अजूनकाही
काही व्यक्तींनी समाजजीवनात आणि सामाजिक सुधारणात भरीव योगदान देऊनसुद्धा त्यांच्याविषयी जनमानसात अत्यल्प माहिती असते. असे अनेक नायक इतिहासाच्या पानांआडच राहिले आहेत. त्यांच्या वैचारिक आणि कौटुंबिक वारसदारांचेही अशा नायकांच्या कार्यकर्तृत्वाकडे दुर्लक्ष झाले. त्यांच्या कार्याचा परिचय देणारी चरित्रेही लिहिली गेली नाहीत. त्यामुळेच त्यांना प्रसिद्धीविन्मुख राहावे लागले. अशाच महनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या यादीत पुण्यातील गंगारामभाऊ म्हस्के यांचा समावेश होतो.
नाशिक जिल्ह्यातील रंगराव ओढे या खेडेगावातून म्हस्के कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी १८३३-३४मध्ये पुण्याला स्थलांतर केले. याच कुटुंबातील गंगारामभाऊंनी उच्चशिक्षण घेतले. त्याचबरोबर ज्या समाजात आपण वाढलो\घडलो, त्या समाजाचे काहीएक देणे लागतो, या भावनेतून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी ही सर्व कामे नोकरी करत केली. प्रारंभीच्या काळात महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्यात सामील होऊन लोकांच्या मनातील अज्ञानरूपी अंधःकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘सत्यशोधक समाजा’ला मदत केली. शिक्षणसंस्थांची स्थापना केली. वाचनालय, सार्वजनिक बाग, ड्रेनेज सिस्टीम, दुष्काळग्रस्त लोकांना मदत, टाऊन हॉल, धर्मशाळा, अशी अनेक लोकोपयोगी कामे केली. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक शिवजयंतीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. एवढी कामे करून गंगारामभाऊ थांबले नाहीत. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन वकिलीचा अभ्यास केला. अनेक राष्ट्रीय नेत्यांचे खटले चालवले. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
गंगारामभाऊंना समाजोन्नतीसाठी शिक्षण महत्त्वपूर्ण वाटत होते. त्यासाठी त्यांनी काही विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या शिष्यवृत्ती देणे सुरू केले; परंतु या मदतीच्या मर्यादा त्यांच्या लगेच लक्षात आल्या. ही मदत मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू करणे गरजेचे वाटल्याने त्यांनी १८८३ मध्ये ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ या संस्थेची स्थापन केली. पुढे न्यायमूर्ती रानडे आणि इतर मित्रांच्या मदतीने या संस्थेला बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांचा राजाश्रय मिळवला. संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेकांना शिष्यवृत्ती दिली. त्यातून शिक्षण घेतलेल्या तत्कालीन पदवीधरांनी आपापल्या भागात शिक्षण संस्था सुरू केल्या. त्यामध्ये महर्षी वि.रा. शिंदे, कोल्हापूर संस्थानातील भास्करराव जाधव, दाजीराव विचारे यांचा समावेश होता. ही नामावली बरीच मोठी आणि सर्वक्षेत्रीय आहे. गंगारामभाऊंमुळे अनेकांना शिक्षण घेता आले.
महात्मा जोतीबा फुले, महाराजा सयाजीराव, राजर्षी शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले या समाजधुरिणांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. वरील सर्व मंडळी अडचणीच्या वेळी त्यांचा सल्ला घेत.
त्यामुळे डॉ. राजेंद्र मगर यांनी एवढा मोठा वैचारिक आणि सामाजिक पैस असणाऱ्या गंगारामभाऊ म्हस्के यांचे चरित्र लिहून मोठेच काम केले आहे. अर्थात हे काम सोपे नव्हते. कारण चरित्र नायकाचा मृत्यू होऊन जवळपास १२० वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळे चरित्रासाठी आवश्यक असणारी अत्यावश्यक साधनसामग्री मिळणे दुरापास्त होते; परंतु चरित्रकारांनी दुर्मीळ साधनसामग्रीचा शोध घेत अत्यंत चिकाटीने हे चरित्र साकारले आहे. गंगारामभाऊंनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे अहवाल, इतिहास आणि त्या संस्थेची आजची परिस्थिती याविषयी माहिती जमा करून त्यासंबंधीचे निवेदन केले आहे. यातून गंगारामभाऊंचे अफलातून व्यक्तिमत्त्व उभे राहते.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
गंगारामभाऊंनी सत्यशोधक समाजाला केलेली मदत, महात्मा जोतीबा फुले यांच्याशी त्यांचा असलेला स्नेह, राष्ट्रीय सभा स्थापनेतील सहभाग, राष्ट्रीय सामाजिक परिषद, पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये दिलेली साक्ष, प्लेगच्या साथीत लोकांना केलेले सहाय्य, द नॅशनल इंडियन असोसिएशनमधील सहभाग, आर्थर कॉफर्ड कमिशनमधील सहभाग, अशा अनेक राष्ट्रीय स्तरांवरील कार्यात त्यांचा असणारा सहभाग हा या चरित्राचा गाभा आहे.
त्या तुलनेत या चरित्रात गंगारामभाऊंच्या कौटुंबिक जीवनाविषयी कमी माहिती आली; तरीसुद्धा त्यांच्या सर्वव्यापक क्षेत्रातील व्यापक परिचयामुळे लेखक प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे ‘कार्यात्मक चरित्र’ खरोखरच सत्यनिष्ठ आणि तटस्थ झाले आहे. चरित्र नायकाच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतचा सामान्य ते असामान्य असा जीवनप्रवास चरित्रकारांनी उलगडला आहे. यामध्ये सर्वाधिक भाग डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचा असला तरी या संस्थेच्या माध्यमातून गंगारामभाऊंनी सर्वाधिक काम केले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
गंगारामभाऊ म्हस्केंचा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने परिचय करून देण्याचे श्रेय बाबा भांड यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीतील संशोधक डॉ. राजेंद्र मगर यांनी केले आहे. या चरित्रात सतरा प्रकरणे, सात परिशिष्टे आणि एकोणवीस छायाचित्रे आहेत. आवर्जून वाचावे असे हे चरित्र आहे.
‘महानायक गंगारामभाऊ म्हस्के’ : डॉ. राजेंद्र मगर
महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद
पाने - २३२, मूल्य – २५० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment