्यांनी भोगलेल्या यातनांचे हृदयद्रावक वर्णन केले आहे. आमीर खान यांना बॉम्बस्फोटाच्या अनेक घटनांमध्ये दोषी म्हणून अटक करण्यात आली आणि या उदाहरणावरून नागरी हक्कांचे रक्षण करण्याची खात्री देणाऱ्या लोकशाही राष्ट्रांमध्ये निष्पाप आणि दुर्बल लोकांना कशा पद्धतीने क्लेश सोसावा लागतो, हे स्पष्ट होते. तरीदेखील खान यांच्या व्यक्तित्वातून मुक्तीचा किरण दिसतो, १४ वर्षे बेकायदेशीर अटकेमध्ये कंठली, त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी अनन्वित अत्याचार आणि छळ केला, तरीही त्यांनी हार पत्करली नाही. सर्व धर्माच्या कैद्यांशी त्यांनी मैत्री केली, विविध नागरी संस्थांच्या मदतीने कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम केले आणि हे सर्व दिव्य पार करूनही त्यांचा बहुलवादी लोकशाहीवरील विश्वास अढळ आहे. खान म्हणतात, ‘भारतीय मुस्लिमांसाठी भारत हे त्यांच्या निवडीचे राष्ट्र आहे आणि माझ्या पूर्वजांनी ही भूमी निवडल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे’ आणि ‘इथे वर्षानुवर्षे साहचर्याने राहता येईल अशी आशा वाटते’ या वाक्याने लेखक समारोप करतो.

या पुस्तकामध्ये अशा व्यक्ती आणि घटना यांविषयी चर्चा केली असल्याने हे लेखन महत्त्वाचे ठरते. भारतीय लोकशाहीवर प्रतिक्रियावादी आणि दुराग्रही वृत्तींकडून हल्ले झाले असले तरी ती आजही टिकून आहे आणि प्रगल्भ होत आहे, व्यक्तिस्वातंत्र्याची कवाडे अधिकाधिक विस्तृत होत आहेत आणि लोकांचे हक्क दृढ होत आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 26 June 2019

निर्मलाताई, आज भारतामध्ये अल्पसंख्याक समुदाय परात्मभाव सोसतोय असं तुम्ही म्हणता. पण याला कारणीभूत हिंदू नाहीत. फाळणीच्या वेळेस पाकिस्तानातल्या मुस्लिमांची फाळणीला अजिबात मान्यता नव्हती. तरीही दंगली करून पाकिस्तान ओरबाडून घेतला गेलाच ना? या घटनेपासून भारतीय मुस्लिम स्वत:पासून तुटायला सुरुवात झाली. फाळणीचे समर्थक मुंबई, लखनौ व अलीगडी मुस्लिम उच्चभ्रू होते. त्यांना पाकिस्तान म्हणून जो भूभाग मिळाला त्याच्याशी ते दुरान्वयेही संबंधित नव्हते. हा मोठ्ठा विरोधाभास नाही का? पाकी मुस्लिमांना इस्लामी जन्नत ( = स्वर्ग) कबूल केली होती. आज काय परिस्थिती आहे? आज पाकिस्तान हे एक जहन्नम ( = नरक ) झाले आहे. मग फाळणीचा जाब कुण्या मुस्लिमाने आजतागायत कोणाला तरी विचारला आहे काय? हा एकंच जाब नव्हे तर सोबत पाकिस्तानच्या फाळणीचा म्हणजे वेगळ्या बांगलादेश निर्मितीचा जाबही विचारला पाहिजे. हे जोवर विचारले जात नाहीत तोवर भारतीय मुस्लिम स्वत:पासनं तुटलेलाच राहणार. मग अशा मुस्लिमांची घरवापसी केलेली काय वाईट? त्यांना स्वत:ची अशी एखादी ओळख तरी लाभेल. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......