इंग्रजीत ‘शेक्सपिअर डिक्शनरी’ आहे. त्यात त्याच्या समग्र वाङ्मयातील शब्दांचे अर्थ, उदाहरणे वगैरे दिलेली आहेत. मनात विचार आला, त्या धर्तीवर एखादा कोश का लिहू नये? आणि मला कालिदासाचे नाव सुचले…
ग्रंथनामा - झलक
सुरेश पांडुरंग वाघे
  • ‘कालिदास शब्दकोश (चार खंड)’ची मुखपृष्ठे
  • Mon , 19 June 2023
  • ग्रंथनामा झलक कालिदास Kālidāsa कालिदास दिन Kālidāsa Din सुरेश पांडुरंग वाघे Suresh Pandurang Vaghe आषाढस्य प्रथम दिवसे AASHADHASYA PRATHAM DIVASE शाकुन्तल Shakuntala रघुवंश Raghuvaṃśa मालविकाग्निमित्र Mālavikāgnimitram विक्रमोर्वशीय Vikramōrvaśīyam

आज १९ जून. आषाढाचा पहिला दिवस – ‘आषाढस्य प्रथम दिवसे’… आणि कालिदास दिन. त्यानिमित्ताने आज महाकवी कालिदासाच्या समग्र साहित्याचा अर्थ सोपा करून सांगणारा कोशकार सुरेश पांडुरंग वाघे लिखित ‘कालिदास शब्दकोश (चार खंड)’ हा ग्रंथराज ग्रंथालीतर्फे प्रकाशित होत आहे. या कोशाला वाघे यांनी लिहिलेल्या मनोगतांचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

मराठी ‘संकल्पनाकोशा’चे पाच खंड जवळजवळ बत्तीस वर्षे खपून सिद्ध केले. ते ‘ग्रंथाली’ने २०१०-११मध्ये प्रसिद्ध केले. मी त्यासाठी मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू आणि इंग्रजी या भाषांतील ४५ शब्दकोश आणि इतर ग्रंथ व लेख यांचा अभ्यास केला होता. ‘संकल्पनाकोशा'चे काम संपत आले, तेव्हा एक प्रकारचे रितेपण जाणवू लागले. पुढे काय करावे, हा प्रश्न मनासमोर उभा राहिला. मग केव्हा तरी वाचनात आले की, इंग्रजीत ‘शेक्सपिअर डिक्शनरी’ आहे. त्यात शेक्सपिअरच्या समग्र वाङ्मयातील शब्दांचे अर्थ, उदाहरणे वगैरे दिलेली आहेत. मनात विचार आला की, मीही त्या धर्तीवर एखादा कोश का लिहू नये?

पण कोणाच्या साहित्यावर? विचार करता करता महाकवी कालिदासाचे नाव सुचले. त्याने ‘अभिज्ञान शाकुन्तल’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘मालविकाग्निमित्र’ ही तीन नाटके; ‘कुमार सम्भव’ आणि ‘रघुवंश’, ही महाकाव्ये; आणि ‘मेघदूत’ व ‘ऋतुसंहार’ ही ललितकाव्ये लिहिली. मी या सात कलाकृतींपैकी एकही वाचली नव्हती. संस्कृतचा अभ्यास आठवीपासून अकरावीपर्यंत झाला असेल, तेवढाच. शालान्त परीक्षा १९६०मध्ये उत्तीर्ण झाल्यावर संस्कृतचा संपर्क तुटला. कारण त्यानंतर मी विज्ञानशाखेतून बी.एससी. आणि अमेरिकन विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.एस. अशा पदव्या संपादन केल्या.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

तथापि ‘संकल्पनाकोश’ लिहिताना आलेल्या अनुभवांची शिदोरी हाताशी होती. त्या आधारे ‘कालिदासकोश’ लिहिण्याचे मनावर घेतले. मोनिअर मोनिअर-विल्यम्स, वामन शिवराम आपटे व देवस्थळी यांचे संस्कृत-इंग्रजी कोश आधारभूत मानले. समानार्थी शब्दासाठी मुळगावकर यांची ‘The Handy English-Sanskrit Dictionary’ वापरली. संस्कृत व्याकरण व वाक्यरचना समजून घेण्यासाठी आठवी-नववीची क्रमिक पुस्तके पुन्हा एकदा अभ्यासली.

त्यानंतर कालिदासाच्या साहित्यकृती वाचत गेलो आणि जाणवले की, तो नुसताच महाकवी नव्हता, तर महापण्डितही होता. त्याने अभ्यासलेली शास्त्रे पाहा- आयुर्वेद, कामशास्त्र, काव्य, ज्योतिष, धर्मशास्त्र, नाट्यशास्त्र, नीतिशास्त्र, मीमांसाशास्त्र, योगवाशिष्ठ, वेदान्त, व्याकरण व सांख्यशास्त्र. त्याखेरीज त्याने ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि ‘महाशिवपुराण’ यांचा जागोजागी उपयोग केला आहे तो वेगळाच. शिवाय त्याने ‘पंचतन्त्र’, ‘भागवत’ व ‘मनुस्मृति’ यांचाही अभ्यास केला असावा, असे वाटते.

कालिदासाने त्या ज्ञानाचा आपल्या साहित्यकृतीत कसा उपयोग केला, हे समजून घेण्यासाठी वर उल्लेखलेल्या शास्त्रांचा नि ग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हे काम जगड्व्याळ आहे, याची मला जाणीव आहे. त्यासाठी प्रस्तुत कोशाला ‘कालिदासकोश’ न म्हणता ‘कालिदास शब्दकोश’ म्हणत आहे. तथापि, कालिदासाच्या साहित्यातील शब्दांचा केवळ अर्थ न देता इतर आनुषंगिक माहिती जागोजागी दिली आहे. एवढेच नव्हे तर एकच शब्द कुठे कुठे वापरला आहे, हे तेथील विविध अर्थच्छटांसह नोंदवले आहे. उदाहरणार्थ, ‘आलीढ’ शब्द घ्या. त्याचा एक अर्थ आहे- ‘धनुर्धराने घेतलेला पवित्रा’, तर दुसरा आहे- ‘चाटलेला, खाल्लेला’, तिसरा अर्थ आहे- ‘घायाळ’.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

तिन्ही प्रस्तुत कोशात दिलेले आहेत; पण ‘धनुर्धराने घेतलेला पवित्रा’ हा अतिशय मोघम खुलासा आहे. अन्यत्र शोध घेऊन त्याचा अर्थ एका परिशिष्टात दिला आहे. त्याचे नाव आहे- ‘वीर’. त्याच परिशिष्टात कालिदासाच्या साहित्यात सापडणाऱ्या वीरांची माहिती दिली आहे. अशी अनेक परिशिष्टे शेवटी जोडली आहेत. त्यावरून कालिदासाच्या शब्दप्रभुत्वाची नव्हे, तर विद्वत्तेचीही साक्ष पटते. उदाहरणार्थ, त्याने ‘त्रेताग्नी’बरोबर ‘चतुर्थ अग्नी’चा उल्लेख केला आहे. तीन अग्नींबद्दल अन्य कोशात माहिती मिळू शकेल; पण चौथा अग्नी? ‘परिशिष्टा’त ते स्पष्ट केले आहे.

कालिदास महाकवी होता, हे निर्विवाद. त्याचे समकालीन किंवा नंतरचे कवी भाष्यकार हे निःसंकोचपणे मान्य करतात.

‘पुरा कवींना गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः।

अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव।।’

हे वचन सुप्रसिद्ध आहेच. त्याच्या काव्यावर अनेकांनी शोधनिबंध लिहिले आहेत, पण त्याच्या महापण्डित्वावर प्रकाश टाकणारे लेखन फारसे झालेले नाही.

त्याच्या काळातील सामाजिक परिस्थिती पेशवाईच्या काळापर्यंत आणि नंतरही टिकून होती. उदाहरणार्थ, जिचा पती बाहेर गेला आहे, अशा स्त्रीने म्हणजे प्रोषितभर्तृकेने साजशृंगार करू नये, असा संकेत कालिदासाच्या काळी होता. ती चाल पेशवाईतही होती. कारण एकदा माधवराव पेशवे मोहिमेवर गेले, असताना नाना फडणीसाने रमाबाईच्या घरगुती खर्चातून पानविड्यांचा खर्च कमी केला होता. विशेष म्हणजे मोहिमेवरून परतल्यावर माधवराव पेशव्यांनी तो निर्णय मान्य केला होता.

‘मेघदूत’ वाचताना जाणवते की, मेघाबरोबर कालिदासानेही रामटेकपासून कैलासापर्यंत प्रवास केला असावा. त्या भागातील पर्यावरणाची माहिती संकेतस्थळावर (उदाहरणार्थ, गुगलवर) उपलब्ध आहे. त्या वर्णनात आणि ‘मेघदूता’त कमालीचे साम्य आढळते. कालिदासाचा काळ निश्चित नाही. इसवी सनपूर्व पहिल्या शतकात (चिंतामण वैद्य), इसवी सनाच्या चौथ्या शतकात (रामकृष्ण गोपाळ भाण्डारकर), इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात व पाचव्याच्या पूर्वार्धात (वा.कि. मिराशी), इसवी सनाच्या सहाव्या शतकात (मॅक्स मुल्लर) अशी मतमतांतरे आहेत (संदर्भ : ‘मराठी विश्वकोश खंड ३, पृ.८१२, १९७६).

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

याचा योग्य निर्णय करणे, एकट्यादुकट्या संशोधकाचे काम नाही. कालिदासाने भास व सौमिल्ल या नाटककारांचा गौरवपूर्ण उल्लेख आपल्या ‘मालविकाग्निमित्रा’च्या पहिल्या अंकात केला आहे. ते त्याच्या समकालीन होते की, त्याच्यापूर्वी होऊन गेले? काही जण कालिदासाला शूद्रकाचा समकालीन मानतात. शूद्रका आपल्या ‘मृच्छकटिक’ नाटकात ‘शाकारी’ भाषेचा वापर केला आहे. ती भाषा शाकारांची असून संस्कृतपेक्षा कनिष्ठ मानली जाते. त्या काळी संस्कृतबरोबर अपभ्रंश, पैशाची, महाराष्ट्री व शौरसेनी इत्यादी प्राकृत भाषादेखील प्रचलित होत्या.

कालिदासाने आपल्या तीन नाटकांत काही पात्रांच्या तोंडी संस्कृतखेरीज अन्य भाषा वापरली आहे. तो जर शूद्रकाचा समकालीन असेल, तर त्याने ‘शाकारी’ वापरली की प्राकृत भाषांपैकी एक? त्यासाठी सर्व भाषांचा अभ्यास करावा लागेल.

की कालिदास भवभूतीचा समकालीन होता? आख्यायिका अशी आहे की, कालिदासाला भवभूतीने त्याचे ‘उत्तररामचरित’ हे नाटक वाचून दाखवले होते. त्या नाटकात एक वाक्य होते-

‘अविदित गतयामा रात्रिरेवं व्यरंसीत्’

(घटकापळे गेलेली कळू नयेत अशा प्रकारे रात्र संपली. -अर्थात रात्र संपली नि गप्पाही संपल्या.)

कालिदासाने ‘रात्रिरेवं’ शब्दावरील अनुस्वार काढून टाकण्यास सांगितले. आता ते वाक्य असे झाले- ‘अविदित गतयामा रात्रिरेव व्यरंलीत्’ (घटकापळे गेलेली कळली नाहीत, इतकेच काय अख्खी रात्र नकळत संपून गेली. -अर्थात्, रात्र संपली, पण गप्पा संपल्या नाहीत!)

हे खरे असेल का? की, कालिदासाचा विवाह झाला होता आणि पत्नीने हिणवल्यामुळे त्याने कालीची उपासना करून तिला प्रसन्न करून घेतले वगैरे. पण त्याला मुलगा किंवा मुलगी झाली होती का? नाही तर ‘धन्यास्तदङ्गरजसा मलिनीभवन्ति।’ (शाकुन्तल, ७.१७) (बालकांना खेळवल्यामुळे ज्यांची वस्त्रे मलिन होतात, ते लोक खरोखर धन्य होत) या वाक्याची संगती लागत नाही. पण मला वाटते, कालिदासाला मुलगीच असावी, कारण ‘शाकुन्तल’मध्ये कण्वमुनी नव्हे, तर खुद्द कालिदासच सद्गदित होऊन म्हणतो- ‘अर्थो हि कन्या परकीय एव।’

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

हे सर्व संशोधनाचे विषय आहेत. तत्पूर्वी अगोदर उल्लेखलेल्या शास्त्रांचा व प्राकृत भाषांचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी हा ‘कालिदास शब्दकोश’ विशेषतः ‘परिशिष्ट खण्ड’ उपयुक्त ठरला, तर त्यासारखा दुसरा आनंद मला वाटणार नाही.

‘कालिदास शब्दकोश’ लिहिताना खूप अडचणी आल्या होत्या. एखाद्या शब्दाचा अर्थ ठरवताना अगदी प्राचीन ऋग्वेदापासून ते विविध शब्दकोशांचा आधार घ्यावा लागला.

संस्कृत अक्षररचना दन्त्य, तालव्य इत्यादि उच्चारानुसार केली आहे. अशी रचना केलेली संस्कृत ही एकमेव भाषा आहे. ‘ळ’ हे अक्षर ऋग्वेदातील ‘अग्निमीळे पुरोहितम्’ या श्लोकात आहे. त्याखेरीज ते दोन श्लोकांत आढळले. आतापर्यंत माझा समज होता की, ‘ळ’ अक्षर दाक्षिणात्य भाषांतच आढळते. त्या भाषांचा संपर्क आल्यामुळे ‘ळ’ मराठीत आला आहे. ‘कानडीने केला मराठी भ्रतार’ ही उक्ती प्रसिद्ध आहे. पण ऋग्वेदातही ‘ळ’ वापरला आहे. म्हणजे तो अगदी प्राचीन काळीसुद्धा वापरला जात असे. असे असता संस्कृतमध्ये अन्यत्र का आढळत नाही? उत्तर भारतात संस्कृत बोलली जात असे. त्यामुळे हिंदी व बंगाली भाषांचा संस्कृतशी जास्त संपर्क असूनसुद्धा दोन्ही भाषांत ‘ळ’ का नाही?

बहुतेक भाषांत एकवचन आणि बहुवचन आहे. संस्कृतमध्ये दोन्ही वचनांखेरीज द्विवचन आहे, ते का? तसेच हिंदीत पुल्लिंग व स्त्रीलिंग आहे; पण नपुंसकलिंग का नाही?

संस्कृत ही ब्राह्मणांची किंवा प्रतिष्ठितांची भाषा, तर प्राकृत अडाण्यांची भाषा मानली गेली. स्त्रियांनाही ‘देवभाषा’ अर्थात् संस्कृत बोलण्यास मनाई होती. खुद्द कालिदासाची या भावनेतून सुटका झाली नाही. त्याच्या नाटकात दास-दासी, राजकन्या प्राकृत बोलतात.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

जर्मन कवि गटे यानेदेखील ‘शाकुन्तल’चा गौरव केला आहे. मोठ्या उत्सुकतेने ते नाटक वाचायला घेतले, तर शकुन्तलेच्या तोंडी प्राकृत बोली वाचताना रसभंग होत होता, जरी त्याचे संस्कृतमध्ये केलेले भाषांतर कंसात दिले असले तरी!

सर्वसामान्य कविलेखकांनी आपल्याच साहित्यातील कल्पनांची किंवा पंक्तींची पुनरावृत्ती करावी, हे समजू शकते. पण कालिदासालाही असा मोह का आवरला नाही? कारण त्याने दहा श्लोक जसेच्या तसे आपल्या दोन साहित्यकृतीत वापरले आहेत. एवढेच नव्हे, किमान ६८ श्लोकार्थांचीही पुनरावृत्ती झाली आहे. असे असले तरी ‘मेघदूता’मधील मेघप्रवास विलक्षण अचूक आहे. खुद्द कालिदासाने असा प्रवास केला असावा, असे वाटून गेले.

प्राचीन काळी वधूपित्याला पैसे, दागिने वगैरे देऊन विवाह करण्याची पद्धत होती. त्याला ‘शुल्क विवाह’ म्हणत असत. मग उलटी प्रथा अर्थात् वधूपित्याने हुंडा देण्याची पद्धत कधी आणि का सुरू झाली? स्त्रियांना दडपून टाकण्यासाठी?

हे प्रश्न मला पडले होते. असेच प्रश्न वाचकांना पडू शकतील.

आणखी काही सांगण्यापूर्वी एक प्रत्यक्ष घटना सांगतो. इ.स. १८५३मध्ये जीआयपी रेल्वे मुंबईत सुरू झाली होती. स्वातंत्र्यानंतर तिचे स्वामित्व भारत सरकारकडे आले. १९९५च्या आगेमागे त्या कंपनीच्या इंग्लंडमधील कार्यालयाने कळवले की, ‘वसईच्या खाडीवर बांधलेल्या पुलास लवकरच १०० वर्षे पूर्ण होतील. जेव्हा बांधला तेव्हा तो शंभरी गाठेल या हेतूने बांधला होता. कदाचित् तो टिकेल किंवा ही टिकणारही नाही. तेव्हा कृपया नवा बांधण्याची तसदी घ्यावी.’

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

हे सांगण्याचा उद्देश हाच की, माझ्या मर्यादा ‘परिशिष्ट कोश’ लिहिताना मला ठाऊक होत्या. उदारणार्थ, कालिदासाने त्याच्या दहाएक श्लोकांची पुनरावृत्ती केली आहे. त्याहून जास्त नसेल कशावरून? असू शकेल, पण माझ्या मर्यादा एवढ्याच आहेत.

‘परिशिष्ट विभागा’त वेगवेगळ्या विषयांवर लिहिताना आणखी माहिती मिळत गेली. उदाहणार्थ, ‘अग्नि’. त्रेताग्नि, चतुर्थाग्नि या प्रकारांवर कालिदासाने लिहिले आहे, पण पंचाग्नि, सप्ताग्नि इत्यादि अग्नीवर त्याचे भाष्य अगर श्लोक आढळले नाहीत. कदाचित् ती माझी उणीव असू शकेल. ऋग्वेदादि प्राचीन ग्रंथांत मिळालेली अग्नीबद्दलची माहिती ‘अग्नि’ प्रकरणात नमूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना तसेच संशोधकांना साहाय्य होईल अशी अपेक्षा आहे. अशीच माहिती अन्य प्रकरणांत नमूद केली आहे.

कालिदासाने वापरलेला एखादा शब्द, शब्दप्रयोग किंवा कल्पना अन्यत्र कुठे कोणी वापरली असेल, तर ते ‘परिशिष्टात’ नमूद केले आहे. काही ठिकाणी स्पष्टीकरणे दिली आहेत. हे सारे संस्कृत, मराठी किंवा भारतीय भाषांपुरती मर्यादित नव्हते. उदाहरणार्थ ‘प्रलय’ शब्द ‘श्रीमद्भगवद्गीते’त जसा वापरला आहे, तसाच कालिदासानेही वापरला आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेत पहिला अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयोग चालू होता; त्याचा स्फोट झाल्यावर जे. रॉबर्ट ओपनहीमर या अणुशास्त्रज्ञाला ‘भगवद्गीते’तील ‘प्रलया’बद्दलचा श्लोक आठवला.

तथापि मी मोठा संशोधक नाही की, कालिदासाचा किंवा इतर संस्कृत ग्रंथांचा विशेषतः साहित्याचा सखोल अभ्यास केलेला नाही. पण कालिदास वाङ्मय वाचताना काही विचार सुचले किंवा मनात प्रश्न उभे राहिले. त्यात खूप उणीवा असतील किंवा ते चुकीचेही असू शकतील, पण ते सारे ‘परिशिष्ट’ विभागांत समाविष्ट केले आहेत. त्यामुळे कुणाला संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली, तर ते माझे सद्भाग्य समजेन.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......