‘अ‍ॅनिमल फार्म’ : ही कादंबरी उपहास, उपरोध शैलीत राजकीय विडंबन मांडते. लोककथेचं मिथक वापरून एकाधिकारशाही व हुकूमशाही नेतृत्वाचं पितळ उघडं पाडते

जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीत आजच्या सत्तासंघर्षाचीही रूपकं जाणवतात, ती त्यामुळेच. जॉर्ज ऑर्वेल यांनी या कादंबरीतून साम्राज्यशाही व एकाधिकारशाहीवर कोरडे ओढले. प्रस्तुत कादंबरीत रूपकात्मक माध्यमातून जे सत्तासंघर्ष नाट्य रंगते, ते कोणत्याही काळात समकालीनच वाटायला लागते. विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रसिद्ध राजकीय उपहासात्मक कादंबरी म्हणून ‘अ‍ॅनिमल फार्म’कडे पाहिलं जातं.......

‘सातपाटील कुलवृत्तांत’  : या कादंबरीने मराठी कादंबरीला जगातील गाजलेल्या व मान्यताप्राप्त झालेल्या कादंबऱ्यांच्या रांगेत नेऊन उभे केले आहे!

‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी अनेक अर्थाने दर्जेदार आहे. मराठीत प्रकाशित झालेल्या आजपर्यंतच्या कोणत्याही कादंबरीत न आलेला एवढा मोठा, प्रदीर्घ काळ या कादंबरीत येतो. ही कादंबरी अशा कोणत्याही प्रवाहात बसत नाही. शेवटी शेवटी निवेदक फक्त मराठी माणसाचा विचार करत नाही, तर विश्वातील अख्ख्या सजीव सृष्टीच्या अस्तित्वाची चिंता करतो. वंश, गोत्र, जात, धर्म, पंथ, राज्य, राष्ट्र, विश्व या सगळ्याच्या पलीकडे हे चिंतन जाते.......