‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात...

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो...

‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ : मोठ्यांनाही आपला दृष्टीकोन तपासून पहायला लावणारी छोट्यांची रंजक सृष्टी आणि दृष्टी

मुलांना काय समजते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे, पण त्यांची समज अनेकदा  मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालते. वर्तमानातील अनेक चुकीच्या आणि घातक बाबींवर उपाय शोधायचे असतील आणि संविधानिक मूल्यं जपायची असतील, तर या साऱ्या घटनांकडे समाजधुरिणांनी मुलांच्या दृष्टीने आणि दृष्टीकोनातून पाहायला हवे. असे घडले, तर त्यांना त्यांच्या भूमिका अवश्य तपासून पाहाव्याशा वाटतील, हा विचार मांडणारी ही कादंबरी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे...

लेखक प्रत्येक कथेत मानवी भावभावनांची हळूवार उकल करतात, म्हणून ती केवळ विज्ञानकथा राहत नाही, तर माणसाची कथा-व्यथा होऊन जाते

‘मिरॅकल’ हा प्रा. डॉ. सुनील विभुते यांचा विज्ञानकथासंग्रह मानवी मन, भावना व विज्ञानातील शोध यांचा सुरेख संगम वा गोफ आहे. विज्ञानातील शोध व त्याचा मानवी आयुष्यात अंतर्भाव असा आशय या संग्रहात पाहायला मिळतो. या संग्रहातील सर्वच कथा मनोवेधक, उत्कंठा वाढवणाऱ्या आहेत. सर्वच कथांमध्ये ‘मानवता’ हा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. लेखकाला उर्दू, हिंदी, कानडी भाषेचा लहेजा चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे कथेतील पात्रे खरीखुरी वाटतात...

‘स्टोरीटेलर’ लिहून गजेंद्र अहिरेने स्वतःविरुद्ध भरभक्कम सज्जड पुरावा आपल्या हाती दिलाय- तुम्ही काय बोलताय माझ्याबद्दल, हे घ्या माझंच माझ्याविषयीचं निरीक्षण!

गजेंद्र नामी एडझवट दिग्दर्शक आहे, म्हणत ज्या काही खऱ्याखोट्या कथा रचल्या गेल्या, अजूनही रचल्या जात आहेत आणि रचल्या जातील, त्या तशाच आहेत, हे आपणच का सांगून टाकू नये, असं त्याला वाटलं की काय माहीत नाही. पण ‘स्टोरीटेलर’ची प्रेरणा तीच असावी, असा भक्कम संशय आहे. गजेंद्र ही एक साक्षात जितीजागती दंतकथा आहे. ते खरं तर एक गूढदेखील आहे. त्याचं हे पुस्तक वाचून त्या साऱ्या अनेकदा ऐकलेल्या किश्यांचा अनेकांना पुनःप्रत्यय येईल...

अनेक लेखकांचे स्वतंत्र लेख प्रचंड प्रभावी असले, तरी त्यांचा लेखसंग्रह सपशेल फसल्याची उदाहरणे आहेत. ‘अध्यात-मध्यात’ला हा शाप भोगावा लागत नाही!

तरुण लेखक राहुल बनसोडे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना पाचेक वर्षांपूर्वी हेमंत कर्णिक यांच्या ‘अध्यात-मध्यात’ या पुस्तकाचं ‘अक्षरनामा’साठी परीक्षण लिहायला सांगितलं होतं. त्यांनी लिहायला सुरुवातही केली. पण नंतर ते त्यांच्याकडून या ना त्या कारणानं पूर्ण झालं नाही. पुढे ते परीक्षणात काय काय लिहिणार आहेत, हेही त्यांनी सांगितलं. पण दुर्दैवानं त्यांना ते लिहून काढून पाठवणं जमलं नाही. तेच हे अपूर्ण परीक्षण...

‘दरम्यानचे प्रक्षोभ’ : सामान्य माणसाची संभ्रमावस्था, परिस्थितीशरणता आणि सामान्य माणसाच्या जगण्याची अजिबात चाड नसलेलं अनैतिक आचरण यांची अभिव्यक्ती

कवी धर्म, जात, भाषा, प्रांत या सर्वसामान्य माणसांत फूट पाडणाऱ्या आणि माणसातलं माणूसपण हिरावून घेणाऱ्या बाबींवर अनेकदा टीका करतो. प्रतीकांच्या आहारी जाऊन समाजातले घटक आपापसांत झगडत राहतात, म्हणून कवीला ‘वर्तमान हा प्रतीकांच्या खुंटीला अडकून ठेवलाय’ असं वाटतं. कवी खिन्न करणारं सामाजिक-राजकीय वास्तव या सगळ्यामुळे अंततः कोणताही कडवटपणा स्वतःच्या स्वभावात शिरणार नाही, याची दक्षता घेत लिहितो...

‘काळोखावरची टोळधाड’ : रस्त्यातील लढ्याला बळ द्यावे, या विचाराने सजग झालेले लोक बाबासाहेबांच्या विचाराचे वाहक म्हणून निर्माण होत आहेत

कवीला ही ‘नाही रें’ची अवस्था दिसत असली तरी तो आशावादी आहे, कारण जंगल आता बेचिराख होऊ लागलेय, विमुक्त आपल्या खांद्यावर पालं घेऊन आपले अस्तित्व मुखर करत आहेत. तो आता जागा झाल्यामुळे ‘आपल्या घामाचा वाटा मागणार आहे/ पुन्हा एकदा चवताळलेला पॅंथर आला आहे’ हा पॅंथर जब्याचे शरीर स्थिरस्थावर करत आहे. तो आता दगड भिरकावतोय मंदिरातल्या मूर्तीच्या रोखाने. जब्या आता जबाब मागतो आहे. ‘माझ्या धनाचा वाटा कुठाय?’ असा प्रश्न विचारतोय...

‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ : जनसामान्यांच्या उन्नयनासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि स्वकर्तृत्वाने विचारांचा मानदंड उभा करणाऱ्या कर्तृत्ववान पुरुषांची काव्यमय शब्दचित्रे

इंद्रजित भालेराव यांच्या अंतर्मनात ठाण मांडलेल्या या व्यक्ती आहेत. त्यांच्याशी जुळलेले आंतरिक नाते आणि त्यांची लोककल्याणाची भूमिका या कवितांमधून प्रकट होताना दिसते. ‘भूमिनिष्ठा’ आणि ‘मांदियाळी’ हे दोन्ही शब्द विशिष्ट दृष्टीकोन व्यक्त करणारे आहेत. भूमिनिष्ठा हाच ज्यांच्या जगण्याचा ध्यास होता अथवा आहे आणि जे इथल्या सत्त्वशील परंपरेशी बांधील आहेत, अशीच शब्दचित्रे इथे अर्थपूर्ण पद्धतीने अभिव्यक्त झालेली आहे...

‘सिद्धार्थ’सारख्या तात्त्विक समस्येला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कादंबऱ्या एका वाचनात संपत नाहीत आणि समजतसुद्धा नाहीत. पण शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी आजही खिळवून ठेवते!

‘सिद्धार्थ’सारख्या कलाकृती सुबुद्ध वाचकांसमोर असंख्य प्रश्न उभे करतात. अशा प्रश्नांना गणितात असतात, तशी उत्तरं नसतात. या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला स्वतंत्रपणे शोधावी लागतात. शिवाय या उत्तरांत याचं उत्तरं बरोबर आणि त्याचं चुकीचं, असं काहीही नसतं. अशा आशयसूत्रावर जेव्हा कादंबरी संपते, तेव्हा वाचक स्वतःमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो...

‘चिनभिन’ : बांदेकरांच्या कविता बाहेरच्या काळोख पसरलेल्या वातावरणाची यथायोग्य जाणीव करून देतात आणि त्याच्या व्यक्तीवर होत असलेल्या परिणामांकडेही निर्देश करतात

प्रसिद्ध हिंदी कवी विष्णु खरे म्हणाले होते, “चांगल्या कवितेत माणसाच्या अस्तित्वासमोर उभ्या ठाकलेल्या सर्व संकटांविषयी चिंता, ती व्यक्त करताना आवश्यक असलेली बांधिलकी, सगळ्या मानवजातीच्या रोमांचक व्यवहारांत खोल रुची, आयुष्य आणि नातेसंबंध यांतल्या विविधतेप्रति असणारी उत्सुकता, आणि हे सगळं आपल्या भाषा आणि शैलीत मांडण्याची क्षमता हे गुण आढळायला हवेत.” बांदेकर यांच्या या संग्रहातील सगळ्या कवितांत हे गुण आढळतात...

