अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येऊनही मी अत्यंत दुर्मीळ असं, ‘अर्थपूर्ण’, मूल्यात्म आयुष्य दुर्दम्य चिवटपणाच्या बळावर ताठ मानेने जगले…
ग्रंथनामा - झलक
उषा रामवाणी-गायकवाड
  • ‘निर्वासित’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि डॉ. उषा रामवाणी-गायकवाड
  • Tue , 04 July 2023
  • ग्रंथनामा झलक निर्वासित Nirvasit उषा रामवाणी-गायकवाड Usha Ramvani-Gaikwad

‘एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’ या विषयीवर पीएच.डी.चे संशोधन करून उत्कृष्ट प्रबंधाचे अ. का. प्रियोळकर पारितोषिक मिळवणाऱ्या आणि व्याकरण-तज्ज्ञ डॉ. उषा रामवाणी-गायकवाड यांचं ‘निर्वासित’ हे आत्मचरित्र नुकतंच त्यांनी स्वत:च प्रकाशित केलं आहे. आपला लोकविलक्षण संघर्ष सांगणाऱ्या या आत्मचरित्राला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

मी शाळेत असतानाच आत्मकथन लिहिणार असल्याचं ठरवलं होतं. लिहिण्याला पर्यायही नव्हता, ती श्वासाइतकी उत्कट गरज होती. या आत्माविष्काराला सार्वजनिक स्वरूपात ‘न्याय’ दिल्याशिवाय घुसमट थांबणार नव्हती. कदाचित, आयुष्याने समोर असं आव्हान उभं केलं, ज्यातून सुटका नव्हती....

भले कोणी साथ देवो किंवा ना देवो, समर्थन करो वा ना करो, या लिखाणातून मला जे आत्मिक सुख मिळालं, ते अमूल्य आहे.

रूढार्थाने हे आत्मचरित्र नाही. उत्कटतेने, उत्स्फूर्तपणे तुमच्याशी मारलेल्या या गप्पा, हितगुज आहे. माझं ‘दुःख’ हलकं करावं, माझ्या ‘असामाजिक’ जगण्याची इतरांना थोडी तरी जाणीव व्हावी, यासाठी लिहावंसं वाटलं...

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आजवर मी मूलभूत गरजांसाठी जीवघेणा संघर्ष केला आहे - घर, पैसे, प्रेम, आधार वगैरे. घर आणि आर्थिक, मानसिक स्थैर्याभोवती इतर प्रश्न रेंगाळले. जगण्याच्या मूलभूत प्रश्नाशी इतर प्रश्न भिडत राहिले. नवनवीन प्रश्नांचा ढीग उपसण्यात सर्व शक्ती खर्च झाली. त्यामुळे कुठलेच प्रश्न सुटले नाहीत. श्रीमंती, पद, अधिकार, आपली माणसं, यांतलं माझ्याकडे काहीच नव्हतं. सतत मानसिक नि आर्थिक विवंचना ‘आ’ वासून उभ्या होत्या. जगावंसं वाटत नव्हतं. मी आयुष्याला कंटाळलेले. प्रयत्नांच्या कक्षेतलं काहीच नव्हतं. माझा आवाज कायम दबलेला होता. कोणताच आधार नव्हता. अशा परिस्थितीत एकीकडे पीएच.डी. करण्यासाठी, तर दुसरीकडे अस्तित्व टिकवण्यासाठी अखंड लढाई चालू होती...

लौकिकार्थाने मी नेहमीच जगाच्या खूप मागे राहिले... मला सर्वार्थाने सक्षम व्हायचं होतं. फक्त जगणंच चालू होतं. त्यापलीकडे जाण्याचा ध्यास होता. अजूनही मी तशी कोणीच नाहीय. नकारात्म आयुष्य पचवणं, पेलणं जवळजवळ अशक्य! मी जे जगले ते सगळंच ‘अॅब-नॉर्मल’ होतं. वर्गमैत्रीण बाबुली शाळेत असतानाच म्हणायची, “तू आमच्या घरी जन्मली असतीस, तर घरातले तुला डोक्यावर घेऊन नाचले असते”. एकूण, जगण्याचा माझा हक्कच डावलला गेला होता! अखेर, वयाच्या बावन्नाव्या वर्षी दीपक गायकवाड यांच्याशी माझं लग्न होऊन माझ्या आयुष्याला पहिल्यांदाच पाया मिळाला!!

काही चूक नसताना लहानपणापासूनच एका सुशिक्षित, सुसंस्कृत, निष्पाप बाईच्या वाट्याला कुठले असांकेतिक भोग यावेत आणि येऊ नयेत... माझ्या वाट्याला जे आलं त्याने मी कठोर, निबर, घट्ट होत गेले. लहानपणापासूनच मी टोकाची अलिप्त, तटस्थ, स्थितप्रज्ञ बनले होते. माझी उत्सुकता, इन्टरेस्टस मर्यादित होते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

हीच वृत्ती आजही कायम आहे. मला कशाचंच काही वाटत नव्हतं. येईल ते स्वीकारायचं, म्हणजे दुर्लक्ष तरी करायचं किंवा घटना-प्रसंगाला थेट भिडायचं, लढायचं तरी अशी माझी मानसिकता बनली. कुठल्याही घटना-प्रसंगाचं विश्लेषण करणं, विविध अर्थ काढत बसणं, हे माझ्या वृत्तीतच नव्हतं… माझ्या परिस्थितीने मला अगतिक केलं होतं.

आयुष्याचा समजलेला, न समजलेला अर्थ तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे, आत्मशोध घेण्याचाही प्रयत्न केला असता हळूहळू लक्षात येत गेलं की, आपण आतापर्यंत अनुभवलेली, पचवलेली आणि न पचवता आलेलीही सुखदुःखं यांना आता आपल्या लेखी काहीच महत्त्व उरलं नाहीय! त्यांच्याकडे विलक्षण अलिप्तपणे पाहण्याची ताकद मी बाणवली. फक्त वर्तमान, आताचा क्षण महत्त्वाचा आहे, हे समजल्यावर सगळं जग आणि जगणं सहज, सोपं, सुंदर होऊ लागलं.

भूतकाळाला विसरण्याचं आणि भविष्यकाळाची चिंता नसण्याचं विलक्षण सामर्थ्य आपल्यात संचारतं, तेव्हा ती अनुभूती खूप सुखद असते. आनंद मनातून आतून झिरपू लागतो. मनाला वळण लागून ते शांत, स्थिर आणि सकारात्मक बनतं. स्वतःला शोधण्याचा प्रवास अव्याहत सुरूच असतो. माझीच मला मी नव्याने आकळत गेले. माझं अंतरंग उजळून निघालं. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जिद्द आपसूकच बळ मिळवून देत होती.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

संवेदनेच्या समृद्धीच्या मिजाशीत, नवनिर्माणाच्या शोधात स्वतःचा शोध घेत स्वतःसोबतचा अर्थपूर्ण प्रवास करताना अधिक सर्जनशील आणि रचनात्मक उपक्रमांत मी स्वतःला गुंतवून घेतलं. मी मला स्वतःला मिळवलं, स्वतःच माझ्या खडतर प्रतीक्षेचं फळ बनले. एक स्त्री म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्याच्या आनंदाची अनुभूती अनुभवली. माझ्या जडणघडणीत आर्थिक श्रीमंतीऐवजी गुणधारक समृद्धीची पायवाट मी स्वीकारली. माझ्या गर्भात मी स्वतःच स्वतःला पुनः पुन्हा रुजवत होते. एकूणच, जगणं थकवून आणि व्यापून टाकणारा जिवंत राहण्याचा हा अखंड झगडा...

अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येऊनही अत्यंत दुर्मीळ असं; ‘अर्थपूर्ण’, मूल्यात्म आयुष्य दुर्दम्य चिवटपणाच्या बळावर ताठ मानेने जगले. प्रयत्न पुरेपूर करूनही परिस्थितिजन्य कारणांमुळे लौकिक यश नाही मिळालं. तरी सगळ्या प्रतिकूलतेतून माझ्या गुणांच्या जोरावर मी हवं ते ‘मिळवलं’. गरजेप्रमाणे नेहमी स्वतःला बदलवलं. शारीरिक आणि आर्थिक या दोन्ही गरजा असूनही पैशांसाठी मी ‘गैरमार्गा’कडे मात्र वळले नाही...

स्वतःच्या कुठल्याही चांगल्यासाठी हवी ती किंमत मोजणं, कमालीचा संयम या सर्व घटकांनाच जगण्याचा आधार बनवलं. कितीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी एकटीने; धैर्याने नि वैचारिक व भावनिक परिपक्वतेच्या आधारे तिला सामोरी गेले. माझं लिखाण, संशोधन वगैरेंची सभोवतालच्या प्रस्थापित समाजाला नोंद घ्यायला भाग पाडलं. या सगळ्याचा मला सार्थ असा अभिमान आहे. प्रयत्नपूर्वक शाबूत ठेवलेला आत्मसन्मान नि संवेदनशीलता मी मरू दिली नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

हिंमत आणि इच्छाशक्ती असेल तर; कितीही नकारात्मक आयुष्य वाट्याला आलेली कुठलीही स्त्री स्वाभिमानी, आदर्श, अर्थपूर्ण आयुष्य जगू शकते. अस्तित्वात असलेले कायदेही महिलांना समर्थ बनवायला आपल्या सदोष न्यायव्यवस्थेमुळे बऱ्याचदा अपुरे असले तरी...

शिक्षित असो वा अशिक्षित असो, एकूणच भारतीय पुरुषांत पुरुषी मानसिकता खोलवर रुजली आहे. सौम्य, शांत, भावनिकदृष्ट्या संतुलित, समतावादी, सहिष्णू, समजून घेणारे, स्त्रियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे पुरुष कमी असतात. काही स्वभावतःच तसे असतात, तर अनेक जण संस्कार, वाचन, चिंतन, अनुभवांतून आलेलं शहाणपण यांतून विचारी, संयमी होतात. पैसा व छप्पर या गरजांच्या चक्रव्यूहातून महिलांचे अनेक प्रश्न निर्माण होतात.

माझ्या एकाकी आयुष्यातली ही वाटचाल प्रतिकूल परिस्थितीत झगडणाऱ्या तमाम भगिनींसाठी प्रेरक ठरेल, अशी मला आशा आहे. माझं हे आत्मकथन वाचून एकीला जरी त्यातून प्रेरणा मिळाली तरी कृतार्थ वाटेल. स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने एकट्यानेही जगातल्या कुठल्याही व्यक्तीला जगता येतं. त्यासाठी गैरमार्ग अवलंबण्याची, मनाविरुद्ध तडजोडी करायची, परिस्थितीला शरण जाण्याची मुळीच गरज नसते. चुकीचा मार्ग पत्करून प्रतिकूलतेचं समर्थन करणं सोपं असतं, मूल्यात्म, ‘क्वालिटी लाइफ’ जगता येतं. आयुष्यात कष्ट खूप असतात, पण तेच आपल्या जगण्याची ताकद वाढवतात...

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

हे पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आलेल्या, विशेषतः माझ्या पडत्या काळात मला मदत केलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींचे, हितचिंतकांचे आणि नातेवाईकांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, वेगवेगळ्या वळणांवर सर्व लहानथोरांसह तुमच्या सगळ्यांच्या असण्यानेच माझं आयुष्य परिपूर्ण आहे. प्रत्येकाने मला काहीतरी दिलंय, शिकवलंय... कसं वागावं, कसं जगावं याबाबत मी प्रत्येकाकडून नकळत खूप शिकले, शिकतेय आणि शिकत राहीन!

जगणं सुसह्य आणि सुखी करण्यासाठी मदत केली, अशा प्रत्येकाची मी हृदयापासून मनोभावे ऋणी आणि कृतज्ञ आहे. कला, साहित्य, समाजकारण, पत्रकारिता, शिक्षणक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतल्या माझ्यावर प्रेम करणास्या सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्व ज्ञात-अज्ञात हितचिंतकांनी मी कमावलेल्या श्रीमंतीची मलाच जाणीव करून देऊन मला मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर बनवण्यात योगदान दिलंय.

माझे टीकाकार, माझ्याशी असहमत असलेले, मला दुखावलेल्या, नाकारलेल्या, लाथाडलेल्या, झिडकारलेल्या अशांचंही स्वागत आणि आभार. कारण मी मानसिकदृष्ट्या अधिक बळकट होण्यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे. त्यांच्यामुळेच संघर्ष करण्यासाठी मी प्रवृत्त झाले. जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मला त्यांच्यामुळेच मिळाली. माझ्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होण्यासाठी त्यांच्यामुळे साहाय्यच होऊन माझ्या अनुभवांचा परीघ विस्तारत राहिला. प्रत्येकाचा पिंड वेगळा होता, सामाजिक पार्श्वभूमी पूर्णतः भिन्न होती.

सगळं आणि नेमकं मला व्यक्त होता आलंय की नाही, माहीत नाही. टिपिकल आणि तांत्रिक माहिती न देता या लेखनाला मी सामाजिकता, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि विशुद्ध अशा देवविरहित अध्यात्माची पूरक जोड दिली आहे. माझ्या या अनुभवांना वैश्विक मूल्य असल्याने ते वैश्विक पातळीवर पोचेल असं मला नम्रपणे वाटतं.

जगले-वाचले नि संधी मिळाली, तर पुढच्या भागात पुन्हा भेटूच...

‘निर्वासित’ – डॉ. उषा रामवाणी-गायकवाड

उष:काल पब्लिकेशन, ठाणे | पाने – ४३० | मूल्य – ४०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......