आजूबाजूला ‘मेंदू नसलेली कवटी’ आणि ‘बेशरमाची झाडे’ पाहून कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘सालं अतीच झालं!’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 05 November 2022
  • ग्रंथनामा शिफारस सालं अतीच झालं Saala Atich Zaal खेमराज भोयर Khemraj Bhoyar

क्रांती किंवा चळवळ रस्त्यावरचीच असते असे नाही, ती वैचारिकही असू शकते. जगातल्या क्रांत्या वा चळवळींच्या इतिहासात आपण हे पाहिलेलं आहे. ‘फ्रेंच राज्यक्रांती’मध्ये वैचारिक चळवळीची भूमिका व्हॉल्टेअरने मांडली होती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला वैचारिक क्रांतीचा फार मोठा हातभार लागला होता. प्रस्थापितांकडून अन्याय, अत्याचार होताना त्याविषयी जनतेत चीड, राग निर्माण करण्याची भूमिका विचारवंत, समाजसुधारक, साहित्यिक लेखनातून पार पाडतात. हे फक्त भाषणांतून किंवा वैचारिक लेखनातून होते असे नाही, तर ललितसाहित्यातूनही तितक्याच प्रभावीपणे होते. कवी कुसुमाग्रज जेव्हा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ म्हणतात तेव्हा शब्दही गर्जत येतात.

समकाळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, खोटारडेपणा वाढतो आहे, भंकसगिरी बोकाळते आहे, तेव्हा भूमिका ठेवून जगणाऱ्या कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कवी खेमराज भोयर यांची यांचा हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. श्रीधर अंभोरे यांचे समर्पक मुखपृष्ठ लाभलेल्या या कवितासंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी न्यायपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. यासोबत कवी लोकनाथ यशवंत व सागर सरहद्दी यांनी केलेले मलपृष्ठावरील भाष्य कवितासंग्रहाची उंची वाढवणारे आहे.

डॉ.यशवंत मनोहर म्हणतात, “चळवळीतील प्रत्येक मन कवीचेच मन असते. काही मने  कृतींनी बोलतात, तर काही मने कवितांनाच कृतीमय करतात. सार्त्र  म्हणतो त्याप्रमाणे ‘To speak is to act. The writer a free man addressing free men, has only one subject- freedom’. कवी लिहितो ही त्याची कृतीच असते. जग बदलण्यासाठीच तो लिहितो आणि मानवाला स्वतंत्र करणे हाच त्याचा विषय असतो.”

‘कविता हीसुद्धा चळवळीतील एक कृतीच असते’ हा विचार प्रस्तुत कवितासंग्रह वाचताना वारंवार येतो. कवी लोकनाथ यशवंत म्हणतात, “आपण राहतो ती दुनिया फारच लबाड आहे. येशू- बुद्ध- पैगंबर यांच्या आदर्शच्या खूपच लंब्याचवड्या बाता करते आणि युद्धाच्या खुरापतीही सतत उकरून काढते. जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकते नि लाखो माणसांना क्षणात मारून टाकते. अशी दुटप्पी दुनिया बघून कवी अस्वस्थ होतो.” त्यातून कवीचे शब्द शस्त्र म्हणून बाहेर पडतात. ‘ये तो बहुत जादा ही हुवा…’ असे मत सागर सरहद्दी व्यक्त करतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

या कवितासंग्रहात एकूण ९६ कविता आहेत. समकालीन समाजकारण, राजकारण, अर्थकारण, मीडिया यांची दुटप्पी भूमिका पाहून कवी अस्वस्थ होतो. लोकशाहीची क्रुरकर्म पाहून आपणास लाज वाटायला लागते. कोण सत्तेत? कोण विरोधी पक्ष हेच कळत नाही.

“मी सत्ताधारी, तू विरोधी

तू विरोधी, मी सत्ताधारी

पर्यायच नाही दुसरा” (पृ.२३)

आपण नम्रपणे मालकी स्वीकारली आहे. स्वसन्मान, अस्मिता खुंटीला गुंडाळून ठेवली आहे. कारण  ‘तुकडा’ भेटला की, घशाला कोरड पडेपर्यंत बोंबलणारे, बेंबीच्या देठापासून चिडीचूप आहेत. दलालांची फौज वाढलेली आहे. कसायाच्या दावणीला सारे आमचेच चमचे आहेत. रक्ताचा लिलाव करून, त्यांचीच थुंकी चाटत आहेत. सत्काराच्या भिकेला स्वतःची लाज विकली आहे. याची कवीला प्रचंड चीड येते. तो आपल्या लेखणीतून प्रहार करतो. आपल्या समविचारी दोस्तांना बंड करण्यास, क्रांती करण्यासाठी प्रवृत्त करतो-

