‘शक्तिमान अणू’ : अणूसारख्या क्लिष्ट विषयाची सोप्या, रंजक भाषेत ओळख करून देणारी पुस्तिका
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
भरत पाटील
  • ‘शक्तिमान अणू’ या पुस्तिकेचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस शक्तिमान अणू Shaktiman Anu संजय पाठक Sanjay Pathak अणू Atom

अणू म्हणजे काय हे सोप्या, रंजक भाषेत आणि चित्ररूपातून समजावून सांगितलंय विज्ञान अभ्यासक संजय पाठक यांनी ‘शक्तिमान अणू’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तिकेतून.  

मुलांसह सर्वांनाच अणूविषयी कमालीचं कुतूहल असतं. हे लक्षात घेऊन पाठक यांनी ही पुस्तिका अनुवादित केली आहे. अणूची रचना सोप्या इंग्रजी भाषेतून स्पष्ट करणारी एक चित्रमय पुस्तिका भारत सरकारच्या पर्यावरण आणि जनसंपर्क संचालनालयानं काही वर्षांपूर्वी प्रकाशित केली होती. त्याचा हा मराठी अनुवाद आहे.

अणू हा मूलद्रव्याचा घटक आहे. ॲटोमोस या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ आहे ‘अविभाज्य’. ॲटोमोसपासून बनला ‘ॲटम’ हा शब्द, म्हणजेच अणू. अणूच्या अंतरंगात जाण्यापूर्वी लेखक अणूच्या शोधाविषयीची थोडक्यात माहिती सांगतात. इसपू सहाव्या शतकाच्याही अगोदर होऊन गेलेल्या महर्षी कणाद या भारतीय तत्त्वज्ञानं त्याच्या ‘वैशेषिक सूत्र’ या ग्रंथात ‘जगातील सर्व पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात’ असं म्हटलं आहे. त्यानंतर अणूचे घटक, त्यांची रचना, किरणोत्सार, केंद्रकीय संमीलन आणि विखंडन, अणुऊर्जा, अणुभट्टीचं कार्य यांविषयीची महत्त्वाची माहिती देत देत लेखक अणूबद्दलचं कुतूहल जागं करतात.

प्रत्येक पानावर मजकुरासोबत आकर्षक चित्रांचा समावेश आहे. त्यामुळे अणूची ही चित्रमय कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. विज्ञानाविषयी जाणून घेऊन वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याचा, तसंच जीवनमूल्यांची जोपासना करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न लेखकानं या पुस्तिकेतून केल्याचं दिसतं.

मुंबईतलं अणूशक्तीनगर आणि तेथील विजय, आनंद, अमर, भारत, चित्रा व दीपा ही सहा मुलं व डॉ.अनुराग ऊर्फ अनुकाका यांच्याभोवती ही चित्रमय कथा फिरते. गंमतीशीर अशा लहान लहान कृती या मुलांकडून करवून घेत आणि त्यांना छोटी छोटी उदाहरणं देत अनुकाका अणूची संकल्पना समजावून सांगतात. शास्त्रज्ञ कसे असतात, याचंही एक गंमतीशीर उदाहरण आहे. यामुळे अणूसारखा क्लिष्ट विषयही आवडू लागतो आणि विज्ञान जवळचं वाटू लागतं.

जॉन डाल्टन, जे.जे. थॉमसन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर यांनी केलेल्या अणूच्या संशोधनाबद्दलची माहिती अगदी सोप्या भाषेत अनुकाका देतात. अणूत असलेल्या प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या घटकांची ओळख डाळींसारख्या दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या पदार्थांच्या साहाय्यानं करून देतात!

अणूसंबंधीचं प्रदर्शन पाहण्यासाठी मुलांनी अनुकाकांसह गाडीतून केलेला प्रवास, प्रदर्शनाच्या ठिकाणचे संवाद आपलं कुतूहल ताणतात. प्रदर्शन पहात असताना मुलं आणि अनुकाका यांच्यामध्ये झालेले संवाद आणिलांच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक समाधान अनुकाका करतात.

कोणत्याही वयातील वाचकांना, विशेषतः ज्यांना विज्ञान विषयाची आवड आहे, अशा सर्व वाचकांना ही चित्रमय पुस्तिका नक्कीच वाचाविशी वाटेल. मूळ इंग्रजी पुस्तिकेचा अनुवाद पाठक यांनी अगदी सोप्या भाषेत केला आहे. त्यामुळे ही पुस्तिका मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करेल हे नक्की!

‘शक्तिमान अणू’ : संजय पाठक

व्यास क्रिएशन्स, ठाणे (प.)

मूल्य : ६० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक भरत विठ्ठल पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर (ता. मालेगाव जि.नाशिक) इथं प्राथमिक शिक्षक आहेत.

bharatpatil7988@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......