अजूनकाही
‘हक्कसोड’ या कादंबरीतून मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्रं समाजात सर्वत्र दिसतात. कायदा न्याय मिळवून देण्यासाठी असतो, परंतु कायद्याच्या गैरवापर करून आपला स्वार्थ साधणाऱ्या स्वार्थकेंद्री मनोवृत्तीचं प्राबल्य वाढताना दिसतं. ‘स्व’च्या दीर्घ ‘मी’साठी आपण कोणाला त्रास देतोय, याचं भान हरपलेली अनेक नात्यातली माणसं आजूबाजूला दिसतात.
या कादंबरीत महिपतराव आणि जानकी ही प्रमुख पात्रं आहेत. त्यांनी आपलं घर उभं करण्यासाठी आयुष्य झिजवलंय. घरातील प्रत्येकाच्या वाट्याला चांगलं जगणं यावं म्हणून आयुष्यभर मेहनत केलीय. महिपतराव सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन बरीच वर्षे उलटलेली आहेत. काही शेती त्यांनी आधीच घेऊन ठेवली होती. ती त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावे असते. त्या पत्नीला सुलोचना व निलिमा अशा दोन मुली. त्या शेतीच्या वारसदार असतात. या मुलींची लग्नं महिपतराव-जानकी यांनी मोठ्या थाटामाटात लावलेली आहेत. जानकी या दोघींची सावत्र आई असली तरी, या मुलींना चांगलं घर मिळावं, त्यांच्या वाट्याला कष्टप्रद जगणं येऊ नये म्हणून धडपडणारी आई आहे. मुलांना चांगलं शिक्षण, त्यांना नोकरीसाठी मदत, घर बांधण्यासाठी मदत, आडल्यानडल्या प्रत्येक ठिकाणी मदत करते. त्यासाठी जानकीबाईंनी महिपतरावांना कधीच अडवलेलं नाही.
जानकी आणि महिपतरावांना दोन मुलं – सुधाकर, उमेश आणि एक मुलगी, नेहा. महिपतरावांना वाटतं आपल्या मुलींचे संसार चांगले स्थिर झालेले आहेत. त्यांचं आयुष्य सुखा-समाधानानं भरलेलं आहे, पण आपल्या मुलांना नोकऱ्या नाहीत. सुधाकर मुंबईला एका कंपनीत नोकरी करतो, पण तिचा भरवसा नाही. त्यामुळे शेत या मुलांच्या नावानं करून टाकू. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटेल, ते मार्गी लागतील आणि आपल्याला त्यांच्यासाठीही काहीतरी केल्याचं समाधान मिळेलं, असं महिपतरावांना वाटतं.
नवीन कायद्यानुसार आई-वडिलांच्या संपत्तीत मुलींनाही बरोबरीचा वाटा द्यायला हवा, असा नियम आहे. मुलींना आपण आधीच सर्व काही दिलेलं आहे. आता त्यांना या शेतात वाटा द्यायची गरज नाही. आपण त्यांच्याकडून हक्कसोड लिहून घ्यायला पाहिजे, म्हणून महितपराव मुलींच्या घरी चकरा मारतात. मात्र सह्या देण्यासाठी दोघीही चालढकल करत राहतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
मुली सह्या का देत नाहीत, हे कळल्यावर जीवाची लाहीलाही झालेले महिपतराव वकिलाचा सल्ला घेतात. वकील म्हणतात, ‘तुमच्या सेवा पुस्तिकेला पत्नी म्हणून कोणाचं नाव आहे’. त्यांना ते आठवत नाही. त्यामुळे ते पंचायत समिती – जिल्हा परिषदेच्या चकरा मारतात. अर्जावर अर्ज देऊनही सेवापुस्तिका पाहू दिली जात नाही.
इकडं मुलींशी तडजोडी चालूच राहतात. मुली रोज नवी काहीतरी मागणी करत राहतात. शेवटी मुली म्हणतील ते सगळं द्यायला महिपतराव तयार होतात. मोहोद्रींची जमीन आणि वरून चार लाख रुपये द्यायला तयार होतात. ही जमीन पिढीजात असल्यानं आणि विभागणी केलेली नसल्यानं त्यावरच्या हक्कसोडासाठी महिपतरावांची बहीण प्रयागबाईची सही लागणार असते. पण तिचा मुलगा शंकर तिला सही करू देत नाही.
सहीसाठी पैसे मागणारी बहीण आणि संपत्तीत नुसता वाटा मागून न थांबता सतत बापाला छळणाऱ्या मुली, या कात्रीत महितपतराव सापडतात. जरी मुलींना वाटा देण्याचा कायदा असला तरी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागृत ठेवून निर्णय घेता आला पाहिजे. आपल्या वागण्याचे परिणाम नात्याच्या वितुष्टापेक्षा काळजावरचे न बुजणारे घाव असतात. आपण मुलगा-मुलगी समान मानून मुलीला आधीच सगळं दिलेलं आहे, त्यामुळे आता त्यांनी उरलेल्या संपत्तीत वाटा न मागता बेकारी अनुभवणाऱ्या भावाच्या पाठीशी उभं राहून नात्याच्या परिघाचा विस्तार करावा, असं महिपतरावांना वाटतं.
पैसे - शेत नावावर केल्यावरही तलाठ्याच्या मदतीनं त्रास देत राहणाऱ्या मुली जशा ठळक होतात, तशाच आपापल्या नवऱ्याच्या मागे ठामपणे उभा राहणाऱ्या स्त्रियाही दिसतात. महिपतरावांच्या मागे जानकी, सुधाकरच्या मागे उजा खंबीरपणे उभ्या राहतात, पण त्यांना टोचणाऱ्या वेदना आणि त्यांचा मुका झालेला संसार ‘हक्कसोड’ या एकाच विषयाभवती फिरत राहतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
महिपतरावांना वाटत राहतं- आपण जीवंत आहोत, तोपर्यंत आपल्या मुलांना न्याय मिळावा, पण तसं होत नाही. ते तलाठ्याला भेटतात, पण तलाठी आपल्या हातात काहीच नसल्याचं स्पष्ट सांगतो. तेव्हा आपल्यालाच मुलींनी आपल्याला फसवल्याचा घाव महिपतरावांच्या जिव्हारी लागतो. सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून सरकत जातो. पहिली बायको, या मुलींची आई आठवते. तिचं पत्र आठवतं. त्यातले ‘पोरी घरी कधी येणार म्हणून इचारून इचारून पोरी मला रडकुंडीला आणतात. तुम्हाला ठाऊक हाय, पोरी तुमच्याबिगर राहत नाहीत. त्याह्यले येकापरिस माय नसली तं चालती, पन बाप पाह्यजे आस्तो’, हे शब्द मायेच्या सर्व कंगोऱ्यांना पुसत जातात. छातीत तीव्र कळ अन् ते जगाचा-जगण्याचा, आपल्याच लेकीबाळीकडून फसवल्याच्या दाहक अनुभवातून झालेली तडफड - फडफडीसह शांत होतात.
या कादंबरीची भाषा संवादी असल्यामुळे संवाद थेट मनाला भिडणारे आणि दुःख जाणीवेच्या तीव्र संवेदना स्पर्श करणारे आहेत. कादंबरी आटोपशीर असल्यामुळे कथानक कुठलेही आडेवेढे न घेता हृदयाला स्पर्श करणारं आणि जगण्याच्या तीव्रतम असह्यतेला वाचा फोडणारं आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
मध्येच भावाला फसवणाऱ्या भावाविषयीही लेखक लिहितो. ही कादंबरी ‘स्त्री’ या नात्यातून फसल्या जाण्याच्या एकाच गोष्टीवर बोलत नाही, तर अनेक वेगवेगळ्या नात्यातून फसल्या जाण्याच्या जाणिवेनं तिचा पट विस्तृत होत जातो आणि मानवी पातळीवरून बदलत चाललेला नात्याच्या गुंतागुंतीचा पीळ उकलत जाण्यास सुसह्य ठरतो.
शेत, त्यातली पीकं, पिंकलर, रस्त्याच्या-रानाच्या आसपासची पाखरं या सगळ्या नोंदी घेत लेखक नात्यांच्या सर्व बाजूंवरही लिहितो. नात्यातलं सहवेदन संपून व्यवहारीपणाच्या बोहल्यावर चढलेल्या माणसांच्या भोगवादी जगण्याचं, त्यातून निर्माण झालेल्या आणि तुटत चालेल्या भावभावनांचं सावत्रपण ठसठसत्या खवंदासारखं होतं. ते मानवी मनाचं अंतरंग कुरतडत राहतं. त्यातून नात्यातल्या कोरडेपणाची जाणीव होते.
‘हक्कसोड’ - मिलिंद जाधव
लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने - ९२ | मूल्य – १०० रुपये.
.................................................................................................................................................................
हनुमान व्हरगुळे | hanumanvhargule@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment