गेल्या १० आठवड्यांतील वाचलीच पाहिजेत अशी वैशिष्ट्यपूर्ण १५ पुस्तके!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 14 February 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस

१) न्यायालयाने ‘तिहेरी तलाक’ची प्रथा रद्द करूनही मुस्लिमांचे व पर्यायाने इस्लामचे शत्रुकरण थांबलेले नाही! - कलीम अजीम

एका अर्थाने भाजपचे अभिनंदन करायला हवे की, त्यांनी शत्रुकरणातून का होईना या संवेदनशील प्रश्नामध्ये हात टाकला व ‘कुरआन’बाह्य प्रथेवर न्यायालयाकडून बंदी आणली; पण दुसरीकडे त्यांनी मुस्लिमांच्या सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नांवर डोळेझाक केली. अन्य सत्ताधाऱ्यांनी हे पाऊल उचलण्याची कुठलीच शक्यता नव्हती; कारण पुन्हा तेच ‘मतांचे राजकारण’ आड आले असते.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3844

.............................................................................................................................................

२) मतचाचण्या अधिक विश्वासार्ह करण्याच्या गरजेचे आकलन वाढवण्यात प्रणय रॉय यांच्या निवडणूकविषयक कार्यक्रमांचा मोठा वाटा आहे! - सर डेव्हिड बटलर

प्रारंभीचे पर्व हे ‘विद्यमान सत्ताधाऱ्यांप्रती ठाम विश्वासा’चे होते, नंतरच्या काळात ‘सत्ताधाऱ्यांप्रती रोषा’च्या उद्रेकाकडे लोकभावनेचा लंबक झुकला आणि पुन्हा मागे फिरला. प्रणय यांच्याकडे बुद्धिचातुर्य होते आणि माझ्या सूचनांच्या स्वीकाराविषयीचा खुलेपणाही. टेलिव्हिजनचे ते प्रारंभीचे दिवस होते. सर्वसामान्य लोकांपर्यंत जटील माहिती पोचवण्यासाठी लागणारी तंत्रज्ञानस्नेही दृष्टीही त्यांच्याकडे होती.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3845

.............................................................................................................................................

३) ‘दुसऱ्या फाळणी’ची शक्यता वर्तवण्यापूर्वी या कथा वाचायला हव्यात. नाहीतर पुन्हा एकदा माणुसकीचा मुडदा बेवारसपणे रस्त्यावर पडलेला आपल्याला पहावा लागेल! - चंद्रकांत भोंजाळ

हल्ली दुसऱ्या फाळणीची चर्चा होऊ लागली आहे. ती अटळ आहे किंवा आपला देश हळूहळू त्या दिशेने चालला आहे. त्याची चर्चा करण्याआधी पहिली फाळणी, तिचे परिणाम समजावून घ्यायला हवेत. प्रसिद्ध अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांनी हिंदी-उर्दूतील भारतीय लेखकांच्या एकंदर १७ कथांचा या संग्रहात अनुवाद केला आहे. मंटो, कृष्णा सोबती, भीष्म साहनी, कुर्रतुल-एन-हैदर, अज्ञेय, गुलज़ार, उपेन्द्रनाथ अश्क अशा मान्यवर लेखकांच्या या कथा आहेत.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3886

.............................................................................................................................................

४) ऑल्फ्रेड हिचकॉक आणि फ्रान्स्वा त्रुफाँ यांचा समृद्ध करणारा संवाद! - अशोक राणे

“इट्स द बायबल फॉर पीपल लाईक अस, यार.’’ नायरचं अजून सांगून संपलं नव्हतं. मी म्हटलं, “मला दे वाचायला. लगेच वाचून परत करेन.’’ “तुम एक काम करो. मेरे घर आकर रहो. पढ़ो और चले जाओ. ‘हिचकॉक’ मेरे घर के बाहर नहीं निकलेगा.’’ पुढे एकदा गो.नी. दांडेकरांनी मला असंच उत्तर दिलं होतं - “तुम्ही माझ्या घरी रहायला या आणि सगळ्या कॅसेट्स् मनसोक्त ऐका. त्यातली एकही कॅसेट घराबाहेर जाणार नाही.’’

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3901

.............................................................................................................................................

५) एखाद्या राष्ट्रप्रमुखालासुद्धा मिळत नसेल एवढा मान ग्रेटा थुनबर्गच्या वक्तव्याला आलेला आहे! - अतुल देऊळगावकर

गणितज्ज्ञ व हवामानशास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांनी १९६३ साली ‘‘फुलपाखरानी एका ठिकाणी पंख फडफडवले तर जगाच्या दुसर्‍या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतं.’’ असा सिद्धान्त मांडला होता. स्वीडनमधील एक चिमुकली मुलगी ‘हवामानासाठी शाळा बंद’ असं लिहून त्यांच्याच संसदेबाहेर धरणे देऊन बसली, तो दिवस होता, २० ऑगस्ट २०१८! केवळ १३ महिन्यांत म्हणजे २० सप्टेंबर २०१९ रोजी तिच्या साथीला जगातील सुमारे ५० लक्ष मुले रस्त्यावर येतात.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3918

.............................................................................................................................................

६) गदिमांचं वलय जसं कधीही न संपणारं आहे, तसंच माडगूळचंही आकर्षण कायम राहणार आहे, हे नक्की! - भालबा विभूते

गदिमांच्या माडगूळचा आज मागमूसही आढळत नाही. कालोघात गावं बदलतात, परंतु एवढी बदलतात हे पटत नाही. १९७२च्या दुष्काळानंतर या गावाने पाऊस असा कधी बघितलाच नाही. पिण्याचे पाणीसुद्धा टँकरच्या पाण्याने पिणारे माडगूळ पाहिल्यावर हे गाव हिरव्या रंगाची शाल पांघरल्याचे गाव होते, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. गावाशेजारचे ओढे आटलेत, व्यंकटेशतात्यांच्या पांढर्‍या खडकाचे अस्तित्वही शिल्लक नाही.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3933

.............................................................................................................................................

७) पुलंसंबंधी काही नकारात्मक म्हणणं मोठं कर्मकठीण आहे - मेघना भुस्कुटे

एकतर माणूस अतिशय म्हणजे अतिशयच चांगला कलावंत - किंवा स्वतः पुलंच्या शब्दांत म्हणायचं, तर खेळिया. अनेक क्षेत्रांत केलेला संचार. भाषेवरची जबरदस्त हुकूमत. लोकांना मोहवून टाकणारं बहुविध साहित्य. बरं, माणूस नुसताच कलावंत म्हणून चांगला नाही, तर माणूस म्हणूनही जिंदादिल आणि उमदा. दातृत्व? पुष्कळ. उत्तम वेव्हारे जोडून उदास विचारे वेचलेलं धन. सरकारी ठोकशाहीविरुद्ध उभं ठाकण्याचं कर्तृत्व? दोनदा दाखवलेलं.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3934

.............................................................................................................................................

८) आपल्याला हव्या होत्या त्या प्रिय देशामध्येच ते जणू निर्वासित बनून राहिले होते. - प्रतिभा रानडे

आज पाकिस्तानातील, जगाचं भान असणाऱ्या बुद्धिवादी, विचारवंत, लेखक, कलावंतांची होणारी घुसमट आणि तेथील सामाजिक, धार्मिक, राजकीय अवकाशातील अपरंपार अस्वस्थता याची पाळंमुळं फैज यांच्या लेखात आणि त्यांच्या मुलाखतीत सापडतात. पाकिस्ताननं आपल्या सांस्कृतिक वारशाऐवजी इस्लामचीच निवड केलेली दिसते आणि आजच्या घटकेला तर पाकिस्तानची एक दहशतवादी देश म्हणून जगभर बदनामी झाली आहे.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3937

.............................................................................................................................................

९) कैफी आझमी : धर्मांधतेविरुद्धचा एल्गार! - लक्ष्मीकांत देशमुख

खुद्द कैफींनीच म्हटलं आहे की, बदल कदाचित आपल्या जीवनात घडून आलेला आपण पाहू शकणार नाही. पण जे परिवर्तन आपणास समाज जीवनात घडवून आणायचं आहे, त्यावर विचारपूर्वक मानलेली निष्ठा हवी आणि त्या बळावर काम करत रहाणं एवढंच आपल्या हाती असतं. खरा परिवर्तनवादी कार्यकर्ता हा कधीच निराश होत नाही. कैफी पण असेच आयुष्यभर ‘इटरनल ऑप्टीमिस्ट’ राहिले.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3948

.............................................................................................................................................

१०) मी विज्ञानकथा का लिहितो? विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी! - जयंत नारळीकर

मी वुडहाऊस यांचासुद्धा खूप चाहता आहे. एक कथा मी वुडहाऊस यांच्या शैलीत सादर केली. अनेकांनी पूर्वीप्रमाणेच मूळ कथानकाबाबत विचारणादेखील केली. वुडहाउस यांनी अशी कथाच लिहिलेली नाही, हे समजल्यावर त्यांनी माझ्या प्रयत्नांची प्रशंसा केली. काहीजण विचारतात, ‘‘तुम्हांला विज्ञानकथा लिहायला वेळ कसा मिळतो?’’ माझे त्यांना सांगणे आहे की, विज्ञानकथा लिखाण हा माझा विरंगुळा आहे.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3957

.............................................................................................................................................

