सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक पातळीवरील चळवळीची दशा आणि दिशा याबाबतचे परखड आणि वास्तव-सत्य
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
किरण शिवहर डोंगरदिवे
  • ‘परिवर्तनवादी चळवळी : चिंतन आणि प्रबोधन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 15 March 2022
  • ग्रंथनामा शिफारस परिवर्तनवादी चळवळी : चिंतन आणि प्रबोधन Parivartanvadi Chalvali - Chintan aani Prabodhan सुरेश साबळे Suresh Sable

‘अस्मितादर्श’, ‘वृत्तरत्न सम्राट’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ अशा नियतकालिकांमधून परिवर्तनवादी साहित्य समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करणाऱ्या सुरेश साबळे यांचे ‘परिवर्तनवादी चळवळी : चिंतन आणि प्रबोधन’ हे पु्स्तक नुकतेच वाचनात आले. ‘समाज’, ‘साहित्य’, आणि ‘प्रबोधन’, या तीन भागांमध्ये हे लेखन विभागलेले आहे.

साबळे यांनी या पु्स्तकातून परिवर्तनवादी चळवळीचा सूक्ष्म आणि सखोल असा आढावा मांडला आहे. एकूण २४ लेखांचा समावेश असलेला, साधारणतः १९९० ते २०१०पर्यंतच्या कालखंडाचा हा एक दस्तावेज आहे.

लेखकावर होणाऱ्या संस्काराचा, अनुभवाचा, दैनंदिन जीवनातील व्यवहाराचा पडसाद त्याचा लेखनामध्ये दिसून येत असतो. साबळेही त्याला अपवाद नाहीत. आपले अनुभव, वाचन, आणि अभ्यास यांचा समन्वय साधत परिवर्तनवादी चळवळीतील साहित्य-चळवळी आणि चळवळीतून होणारे प्रबोधन इत्यादी बाबींवर समर्पक भाष्य केले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

पहिला भाग ‘समाज’ या घटकाशी निगडित असून त्यात सामाजिक जनजीवनामध्ये परिवर्तनवादी चळवळीमुळे सामाजिक स्थित्यंतरे कशी घडतात आणि बदलत जातात, याविषयीचे विवेचन साबळे यांनी केले आहे. ‘भारत राष्ट्रात बुद्ध काळापूर्वी आणि बुद्धानंतरच्या काळात वाढलेली मंदिरे, शोषक पुरोहितशाही व विषमता पेरणारी धर्मशास्त्रे, कर्मकांड यांनी धुमाकूळ घातला होता, आजही तो धुमाकूळ थांबला असे म्हणणे धाडसाचे होईल. त्यामुळे इथे माणसापेक्षा देवाला महत्त्व प्राप्त झाले. धार्मिक हिंसा वाढली’ असे भाष्य लेखकाने केले आहे.

साबळे यांनी बुद्ध सिद्धांतातील ‘सद् धम्माविषयीचे चिंतन’ या प्रकरणामधून चित्ताची शुद्धी असणारा, दैनंदिन जीवनातील बुद्ध ठेवणारा एक जण हा बुद्ध आहे असे निक्षून सांगितले आहे. १९५६मध्ये बुद्ध धर्म या देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुनर्जिवित केला, अज्ञानात भटकलेल्या समूहाला समता व स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. या सर्व घटनांचा ऊहापोह साबळे यांनी केलेला दिसतो. सामाजिक परिवर्तनासाठी धम्मदीक्षा घेणाऱ्या बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे संविधान लिहिताना आपले धम्मा अनुयायी आपसूकच संविधानाचे पालन करतील, अशा रीतीने संविधान आणि धम्म यांचा समन्वय साधलेला दिसून येतो. 

नेमका हाच धागा धरून बौद्धधम्म हा नैतिक मूल्याचे संविधानिक शिक्षण देणारा आहे, असे विवेचन लेखकाने केले आहे. तथागत गौतम बुद्ध स्वतःला सामान्य माणूस म्हणून संबोधतात, ते स्वतःला परमेश्वर अथवा ईश्वराचा पुत्र मानत नाहीत, तसेच ते स्वतःला ईश्वराचा प्रेषित म्हणजे दूत म्हणून घेत नाहीत. त्यामुळे बुद्धाचा विचार माणसाला जास्त जवळचा व कल्याणकारी वाटतो... हे सांगत असताना जागतिकीकरणाच्या काळामध्ये वैचारिक गोंधळ कसा सुरू आहे, कालच्या समस्या तशाच शिल्लक असताना नवनवीन समस्या नव्याने निर्माण होत आहेत, असे विवेचन केले आहे. या पार्श्वभूमीवर जगातील विचारवंत पुन्हा एकदा बुद्ध तत्त्वाकडे आकर्षित होत आहेत, हे अभिमानाने सांगितले आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................ 

जागतिक स्तरावर विचारवंत आकर्षित होत असताना आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र विसरून, आंबेडकरी चळवळ एक वेगळी आणि विद्रोही चळवळ म्हणून का समोर येते आहे, याबाबत चिंतन करण्याची समाजातील दोन्ही घटकांना गरज आहेच. शिवाय आजचा तरुण वर्ग या परिवर्तनवादी चळवळीमधून स्वतः ची सुटका करून घेत निव्वळ स्व-प्रपंच आणि स्व-प्रतिमेत अडकून पडला आहे, यावरसुद्धा विचार करणे गरजेचे आहे, असे लेखक म्हणतात.

या भागात ‘सत्यशोधक समाज - शोध आणि बोध’ हा एक महत्त्वाचा लेख वाचायला मिळतो. परिवर्तनवादी चळवळीत महात्मा फुले यांच्या कार्याचा सर्वांनाच आवर्जून उल्लेख करावा लागतो. साबळे म्हणतात, ‘आधुनिक काळातील माणसांची मांडणी महात्मा बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानातून उगम पावत, जोतीराव फुले यांच्या चळवळीच्या मार्गाने पुढे जात, तिचे शेवटचे टोक बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र लढ्यात आणि चळवळीत येऊन मिसळते.’ यातून बुद्ध-फुले-आंबेडकर हा मार्ग एकच असल्याचं लेखक सांगतात.

‘भारतीय मानस - मुस्लीम समाज’ या लेखात आपल्या इच्छेनुसार बरे-वाईट कर्म करावे आणि आपल्या कर्मांना मनुष्य स्वतःच जबाबदार आहे, अल्लाह नाही. अल्लाह निर्बलावर अन्याय करा, शोषण करा असे म्हणत नाही, या गोष्टींचा उहापोह करत, मुस्लीम धर्माची प्रमुख शिकवण आणि त्यामागील उदात्त हेतू यावर सविस्तर चर्चा केली आहे. त्याशिवाय भारतीय मुस्लिमांच्या चालीरीती, सय्यद-गाझी-मेमन अशा अनेक नावांमागील कारणमीमांसा ते भारतातील मुस्लीमधर्मियांचा आढावा घेतला आहे. कट्टरतेविषयी बोलताना लेखक म्हणतात, ‘कितीही मोठा मुस्लीम विचारवंत असला तरी तो इस्लाममधील चुकीच्या मुद्द्यावर विरोध करत नाही, अगदी मोजके सन्माननीय अपवाद आहेत. त्यांची संख्या वाढत गेली पाहिजे.’

‘भटके-विमुक्त-आदिवासीच्या विकास वाटा’ या लेखात आदिवासी जंगलाचा राजा राहून चालणार नाही. त्यासाठी बदलत्या काळाची जाण आणि भान ठेवून मार्गक्रमण करावे लागेल, असा सल्ला लेखक देतात. जगाच्या पाठीवर केवळ शिवधर्म हा एकमेव असा धर्म आहे, जो एका स्त्रीला म्हणजे जिजाऊंना प्रेरणास्थान मानून पूढे आला आहे, असे आवर्जून नमूद करणारे साबळे शोषित स्त्रियांच्या विकासासाठी ‘भारतीय संस्कृतीत स्त्रियांचा काल आज आणि उद्या’ यावर भाष्य करतात.

‘सर्व धर्माच्या पल्याड संविधान संस्कृती’ ही नवी संकल्पना साबळे यांनी समोर आणली आहे. भीमशक्ती-शिवशक्ती युतीची राजकीय भूमिका याबाबत शिवसैनिक आणि भीमसैनिक यांच्या विचारांबाबत राजकीय आणि सामाजिक पातळीवर लेखकाने मंथन केले आहे. याशिवाय आंबेडकरी चळवळीतील घडामोडी, अंतर्गत आणि बाह्य संघर्ष इत्यादीवरील विवेचनासह आंबेडकरी चळवळीने सावरणे कसे गरजेचे आहे, हे सांगणारा उदबोधक लेख आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

परिवर्तनवादी चळवळीतील महत्त्वाचा एक घटक म्हणजे आंबेडकरी आणि विद्रोही साहित्य. साबळे यांनी आंबेडकरी साहित्य चळवळीतील प्रेरणा आणि वाटचाल यांचा मागोवा घेत असताना गौतम बुद्ध यांच्यानंतर ११३८मध्ये जन्मलेल्या चक्रधर स्वामींनी स्त्रियांना सन्मान दिला, मात्र कोणताही आध्यत्मिक ऐतिहासिक लेखक त्यांना साहित्य प्रांतात नायकत्व देऊ शकले नाही, अशा बाबी उलगडल्या आहेत.

त्याचप्रमाणे आजच्या वर्तमान काळात माणूस कोणत्या धर्मात जन्मास आला, त्यावरून त्याची देशभक्ती आणि देशद्रोही अशी भूमिका ठरते. अशा वेळी शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेला मानणारे साहित्यिकच समाजाला दिशा देऊ शकतात, असे लेखक निक्षून सांगतात.

साहित्यामध्ये आंबेडकरवादी रंगभूमीवर विस्तृत भाष्य लेखक करत आहे, असे वाटत असतानाच लेख संपतो. प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी अशा नाटककारांशिवाय इतर काही नाटककारांचा नामोल्लेख आवर्जून करत जिज्ञासा वाढत जाते, मात्र ‘आंबेडकरी काव्यलेखन’ हा विषय जितका जास्त प्रमाणात लेखक चर्चेला घेतात, तितका रंगभूमीचा विषय विस्तृतपणे येत नाही. कदाचित दलित नाटक लिखाण मोजकेच असल्याने ही मर्यादा आली असावी. मात्र संभाजी भगत यांच्या ‘शिवाजी अंडर ग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’सारख्या नाटकांवर लेखक पुढे सविस्तर लिहितील, अशी अपेक्षा ठेवता येईल.

‘आंबेडकरवादी कवयित्रींचे काव्यलेखन’ या लेखात आंबेडकरी कवयित्रींचे महत्त्व अधिक उठावदार झाले आहे. दलित साहित्य चळवळीतील स्त्री कवयित्रींच्या योगदानाची साहित्यसृष्टी दखल घेईल हे नक्की. मानवतेच्या विचारांचा मूळ गर्भ या स्त्रियांच्या कवितेस सापडल्यामुळे किंवा आपल्या ‘स्व’चा अर्थ कळल्यामुळे आपला काव्यप्रदेश नवबदल घडवण्यासाठी ही कविता संघर्षरत झाली आहे.

‘मराठी साहित्यातील वऱ्हाडी भाषेचे योगदान’ हा खूप वेगळा विषय लेखकाने मोठ्या ताकदीने हाताळला आहे. काही तथाकथित वऱ्हाडीच्या शिलेदारांनी वऱ्हाडी भाषा ही निव्वळ विनोदनिर्मिती आणि हास्य यापुरती मर्यादित करून ठेवली आहे. या लेखात वऱ्हाडी भाषेचा परिवर्तन चळवळीतील उपयोग, तसेच वऱ्हाडी भाषेचा संक्षिप्त इतिहास, त्यातही सीमावर्ती वऱ्हाडी भाषा, वऱ्हाडी आणि महानुभाव साहित्य, स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वऱ्हाडी साहित्य या बाबींचा चिकित्सक लेखाजोखा मांडला आहे.

‘अस्मितादर्श’ हे गंगाधर पानतावणे सरांचे सांस्कृतिक अधिष्ठान, म्हणजे दलित साहित्य, परिवर्तनवादी साहित्य याची नवी वाट होती. ‘अस्मितादर्श’मुळे दलित साहित्यिक आणि साहित्य यात फार मोठी उत्थानक्रिया घडून आली. ‘अस्मितादर्श’च्या निमित्ताने घडून आलेल्या साहित्यमंथनाचा आढावा घेत लेखकाने आपली त्यासंबंधीची भूमिका मांडली आहे. ‘अस्मितादर्श साहित्य संमेलना’चे अध्यक्ष, स्थळ, उदघाटक आणि वर्ष असा अगदी १९७४ ते पानतावणे सर याच्या निधनानंतर झालेले २०१८चे संमेलन इत्यादींबाबत माहितीही लेखकाने उपलब्ध करून दिली आहे.

बुलडाणा हा लेखकाची कर्मभूमी असलेला जिल्हा. यातील आंबेडकरी साहित्य आणि सांस्कृतिक घडामोडी आणि चळवळीची दिशा आणि दशा यांची माहिती देत लेखकाने कर्मभूमीचे ऋण व्यक्त केले आहे.

‘प्रबोधन’ या तिसऱ्या भागात सत्यशोधक जलसे, आंबेडकरी जलसे यांचा आढावा घेतला आहे. त्यात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या योगदानाबद्दलचे सविस्तर विवेचन तर निव्वळ अप्रतिम असे आहे. माणगाव परिषदेची माहिती सांगणारा लेख, तसेच पाक्षिक ‘मूकनायक’बाबत विवेचन करणारा लेखसुद्धा महत्त्वपूर्ण आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

बहुजन समाज चळवळीपासून कसा अलिप्त राहत गेला, हे लेखकाने नोंदवले आहे. जग बौद्धविचारांना मान्यता देत असले तरी आपण पारंपरिक बुद्ध धर्मात गुंतून पडलो की काय, याबाबत लेखक वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करतात.

या विचारमंथनातून हाती काय लागते तर सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक पातळीवरील चळवळीची दशा आणि दिशा याबाबतचे परखड आणि वास्तव-सत्य. या नक्कीच दिशादर्शक ठरतील. श्रीपाल सबनीस यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना ही या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू आहे. ख्यातनाम चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रं या ग्रंथाला ऐश्वर्य प्रदान करतात. हे पुस्तक परिवर्तनवादी साहित्याचा अभ्यास आणि उपयोजन यादृष्टीने मोलाची माहिती देणारा आहे.

‘परिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि प्रबोधन’ - सुरेश साबळे

अथर्व पब्लिकेशन्स, खानदेश

पाने - २१२

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

किरण शिवहर डोंगरदिवे

kdongardive@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......