२०१९मध्ये वाचलीच पाहिजेत अशी २०१७-१८मधील काही महत्त्वाची पुस्तकं!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • २०१७-१८मधील काही महत्त्वाच्या पुस्तकांची मुखपृष्ठ
  • Fri , 04 January 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras

दरवर्षी मराठीत काही हजार पुस्तकं प्रकाशित होतात. त्या सगळ्यांची परीक्षणं वा त्यातील संपादित अंश छापणं तर सोडाच पण नुसती त्यांची यादीही कुणा एका प्रसारमाध्यमाला छापणं शक्य नाही. मात्र २०१९मध्येही वाचायलाच हवीत अशा २०१७-१८ या दोन वर्षांतील काही निवडक पुस्तकांची ही ओळख. अमूक पुस्तक या यादीत का नाही, यांसारखे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यावर एवढंच म्हणता येईल की, सबूर करो. और कुछ आयेंगे...

.............................................................................................................................................

प्रियोळकरांनंतरचे सारे मुद्रणसंशोधन या त्यांच्या पुस्तकाला जोडलेल्या तळटिपा आहेत! - दीपक घारे 

अ. का. प्रियोळकरांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरर्पंतचा भारतीय मुद्रणाचा इतिहास सांगितला आहे. विसाव्या शतकात अधिक वेगाने तंत्रज्ञान बदलले. मुद्राक्षर जुळणीत मोनो, लाइनो पद्धतींमुळे मोठे बदल झाले. मराठीसह भारतीय भाषांना नव तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. पण संगणकाचे युग आल्यानंतर भारतीय लिप्यांमधील मुद्राक्षररचनेला नवी संजीवनी मिळाली आणि मुद्रणक्षेत्रात क्रांती घडून आली. भाषाशुद्धीची झालेली चळवळ काही अंशी मुद्रणाने प्रभावित झालेली होती. या सगळ्याचा परामर्श घेणारा इतिहास स्वतंत्रपणेच लिहिला गेला पाहिजे. पण मुद्रणकलेचा दुसऱ्या कालखंडातला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी आधीचा इतिहास अभ्यासाला हवा. त्यासाठी अ. का. प्रियोळकरांच्या ‘प्रिंटिंग प्रेस इन इंडिया’सारखे दुसरे विश्वासार्ह साधन कोणते असणार? त्यामुळेच त्याचे महत्त्व आजही कमी झालेले नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4617/Hindustanatil-Mudran-:-Prarambh-ani-Vikas

.............................................................................................................................................

जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो! - रवीश कुमार

निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकार रविश कुमार यांच्या ‘द फ्री व्हॉइस’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा पत्रकार सुनील तांबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. मधुश्री प्रकाशनातर्फे हा अनुवाद प्रकाशित झाला आहे. झुंडीचं स्वरूप जाणून घेण्यासाठीही आपण प्रयास करायला हवेत. झुंडीचे स्वतःचे कायदे असते, झुंडीचं स्वतःचंच एक राष्ट्र असतं. झुंड स्वतःचे आदेश, निर्देश आखते आणि आपलं सावजही तीच ठरवते. झुंडीचं हे स्वरूप ध्यानी घेऊन आपण निर्धाराने खबरदारी घ्यायली हवी की शासनकर्त्या संस्थांना त्यांची ठरलेली चौकशीची आणि उत्तरदायित्वाची कर्तव्ये नीटपणे पार पाडता यायलाच हवीत. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची चौकशी होईल आणि त्यांना शासनही होईल, ही बाब आपण निष्ठेने आणि संयमाने स्वीकारायला हवी. कुठेही आणि कोणत्याही काळात आपण जमाव वा झुंड होणे, म्हणजे हिटलरचा जर्मनी होणे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice

.............................................................................................................................................

डाव्यांचं अस्तित्व इतकं महत्त्वाचं आहे की, ते जर नाहीसं झालं, तर नव्यानं उभारावं लागेल! - सुहास परांजपे

ज्येष्ठ संपादक व अभ्यासक प्रफुल्ल बिडवई याच्या ‘दि फिनिक्स मोमेंट : चॅलेंजेस फेसिंग दि इंडिअन लेफ्ट’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा : इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता’ या नावानं नुकताचं रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला असून त्याला ज्येष्ठ मार्क्सवादी अभ्यासक सुहास परांजपे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकाचं महत्त्व निर्विवाद आहे. डाव्यांपासून उजव्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्याबद्दल लिहिलं आहे, त्यांना त्यातील मतं पटली असोत वा नसोत, सर्वांना हे नक्कीच मान्य करावं लागलं आहे की, भारतातील कम्युनिस्ट चळवळीबद्दल किंवा पक्षांबद्दल आजपर्यंत जी पुस्तकं आली आहेत, त्यांमध्ये– समग्रपणे, सिद्धान्तांपासून ते कृती कार्यक्रमांपर्यंत, ऐतिहासिक आढाव्यापासून ते राजकीय विश्लेषणापर्यंत, संसदीय हस्तक्षेपापासून ते तळागाळातल्या कामगिरीपर्यंत आणि तात्कालिक यशापासून ते ऐतिहासिक योगदानापर्यंत– अशी सर्व प्रकारची वैशिष्ट्यं एकत्रपणे व लीलया हाताळणारं दुसरं कुठलंही पुस्तक या पुस्तकाच्या जवळपासदेखील येत नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4546/Bharatatil-Davya-Chalwalincha-Magova

.............................................................................................................................................

‘आपले सरकार’ म्हणजे ज्या विचारधारेवर भारतीय जनता पक्ष उभा आहे, त्या पक्षाचे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे? - डॉ. रावसाहेब कसबे

डॉ. रावसाहेब कसबे यांचे ‘हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा’ हे पुस्तक नुकतेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. ‘हिंदु-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद’ हे कसबे यांचे पुस्तक १९९४ साली सुगावा प्रकाशनने प्रकाशित केले होते. त्या पुस्तकाची ही सुधारित आवृत्ती आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4448/Hindurashtravad---Swa.-Swarkarancha-ani-Rashtriya-Swayamsewaksanghacha

.............................................................................................................................................

यथार्थवादी भारतीय चित्रकलेच्या अभ्यासकाला या पुस्तकाची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही! - दीपक घारे

रावबहादूर म. वि. धुरंधर यांच्या ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या जे. जे. कला महाविद्यालयाचा सुरुवातीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं काल मुंबईत प्रकाशन झालं. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला समीक्षक प्रा. दीपक घारे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4521/Kalamandiratil-Ekechalis-Varshe

.............................................................................................................................................

दुर्गाबाई हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक धन आहे; सदसद्विवेकबुद्धीचं प्रतीक आहे! - अंजली कीर्तने

‘बहुरूपिणी दुर्गा भागवत’ हे अंजली कीर्तने यांचं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. दुर्गाबाईंचं सर्वांत जास्त लोभवणारं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा ध्यासवेडेपणा; त्यांच्यातलं चैतन्य. भोंडल्याच्या गाण्यातली कमळाच्या पाठीमागे लागली राणी ही ओळ वाचताना दुर्गाबाईंची आठवण होते. कमळाची भुरळ पडलेल्या राणीसारख्याच त्या कोणत्या ना कोणत्या ध्यासानं, छंदानं, कल्पनेनं अथवा एखाद्या शब्दानंसुद्धा भारल्या जात. दुर्गाबाई हे एक झपाटलेलं झाड होतं.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4462

.............................................................................................................................................

प्रत्येक पुस्तकवेड्याच्या आयुष्यात पुस्तकशोधाच्या काही सुरस आणि चमत्कारिक गोष्टी असतातच. तशा माझ्याही आहेत. - निखिलेश चित्रे

ग्रंथसंग्राहक आणि गाढेवाचक असलेल्या निखिलेश चित्रे यांचं ‘आडवाटेची पुस्तकं’ हे पहिलंवहिलं पुस्तक लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे.  जगभरातल्या उत्तम पण फारशा माहीत नसलेल्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची सफर हे पुस्तक घडवतं. पुस्तकांच्या शोधात आडवाटेला वळल्यावर पुढे त्या आडवाटेला अनेक फाटे फुटतात. वाचनाच्या अंगणात पाऊल ठेवणाऱ्या वाचकानं त्या वाटांनी पुढे जाऊन स्वत:चे लेखक शोधले, त्यातून त्याला खास त्याच्या अशा नव्या आडवाटा सापडल्या, तर मला आनंद होईल.       

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4507/Adwatechi-Pustake

.............................................................................................................................................

भुत्तोची फाशी हे एक नाटक होतं. मृत शरीरालाच फाशी दिली होती. - निळू दामले

धर्मसंकल्पनेचे एक शस्त्र करून दहशतीच्या हिंस्त्रतेतून जगाला हादरवून सोडणार पाकिस्तान हा देश. लोकशाही व्यवस्थेपेक्षा धर्मरक्षण आणि धर्मप्रसार हीच आपल्या देशाची ओळख असं ठासून सांगणारी या देशाची व्यवस्था - वस्तुतः कुठलीही व्यवस्थाच नसणारा. तरीही या देशाला एका पूर्वेतिहासाची भक्कम पार्श्वभूमी आहे. भारतासारखीच विविध जाति-जमातींची अनेकताही या देशाला आहे. परंतु या अनेकतेला नाकारत केवळ इस्लामचेच प्राबल्य पुनःपुन्हा अधोरेखित करणारा हा देश. या देशाचं भवितव्य कसं आहे नेमकं? पाकिस्तानमधली न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थकारण, राजकारण यांचे चेहरे कसे आहेत? सुधारणांना नकारच नोंदवणाऱ्या या देशाची अधोगती अटळ असेल तर या देशाचा यापुढील इतिहास कसा आणि कोणत्या दिशेने आपली पावलं उमटवत जाणार आहे? - पाकिस्तानबद्दलचे हे नि असे अनेक प्रश... अपरिहार्यही, गुतांगुतीचेही... या प्रश्नांची विश्लेषक उकल करणारं ‘पाकिस्तानची घसरण’ हे पुस्तक! हिंसा आणि व्यवस्थेचा अभाव या दोन पात्यांच्या कात्रीत अडकलेल्या पाकिस्तानची घसरण आणि एका अनघड देशाच्या सर्वांगीण प्रगति - अधोगतीचा आलेख मांडणारं हे पुस्तक नुकतंच मौज प्रकाशन गृहातर्फे प्रकाशित झालंय.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4510/Pakistanchi-Ghasaran

.............................................................................................................................................

मध्ययुगातच भारताचा इतिहास ‘जमातवादी’ झाला! बिगर मुस्लिम इतिहासकारांनी इतिहासाचे ‘विकृतीकरण’ केले. - प्रा. फकरूद्दीन बेन्नूर

मुस्लिम अभ्यासक सरफराज अहमद यांचं ‘मध्ययुगीन मुस्लिम विद्वान’ हे पुस्तक नुकतंच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे. मध्ययुगीन इतिहासाच्या आजवर कधीही चर्चिल्या न गेलेल्या बाजूवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. अनेक मुस्लिम विद्वांनाचा परिचय करून देतं. पुस्तकाला मुस्लीम अभ्यासक प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4506/Madhyayugin-Muslim-Vidwan

.............................................................................................................................................

‘अपना बाजार’ हा सामूहिक कर्तृत्वाचा आविष्कार ठरला - प्रा. पुष्पा भावे

‘अपना बाजारची गोष्ट : सहकार चळवळीतला आगळा प्रयोग’ हे गजानन खातू यांचं ‘अपना बाजार’च्या निर्मितीची गोष्ट सांगणारं पुस्तकं लवकरच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ सामार्जिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. गिरणगावात उभ्या झालेल्या ‘अपना बाजार’चे यश हा देशातील सहकारी चळवळीतील एक चमत्कार म्हणावा लागेल. या चमत्काराची कथा अत्यंत सरलपणे गजानन खातू यांनी निवेदन केली आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4520/Apna-Bajarchi-Gosht-

.............................................................................................................................................

‘कहाणी पाचगावची’ ही फक्त एका गावाची गोष्ट नाही... - मिलिंद बोकील

‘कहाणी पाचगावची’ हे आधुनिक राज्यशास्त्र आहे. ‘स्वराज्य’ ही काही जुनाट संकल्पना नाही. ती खरे तर अति-आधुनिक संकल्पना आहे. शहरातले मध्यमवर्गीय लोक या संकल्पनेला पूर्ण पारखे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व कळत नाही. खरं तर ७३व्या आणि ७४व्या घटनादुरुस्तीचा हाच उद्देश आहे, पण आपण तो प्रत्यक्षात आणलेला नाही. प्रतिनिधींच्या हातात सत्ता सोपवून आपण लोकशाहीचे विडंबन हताशपणे बघत बसलेलो आहोत.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4345

.............................................................................................................................................

अँडरसनची विलक्षण दृष्टी साध्यासुध्या गोष्टींमध्ये साहस आणि अचाटपण शोधते - चैताली भोगले

अँडरसनला उथळपणाचा त्याला भारी राग. अशा गोष्टींना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्यांची तो आपल्या गोष्टींमधून पदोपदी खिल्ली उडवताना दिसला. मग ती गोष्ट धर्माची असो, कलेची किंवा हुशारीची. नायटिंगेलच्या गोष्टीमध्ये राजाचा उत्तराधिकारी बुलबुलच्या शोधात निघतो, तेव्हा गायीच्या हंबरण्याला आणि बेडकाच्या डराव डराव करण्यालाच तो बुलबुलचा आवाज समजतो.

‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

आठवणी गुरुजींच्या - प्रा. मधुकर राहेगावकर

वैचारिक निष्ठा आणि वैयक्तिक ऋणानुबंध यात मानसिक संघर्ष निर्माण करणारे प्रसंग गुरुजींच्या आयुष्यात अनेकदा आले. त्या वेळी सारे दोषारोप सहन करूनही त्यांचा कल मानवी संबंधांकडे अधिक झुकलेला असे. जीवनावरील व माणसांवरील अतीव श्रद्धेने ते असेच वागत राहिले. स्वत: स्वीकारलेल्या वैचारिक तत्त्वाविरुद्ध वागून लोकनिंदेने भाजून जात असताना आपण कुणाच्या तरी ऋणाची किंमत मोजत आहोत, यात अंतिमत समाधान आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4346

.............................................................................................................................................

छापण्याजोग्या गोष्टी, लिहिण्याजोग्या आणि वाचण्याजोग्याही - विजय तेंडुलकर

वास्तविक या लेखनात आलेली माणसे, त्यांचे जग मला अपरिचित नव्हते. इतकेच नव्हे तर त्यातले काही अतिपरिचयाचे होते. तरीही या लेखनाने मला रमवले, काही नवे दिले, विचाराला प्रवृत्त केले, हे त्याचे यश म्हटले पाहिजे. कर्णिक चांगले संपादक आहेत हे माहीत होते. पण ते चांगले लेखक आहेत हे आता कळले.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4349

.............................................................................................................................................

‘हळक्षज्ञ’चा श्रीगणेशा! - सतीश तांबे

पठडीबाह्य विचार हे नेहमीच योग्य, उपयुक्त वा कामाचे असतात असं नाही. त्यामध्ये गफलतीही असू शकतात. मात्र विचारांच्या क्षेत्रात त्यांचा वापर हा अत्यंत आवश्यक असतो. तावून-सुलाखून घेतल्याशिवाय शुद्ध विचार निर्माण होणं असंभव असतं. विचारसंकोचाच्या काळात तर ‘हळक्षज्ञ’ विचारांची मोठीच गरज असते. चिकित्सा ही गोष्ट आपण यापुढे सांस्कृतिक क्षेत्रातून बादच करायची आहे का?.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4390

.............................................................................................................................................

‘सिनेमास्केप’ वाचताना लक्षात घेण्याजोगी आहे, आजच्या बदलत्या काळाची, विचाराची पार्श्वभूमी - गणेश मतकरी

या पुस्तकाला ‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं हे की ‘सिनेमॅटिक’मध्ये ज्या पद्धतीचे लेख आहेत, त्याच प्रकाराला हे पुस्तक पुढे नेतं, त्यामुळे नावातलं साधर्म्य हे त्या दिशेचा निर्देश करणारं. ‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागचं दुसरं कारण आहे, ते त्या शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाशी संबंधित. चित्रपटाचा प्रांत, परिसर या दृष्टीनं हा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4391

..............................................................................................................................................

विशाल अवकाशाचं दर्शन घडवणारी कळवळ्याची ‘धूळपेर’ - अतुल देऊळगावकर

‘धूळपेर’मधील प्रत्येक निबंध हा अत्यल्प शब्दात अतिशय विशाल अवकाशाचं दर्शन घडवणारा आहे. त्यात अनेक चित्रपटांची, शोधनिबंधांची बीजं आहेत. कुठलाही निबंध कधीही वाचला तरी पुस्तक हातातून सुटत नाही. वाचल्यावर आपण होतो तसे रहात नाही. सद्यकाळातील वाढत जाणारे आत्ममग्नता आणि असंवेदनशीलता यांचं पीक पाहून आसाराम वेदनेनं व्याकूळ झाला आहे. आपलीही अवस्था सैरभैर होऊन जाते..

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/2453

.............................................................................................................................................

‘भंगार’मध्ये पानोपानी ऊर्जा भरली आहे; ती कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही - डॉ. सुनीलकुमार लवटे

‘भंगार’ वाचताना गोसावी समाजाचा कायाकल्प करणारा एक चित्रपट वाचकांच्या मनापुढे झरझर सरकत राहतो. त्या अर्थानं ‘भंगार’ आत्मचरित्र हे समांतर विकसित होत समाजचित्र जिवंत करतं. मराठी वाचक ‘भंगार’ वाचतील तर त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाहीत. ती ऊर्जा या पुस्तकात पानोपानी भरली आहे; ती उद्या कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4301

.............................................................................................................................................

बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत - इरावती कर्णिक

बाहेरचं जग कसं असेल? तिथं आयुष्याला अर्थ असेल का नसेल? ते आपल्याबद्दल असेल का नसेल? आपल्याला माहीत नसलेलं तिथे किती असेल? कोणास ठाऊक, कदाचित तिथं आपल्याला न सुचणारे प्रश्नही असतील तर? आणि उत्तरं मिळण्यासारखी असतात. बाटलीतून बाहेर पडून फक्त त्याआधी ती आडवी पाडावी लागणार. सगळं सुरळीत चालू असताना गदागदा हलवून बॅलन्स घालवावा लागणार.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4392

.............................................................................................................................................

बंडखोरीकडून वेगानं आत्मशोधाकडे जाणारी कविता : वेदिका कुमारस्वामी - अश्विनी दासेगौडा - देशपांडे

फेसबुकच्या आजवरच्या इतिहासात कुणाच्या कवितांची प्रचंड चर्चा झाली? फेसबुकवच्या आजवरच्या इतिहासात कुठल्या कवयित्रीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली? फेसबुकवरच्या आजवरच्या इतिहासात ‘ही कवयित्री नेमकी कोण?’ याविषयी अनंत तर्क लढवले गेले? फेसबुकच्या आजवरच्या इतिहासात कुणाच्या कविता प्रचंड प्रमाणावर वाचल्या गेल्या? या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे - वेदिका कुमारस्वामी.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4427/Gavnavari

.............................................................................................................................................

श्रीकृष्ण तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाने त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला - डॉ. सदानंद मोरे

कृष्ण तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारूपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसर्‍यात तो अनुकरणीय आदर्श बनतो.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4398

.............................................................................................................................................

वीरा राठोडचं लेखन अधिक आश्वासक व प्रसन्न करणारं आहे - संजय पवार

वीरा राठोड फुले अमुक साली हे म्हणतात, बाबासाहेबांनी अमुक साली हे भाषण केलं, मार्क्स म्हणतो, शाहू अमुक साली तमुक करतात अशी सनावळीही देत नाहीत. याऐवजी ते शिक्षण तज्ज्ञांपासून, शास्त्रज्ञांपासून, खेळाडू, कलावंत यांना उद्धृत करतात. त्यातून काही अपरिचित इतिहास, मुद्दे कळतात. हे ‘अपरिचित’ मांडून आधुनिक इतिहासात नोंद करण्याची कामगिरी ते जाता जाता करतात..

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4399

.............................................................................................................................................

हे पुस्तक शिष्टाईचा विविधरंगी, विविधढंगी कॅलिडोस्कोप आहे! - ज्ञानेश्वर मुळे

विजय नाईक यांच्या याआधीच्या ‘साउथ ब्लॉक, दिल्ली- शिष्टाईचे अंतरंग’ या लोकप्रिय पुस्तकानंतर ते ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ घेऊन मराठी वाचकांना भेटायला येत आहेत, हे आपल्या मराठीचं भाग्य आहे. यामुळे मराठी माणसाला एका अपरिचित विश्वातील कंगोरे तर कळतीलच, पण अशा पुस्तकांमुळे भाषेलाही श्रीमंती येते हे विसरता कामा नये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4400

.............................................................................................................................................

पक्ष्यांची किलबिल ऐकली, पक्षी-फुलपाखरे स्वछंद नाचताना दिसली की, आई-बाबा आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते - डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर

आता आमचे आई-बाबा नाहीत; पण अजूनही पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकली, ब्लू जे, कार्डिनल व रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे स्वछंद नाचताना, पंख फडफडवताना दिसली, समोरच अंगणात वा रस्त्यांत हरणे बागडताना दिसली, खारी, कुत्रे वगैरे प्राणीमित्र भेटले, ठरावीक वेळेला बदकांची मालिका आकाशात दिसली, मोर नाचताना पाहिला व कोकिळेचे सुस्वर गायन ऐकले की, आई-बाबाही सदैव आमच्यातच आहेत, आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4401

.............................................................................................................................................

दु:खांना हसावयाचे, ती हसण्यावारी न्यावयाची, हसून हसून ती विसरून जावयाचे, हा विनोदाचा खरा हेतू आहे - प्रदीप कुलकर्णी

विनोदामध्ये कलाटणी देण्याचं काम ‘पंच लाइन’ करते. श्रोत्यांना या कलाटणीचा थोडासा जरी सुगावा लागला, तरी एखाद्या फुग्यातली हवा निघून जावी तशी विनोदातली गंमत निघून जाते. म्हणूनच हास्यनिर्मितीमध्ये अचानकपणे आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या कलाटणीला महत्त्व असतं. अपेक्षा आणि त्यांना मिळालेली कलाटणी यांच्यातील दरी जेवढी मोठी, तेवढा हास्याचा स्फोट अधिक मोठा.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4371

.............................................................................................................................................

‘लीळा पुस्तकांच्या’ : समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्याची एक खिडकी - नितिन भरत वाघ

जर आपण पुस्तकांना आणि पुस्तक संस्कृतीला समाजशास्त्रीय मूल्यमापनाचं ‘एकक’ गृहित धरत असू आणि त्याचं प्रमाण इतकं अत्यल्प असेल, त्यावरून लक्षात येतं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे. हे पुस्तक केवळ पुस्तकांच्या जगाविषयी किंवा पुस्तकांविषयी माहिती देत नाही तर समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्यासाठी एक खिडकी प्रदान करतं. अशी खिडकी जी कुणासाठी उघडली तर लगेच उघडेल किंवा कुणासाठी कायमची बंद राही

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......