‘उद्याचा मराठवाडा’ : ‘सेंद्रिय एकात्मता’ आविष्कृत करणारा ‘नवे पर्व’ या विषयावरील वाचनीय दिवाळी अंक
पडघम - साहित्यिक
शंकर विभुते
  • ‘उद्याचा मराठवाडा’ या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 18 November 2021
  • पडघम साहित्यिक उद्याचा मराठवाडा Udyacha Marathwada राम शेवडीकर Ram Shevdikar नयन बाराहाते Nayan Barahate करोना Corona शिक्षण Education

कवितेच्या अस्तित्वाचा मूलभूत घटक म्हणून सेंद्रिय एकात्मेला महत्त्व दिले जाते. कवितेत आलेले शब्द, लय, नाद, अर्थ, प्रतिमा, प्रतीके, रूपक… हे सर्व घटक कवितेत अविभाज्य पद्धतीने जोडले जातात. त्यामुळेच त्यास परिपूर्णता येते. या परिपूर्णतेला समीक्षेच्या भाषेत ‘सेंद्रिय एकात्मता’ असे म्हटले जाते. अर्थात ही संकल्पना फक्त कविता या वाङ्मयप्रकारापुरतीच मर्यादित नाही, तर ती सर्व ललितसाहित्य प्रकारालाही लागू होते. पण त्याकरता कथा, कादंबरी, नाटक, ललितलेख यांतील आशय आणि अभिव्यक्ती या सर्व घटकांनी जोडले गेले पाहिजे. अशा जोडलेल्या गद्यलेखनालाही प्राचीन काळी ‘कविता’ किंवा ‘काव्य’ या अर्थाने ओळखले जात असे. संस्कृत अभ्यासक विश्वनाथ जेव्हा ‘वाक्यं रसात्मकं काव्यं’ असे म्हणतो, तेव्हा ते कविता हा शब्द ‘साहित्य’ या व्यापक अर्थाने व्यक्त होतो. ही व्यापकता ‘उद्याचा मराठवाडा’चा दिवाळी अंक वाचताना वारंवार जाणवते.

‘उद्याचा मराठवाडा’चा प्रत्येक दिवाळी अंक हा उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. २०२१चा ‘नवे पर्व’ हा अंकही परिपूर्ण आहे. या अंकाचे अतिथी संपादक सुरेश वांदिले असून कविताविभाग नयन बाराहाते आणि कथाविभाग मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केला आहे. दुर्दैवाने या अंकाचे काम पूर्णत्वास येत असतानाच बाराहाते यांचे दुःखद निधन झाले. परंतु त्यांनी आजाराशी झुंज देत कविता विभागाचे संपादन पूर्ण केले. त्यांच्याविषयी संपादक राम शेवडीकर यांनी ‘बहती हवा सा था वो...’ या शीर्षकांतर्गत आदरांजली वाहिली आहे. त्यांचा स्वभाव, त्यांची प्रतिभा, त्यांची माणुसकी यांचा त्यांनी घेतलेला आढावा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. ते लेखाच्या शेवटी म्हणतात, “नयन ज्या वाटेने गेला, त्या वाटेवरच्या लोकांना शोधता येत नाही, हा कोट्यवधी वर्षांपासूनचा अनुभव असूनही वजीराबादचा रस्ता ओलांडताना मी क्षणभर आशाळभूतपणे तिकडे पाहतो आणि पुन्हा छातीत चर्र झाले की, समोर बघत वाट काढतो.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

करोना महामारीला आपण तब्बल दोन वर्षांपासून तोंड देत आहोत. किंबहुना संपूर्ण जगच लढा देत आहे. आजही चीन, रशिया यांसारख्या राष्ट्रात तिसरी, चौथी, पाचवी लाट येत असल्याच्या बातम्या आपण ऐकत आहोत. करोनाची भीती अजूनही गेलेली नाही. या महामारीने जगाची अर्थव्यवस्था कोलमडली, जगण्याचे गणित बिघडले, सामान्यांचे कंबरडे मोडले, त्याहीपेक्षा कधीच भरून न निघणारे नुकसान म्हणजे लहान मुलांचं शिक्षण. ज्या वयामध्ये हातात पाटी-लेखणी घेऊन अक्षर गिरवायचे, त्या वयात तोंडाला मुखपट्टी आणि हातात सॅनिटायझर घेऊन घरात स्वत:ला कोंडून घेण्याचे दिवस आले आहेत. अशा काळात मुलांच्या शिक्षणावर कोणता परिणाम झाला? याचा आढावा या अंकातील ‘करोना आणि मूल’ या पहिल्या विभागात वाचायला मिळतो. या

करोनाच्या भयंकर रूपाविषयी या अंकाचे अतिथी संपादक सुरेश वांदिले यांचे एकच वाक्य खूप बोलके आहे. ते म्हणतात, ‘झाडावरून टपटप फळे गळून पडावीत तशी माणसे मरून पडत होती. यातून अमेरिका सारखा प्रगत देश वाचला नाही की, सोमालियासारखा अप्रगत देशही सुटला नाही.’ खरंय, आपणही खूप जवळची माणसं गमावली. कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचे भाऊ, कुणाची बहीण, कुणाची पत्नी, कुणाचे जवळचे मित्र... अशा अनेकांना गमावून बसलो आहोत.

यासोबतच भविष्यात किती मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल, याची प्रचिती मुलांच्या शिक्षणावरून येते आहे. या सर्वांचा आढावा या विभागात केलेला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, प्रदीप आवटे, शुभांगी पारकर, राजश्री हेमंत पाटील, श्रीकांत चोरघडे, संजीव लाटकर, राजीव तांबे, जयश्री देसाई, रवींद्र चिंचोलकर, डॉ. राणी खेडीकर, एकनाथ आव्हाड, चिंतन थोरात, समीक्षा गोडसे, अंजली अंबेकर, अलका गाडगीळ, आदित्य चाकूरकर, बाळ फोंडके, वैशाली चौधरी, यांच्या अभ्यासपूर्ण लेखांतून करोनामुळे मुलांच्या शिक्षणावर कोणता परिणाम झाला, याची बारकाव्यांनिशी केलेली मांडणी समजून घेता येते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

बालसाहित्यिक राजीव तांबे म्हणतात, “घरातली लहान मुले सतत मोठ्या माणसांच्या सहवासात राहिल्याने लहान मुलांचा निरागसपणा, खट्याळपणा, त्यांची फॅंटसी संपली. त्यांची म्हणून स्वतःची असणारी भाषा ते विसरून गेले.” पत्रकार संजीव लाटकर म्हणतात, “पावसामुळे झालेले नुकसान एक वेळ मोजता येतं. वादळामुळे झालेल्या हानीचा थोडाफार अंदाज येऊ शकतो, पण covid-19 नावाच्या महासाथीने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जे महावादळ आणलं, त्याने किती मोठी आणि दीर्घकालीन हानी केली आहे, याची मोजदाद करणं केवळ अशक्यच आहे.” चिंतन थोरात म्हणतात, “स्क्रीनवरील आभासी जगाचे व्यसन लागल्यामुळे मुलांना ADHDचा म्हणजेच Attention Deficit Hyper-active Dis-orderची समस्या भेडसावू लागली. याचा अर्थ मन सतत विचलित होणे, सहा सेकंदाच्या वर कुठेही लक्ष न टिकणे, एकाग्रताच घालून बसणे. एक अख्खी पिढी या आभासी व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे.”

या तीन प्रातिनिधिक उदाहरणांवरून या विभागातील लेखांची कल्पना येऊ शकते. यातल्या मुलांच्या प्रतिक्रिया तर अतिशय बोलक्या आहेत. ते वाचताना संवेदनशील मनाच्या कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीत शिकणारी शिवकन्या उमाकांत बाजगिरे म्हणते, “दिवस मावळला. सारे जण अंधारातच सडकनं निघालो होतो. थोड्या अंतरावर एक बंद डब्यांची माल घेऊन जाणारी गाडी थांबली होती. त्या गाडीच्या बंद डब्यात बाबांनी आम्हाला बसवलं. तेबी बसले. आधीच काही माणसं आतमध्ये बसली होती. दरवाजा बंद झाला. गाडी निघाली. डब्यात अंधार होता, काही, काही दिसत नव्हते. आमचा दम कोंडल्यावनी होत होता. अंग घामाने ओलेचिंब झाले होते. फोनच्या उजेडात कोणी झेंडू बाम लावून डोस्क चोळत होते. कोणी बेशुद्ध पडत होते...”

एकीकडे करोना महामारीने अशी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे आजही आपण अंधश्रद्धेला घट्ट चिटकून आहोत. त्यामुळे या सर्व व्यवस्थेला जबाबदार कोण, असाच चिंतनात्मक प्रश्न आपल्या लेखातून ज्येष्ठ अभ्यासक व संपादक प्रवीण बर्दापूरकर उभे करतात. ते आपल्या लेखात म्हणतात, “कर्मकांड करणाऱ्या परंपरागत ब्राह्मण्यापासून असंख्य ब्राह्मण कधीचेच कोसो दूर गेले आहेत. हे लक्षात घेतलं न जाण्याइतकं बहुसंख्य ब्राह्मणेतरांच्या सारासार विवेकबुद्धीचं दिवाळं वाजलं आहे, असं जर त्यावर म्हटलं तर त्यात गैर काय? कुणीच कुणाची जातिधर्मावरून हेटाळणी करायला नको. धर्म-देव-जात असेपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही. या देशाची घटना हाच माझा धर्म आणि तीच माझी जात, यावर जोपर्यंत आपलं एकमत होत नाही, तोपर्यंत आपला समाज जात आणि धर्माच्या तुकड्या-तुकड्यात विभागलेला राहणार.”

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

करोना महामारीसोबतच महाराष्ट्रात आणि भारतात आरक्षणाचा प्रश्न हा सर्वांच्या चर्चेचा, चिंतनाचा विषय बनलेला आहे. आरक्षणामुळे सर्वच प्रश्न सुटून जातील आणि प्रगतीचा विकासाचा अश्व चौफेर पद्धतीनं दौडू शकेल, असंच सर्वांना वाटू लागल्यानं जी परिस्थिती निर्माण झाली, तिचा समतोल आढावा तिसऱ्या विभागमध्ये घेतला आहे. ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके, पत्रकार-संपादक राही भिडे, राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आसबे यांचे लेख या विषयावर प्रकाश टाकतात.

हे वर्षे मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या तीन लेखांचाही या अंकात समावेश आहे. ‘आठवणीचा बकुळगंध’, ‘त्यांना होता चंद्र गवसला’, ‘तिची शब्दमोहिनी, चित्रमयी शैलीचा गोडवा…’ या लेखांतून विनय तरवडे, डॉ. विनिता हिंगे व साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी शांताबाईंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  

शेवटच्या विभागात रत्नाकर मतकरी, श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी, नंदू मुलमुले, मधुकर धर्मापुरीकर यांच्या कथा, शिवाजी जवरे व प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रे, तर जवळपास २६ कवींच्या कविता यांचा समावेश आहे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

गुलजार यांच्या एका गीताचा संदर्भ देत कविता विभागाचे संपादक नयन बाराहाते म्हणतात, “ ‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है...’ ” ‘समकालीन कविता’ असा विषय न घेता त्यांनी कवितेतील नावीन्य ही भूमिका ठेवून या विभागाचं संपादन केलं आहे. यामुळे यातील सर्व कविता वाचकरसिकांना एक वेगळा आनंद देऊन जातात. यातील सर्व कवी, कवयित्री सुप्रसिद्ध, नामांकित नाहीत, पण त्यांच्या कविता मात्र दखल घेण्यासारख्या आहेत.

थोडक्यात, या अंकातील ‘कोरोना आणि मुलं’, ‘मराठा आरक्षण टोलवाटोलवी’, ‘शांताबाई शेळके जन्मशताब्दी’निमित्तचे लेख, कविता, कथा, व्यंगचित्रे, या सर्वांमधून ‘सेंद्रिय एकात्मता’ आविष्कृत झाली आहे.

‘उद्याचा मराठवाडा’ : संपादक राम शेवडीकर

पाने - २०४, मूल्य – २०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......