‘लॉकडाऊन’ : करोनामुळे माणसांमधला स्वकेंद्रितपणा अधिक गडद झाला आणि ही कादंबरी तो तीव्रतेनं मांडते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आनंद कुलकर्णी
  • ‘लॉकडाऊन’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 18 June 2021
  • ग्रंथनामा शिफारस लॉकडाऊन Lockdown ज्ञानेश्वर जाधवर Dnyaneshwar Jadhavar करोना Corona लॉकडाऊन Lockdown

मराठीतील एक उभरता तरुण लेखक ज्ञानेश्वर जाधवरची ‘लॉकडाऊन’ ही करोनाकाळाचं चित्रण कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. ‘यसन’ ही त्याची पहिली कादंबरी आणि ‘लॉकडाऊन’ दुसरी. जाधवर अतिशय कष्टपूर्वक शिक्षण घेऊन कादंबरी लेखनाकडे वळलेला तरुण आहे. त्याचं लेखन कमालीच्या अस्वस्थेतून आणि जाणिवेतून आकार घेतं. ठरवून आणि निश्चयपूर्वक त्याने पूर्ण वेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला आहे. लेखनातला सच्चेपणा, दमनकारी व्यवस्थेविषयीची चीड आणि मानवी मूल्यांवरचा गाढ विश्वास हा त्याच्या जीवनात आलेल्या दाहक अनुभवांचा परिपाक आहे. तो सतत वाचन, चिंतन आणि नव्या गोष्टींचा शोध घेतो. मानवी जीवन आणि व्यवहारासंबंधीची उत्सुकता ही सर्जनाची पूर्वअट असते. जाधवरने विषयाची केलेली निवड त्याचं भोवतालाविषयी असलेलं तीव्र भान आणि संवेदनशीलता व्यक्त करण्यास पुरेशी आहे. 

कादंबरीलेखन ही जोखीम असते. तिचा आवाका मोठा आणि रचनाबंध गुंतागुंतीचा असतो. त्यासाठी केवळ लेखन कौशल्य असून भागत नाही, प्रतिभाही असावी लागते. ‘लॉकडाऊन’मध्ये हे सगळं जमून आलेलं आहे. त्यामुळे यातील मानवी जीवनाचं अस्वस्थ करणारं वास्तववादी चित्रण वाचकांची पकड आणि जीवनाविषयी चिंतन करायलाही भाग पाडतं. एकूण २३ प्रकरणांमध्ये विभागलेली, २६४ पानांची ही कादंबरी आहे. सुरुवातीलाच जाधवर संत तुकारामांचा ‘कोणाचे चिंतन करू ऐशा काळे | पायाचिया बळे कंठितसे ||’ हा अभंग उद्धृत करतो. तुकारामांनी अनुभवलेली असह्यता, उद्वेग आणि एकटेपणा आजच्या करोनाकाळाला चपखल लागू होतो. कादंबरीच्या पहिल्या प्रकरणापासून वाचकाचा करोनाने आकांत मांडलेल्या जगाचा प्रवास सुरू होतो. त्यात जागोजागी करोनाची दहशत, कुटुंबांची झालेली वाताहत आणि दारुण मृत्यू बघावे लागतात. आणि हतबलता, नैराश्य आणि भीती. 

संदेश शिंदे हा ४७ वर्षीय इंजिनिअर त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात करोनामुळे उदभवलेल्या दुःखद प्रसंगांचं निवेदन करतो. तोच या कादंबरीचा लौकिक अर्थानं नायक. पण या सबंध कादंबरीत खरी व्यक्तिरेखा उभी राहते ती संदेशची बायको, स्वातीची. संदेशचं कुटुंब प्रातिनिधिक आहे. खरं तर अशी हजारो कुटुंबं करोनामुळे उदध्वस्त झाली आहेत. त्यांची वाताहत ही भारतासारख्या महाकाय देशातील वाताहतीचं लघुरूपच आहे!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

करोनाची कादंबरीवर पडलेली विक्राळ सावली सोडली तर तिच्यातील घटनांचा पट स्वातीभोवती फिरत राहतो. करोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जातो आणि संदेश शिंदे व त्याचं कुटुंब अडचणीच्या आवर्तात सापडतं. लॉकडाऊन पूर्वी संदेशचं दुबईला जाऊन येणं आणि करोना चाचणी न करणं, यामुळे संपूर्ण कुटुंबाला संकटाला तोंड द्यावं लागतं. लॉकडाऊनमुळे संदेश कुटुंबाला घेऊन त्याच्या गावी जायचा निर्णय घेतो. पण प्रवास करणं सोपं नसतं. कोणतंच वाहन मिळत नाही, हे लक्षात आल्यावर तो बायको स्वाती, मुलगी स्मिता आणि मुलगा सुमित यांच्यामुलांसह दुचाकीवरून गावी निघतो. प्रवासादरम्यान त्यांना जबरदस्तीनं पकडून पोलीस व्हॅनमध्ये बसवून संपूर्ण कुटुंबाची टेस्ट करण्यासाठी पुण्याच्या पुण्यातील नायडू रुग्णालयात आणलं जातं.

या दरम्यान संदेश-स्वातीची प्रचंड उलघाल होते. पण व्यवस्थेपुढे त्यांचं काही चालत नाही. रुग्णालयात त्यांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे हे कुटुंब भेदरून जातं. या अवघड प्रसंगात शिंदे कुटुंबाला आस्थेनं चौकशी करणाऱ्या आणि धीर देणाऱ्या डॉ. पाटकर यांचाच काय तो दिलासा आणि आधार वाटतो. यातून आपण लवकरच सुखरूप बाहेर पडू असं मनाचं समाधान करत हे कुटुंब रुग्णालयातले दिवस कंठत असतं.

महिनाभर या कुटुंबाचं रुग्णालयात वास्तव्य असतं. त्या दरम्यान प्रत्येकाला हादरवून टाकणाऱ्या प्रसंगांना समोर जावं लागतं. संदेश सोबत शांताराम, अजित, कुलकर्णी काका असे अनेक जण वॉर्डात असतात. प्रत्येकाच्या व्यथा वेगळ्या, पण परिणाम एकच- करोनामुळे सक्तीचा विजनवास आणि मृत्यूची टांगती तलवार. वॉर्डातील इतर रुग्णांबरोबर बोलताना संदेश त्याचं दुःख थोडा वेळ का होईना विसरून जातो.

लेखकानं अनेक रुग्णांना बोलतं करून करोनाची व्याप्ती आणि घातकता स्पष्ट केली आहे. हातावर पोट असलेल्या, मध्यमवर्गीय, पांढरपेशी आणि महालात राहणाऱ्या लोकांचं जगणं कसं वेदनादायी झालं आहे, हे त्यातून अधोरेखित होतं. इतर अनेकांसारखी या कुटुंबालाही टेस्टच्या रिपोर्टसाठी वाट बघावी लागते. दरम्यानच्या काळात सर्व कुटुंबाला प्रचंड ताण आणि कुचंबणा सहन करावी लागते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

पुढे संदेश आणि त्याच्या दोन मुलांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो, पण स्वातीचा पॉझिटिव्ह येतो आणि संदेशच्या दु:खाला पारावार राहत नाही. मुलांना सांभाळणं आणि स्वातीच्या आजारपणाचं गांभीर्य त्यांच्यापासून लपवून ठेवणं, यात त्याची प्रचंड ओढाताण होते. लेखकानं संदेशच्या मनाचा कोंडमारा आणि भावनांचं आंदोलन अतिशय प्रत्ययकारी शब्दांत रेखाटलं आहे. शेवटी स्वातीचा दुर्दैवी मृत्यु होतो आणि संदेशवर आभाळ कोसळतं. त्यावर ताण म्हणजे पुण्यातल्या त्याच्या सोसायटीतील लोक त्याला आणि त्याच्या मुलांना त्यांच्याच हक्काच्या घरात प्रवेश नाकारतात. अक्षरश: अटीतटीचं भांडण करून आणि पोलिसी हिसका दाखवून संदेशला त्याच्या घरात प्रवेश मिळवावा लागतो.

हे सगळं वाचताना आपण अस्वस्थ होतो. जणू हे सगळं आपल्या समोर आणि आपल्याच बाबतीत घडतंय असं वाटत राहतं. कादंबरीत वाचताना संदेशच्या मनाची घालमेल आणि वेदना आपल्याला अधिक तीव्रतेनं जाणवत राहते.

तसं बघायला गेलं तर या कादंबरीचं कथानक अतिशय सरळ, साधं आहे. त्यात कुठेही गुंतागुंत नाही. पण भावनांची इतकी आंदोलनं जोरदार आहेत आणि वेदनेची तीव्रता इतकी आहे की, एकरेषीय वाटणारं कथानक जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करत जातं.

या कादंबरीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे करोनाच्या वरवंट्याखाली चिरडल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या लोकांना त्यांच्या कंगोऱ्यांसह व्यक्त व्हायला लेखक अवकाश देतो. समाजातील सर्व घटकांचे आवाज मुखर होणं आवश्यक असतं आणि ही कादंबरी तो पैस देते. अशा भीषण स्थितीतही काही लोक कसे निर्दयी, स्वार्थी आणि दुटप्पी वागतात, हे छोट्या प्रसंगांतून जाणवत राहतं. दुसऱ्यांसाठी झटणारे, निःस्वार्थ आणि माणुसकी जपणारे लोकही आहेत, तसेच स्वार्थी, आपल्या पायापुरतं पाहणारे आणि क्रूर लोकही. हा प्रवृत्तींमधला फरक आहे आणि संघर्षही.

एकटं असताना संदेशशी बोलणाऱ्या प्रकाशबिंदूची कल्पना लेखकानं फार चातुर्यानं वापरली आहे. कादंबरीभर हा प्रकाशबिंदू त्याच्याशी बोलतो, त्याची समजूत काढतो, त्याला सल्ला आणि धीर देतो. हा प्रकाशबिंदू म्हणजे मन, पण ते फक्त त्याचं एकट्याचं नसतं. त्यात त्याच्या बायकोचं मनही मिसळलेलं असतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या कादंबरीत करोनाच्या पहिल्या लाटेतील विदारक अनुभवांचं अतिशय प्रत्यकारी वर्णन आहे. लॉकडाऊनच्या निर्णयानं सामान्य माणसांच्या आयुष्याची परवड झाली आणि त्यांना जाच सहन करावा लागला, त्याचं फार आर्त वर्णन आहे. करोनाच्या दहशतीखाली सर्व यंत्रणा नियोजन आणि व्यवस्थापनाची क्षमता हरवून बसतात. पण यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे विवेक, नैतिकता आणि माणुसकीही गमावतात.

ही कादंबरी हे स्खलन परिणामकारकतेनं रेखाटते. करोनामुळे माणसांमधला स्वकेंद्रितपणा अधिक गडद झाला आणि ही कादंबरी तो तीव्रतेनं मांडते. राज्यात आणि देशात लाखो लोकांना लॉकडाऊनमुळे अतोनात हालअपेष्टांना तोंड द्यावं लागलं. खरं तर ही आणीबाणीच. जीवनावरचा विश्वासच उडून जावा असा हा काळ. तो विविध रूपात या कादंबरीत आला आहे. त्यामुळे ही कादंबरी एकाच वेळी अनेक संवेदनांना जागं करते.

लॉकडाऊन - ज्ञानेश्वर जाधवर,

न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, पुणे

मूल्य - ३०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......