‘अ‍ॅनिमल फार्म’ : ही कादंबरी उपहास, उपरोध शैलीत राजकीय विडंबन मांडते. लोककथेचं मिथक वापरून एकाधिकारशाही व हुकूमशाही नेतृत्वाचं पितळ उघडं पाडते

जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीत आजच्या सत्तासंघर्षाचीही रूपकं जाणवतात, ती त्यामुळेच. जॉर्ज ऑर्वेल यांनी या कादंबरीतून साम्राज्यशाही व एकाधिकारशाहीवर कोरडे ओढले. प्रस्तुत कादंबरीत रूपकात्मक माध्यमातून जे सत्तासंघर्ष नाट्य रंगते, ते कोणत्याही काळात समकालीनच वाटायला लागते. विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रसिद्ध राजकीय उपहासात्मक कादंबरी म्हणून ‘अ‍ॅनिमल फार्म’कडे पाहिलं जातं...

‘मेळघाट : शोध स्वराज्याचा’ या पुस्तकात मिलिंद बोकील ‘स्वशासन’ ही संकल्पना स्पष्ट करतानाच आपल्याकडच्या प्रशासकीय विटंबनेचा उल्लेख करतात, तेव्हा पटतंच ते!

मागील वर्षाच्या सुरुवातीला आलेलं ‘मेळघाट : शोध स्वराज्याचा’ हे मिलिंद बोकील यांचं पुस्तक आदिवासींच्या स्वशासनाच्या प्रयोगावरचे तिसरं आणि सर्वांत महत्त्वाचं पुस्तक. या पुस्तकात तिथल्या अशा प्रयोगांची पुनरावृत्ती टाळून प्रत्येक प्रयोगातलं वेगळेपण, त्यात असू शकणाऱ्या शक्यता बोकील सांगतातच, पण यात लोकशाहीतील सर्वांत खालच्या म्हणजे ‘ग्रामसभा पातळीवरील ‘स्वशासन’ या संकल्पनेमागचा विचार विस्तारानं मांडतात...

‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग ३)

घाचर घोचर या अक्षरांच्या उच्चारणातून निर्माण होणाऱ्या नादात जी घालमेल आहे, जो गुंता आहे आणि तरीही जी निरर्थकता आहे, तो सगळा दाब, सगळा ताण आणि त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर कोसळते आणि आपण या सगळ्याखाली दबले जात असल्याची भावना आपल्याला पछाडून टाकते. वास्तविक ‘घाचर घोचर’ एक शब्द आणि शीर्षक म्हणून त्याचं केलेलं उपयोजन लेखकाच्या प्रतिभेची झेप दाखवण्यासाठी पुरेसा आहे...

‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग २)

जागतिकीकरणानं तयार केलेली बाजार नावाची व्यवस्था स्लो पॉयझनिंगप्रमाणे कशी काम करते, हेही लेखकानं ‘मुंग्या’ या रूपकातून अगदी चपखलपणे मांडलं आहे. मुंग्या काय करतात? तर कुठल्याही साध्याशा अडचणीचं उपद्रवमूल्य वाढवतात. याने साधी अडचण विनाकारण टोकदार होते. एकदा अडचण टोकदार झाली की, जाणिवांना ‘कम्फर्ट’ नावाच्या गरजा खुणावू लागतात...

‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग १)

एका लहानशा, शब्द जवळजवळ मुके असणाऱ्या फक्त ॲक्शन-रिॲक्शन-निष्ठ प्रसंगातून एकेक पापुद्रा सोलत शानभाग वरण वर्मी बाण मारतात. इथेच त्यांनी कादंबरीवर मांड ठोकलेली आहे आणि वाचकाला झडप घालून हायजॅक केलं आहे; पण आपण हायजॅक झाल्याचं वाचकाला मात्र फार उशिरा, सगळ्या जंजाळात फसल्यानंतर कळतं. शानभागांचा निवेदनातला हा एक प्रकारचा अंडर टोन ‘गनिमी कावा’ जबरदस्त आहे...

आगरकरांच्या आयुष्यातील पूर्वार्ध माहीत नसल्याने त्यांचा उत्तरार्ध समजून घेण्यामध्ये अडथळे येतात. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चांगली चरित्रात्मक कादंबरी आली तर त्याचे स्वागत करायला हरकत नाही

कुमारवयातील गोपाळची एका वानराशी त्याची झटापट होते. गोपाळच्या या कर्तबगारीचे त्याच्या मित्रांना खूप कौतुक वाटते. अर्थात टिळक आणि आगरकर यांची बाजू घेऊन वादविवाद करणारांना त्याचा एक चांगला फायदा होऊ शकेल. शालेय वयातील टिळकांच्या संदर्भात शेंगा आणि टरफलं हा प्रसंग रंगवून सांगितला जातो. तसाच आगरकरांच्या चाहत्यांनाही कुमारवयातील गोपाळचा हा प्रसंग सांगता येईल. म्हणजे ‘टिळकांच्या शेंगा’ आणि ‘आगरकरांच्या चिंचा’...

‘मृत्यू पाहिलेली माणसं’ : जीवन-मरणाच्या उंबरठ्यावरदेखील माणसात ठाण मांडून बसलेल्या मूल्यविवेकाचं, समाजशीलतेचं, हळुवार भावनिक बंधाचं आणि विनोदबुद्धीचं दर्शन

पुस्तकाची कॅचलाईन पुस्तकाचा आशय अगदी नेमकेपणाने आणि तंतोतंत व्यक्त करते – ‘मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या’. या गोष्टी वाचताना ‘अत्त्युच्च भीती’ आणि ‘कल्पनेपलीकडची आशा’ या दोन टोकाच्या भावना मनाची पकड घेतात आणि या गोष्टींमधल्या माणसांप्रमाणे वाचकही या दोन टोकांमध्ये झुलत राहतो. लेखिका गौरी कानेटकर यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे, या कहाण्या खरोखरच झपाटून टाकणाऱ्या आहेत...

‘लेकमात’ : ऊसतोडणी कामगारांचा अनेक पातळ्यांवरचा जीवनसंघर्ष, त्यांची जीवनाला सामोरे जाण्याची उत्कट धडपड आणि बालाघाटातील डोंगररांगांच्या लोकजीवनाचा गंध असलेली कादंबरी

‘लेकमात’ या शब्दाचा अर्थ लग्नाची मुलगी असा होतो. या कादंबरीतील सर्वच व्यक्तिरेखांचा आपापल्या पातळीवर संघर्ष सुरू असतो. कुटुंबांची, त्यातल्या व्यक्तिरेखांची काही स्वप्ने आहेत आणि ती डोळ्यात घेऊन ही माणसे परिस्थितीशी झगडत राहतात. काही स्वप्ने पूर्ण होतात, काहींचा पाठलाग सातत्याने करावा लागतो. डोळ्यातली स्वप्नं आणि पुढ्यातले रखरखीत वास्तव यांचा लपंडाव या कादंबरीत पाहायला मिळतो, तो अंतहीन आहे; त्याला शेवट नाही...

‘इन्शाअल्लाह’ : हिंदू-मुस्लिमांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचं चित्रण करण्याचा प्रयत्न चांगला असला तरी त्यातून पुन्हा काही सूक्ष्म, अतिसूक्ष्म एकमेकांना आंतरछेद देणारे प्रश्न निर्माण होतातच

भडकमकर हे मुळात नाटककार असल्याने दृश्यमयता हे त्यांच्या लेखनाचं एक बलस्थान आहे. त्यामुळे कादंबरीतलं दृश्य नि दृश्य डोळ्यापुढे उभं राहतं. घटनांचा पट वेगानं पुढे सरकतो आणि त्याचा दृश्य परिणाम वाचनीयता आणखी वाढवतो. लेखकानं रंगवलेला मोहल्ला अगदी वाचकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो किंवा वाचकाला बसल्याजागी स्वत:च त्या त्या ठिकाणी फिरून आल्यासारखं वाटावं इतकं रसरशीत आणि उत्कट चित्रण मोहल्ल्याचं केलेलं आहे...

‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी एका गोष्टीवर नेमकं बोट ठेवते - मुस्लिमांच्या समस्यावर... जे सामाजिक कार्यकर्ते सोयीस्कररीत्या मौन बाळगतात त्याच्यावर...

या कादंबरीचं कथानक कोल्हापुरातील एका छोट्या मुस्लीम मोहल्यात घडतं. तिथं राहणारे मुस्लीम लोक रूढीग्रस्त, अशिक्षित तर आहेतच, त्याचबरोबर मुस्लीम मौलवी आणि धर्मगुरूंचा जबरदस्त पगडा असलेला असा हा मोहल्ला आहे. बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावल्यानंतर जी धरपकड होते, त्यात या मोहल्यातील दोन तरुण मुलांना पोलीस पकडून नेतात. अशा कथानकानं या कादंबरीची सुरुवात होते. पहिल्या १०-१५ पानांतच ही कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते...

‘पटेली’ समकालीन मराठीतील भाषिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवहाराबाबत बरंच काही बोलू पाहत असली तरी हे काम यापूर्वीच आणि अधिक प्रभावीपणे झालेलं आहे!

‘एक पुरुष, दोन स्त्रिया’ ही मूलभूत संकल्पना आणि कादंबरीभर अस्तित्वात असणाऱ्या विखंडिततेच्या दृष्टीने ‘पटेली’ ही कादंबरी प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ची (रोहन प्रकाशन) आठवण करून देणारी आहे. या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये प्रादेशिक, जागतिक साहित्य, सिनेमांचे असलेले संदर्भ हा एक समान धागा आहे. विशेष बाब ही की, दोन्हीकडे या संकल्पनांचं अस्तित्व असताना त्यामधील दोषदेखील समप्रमाणात अस्तित्वात आहेत...

श्रीनिंचे ‘डोह’ व इतर लेखन वाचून या समीक्षाग्रंथाकडे वळायचे, की या समीक्षेच्या प्रकाशात मूळ लेखन वाचायचे, याची निवड वाचकाला आपल्या प्रकृतीनुसार करावी लागेल

‘डोह’ प्रसिद्ध होऊन आता पंचावन्न वर्षं झाली तरी तो आजही आपल्या मंद दरवळाने मराठी साहित्यविश्व सुगंधित करत आहे. त्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे स्मरण म्हणून संकल्पित केलेल्या त्यावरील समीक्षेच्या संकलनाचे ‘डोह : एक आकलन’ हे देखणे पुस्तक अलीकडेच वाचकांच्या हाती पडले आहे. मराठीतील ललित गद्याच्या शिखरस्थानी असलेल्या ‘डोह’च्या मानमरातबाला साजेशी देखणी निर्मिती आणि त्या रूपाला शोभेल असेच त्याचे अंतरंग आहे...

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

भारतातील राजकीय व्यंगचित्रांचा पुरेसा सूक्ष्म अभ्यास अकादमिकांनी अजून केलेला नाही. संशोधन करत असताना सामाजिक सुधारणा, जात व अस्पृश्यता यांवरची व्यंगचित्रं योगायोगाने माझ्या समोर आली. दफ्तरांमधून संकलन करत असताना माझ्या लक्षात आलं की, अगदी नियम असल्याप्रमाणे आंबेडकरांचं नकारात्मक चित्रण करताना ‘राष्ट्रवादी’ भारतीय प्रसारमाध्यमांनीही त्यांच्याबाबतीत अन्याय्य भूमिका घेतली...

धर्मश्रद्धेच्या क्षेत्रात आलेली नवी ‘विषाणू’बाधा पाहता, ढेऱ्यांनी घेतलेल्या श्रीविठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या शोधाकडे पुन्हा पाहायला हवे

सध्याच्या अभूतपूर्व स्थितीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत १ जुलै २०२० रोजी ‘आषाढी एकादशी’ पार पडली. अशी अस्मानी-सुलतानी संकटे काही पहिल्यांदाच आलेली नाहीत. धर्मश्रद्धेच्या क्षेत्रात आलेली ही नवी ‘विषाणू’बाधा पाहता, ढेऱ्यांनी घेतलेल्या श्रीविठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या शोधाकडे पुन्हा पाहणे अत्यंत संयुक्तिक आणि रास्त आहे. ढेऱ्यांनी सर्व माध्यमे-साधने आणि जवळपास निर्दोष असणारी संशोधन पद्धती वापरली आहे...

‘युगानयूगे तूच’: ही कविता आंबेडकरांना अभिप्रेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा केंद्रबिंदू व क्रांतिबिंदू होते. भारतीय संविधानाचा मूल्यजागर करते.

आंबेडकरांच्या विचाराचं दर्शन घडवणारी, हा महामानव समजावून सांगू पाहणारी मराठी दीर्घकवितेच्या परंपरेतली ही महत्त्वाची कविता आहे. सध्या कवींना वाईट दिवस आहेत. त्यातल्या त्यात भूमिका घेऊन लिहिणारी संवेदनशील कवी तर हिटलिस्टवर आहेत. ‘आमच्या विरोधात लिहाल\बोलाल तर तुमचा दाभोळकर-पानसरे करू’, असं दहशतीचं वातावरण असताना कांडर यांची ही दीर्घकविता प्रकाशित होणं, ही महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे...