ज्येष्ठ विचारवंत, साक्षेपी लेखक, सत्यशोधक चळवळ व महात्मा फुल्यांच्या विचारांचे भाष्यकार रा. ना. चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक, वाङ्मयीन व सामाजिक चळवळीला वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिले आहे.
तथागत गौतम बुद्धांपासून म. जोतीराव फुल्यांपर्यंत, राजर्षी शाहूंपासून ते आंबेडकरांपर्यंत आणि यशवंतराव चव्हाणांपासून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपर्यंतच्या विचारकार्याचा साक्षेपी, चिकित्सक, तुलनात्मक विचार त्यांनी मांडला आहे. सामाजिक चळवळींचा, व्यक्तींचा विचारव्यूह स्पष्ट करून सांगितला आहे. तुलनात्मक दृष्टीकोनातून भाष्य करणे, हे रा.नां.च्या लेखनव्यवहाराचे महत्त्वाचे सूत्र आहे.
रा.नां.ची भूमिका स्पष्ट, सत्याची बाजू घेणारी आणि लोकशाही मूल्ये मजबूत करणारी राहिली आहे. राजा राममोहन राय, फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा ते स्वत:ला ‘नम्र प्रवक्ता’ समजत. ते म्हणतात, ‘‘आत्मपरीक्षणाची, आत्मटीकेची गरज सर्वत्र असतेच. राष्ट्रीय संदर्भात सर्वस्वी इंग्रजाला जबाबदार धरणे आणि सामाजिक, धार्मिक बाबतीत दलितांनी व ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणीधर्म व ब्राह्मण समाज यांना सर्वस्व कारण मानणे, ही सर्व प्रथा स्वातंत्र्यात तपासली पाहिजे. यासाठी मी तटस्थ झालो. मी कोणत्याही पक्षाचा नव्हतो व नाही. प्रार्थनासमाजात मूर्तिपूजा-विभूतीपूजा, कोणत्याही ग्रंथाचे सर्वप्रामाण्य नसते. ग्रंथ हे मनुष्यकृत समजले जातात. त्यामुळे बुद्धिवादाची वाट मोकळी होते. हीच तत्त्वे म. फुल्यांच्या पुस्तकातून शोधांती सापडतात. या दृष्टीचा मी जोडप्रचारक बनलो. प्रचार म्हणजे पुनरुक्ती व आभरण आलेच. सरळपणे माझ्या लिखाणात हा दोष (?) आढळतो. पण मी इहवादी, सामाजिक व राजकीय विषय वगळले नाहीत. उत्तरोत्तर सांप्रदायिक प्रचाराच्या बाहेर पडलो. राजकारण वर्ज्य मानले नाही.’’ (रा. ना. चव्हाण निवडक वाङ्मय, संपादक : प्रा. मो. नि. ठोके, १९८६)
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
सत्याचा ध्यास घेतलेला आणि त्यासाठी शोधकवृत्तीची जोपासना करणारी भूमिका रा.नां.च्या एकूणच लेखनाची आहे. त्यांचे ‘म. फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन (भाग ३)’ हे एप्रिल २०२३मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक त्यांच्या लेखननिष्ठेचा आणि सत्यशोधनाचाच परिपाक आहे.
रा.नां.वर सत्यशोधक समाज, ब्राह्मोसमाज यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. या दोन्ही समाजांच्या लेखक-कार्यकर्त्यांचा त्यांना सहवास लाभला. स्वत: त्यांचे वडील नारायणराव चव्हाण ब्राह्मो व सत्यशोधक समाज (वाई, जि. सातारा) येथील सक्रीय कार्यकर्ते होते. या विचारांचे संस्कार आणि विठ्ठल रामजी शिंदे यांचे मार्गदर्शन व सहवास, यामुळे रा.नां.ची तुलनात्मक अभ्यासाची दृष्टी वृद्धिंगत झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात तिला लोकशाही, घटनात्मक विचार आणि ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वांची बळकटी येत गेली. सदर पुस्तक वाचतानाही याची प्रचिती येते.
रा.नां.च्या एकूण लेखनव्यवहारात सर्वांत जास्त लेखन म. जोतीराव फुले आणि सत्यशोधक समाज यावर आहे. यापूर्वीची रा.नां.ची पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत-
१) म. फुले यांचा शोध व बोध, २००३
२) म. फुले यांचे नवदर्शन - एक लौलनिक अभ्यास, २००४
३) सत्यशोधकाची चिंतनिका, २००४
४) म. फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन (भाग-१), २००९
५) म. फुलेकृत सार्वजनिक सत्यधर्म (पुस्तकसार), २०१६
६) म. फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन (भाग-२), २०२१
७) सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे, २०२१
याबद्दलची त्यांची भूमिकाही मूलभूत आणि द्रष्टेपणाचीच आहे, हे त्यांच्या पुढील विधानातून दिसून येते. ते म्हणतात- ‘‘भारतीय घटनेने नवी आधुनिक निधर्मी मूलतत्त्वे स्वीकारली आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, समान संधी, समान हक्क, सामाजिक न्याय व सर्वांना सारखा कायदा ही आधुनिक तत्त्वे भारतीय घटनेने मान्य केली आहेत. ही तत्त्वे व ही दृष्टी म. फुले यांचे विचार व कार्य यामधून मागेच बीजभूतपणे व्यक्त झाली आहेत.’’
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
प्रस्तुत पुस्तकात विभाग-एकमध्ये ‘जोतीबा फुले’ या उपशीर्षकाखाली १२ लेख आहेत. ‘सत्यशोधक समाज’ या विभाग-दोनमध्ये ९ लेख आहेत. ‘सामाजिक प्रबोधन’ या विभाग-तीनमध्ये १६ लेख आणि ‘संकीर्ण’मध्ये ११ लेख आहेत. म. फुले, सत्यशोधक समाज आणि तत्कालीन सत्यशोधक संस्था, टीकाकार यांच्या एकूण दृष्टीचा, त्यांच्या कार्याचे महत्त्व या पुस्तकातून पुढे येते.
डॉ. व्ही.एल. एरंडे या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात- ‘‘रा.ना. चव्हाणांच्या विचारकक्षा अभ्यासनीय आणि संदर्भांकित आहेत. विचारांचा धागा पुढे गुंफत नेताना म. फुलेंच्या सामर्थ्याला वेगवेगळ्या लेखांमधून कवेत घेण्याचा प्रयत्न, परंतु नेमकेपणाच्या बांधीव शैलीतून त्यांनी हे सामर्थ्य मोठ्या कष्टाने पेलले आहे. हे पुस्तक म्हणजे म. फुल्यांच्या कार्याची आणि विचारांची लेणीच आहेत. म. फुलेंच्या विचारकार्याला समजून घेत पुढेपुढे नेणारा, हा प्रवाह परिवर्तनवादी जीवन जाणीवेला जागं करणारा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे.”
जोतीरावांच्या आचार-विचारांचा सार त्यांच्या ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या उक्तीत दडलेले आहे. सत्यशोधक समाजाची तत्त्वे आणि प्रचार-प्रसार महाराष्ट्रभर सत्यशोधकांनी केला, त्याचाही आधार हीच उक्ती आहे. सनातनी ब्राह्मणी धर्माविरुद्ध जोतीरावांनी जो संघर्ष केला, त्याचा आधार, सत्याचा निर्धार हाच होता. ज्या काळात बहुमत हे धर्माच्या, जातीच्या, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या, स्पृश्य-अस्पृश्य कल्पनांनी वेढलेले होते, त्या काळात अशा बहुमताला मानण्याचे काहीच कारण नव्हते, हे जोतीरावांना कळल्यामुळे त्यांनी आपल्या सर्व ग्रंथांमधून आणि कार्यातून सत्याचा प्रचार-प्रसार केला. त्यालाच नीती, धर्मव्यवहार मानले.
रा.नां.नी आपल्या खास शैलीत जोतीरावांच्या विचारांचा अर्थ उलगडून सांगितला आहे. शोषित जनतेचा पहिला पुढारी म्हणजे म. फुले. त्यांच्यापासूनच शेतकरी-कामकरी चळवळीचा उद्गम झाला आहे. १८५२ची ‘The first native library for these castes’ जोतीरावांच्या पुढाकाराने सुरू झाली होती.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
रा.नां.नी या पुस्तकात जोतीरावांसोबत सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाची, विचारांचीही चिकित्सा केली आहे. जोतीरावांच्या सहवासात सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे पुढे आले होते. सामाजिक समतेसाठी फुले दाम्पत्याने निकराचा संघर्ष केला. अनाथाश्रम, शाळा व इतर उपक्रम या दोघांच्या सहजीवनाचा उच्चतम कळस होता. रा.नां.ची लेखणी फुले दाम्पत्याच्या संदर्भात लिहिताना त्यांच्या विचार-कार्याशी पूर्णत: एकरूप झालेली आहे. म. फुले, सावित्रीबाई, दीनबंधु यांच्या संदर्भातील ऐतिहासिक माहिती पहिल्या आहे.
सत्यशोधक समाज, सत्यशोधक परिषद या अनुषंगाने मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि सत्यशोधक समाजाचा भौतिकवादी विचार रा.नां.नी आपल्या विचारपरंपरेशी संगती लावत मांडतात. त्यामुळे त्यांनी अभ्यासलेल्या सत्यशोधक समाजाच्या ऐतिहासिक दाखल्यांचा संदर्भ वर्तमानाशी जोडण्यात त्यांना यश आले आहे. कृष्णराव भालेकर, माधवराव रोकडे, नारायण मेघाजी लोखंडे, राजारामशास्त्री भागवत यांच्या सत्यशोधकी कार्याचा व लेखनाचाही ते ऐतिहासिक आढावा घेतात.
रा.ना. सत्यशोधक चळवळीच्या लहान-मोठ्या घटना, तत्कालीन भूमिका, तसेच विरोधी विचार व व्यक्तींचाही समतोल पद्धतीने चिकित्सा करतात. यांमधून तत्कालीन काळातील समाजवास्तव, व्यक्तींचे हितसंबंध, भूमिकांमधील ताणतणाव आणि व्यापक समाजहिताच्या तत्त्वांचे रक्षण आणि प्रचार-प्रसार यातील द्वंद्व स्पष्ट होते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
रा.ना. सामाजिक प्रबोधनामध्ये गणपती उत्सवांसारख्या व सार्वजनिक सत्यनारायणाच्या उत्सवाचे कोणतेच स्थान नाही, हे सांगतानाच ते लोकशाहीला मारक असल्याचेही सांगतात. बहुजन समाजाने अशा उत्सवांपासून दूर राहावे, असेही सुचवतात. या उत्सवामधील आगरकर व टिळकांच्या भूमिकेतील अंतर कसे मूलगामी होते, याची संदर्भासह मांडणी करून आगरकरांना ‘ब्राह्मणविध्वंसक’, तर टिळकांना ‘ब्राह्मण्यरक्षक’ म्हणतात.
म. फुलेत्तर काळातील व्यक्ती, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, निवडणूक या संदर्भातील रा.नां.चे चिंतन मूलगामी आहे. शेतकरी-कामगार पक्ष (शेकाप) आणि मार्क्सवाद, शेतकरी कामगार पक्षाचा विकास व संवर्धन या संदर्भात जातीय-वर्गीय प्रश्नांची, सत्यशोधक-ब्राह्मणेतर पक्षाच्या व मार्क्सवादातील आंतर-विरोधाच्या संदर्भासह ते विचार व्यक्त करतात. दलित समाजाच्या प्रश्नांबद्दलही रा.ना. चिंतनात्मक लेखन करतात. काही महत्त्वाच्या मुद्द्याचा उहापोह करून, लोकसत्ताक समाजरचनेसाठी दलित उत्थानाची भूमिका व तत्त्वांचे रेखाटन करतात.
विशेष म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या मंडल आयोगाबद्दलच्या भूमिकेचा विस्ताराने चर्चा करतात. या निमित्ताने ना.ग. गोरे व समकालीन समाजवादी, मार्क्सवादी व दलित विचारवंत, लेखक, कार्यकर्ते यांच्या भूमिकेतील विरोधाभासावर ते नेमके बोट ठेवतात. तर्कतीर्थांच्या वैचारिक प्रवासाचा वेध घेऊन ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात असलेल्या मंडल आयोगाबद्दलची तर्कतीर्थांची भूमिका न्याय नाही, ती विसंगत आहे. तर्कतीर्थ असे का बदलले, याची रा.ना. स्पष्टपणे मीमांसा करतात.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
पुस्तकाच्या शेवटचा भाग संकीर्ण लेखांचा आहे. त्यामध्ये गुरुवर्य बाबूराव जगताप, शामराव देसाई, मामा परमानंद, दत्तो वामन पोतदार, तांबटकाका, देशभक्त घोरपडे, महामूदमियाँ, श्रीपाद महादेव माटे, बाबूराव गोखले, मौनी महाराज, यशवंतराव मोहिते, गाडगेबाबा, अण्णा भाऊराव पाटील, बाबासाहेबांचे (डॉ. आंबेडकरांचे) दर्शन इ. महान विभूतींच्या व्यक्तिमत्त्व कार्याची ओळख रा.ना. करून देतात. या सर्व व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला होता. त्यांच्या विचार-कार्याची ओळख स्वत: अनुभवातूनही त्यांना झाली होती. त्यामुळे पूर्णत: अनुभवनिष्ठ विचार, तुलनात्मक पद्धतीने तत्कालीन काळाच्या संदर्भात मांडून, त्यांची ओळख समाजाला करून देतात.
रा.ना. सत्यशोधक समाज, सामाजिक प्रबोधनाच्या म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, चळवळींचा व समकालीन व्यक्तींचा ऐतिहासिक व समतोल लेखाजोखा उपलब्ध करून देतात.
या पुस्तकाचे संपादन रा.नां.चे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी केले आहे. त्यांनीनी आतापर्यंत वडिलांच्या लेखनाची ४४ पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली आहेत. १३,६०० पृष्ठांचा एकूण मजकूर या पुस्तकांतून प्रकाशित झाला आहे. ते गेली ३० वर्षे अविरतपणे सत्यशोधकी मूल्यसंवर्धनाचे काम नेटाने करत आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
प्रस्तुत पुस्तकाच्या संपादकीय मनोगतात रमेश चव्हाण म्हणतात, ‘‘प्रस्तुत लेखसंग्रहामध्ये ‘म. फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन’ यांवरील ५३ लेखांचे संकलन आहे. प्रदीर्घ काळात ५० वर्षे लिहिलेले/प्रकाशित झालेले हे लेख असून पहिला लेख १९४१ सालातील असून शेवटचा लेख १९९२मधील आहे. त्यामुळे उत्क्रांत झालेले त्यांचे मनन, चिंतन, विचारसुद्धा दृग्गोचर होतात. त्यांचे मूलगामी चिंतन आजच्या समाजवास्तवाचा विचार करता कालबाह्य झालेले नाही, याचा अनुभव हा लेखसंग्रह देईल.’’ (पृ.१० संपादकीय)
रा.नां.च्या आतापर्यंतच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांवरील मान्यवर संपादकांचे अभिप्राय आणि पुस्तकाला न्याय देणारी आणि मांडणीला भक्कम आधार देणारी परिशिष्टे, या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष, राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्ष, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि रा.ना. चव्हाण यांचा तिसावा स्मृतिदिन, हे या पुस्तक प्रकाशनाचे निमित्त आहे.
वर्तमानकाळातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रश्नांची उकल या पुस्तकातून होईल. सामाजिक प्रबोधनाच्या प्रचार-प्रसारात हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करेल.
.................................................................................................................................................................
‘म. फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन (भाग -)’ - रा. ना. चव्हाण
संपादक व प्रकाशक : रमेश चव्हाण | पाने : ३३६ | मूल्य : ४३० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment