‘कॉर्पोरेट साधू’ ही वर्णनात्मक शैलीत लिहिलेली एका थकलेल्या व्यवस्थापकाच्या प्रवासाची बखर आहे
ग्रंथनामा - झलक
अंजू शर्मा
  • ‘कॉर्पोरेट साधू’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 18 June 2021
  • ग्रंथनामा झलक Corporate Monk कॉर्पोरेट साधू अंजू शर्मा Anju Sharma

‘Corporate Monk’ या अंजू शर्मा यांच्या इंग्रजीतील बहुचर्चित पुस्तकाचा नुकताच ‘कॉर्पोरेट साधू’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. तो सतीश बेंडीगिरी यांनी केला असून तो आर. आर. शेठ आणि कंपनी (मुंबई)ने प्रकाशित केला आहे.  ‘कॉर्पोरेट साधू’ ही आंतरिक समाधान मिळवण्याच्या उद्देशानं वर्णनात्मक शैलीत लिहिलेली एका थकलेल्या व्यवस्थापकाच्या प्रवासाची बखर आहे. ती वेगवेगळ्या अधिक्षेत्रातील परिस्थितीचं चित्रण करताना, आंतरिक शांतता आणि मन:शांती मिळवून व्यावसायिक यशासह संपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग सूचित करते. या पुस्तकाच्या लेखिका अंजू शर्मा या व्यवस्थापन आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातल्या विद्यार्थिनी. भारतीय अनुशासन सेवेत त्यांनी वरिष्ठ पदावर २७ वर्षं काम केलं आहे. आयुष्य बदलणाऱ्या काही घटनांनंतर त्यांच्यातला तत्त्वज्ञानी आणि शोधक जागा झाला. त्यानंतर त्यांनी ‘आय ऑफ द स्टॉर्म : डिस्कवर युअर ट्रू सेल्फ’ हे पहिलं पुस्तक लिहिलं.

शर्मा आता व्यवस्थापकासांठी ‘आध्यात्मिक बुद्धिमत्ता’ या विषयात पीएच.डी. करत आहेत. त्या नियमित ‘स्पिकिंग ट्री’मध्ये लिखाण करत असतात. त्यांचा ब्लॉग https://www.speakingtree.in/anju-sharma या लिंकवर आपण वाचू शकता.

या पुस्तकाला लेखिकेनं लिहिलेलं हे मनोगत...

..................................................................................................................................................................

आजच्या तंत्रज्ञानयुक्त, बदलत्या जीवनशैलीच्या जगात सगळ्याच क्षेत्रांत ताणतणाव आणि असमाधान दिसते. ज्वालामुखीच्या तोंडावर कित्येक लोक बसलेले आहेत. उद्योगातील गुंतागुंतीचे वातावरण आणि गळेकापू स्पर्धा, यांमुळे तणावात आणखीनच भर पडली आहे. लक्ष्याची पूर्तता किंवा कारकिर्दीचा विस्तार करण्यासाठी सोळा ते अठरा तास काम करून, शिवाय आठवड्याच्या शेवटी काम ताणत आहेत. त्यांना आपण हे सगळं करू शकतो, हे दाखवायचं आहे. गुंतागुंतीचे प्राधान्यक्रम, विषयाच्या खोलात शिरणं आणि गिऱ्हाईकांच्या सतत मागण्या, यात कुटुंबाच्या गुंतागुंतीचं वातावरण अजूनच भर घालतं.

या सर्व गोष्टींमुळे सततची चिंता वाढली आहे. सभोवतालच्या सर्व गोष्टींसह सद्भावना हरवणं, नाराज होणं आणि रिक्तपणाची सामान्य भावना सामावली आहे. सर्व गोष्टी असूनही काहीतरी कमी आहे, ही भावना पाठ सोडत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधिका ख्रिस्तीना मँसलाच म्हणतात- “भावनात्मक थकवा आणि उपेक्षा यांचा लक्षण-समूह म्हणजे ‘बर्न आउट’ होय. तो सतत लोकांसमवेत बंदिस्त वातावरणात काम करणाऱ्यांना होतो. सतत लोकांच्या संपर्कात येणाऱ्या आणि स्वतःच्या अडचणी मनात दाबून ठेवणाऱ्या, परंतु सर्व काही आलबेल आहे, असा मुखवटा धारण करणाऱ्या व्यवस्थापकांना हे संकट झेलावं लागतं. त्यांना विविध प्रकारच्या लोकांशी संवाद साधणं, त्यांचे संघर्ष सोडवणं, त्यांच्या आकांक्षा हाताळणं आणि निर्बंध व कामगिरीच्या दबावांसह वेळेवर संतुलन ठेवणं नेहमीच आवश्यक भासतं.’’

हॅरी लेव्हिनसनच्या मते – ‘‘बहुतेक लोक, अगदी प्रभावी व्यवस्थापकांना कदाचित त्यांच्या कारकिर्दीत काही काळ ‘बर्न आउट’चे विकार होऊ शकतात. या व्यवस्थापकांना त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा स्वतःचं काम अधिक चांगलं करण्याची गरज वाटते.’’

ही समस्या मुख्यत्वे मध्य आणि उच्च स्तरावरच्या व्यवस्थापकामध्ये आढळते. एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, ८० टक्के लोक चिंता आणि ५५ टक्के लोक निराशेचा सामना करत आहेत. वैद्यकीय मदतीसाठी ते एका वर्षापेक्षा जास्त काळ वाट पाहत राहिले. अनेक लोक हे सगळं यश आणि चमकधमक यांच्या रेशमी वस्त्राखाली लपवतात, तर इतर लोक या विदारक सत्याचा सामना करण्यासाठी धैर्यानं एकत्र येऊन या नकारात्मक वातावरणातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात.

या संकटांचा सामना कसा करावा हा एक मोठा प्रश्न आहे. अशा एका गोष्टीची आवश्यकता आहे, जी लोकांना आधुनिक जीवनशैलीतील असंख्य आव्हानांना तोंड देण्यास मदत करेल. त्यामध्ये शांती, शांतता आणि उद्देशाच्या पूर्णतेसह बहुआयामी यश मिळेल.

‘आध्यात्मिक बुद्धिमत्ता’ यात याचं उत्तर दडलेलं आहे. अनुभवातून अर्थ शोधणारी ही उच्च पातळीची बुद्धिमत्ता. परिस्थितीच्या नकारात्मकतेमध्ये अडकून बसण्यापेक्षा तिची कास धरली तर ती आपल्याला मोठे, चांगले आणि व्यापक दृष्टीकोन प्रदान  करते.

बुद्धिमत्ता गुणांक (आयक्यू) प्रामुख्याने तार्किक समस्या सोडवण्याच्या क्षमतेची प्राथमिकता निर्धारित करते. ती एखाद्या व्यक्तीच्या नोकरीमधल्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मुख्य शक्ती म्हणून कार्यरत असते. विशेष ज्ञान लागत असलेल्या काही नोकऱ्यांमध्ये एखाद्याची नियुक्ती त्यामुळे निश्चित केली जाऊ शकते. पण संघटनांमध्ये काम सुरू झाल्यानंतर भावनात्मक बुद्धिमत्ता (ईआय) एक मजबूत प्रेरणादायी गोष्ट ठरते. कारण टीमचं यश मुख्यत्वे कार्यसंघाच्या सभासदांच्या कामगिरीपेक्षा समूह गतिशीलतेवर अवलंबून असतं. तथापि व्यक्ती जेव्हा वरच्या जबाबदारीच्या पदावर चढत जाते, तिथं वस्तुपाठ घालून देणं आवश्यक असतं. आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता आनंदी राहण्यासाठी, सकारात्मकता आणि अनुकंपा प्रदान करण्यासाठी आवश्यक ठरते.

म्हणूनच अधिकाधिक लोक जागरूकता आणि उच्च चेतनेच्या अंतर्गत भागांना शोधण्याचा प्रयत्न करतात. कारण ते आंतरिक स्रोतांच्या शोधमोहिमा आणि त्यांच्या उपयोगाद्वारे प्राप्त होणाऱ्या चेतना याबद्दल संवेदनशील बनतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘कॉर्पोरेट साधू’ आध्यात्मिक बुद्धिमत्तेच्या तत्त्वांचं आंतरिकीकरण करून अंध:कारातून प्रकाशाकडे पावलं टाकत असलेल्या एका व्यवस्थापकाचं प्रतीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या बुद्धिमान असते, तेव्हा ती प्रत्येक मुद्द्याकडे जागरूकतेनं पाहते. आणि सद्भावना व करुणा लक्षात घेऊन विश्वासानं विचार करते. त्यामुळे ती आपोआपच सकारात्मक आणि जबाबदारी घेऊन वागते. जेव्हा आपण इतरांना स्वत:चाच विस्तारलेला भाग म्हणून पाहणं प्रारंभ करतो, तेव्हा त्यांची ग्रहणक्षमता आणि खुलेपणा वाढतो. आणि ते सर्वांच्या फायद्याचं ठरतं. निश्चलता आणि मन:शांती आणणारे असंही त्याला म्हटलं जातं. ती अव्यवस्था कमी करते आणि माहितीवर पुरेशी प्रक्रिया करायला सक्षम करते. तसंच सशर्त प्रतिसाददेखील कमी होतो.

इथं थोडीशी सावधगिरी बाळगली पाहिजे. जरी दोन्ही कल्पनांची हाताळणी सारखीच वाटत असली तरी ‘आध्यात्मिक बुद्धिमत्ता’ म्हणजे अध्यात्म नव्हे. प्रत्यक्षात दोन्ही वेगवेगळे आहेत. अध्यात्म हा अभ्यासण्याचा विषय असून आध्यात्मिक बुद्धिमत्ता प्रश्न सोडवण्यासाठी अंमलात आणायचा क्रियात्मक भाग आहे. म्हणून अध्यात्माच्या खोल बाबींचा अभ्यास न करता आणि त्यांत प्रावीण्य न मिळवताही ‘आध्यात्मिक बुद्धिमत्ता’ आपण अंमलात आणू शकतो.

या क्षेत्रात माझा प्रवास अगदी अलीकडचा नाही.  माझ्या मागील  ‘I of the Storm - Discover your True Self’ या पुस्तकात मी अध्यात्मशास्त्राच्या अनेक तत्त्वांचा विस्तार केला. त्यामुळे आयुष्यात शांती, समाधान आणि आनंद मिळवण्यास मनुष्य सक्षम होतो. तथापि, मला हळूहळू जाणवलं की, व्यवस्थापन या विषयाला  व्यवस्थित आणि तर्कशुद्धपणे विकसित करणं आवश्यक आहे. म्हणून मी या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवण्यासाठी संशोधन करत आहे.

मी इथं सांगत असलेले सात सेतू माझ्या पहिल्या वर्षाच्या शोधनिष्कर्षांचे परिणाम आहेत. त्यात मी विविध पाश्चात्य विचारवंतांनी उल्लेख केल्याप्रमाणे ‘आध्यात्मिक बुद्धिमत्ते’च्या परिमाणांची तुलना केली आहे. ‘भगवद्गीते’मधून मला हे समजलं की, या सर्व परिमाणात मी या पुस्तकात विस्तारित केलेल्या सात गटात प्रवेश केला जाऊ शकतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सात ही संख्या पूर्णतेची आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्मात हा एक शुभ क्रमांक मानला जातो. आपल्या शरीरात सात चक्र असतात आणि ही चक्रं ऊर्जेला शिस्त लावतात. विवाहातसुद्धा सात पावलं चालतात ज्याला ‘सप्तपदी’ म्हणतात.

माझं पहिलं पुस्तक वर्णनात्मक शैलीत लिहिलेलं होतं. त्यात विचार स्पष्टपणे मांडता येतो. तथापि मला लवकरच कळलं की, पूर्वापार चालत आलेली गोष्ट सांगण्याची शैली ही परिणामकारक ठरते. आणि वाचक स्वतःच्या कल्पना आणि मुद्दे त्याच्याशी ताडून पाहू शकतात. म्हणून मी इथं कथाकथन ही शैली वापरली आहे. त्यात येणारे मुद्दे खऱ्या आयुष्यातील असावेत असं वाटतं. वाचकांच्या सोयीसाठी क्षोभ प्रधानकथा वापरली आहे. तथापि कथेतील पात्रं काल्पनिक आहेत.

‘कॉर्पोरेट साधू’- अंजू शर्मा
मराठी अनुवाद - सतीश बेंडीगिरी
आर. आर. शेठ आणि कंपनी (मुंबई)

मूल्य - २०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......