हे पुस्तक नवीन पिढीतील पालकांनी, शिक्षकांनी आणि एकुणच मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचावे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सचिन नलावडे
  • ‘डॉ. मारिया माँटेसरी’ - वीणा गवाणकर
  • Sat , 19 August 2023
  • ग्रंथनामा शिफारस मारिया माँटेसरी Maria Montessori वीणा गवाणकर Veena Gavankar

बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या ‘डॉ. मारिया माँटेसरी’ यांचा जीवनपट उलगडणारे  वीणाताई गवाणकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचून झाले. तसे आकाराने पाहायला गेले, तर हे  पुस्तक छोटं आहे, पण जसजशी पाने उलटत गेलो, तसे बऱ्याच ठिकाणी थांबून विचार करायला भाग पाडणारे मुद्दे समोर आले. विशेषत्वाने बालशिक्षणात काम करताना मूलभूत विचारसरणी काय असावी? तिची दिशा काय असावी? याचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक मोलाचे आहे.

मला या पुस्तकातून काय शिकायला मिळाले, या अंगाने लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. माँटेसरी पद्धत योग्य की अयोग्य, ती आता कालबाह्य आहे की नाही, या प्रश्नात न पडता, या पुस्तकाचा मला रोज मुलांच्या सहवासात असताना, काम करताना उपयोग होईल, या दृष्टीकोनातून मी वाचन केले.

वीणाताईंनी ‘बालशिक्षण’ केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटते. वीणाताईंचे लेखन ती त्या व्यक्तिमत्त्वाची नुसती गोष्ट नसते, नुसती माहिती नसते किंवा नुसते ज्ञान ही नसते, तर गोष्ट, माहिती, ज्ञान यांच्या मर्यादा ओलांडून वाचकाच्या आयुष्याला भिडणारे आणि त्याच्या संवेदना जागृत करून वाचकांच्या मनामध्ये सकारात्मक बदल घडवते, म्हणूनच त्यांची पुस्तके आयुष्यभर सोबत करतात, वाचणाऱ्यांचं आयुष्य घडवतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

या पुस्तकातील पुढील तीन टप्पे महत्त्वाचे वाटतात-

१) मारिया माँटेसरी यांचे शिक्षण

२) बालशिक्षण हे जिवीत कार्य होण्याचा प्रवास

३) माँटेसरी शिक्षण प्रणालीची निर्मिती आणि त्या प्रणालीचा जगभर प्रसार.

मारिया माँटेसरी यांचे शिक्षण

साधारण युरोपातील एका बाजूला विज्ञान-संशोधन भरभराटीला येण्याचा हा काळ, तर  दुसरीकडे (१८८३ ते १८९४) स्त्रियांना माणूस म्हणून जगण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी असलेली सामाजाची मानसिकता, यात कमालीचा विरोधाभास होता. याला इटली हा देशही अपवाद नव्हता. मारिया यांना शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अडचणी आणि तितक्याच जिद्दीने त्यावर त्यांनी केलेली मात विलक्षण आहे.

स्त्रियांनी एकटीने रस्त्यावर वावरणं-फिरणं यावर बंदी असतानाच्या काळात मारियाचा इटली देशातील ‘पहिली स्त्री डॉक्टर’ होण्याचा प्रवास खूप काही शिकवून जातो. एक पालक म्हणून मारियाच्या आईचा रेनिल्देचा असलेला खंबीर पाठींबा, त्या काळात मुलीला हवं ते शिक्षण मिळावे म्हणून करावा लागलेला संघर्ष वाचताना सर्व घटना समोर घडत आहेत, असा भाव निर्माण होतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आजपर्यंत लाखो मुलांना ज्या व्यक्तीमुळे शरीरस्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचा विचार करणाऱ्या शिक्षण पद्धतीचा लाभ मिळाला, तिच्या आईला सलाम. आपली लेक नव्या वाटेने जाऊ पाहतेय, हेच रेनिल्देसाठी महत्त्वाचं होतं. आणि त्यासाठी ती मारियाला ज्या पद्धतीने प्रोत्साहन आणि पाठिंबा देत होती, तो भाग कमालीचा वाचनीय आणि पालकांसाठी अनुकरणीयही आहे.

शिक्षण ते बालशिक्षण प्रवास

हा टप्पा मला स्वतःला खूपच शिकवणारा आहे, असे वाटले. वाचता वाचता मध्येच एखादे वाक्य एवढे विचारप्रवर्तक वाटायचे की, तिथेच थांबावे, त्याचे अनुकरण करावे आणि मग पुढे जावे, तरच हे वाचण्याला अर्थ आहे, असे वाटायचे. मारिया डॉक्टर झाल्या, रुग्णालयात शल्यविशारद म्हणून काम करू लागल्या, स्वतःच्या खाजगी क्लिनिकमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करू लागल्या... इतकी कामे करत असताना परिचारिका, स्वयंपाकीण, घरातील कामाची मदतनीस अशा सगळ्या भूमिका एकाच वेळी त्या लीलया पार पाडत.

विशेषतः ही कामे चालू असताना मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलांसोबत काम करताना त्यांना आलेला अनुभव आणि त्यापासून त्यांना ‘मुलांच्या बौद्धिक विकासाचा मार्ग हातापासून सुरू होतो’, हे सापडलेले सूत्र वाचून अंगावर काटा आला, कारण या एका सूत्रावर माँटेसरी प्रणाली निर्माण झाली आहे. या टप्प्यावर त्यांनी अविकसित बुद्धीच्या मुलांसंबंधी वाचन करायला, पूर्वी झालेले संशोधन, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे

२०००च्या सुरुवातीला आयटीमध्ये काम सुरू केलेल्या पिढीने आयुष्यात नक्की काय मिळवले? गुलामगिरी!

भारतात कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर अजूनही पुरेसं शास्त्रोक्त पद्धतीचं काम झालेलं नाही. भारतीयांच्या अ-वैज्ञानिक दृष्टीकोनसुद्धा यासाठी कारणीभूत आहे

लोक खूप आहेत, पण नाती नाहीत, ही भारतीयांची शोकांतिका आहे. तुम्हाला लाखो-करोडो रुपये किंवा सोशल मीडियावरचे लाखो-करोडो Followers आनंद देऊ शकत नाहीत!

.................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या पूर्वार्धात वीणाताईंनी तत्कालीन विविध शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा ज्यांनी ज्यांनी बालशिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि ज्यांच्या संशोधनाचा मारियावर प्रभाव होता, त्यांच्या कार्याचे विवेचन केले आहे. या सर्व शिक्षणतज्ज्ञांचा, त्यांच्या  संशोधनाचा मारिया यांनी अभ्यास केला आणि ते काम पुढे नेले. त्यामुळे हा टप्पा विशेष करून शिक्षक आणि संवेदनशील पालकांसाठी महत्त्वाचा आहे. या टप्प्यात मारीया यांचे अध्यापनशास्त्र आणि त्याचे मूलभूत तत्त्व याविषयी सखोल अभ्यास सुरू झाला आणि बालशिक्षण हे त्यांचे जिवीत कार्य झाले.

डॉ. मारिया मॉंटेसरी यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीयशास्त्र, मानववंशशास्त्र, अध्यापनशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक अभ्यासविषयांचा, संशोधनाचा समग्र विचार करून स्वतःची अशी एक  नवीन शिक्षणप्रणाली निर्माण करण्यासाठी उपयोग करून घेतला.

माँटेसरी प्रणालीचा विकास आणि प्रसार

या तिसऱ्या टप्प्यात मारिया यांनी वस्ती पातळीवरील मुलांसोबत काम करून त्यांची अतिशय बारकाईने निरीक्षणे नोंदवली. त्यातून मुले मोकळ्या वातावरणात, स्वयंशिस्तीने व शांतपणे काम करतात, इतकेच नव्हे, तर ते करत असताना त्यांचा बौद्धिक विकास पण नैसर्गिक पद्धतीने घडत आहे, हे लक्षात आले. या निरीक्षणांवर विचार करून, त्याच्या नोंदी करून इंद्रिय जाणिवा वाढवणारी अनेक अध्यापन साधने त्यांनी विकसित केली, हे या भागात जाणून घेता येते.

ही साधने मुलांच्या नैसर्गिक कुतूहलाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी होती, किंबहुना आहेत असे म्हणता येईल. त्या काळात मोंटेसरी यांचे या शिक्षणाच्या अनोख्या पद्धतीवर तत्कालीन वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांमधून लेख छापून यायला लागले. शिक्षणाच्या या नवीन  प्रणालीवर शाळा स्थापन करणे, शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करणे, शिक्षण परिषदा भरवणे, शैक्षणिक साहित्याची प्रदर्शने भरवणे, हे सर्व काम जोमाने सुरू झाले.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

जगभरात पूर्वीची शिक्षण पद्धती बदलून माँटेसरी पद्धती कुठे कुठे आणि कशी स्वीकारली गेली, याचे, त्याचबरोबर त्या काळात त्यांनी केलेला जगभर प्रवास, आपली शिक्षणपद्धती  सुस्थापित करण्यासाठी घेतलेले कष्ट याचा आढावा या टप्प्यात वाचायला मिळतो.

कोणत्याही प्रकारची प्रभावी संपर्क साधने आणि माध्यम नसतानाही या शिक्षण पद्धतीचा जगभर झालेला विस्तार खरोखर अचंबित करणारा आहे. ‘शिक्षकानं काय शिकवलं यातून नव्हे, तर स्वतः तिने काय केले यातून ती व्यक्ती घडते’, हे  मारिया यांचे या भागातील वाक्य खूपच महत्त्वाचे आहे.

त्या काळी शिक्षकाला निरीक्षकाची भूमिका घ्यायला लावणारा त्यांचा विचार खूपच क्रांतिकारक होता. शिक्षण हे शांततेसाठीचे साधन आहे, असे त्या मानत. अशा विचारांमुळे त्यांची भारताशीसुद्दा नाळ जोडली गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जवळ जवळ दहा वर्षे डॉ. माँटेसरी यांचे वास्तव्य भारतात होते. त्यांचे काम त्याआधीच भारतात पोहचले होते, पण त्यांच्या या वास्तव्यात बालशिक्षणाच्या या नवीन प्रणालीची पाळेमुळे चांगलीच रुजली. त्याविषयी या भागात सविस्तर वाचायला मिळते.

हे पुस्तक नवीन पिढीतील पालकांनी, शिक्षकांनी आणि एकुणच मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचावे. हे पुस्तक पालक व शिक्षक यांच्यासाठी खूप मार्गदर्शक आहे. नवीन गोष्टी शिकण्याची शोधक वृत्ती व नवनिर्मितीचा ध्यास घेण्याची सवय जडायलाही, हे पुस्तक ‘कारक’ ठरू शकते.

‘डॉ. मारिया माँटेसरी’ - वीणा गवाणकर

इंडस सोर्स बुक्स, मुंबई | मूल्य - २९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......