११) ९/११च्या त्या एका घटनेने जागतिक राजकारणाची दिशाच बदलली. अनेक समीकरणे बदलली. जुनी मोडली, नवीन तयार झाली. - चिंतामणी भिडे

११ सप्टेंबर २००१ नंतर सगळेच चित्र पालटले. प्रथमच आपल्या भूभागावर आपणच पोसलेल्या भस्मासुराने केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिका खडबडून जागी झाली. जे आमच्यासोबत नाहीत, ते आमच्या विरोधात आहेत, असं मानण्यात येईल, अशी घोषणा करत अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बुश यांनी दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं. तेव्हापासून आजपर्यंत या शतकाची पहिली १७ वर्षे जागतिक राजकारणातला सर्वांत महत्त्वाचा घटक दहशतवाद हाच आहे.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3958

.............................................................................................................................................

१२) सरकारी अधिकाऱ्यांची फायलींमधील टिपणं व पत्रं यांतूनच एखाद्या प्रकरणातला भ्रष्टाचार उघडकीस येतो, असं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलेलं आहे. - अरुणा रॉय

माहितीचा अधिकार आपल्याला सार्वभौमता व प्रतिष्ठा यांचा अनुभव देतो, हे भारतातील नागरिकांनी लक्षात ठेवायला हवं. विषम व अन्याय्य समाजामध्ये समता व सहभागाची मागणी झाली आणि ती परिणामकारकही ठरली, तर तिच्याकडे कायम धोका म्हणूनच पाहिलं जातं. माहितीचा अधिकार वापरणार्‍यांची संख्या बरीच मोठी आहे, त्यामुळे या संदर्भातील सामर्थ्य ठरावीक काळाने दाखवत राहिलं, तर या कायद्याला असलेले धोके टाळता येतील.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3960

.............................................................................................................................................

१३) ‘झुणका-भाकर चळवळीचे प्रवर्तक’, ‘समतानंद’, ‘प्रचारकार्यप्रवीण’, ‘जाहिरातजनार्दन’, ‘लोकमान्य टिळकांचे खास वार्ताहर’ अनंत हरी गद्रे! - भानू काळे

‘समतानंद’ अनंत हरी गद्रे हे एकेकाळी महाराष्ट्र गाजवणाऱ्या झुणका-भाकर चळवळीचे प्रवर्तक. अस्पृश्यतानिवारणार्थ महाराष्ट्रात जे प्रयत्न झाले, त्यांत या चळवळीचे स्थान खूप वरचे आहे. सत्यनारायणाची पूजा हे त्यासाठी गद्रे यांनी निवडलेले माध्यम. बहुतेक सर्व समाजस्तरांत बऱ्यापैकी प्रचलित असलेले. या पूजेत नेहमीप्रमाणे दिला जाणारा तूप-साखर घातलेल्या शिऱ्याचा प्रसाद न ठेवता झुणका-भाकर हाच प्रसाद ते ठेवत.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3966

.............................................................................................................................................

१४) मधल्या काळातील मराठी विचारवंतांचे, राज्यशास्त्रज्ञांचे, समाजशास्त्रज्ञांचे लोकप्रिय लेखन पाहा. ‘प्रोपगंडा’ हा शब्द त्यांच्या कोशातच नाही असे वाटावे. - रवि आमले

२०१४ मध्येच नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारमोहिमेमागील प्रशांत किशोर या प्रोपगंडाकाराचा हात बऱ्यापैकी उघड झाला. बातम्यांतून त्याची चर्चा होत होती. परंतु डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. ‘केब्रिज अ‍ॅनालिटिका’, ‘बिग डेटा’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या साऱ्या गोष्टी जागतिक चर्चेत आल्या. आजचा प्रोपगंडा हा किती सर्वव्यापी आहे, त्याची साधने किती आधुनिक आहेत हे त्यातून दिसत होते.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4009

.............................................................................................................................................

१५) खाद्यसंस्कृतीच्या एखाद्या गाढ्या अभ्यासकाने हा विषय जसा हाताळला असता, त्यापेक्षा टिकेकरांची हाताळणी अगदी सहज, सुलभ आणि गोष्टीवेल्हाळ आहे. - सुहास कुलकर्णी

इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. हा विषय लिहिण्याचा आनंद ते स्वत: घेत असल्याचं हा मजकूर वाचताना वाटत राहतं. त्यामुळेच त्यांच्यासोबत आपणही या आनंदात सहभागी होऊ शकतो. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो’, असा या लेखनाचा बाज आहे.

संपूर्ण लेखासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4011

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......