“काठ फिरून खोलीचा

अंत लागणे नाही इथे

मेंदू नासव्या भक्तीची

ती कोंडी फोड दोस्ता” (पृ.३९)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

गटारातील गटातटांना घोडा लाव, लाथ मारून पाणी नाही तर पेट्रोल काढ असा सल्ला कवी देतो. ‘मला कुठल्याच वादात पडायचं नाही’ म्हणणाऱ्यांना कवी आपल्या बापाची आठवण करून देतो. आपण आपली खरखटी ठेवून त्यांचं धुवायला निघालो, दोस्त कोण? दुश्मन कोण? यावरून आपण भांडत बसलो, याचा राग कवीला येतो. म्हणून तो आपल्या मुलाला बजावून सांगतो- ‘शिक्षणाच्या परीक्षेत नापास झालास, फरक पडत नाही. आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी मात्र तुला महापुरुषांच्या विवेकाचा धागा पकडावा लागेल. कारण आजच्या कृतिशून्य  जगण्याचा कवीला संताप येतो-

“लिहून फार झाले

गाऊन फार झाले

पोकळ धमकी वार

देऊन फार झाले” (पृ.८२)

काठीविना झेंड्याला अर्थ राहत नाही. मोर्च्यात कधी न राहता, चर्चेत सहभागीला किंमत नाही, करणी आणि कथनीत फरक असू नये, ही कवीची प्रांजळ भावना आहे. “तुम्ही बाटलीनं पिता, की बोळ्यानं, या वादात मला पडायचं नाही, गंध बनून लोळायचं नाही, अन् आपसात लढायचं नाही” ही भूमिका हा कवी घेतो.

प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. पण दुर्दैवाने काही बोटांवर मोजता येतील, असे अपवाद वगळले तर बाकी सर्व विकले गेली आहेत. निरर्थक चर्चा, सत्तेची दलाली, ठरवून घेतलेल्या मुलाखती करणाऱ्या मीडियाला कवी प्रश्न करतो-

“माउल्या भोगून कापले-फाडले

पोटातील तिच्या गर्भही गाडले

सांगा कलम कसायांनो आता

आटली का शाई? मेंदू का सडले?” (पृ.६७)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

डोळ्यांदेखत धिंड काढताना, वस्ती जाळताना, धर्माचे ठेकेदार हैदोस घालताना, लोकशाहीआड नंगेशाही चालू असताना तुमची कलम का चालत नाही? असा प्रश्न कवी मीडियाला विचारतो. डुप्लिकेट लोकांचा खूप राग कवीला येतो. फेकू नेत्यांचा राग येतो. तो फक्त राजकारण्यांना, मीडियालाच उघडे पाडतो असे नाही, तर समाजातल्या संधिसाधू लोकांनाही सोडत नाही-

“तो ‘रामराम’

नमस्कार करीत

माझ्याजवळ थांबला

हळूच मला ‘जय भीम’ म्हणाला

अन् माझा हात

पायातील

बुटाकडं लांबला…” (पृ.८७)

ज्या बापाने तुला अस्तित्व दिलं, त्या बापाचं नाव घेताना तुला लाज वाटत असेल तर खबरदार, असा दमही कवी देतो. ‘फुले-शाहू-आंबेडकर-शिवाजी’ यांचा आरसा व आदर्श घेऊन पुढे येण्याचा सल्ला देतो.

थोडक्यात, समकाल भयावह, भीषण शब्दांत व्यक्त करताना कवी शब्द शस्त्र म्हणून घेऊन येतो. ‘बेशरम’, ‘कृतिशून्य’, ‘खेकडे’, ‘फौज’, यांची संख्या वाढते आहे. आजूबाजूला ‘मेंदू नसलेली कवटी’ आणि ‘बेशरमाची झाडे’ पाहून कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’

‘सालं अतीच झालं!’ - खेमराज भोयर

परिस पब्लिकेशन, पुणे

पाने – १५२

मूल्य – २०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘इंडिया आउट ऑफ वर्क’ : लेखकद्वय सरकारला प्रश्न विचारणारे आहेत. त्यामुळे अलीकडच्या आपल्या प्रथेनुसार त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल’ असल्याचा शिक्का बसू शकतो

मात्र ते जे प्रश्न उपस्थित करत आहेत, ते टाळून भारताने २०४७मध्ये उच्च उत्पन्न गटात प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण कसे होईल? रोजगार, अर्थव्यवस्था, शिक्षण यांमध्ये उत्पन्न झालेल्या या संकटाला लेखकद्वय ‘ट्रिपल ई क्रायसिस’ असे संबोधतात. प्रस्तुत पुस्तकाचा प्रमुख उद्देश भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाची गणना उच्च मनुष्यबळ विकसित असलेल्या देशांमध्ये व्हावी हा आहे........

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......