बातम्यांपासून लांब राहण्याची डझनभर कारणे आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाची तीन सांगतो
ग्रंथनामा - झलक
रॉल्फ डोबेली
  • ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 August 2020
  • ग्रंथनामा झलक द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली The art of Thinking Clearly रॉल्फ डोबेली Rolf Dobelli

‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’ या पुस्तकाच्या आजवर २० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ४५ हून अधिक भाषांमध्ये त्याची अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा नुकताच मराठीमध्येही अनुवाद झाला आहे. मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केलेला हा अनुवाद सुलभा सुब्रमण्यम यांनी केला आहे. या पुस्तकात एकंदर छोटी ९९ प्रकरणे आहेत. त्यातील हे एक प्रकरण... 

..................................................................................................................................................................

सुमात्रामध्ये भूकंप, रशियामध्ये विमान दुर्घटना, एका माणसाने आपल्या मुलीला ३० वर्षे तळघरात कोंडून ठेवले, हायडी क्लम सीलपासून वेगळी झाली, बँक ऑफ अमेरिकामध्ये भरघोस पगार, पाकिस्तानमध्ये हल्ला, मालेच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा, शॉट पुटमध्ये नवा जागतिक विक्रम.

हे सर्व तुम्हाला माहीत असण्याची खरंच गरज आहे का? आपल्याकडे माहितीचा भक्कम साठा असतो, पण तरीही आपल्यात ज्ञान कमी असते. का? कारण दोन शतकांपूर्वी आपण एका विषारी ज्ञानाचा शोध लावला – ‘बातम्या’. जशी शरीराला साखर तसेच मनासाठी बातम्या - चमचमीत, आकर्षक, पचायला सोप्या - आणि दीर्घ कालावधीत प्रचंड विध्वंसक.

तीन वर्षांपूर्वी मी एक प्रयोग सुरू केला. मी बातम्या वाचणे आणि ऐकणे थांबवले. मी सर्व वर्तमानपत्रांची आणि मासिकांची वर्गणी रद्द केली. टेलिव्हिजन व रेडिओ देऊन टाकले. माझ्या आयफोनमधून मी न्यूज अॅप काढून टाकले. फुकट मिळणाऱ्या एकाही वर्तमानपत्राला मी हातही लावला नाही. विमानात कोणीतरी वाचायला असे काही दिले, तर मी मुद्दाम दुसरीकडे नजर फिरवू लागलो.

पहिले काही आठवडे कठीण गेले. खूपच कठीण. काहीतरी माझ्यापासून निसटून जाईल, अशी भीती मला वाटायची. काही दिवसांत माझा एक नवीन दृष्टिकोन तयार झाला. तीन वर्षांनंतर परिणाम - जास्त स्पष्ट विचार, अधिक मौल्यवान आकलन, चांगले निर्णय आणि खूप जास्त मोकळा वेळ. आणि सर्वांत चांगली गोष्ट- काहीही महत्त्वाचे मी गमावले किंवा काही निसटून गेले नाही. माझे सोशल नेटवर्क-फेसबुक नव्हे - जे खऱ्या जगात अस्तित्वात असते - ज्यात हाडामांसाचे मित्र आणि ओळखीपाळखीचे असतात - तेच माझ्यासाठी बातम्या गाळून नेमक्या तेवढ्या माझ्याकडे पोचवतात.

बातम्यांपासून लांब राहण्याची डझनभर कारणे आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाची तीन सांगतो. पहिले - आपला मेंदू वेगवेगळ्या माहितीला बेहिशोबीपणे वाटेल तशी प्रतिक्रिया देतो. लज्जास्पद, धक्कादायक, माणसांविषयक भडक, पटपट बदलणारे तपशील सर्व आपल्याला उत्तेजित करतात. त्याउलट संदिग्ध, जटिल, गुंतागुंतीची आणि कच्ची प्रक्रियाहीन माहिती आपल्याला शांत करते. बातम्याच्या कार्यक्रमांचे निर्माते याचा पुरेपूर उपयोग करून घेतात. खिळवून टाकणाऱ्या कहाण्या, भडक चित्रे आणि सनसनाटी ‘माहिती' आपले लक्ष वेधून घेते.

त्यांच्या उद्योगाचे मॉडेल काय आहे ते लक्षात घ्या - जाहिरातदार त्याची ‘जागा’ (स्पेस) विकत घेतात आणि बातम्या नामक सर्कशीला एक अटीवर आर्थिक पाठबळ देतात - त्यांच्या जाहिराती दिसल्या पाहिजेत. परिणाम - जे काही सूक्ष्म, मार्मिक, संदिग्ध, जटिल, गंभीर व अर्थपूर्ण असेल अशा कहाण्या सर्रास गाळल्या जातात - जरी त्यांचे आपल्या जीवनाबरोबर काही नाते असले आणि आपले जग समजून घेण्यास त्यामुळे काही उपयोग होत असेल तरीही.

बातम्यांचा भडिमार रोज झाला की, त्याचा प्रभाव आपल्यावर पडून आपल्यापुढे खरोखरच काय आव्हाने व धोके आहेत त्याबद्दल एक विरूप, विचित्र समज आणि मानसिक नकाशा धरून आपण वावरू लागतो.

दुसरे - बातम्या असंबद्ध असतात. त्यांच्याशी आपले वैयक्तिक असे काही नाते नसते. गेल्या बारा महिन्यांत तुम्ही बहुधा १०,००० बातम्यांच्या टिप्पण्या पाहिल्या-ऐकल्या असतील - कदाचित दिवसागणिक तीससुद्धा. प्रामाणिकपणे - त्यातली कुठचीही एक बातमी सांगा - फक्त एक, जिच्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य, तुमचे करिअर किंवा उद्योगधंद्यामध्ये चांगले निर्णय घेऊ शकलात. त्या बातमीचा अंशही नसताना निर्णय कसा घेतला असता? मी विचारलेल्यांपैकी कोणालाही दोनपेक्षा अधिक उपयुक्त बातम्या सांगता आल्या नव्हत्या - १०,००० मधून फक्त दोन. हा फारच दु:खद निकाल आहे. बातम्यांच्या कंपन्या तुम्हाला सांगतात की, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला स्पर्धात्मक फायदा मिळतो.

याने खूप जणांना भुरळ पडते. वास्तविक रवंथ करत राहिल्याने बातम्यांचा स्पर्धात्मक तोटा होतो. जर बातम्या खरंच लोकांना प्रगतीचा व समृद्धीचा मार्ग खुला करून देत असत्या तर पत्रकारांचे उत्पन्न सर्वांत जास्त असते. तसे नाहीये - खरं तर उलटच आहे.

तिसरे - बातम्या हा वेळेचा अपव्यय आहे. एक व्यक्ती दर आठवड्यागणिक अर्धा दिवस तत्कालीन घटना (करंट इव्हेंटस्) वाचण्यात घालवते. जागतिक स्तरावर पाहिले तर ही उत्पादकतेची मोठी हानी आहे. एक वर्मी लागणारे पण सच्चे निरीक्षण.

मी हे नक्की सांगू शकतो की, बातम्यांकडे पाठ फिरवली तर इतर ९८ चुका बाद करण्याइतकाच फायदा तुम्हाला होईल. ती सवय पूर्णपणे सोडून द्या. त्याऐवजी, नीट अभ्यासून लिहिलेले मोठे लेख आणि पुस्तके वाचा.

होय, जगाला ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखे दुसरे काही नाही.

..................................................................................................................................................................

‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5218/The-Art-of-Thinking-Clearly

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......