आदिवासी कोरकूंच्या लोकजीवनातल्या लोकलयी, लोकतत्त्वे, लोकभाषा, लोकसंकेत आणि लोकजीवनाचा उपयोग केल्यामुळे या कविता फार वेगळ्या झालेल्या आहेत
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
इंद्रजित भालेराव
  • ‘मेळघाटच्या कविता’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Wed , 16 March 2022
  • ग्रंथनामा शिफारस मेळघाटच्या कविता Melghatchya Kavita श्रीकृष्ण राऊत Shreekrushna Raut

कवी श्रीकृष्ण राऊत यांचा ‘मेळघाटच्या कविता’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून ते कविता लिहितात. त्यांचे याआधी चार कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. हा त्यांचा पाचवा कवितासंग्रह आहे.

मराठी कवितेच्या रसिकांना प्रामुख्याने गझलकार म्हणून श्रीकृष्ण राऊत माहीत असले, तरी त्यांनी आपल्या प्रत्येक संग्रहात वेगळा विषय आणि वेगळे वृत्त छंद उपयोजित केलेले आहेत. मेळघाटच्या कवितांमध्ये त्यांनी आदिवासी कोरकूंच्या लोकजीवनातल्या लोकलयी, लोकतत्त्वे, लोकभाषा, लोकसंकेत आणि लोकजीवनाचा उपयोग केल्यामुळे या कविता फार वेगळ्या झालेल्या आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आदिवासींचं जगणं, वागणं, वाङ्मय आणि संस्कृती या सर्व कवितांमधून राऊत इतक्या समर्थपणे मांडतात की, ते मुळात आदिवासी नाहीत, हे लक्षातही येत नाही. राऊतांनी हे असं का केलं आणि त्यांना हे इतक्या चांगल्या पद्धतीने कसं जमलं, असा प्रश्न आपणाला पडू शकतो. जो ज्या वर्गाचा, जातीचा, गटाचा आहे, तो त्याच्याच कविता लिहितो, हा आजचा वास्तविक भोवताल आहे. मग आदिवासी नसलेल्या राऊतांनी आदिवासी कविता का लिहिली आणि त्यांना ती कशी जमली, या प्रश्नाचं एक उत्तर आहे.

श्रीकृष्ण राऊत यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाने २००६ साली संशोधनासाठी ‘आचार्य’ ही पदवी बहाल केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता ‘कोरकू आदिवासींच्या पारंपरिक मौखिक गीतांचा लोकतत्त्वीय अभ्यास’ राऊत यांनी केवळ पदवीसाठी हा अभ्यास केला नाही. त्यात ते इतके बुडून गेले की, त्या सगळ्या लोकलयी आणि तिथले जीवन त्यांच्या तना-मनात भिनलं आणि त्यातूनच या कवितांचा जन्म झाला.

मराठीत वाहरू सोनवणे, भुजंग मेश्राम, उषा अत्राम, कुसुम आलाम, विनायक तुमराम, सुनील कुमरे, सखाराम डाखोरे अशी एक आदिवासी कवितेची परंपरा आहे. प्रत्यक्ष आदिवासी जीवन जगलेल्या या कवींमध्ये आणि राऊत यांच्यामध्ये फरक हा आहे की, त्या कवींनी आदिवासी जीवनाचा आणि लोकवाङ्मयाचा स्वतः अभ्यास केलेला नव्हता. त्यामुळेच ते आदिवासी असूनही त्यांची कविता आदिवासी लयीत बोलत नव्हती. पण राऊत यांची कविता तसं बोलते. कारण आदिवासी जीवनाचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने राऊत यांना कोरकू संवेदनेच्या अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली.

या कवितांवर भाष्य करणारा एक सुंदर दीर्घ लेख किशोर सानप यांनी या संग्रहाच्या शेवटी लिहिला आहे. सुरुवातीला मधुकर वाकोडे यांची एक सुंदर प्रस्तावना आहे. वाकोडे सर आदिवासी जीवनाचे जाणकार आहेत. त्यांनी आदिवासी जीवनावर दोन कादंबऱ्याही लिहिलेल्या आहेत. त्यामुळे या प्रस्तावनेत या कवितांवर त्यांनी मार्मिक भाष्य केलेलं आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................ 

पण सानप यांचे भाष्य वाचून ही कविता खऱ्या अर्थानं कळते. त्यांनी या संग्रहातल्या प्रत्येक कवितेवर सविस्तर भाष्य केलेले आहे. प्रत्येक कवितेचा छंद कोणता तेही सांगितलेलं आहे. आणि कवितेचं मर्म उलगडून दाखवलं आहे. त्यामुळे ४० लघुकवितांवरचं हे भाष्य ४२ पानाइतकं दीर्घ झालेलं आहे.

या भाष्यात किशोर सानप यांनी अनेक धाडसी विधानं केलेली आहेत. ‘वृत्त छंद सोडल्यामुळे मराठी कविता सामान्य रसिकांपासून दूर गेलेली आहे’, ‘आतापर्यंतची आदिवासी कविता म्हणजे दलित कवितेची उपशाखा होती’, ‘खऱ्या अर्थानं पहिली आदिवासी कविता श्रीकृष्ण राऊतांनी लिहिली’, सानप यांच्या या विधानांची गंभीर दखल घेऊन त्यावर मराठी वाङ्मयविश्वात चर्चा व्हायला हवी. त्यावर घुसळण व्हायला हवी.

या सगळ्या कविता अत्यंत अल्पाक्षरी आहेत. सर्व कविता लयीतच आहेत. संग्रहातली पहिली आणि शेवटची कविता पावसावर आहे. या सर्व कवितांमधून आदिवासींच्या मुक्त जगण्यातला आनंद आणि शहरी माणसांनी त्यांच्या जगण्यात निर्माण निर्माण केलेले पेच, ही दोन्ही अंगे सारख्याच सामर्थ्याने आलेली आहेत.

या संग्रहातली मला खूप आवडलेली कविता मी खाली देत आहे. फाटक्या वस्त्रातील एका आदिवासी स्त्रीचा हा बोराटीच्या काटेरी झाडाशी झालेला संवाद आहे. प्रातिनिधिक रूपात सगळं आदिवासी जगणं आणि राऊत यांच्या कवितेची समग्र वैशिष्ट्यं या कवितेत दिसतात. म्हणून मी ही कविता इथं देत आहे. पण आपण मुळातून या समग्र कविता वाचाव्यात, अशी शिफारस मी यानिमित्तानं करील.

बोराटीच्या काट्या

नको धरू पदराला

एकुलतं एक नेसू

मला नेसायला

 

बोर वेचायला

आली सबागत

केळ पाणावाणी

झाली पदराची गत

 

गाठी बांधून बांधून

झालं मासोळीचं जाळं

त्यात तूही दुसमाना

केलं तोंड काळं

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आणखी एक कविता देण्याचा मोह मला आवरत नाही. म्हणून या संग्रहातली पहिलीच कविता ‘वरुणा वरुणा’ इथं देत आहे.

वरुणा वरुणा

तुझ्या डोळ्यातून

झरु दे करुणा

 

गाईच्या पोटाला

हिरवा चारा दे

चिमण्या ओठाला

दुधाच्या धारा दे

 

मिठाच्या कणाला

झोंबू दे भाकर

मुंगीच्या सणाला

सांडू दे साखर

 

तहानेचे बुंद

खुरात साचू दे

मुळांचा आनंद

शेंड्यात नाचू दे

 

वरुणा वरुणा

तुझ्या डोळ्यातून

झरु दे करुणा

झरु दे करुणा

.................................................................................................................................................................

लेखक इंद्रजित भालेराव प्रसिद्ध कवी आहेत.

ibhalerao@yahoo.com
.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......