‘हिंदू’ :  कादंबरीलेखन स्पर्धा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
एक निवेदन
  • भालचंद्र नेमाडेलिखित ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Sat , 28 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade हिंदू Hindu

भालचंद्र नेमाडेलिखित ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी महाकाव्यात्म स्वरूपाची आहे. महाकाव्यात असावीत तशी अनेक कथाबीजे या कादंबरीत विखुरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने एक कादंबरीलेखन स्पर्धा जाहीर करत आहोत.

‘हिंदू’ या कादंबरीतील कथाबीजांवर\उपकथांवर आधारलेली, तीमधील नायक, पात्रे, प्रसंग, वातावरण इत्यादींचा आवश्यक तर संदर्भ घेऊन सर्वस्वी नवीन अशी कादंबरी लेखकांनी लिहावी असा प्रस्तुत स्पर्धेमागील हेतू आहे.

कादंबरी पूर्णपणे स्वतंत्र असावी व तीमधून लेखकाची सर्जनशीलता व्यक्त व्हावी. तथापि तिला ‘हिंदू’मधील बीजाचा आधार असावा.

‘हिंदू’मधील बीजांच्या आधारे परंतु आपल्या स्वत:च्या कल्पनाशक्तीच्या\प्रतिभेच्या बळावर लेखकांचे लेखन असावे अशी अपेक्षा आहे.

स्पर्धेच्या आयोजकांना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखकांनी ‘हिंदू’ या कादंबरीची सिक्वेल लिहावी अशी अजिबात अपेक्षा नाही. कादंबरी वाचतना लेखकाच्या नवनिर्मितीक्षमतेचा प्रत्यय वाचकांना यावा.

या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकेल. अगदी नव्या लेखकांपासून प्रथितयश लेखकांपर्यंत कोणालाही स्पर्धेत सहभागी होता येईल.

कादंबरीला पृष्ठसंख्येचे कोणतेही बंधन नाही. लहान-मोठ्या आकाराचेही बंधन नाही.

स्पर्धेसाठी कादंबरी सादर करण्याचा अखेरचा दिनांक ३१ डिसेंबर २०१८ हा आहे. स्पर्धेसंबंधी काहीही माहिती विचारावयाची असल्यास खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर दुपारी ३ ते ५ या वेळेत संपर्क साधावयास हरकत नाही.

स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या कादंबऱ्यांना रु. पंचवीस हजार, रु. वीस हजार व रु. दहा हजार या रकमांची अनुक्रमे (प्रथम, द्वितीय व तृतीय अशी) तीन पारितोषिके दिली जातील. पारितोषिकासंबंधीचा अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. तो स्पर्धकांवर बंधनकारक असेल. निर्णयानंतर त्यासंबंधी कोणतीही चर्चा वा पत्रव्यवहार केला जाणार नाही. निर्णय ३१ मार्च २०१९ पर्यंत जाहीर केला जाईल. प्रथम क्रमांकाची कादंबरी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने प्रकाशित केली जाईल.

कादंबरी पाठवण्याचा पत्ता –

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ३०८, फिनिक्स, ४५७ एस.व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४०० ००४.

दूरध्वनी : ०२२ – २३८२६२२५ (दुपारी ३ ते ५)

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......