अजूनकाही
कवी दासू वैद्य यांचा ‘मेळा’ हा महत्त्वपूर्ण ललित लेखसंग्रह. ‘तूर्तास’, ‘तत्पूर्वी’, ‘क कवितेचा’ (बालकवितासंग्रह) हे त्यांचे कवितासंग्रह असून ‘आजूबाजूला’ हा ललित लेखसंग्रह. मुळातच दासू वैद्य यांचा पिंड कवी प्रवृत्तीचा, पण कवी जेव्हा ललितलेखनात उतरतो, तेव्हा गद्यालाही कवितेचे रूप कसे प्राप्त होऊ शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे त्यांचा ‘मेळा’ हा ललित लेखसंग्रह होय.
ललितलेखनात लेखकाच्या स्वानुभवाच्या आधारे व्यक्त झालेल्या विचारांना महत्त्व असते. मानवी सुख-दुःखाचा शोध घेत जीवन मूल्यांचाही घेतलेला वेध महत्त्वपूर्ण ठरतो. लेखक कलाकृतीशी एकरूप होत अत्यंत आत्मीयतेने आपल्या अनुभवाला शब्दबद्ध करतो. जीवनावर भरभरून प्रेम करत या लेखनातून पाहिलेले, टोचलेले, बोचलेले आणि अंतर्मुख करणारे अनुभव लेखक शब्दबद्ध करतो. असेच अनुभव या संग्रहातून साकारले असून समाजातल्या विविध वृत्ती-प्रवृत्तीला शब्द रूप दिले आहे.
हे अनुभव मांडताना त्यांच्या लेखनात आलेला उपरोध, तिरकसपणा, कारुण्य, व्यवस्थेला लावलेले सुरूंग, काळानुसार ढासळलेली मूल्ये, अगतिकता, मुखवटे धारण करणारी संकुचित स्वार्थी माणसे यावर केलेले आश्वासक भाष्य लेखकाची माणसाप्रती, समाजाप्रती असणारी निष्ठा किती ठासून भरलेली आहे, याचे दर्शन यातून घडते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
दासू वैद्य यांच्या लेखनात लहान-मोठ्या घटना, प्रसंग आणि अनुभवाकडे पाहण्याच्या आश्वासक दृष्टीसोबतच माणसाबद्दलची विलक्षण ओढ ओतप्रोत भरून राहिली आहे. यात आठवणीपर, निसर्गपर, वैचारिक, स्त्रीविषयक आणि व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा समावेश आहे. जीवनानुभव घेणारा ‘मी’ अर्थात लेखक आपल्या काळाशी एकरूप होतं, जीवनाचे, मानवी स्वभावाचे सर्व रंग प्रकट करत, भवतालाचे, आपल्या गावाचे विलक्षण आणि चित्रदर्शित्व ओघवत्या भाषेत करतो.
लेखक म्हणून समकालाकडे पाहण्याची दासू वैद्य यांची एक दृष्टी आहे. या दृष्टीमुळेच त्यांच्या लेखनाला सकसता आणि वैविध्यता प्राप्त झाली आहे. संग्रहातील लेख केवळ आत्मनिष्ठ, मनोरंजन करणारे, स्मृतिरंजनात रमणारे नाहीत, तर समकालाचे अचूक भान ठेवत, गांभीर्याने, संवेदनशीलतेने केलेले लेखन आहे. त्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील दर्शन समकालाचे वेध घेणारे ठरले आहे.
दासू वैद्य यांच्यावर गावखेड्यातील संस्काराचा प्रभाव आहे. तेथील वातावरण, निसर्ग, एकत्र कुटुंब पद्धती, परंपरा, आचार-विचार, जीवन, या घटकांचा सांधा जोडत त्यांच्या लेखनाने समाजमनाची अचूक नस पकडली आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
‘मेळा’तील ‘रंग’ या ललितलेखापासून सुरू झालेला समाजचिंतनाचा प्रवास ‘गळा दाबल्याने गाणे अडते का?’, ‘बाई सांभाळ कोंदण’, ‘कटिंग अंधारातला नट’, ‘सीमेवरचं नाटकं’, ‘अरं... येऊSSन येऊSSन येणार कोण?’, ‘मरणगंध’, ‘उगवून आलेलं... खडूची भुकटी’, ‘खानपुराण’, ‘अरण्यरुदन’, ‘बाजार’, ‘झेंडे’, ‘मार्गदर्शन’, ‘निघून गेला आहे’, ‘गोष्ट लिहिणाऱ्याची गोष्ट’, ‘पिच्चर’, ‘मनातलं घर’, ‘अंथरलेली वाळू’, ‘बक्षिसी, पोळणारी सावली’, ‘लाल पोशाखातला हिरवा माणूस’, ‘रास्ता रोको’, ‘न पाठवलेलं पत्र’, ‘लांब नाकवाल्याची गोष्ट’, ‘रे पावसा...’, ‘पाठलाग’ आणि ‘प्राप्ती’पर्यंत येऊन जीवनानुभावाचा काव्यात्म आविष्कार घडवतो.
‘गळा दाबल्याने गाणे अडते का?’ या लेखात दासू वैद्य यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवर भाष्य केले आहे. सांस्कृतिक/राजकीय हस्तक्षेप करत थेट आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
‘बाई सांभाळ कोंदण’ या लेखातून ‘स्त्री’विषयी पुरुषाची मानसिकता बदलायला तयार नाही. काळ बदलला पण स्त्रीचे अगणित प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच गेले आहेत. याला कारण ‘पुरुषी वर्चस्वा’ची भूमिका आहे, यावर भाष्य केलंय.
‘बाजार’ या लेखातून गावातल्या मॉलचे केलेले वर्णन वाचनीय झाले आहे. ‘एकाच छताखाली मिळेल सर्व या उद्देशाने जनसामान्य मॉलकडे आकृष्ट झाला. तेथील भव्य-दिव्य रोषणाईने सर्वांनाच भुरळ पाडली खरी, पण उत्साहाने सुरू झालेले अनेक मॉल काही दिवसांतच बंद पडले. या पाठीमागचे गणित वेगळे होते’, असे लेखकाने सुचवले आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
संकरित बी-बियाणे, हायब्रीड यांमुळे उत्पादनात वाढ झाली खरी, पण काय खावे आणि काय खाऊ नये, हा भलताच प्रश्न जनसामान्यासमोर उभा राहिला. कारण, खाण्याच्या सर्वच गोष्टींत झालेल्या भेसळीचा मुद्दा समोर आला आहे. विशिष्ट ऋतूतच मिळणाऱ्या फळभाज्या आज बाजारात वर्षभर उपलब्ध झाल्या आहेत. पाहिजे तेव्हा सर्व काही मिळेल, असा ‘बटन स्टार्ट’ वस्तूचा बाजार भरलेला असताना आपण मात्र जिवंत वस्तूच्या शोधात आहोत, ही व्हिक्टर द्रागुन्स्की नावाच्या लेखकाची लेखातील छोट्या मुलांसाठीची गोष्ट कायम मनात कोरलेली राहील.
‘झेंडे’ या लेखात आज गावागावात विविध राजकीय पक्षांच्या झेंड्याचे फुटलेले पेव, झेंड्यांनी सगळा गावच व्यापून टाकला आहे. लेखक म्हणतात त्याप्रमाणे मोहराने आंब्याचे झाड भरून जावं, तसे गावात झेंडे लगडलेले. अशा झेंड्यांची आता गावभर दहशत आहे. परंतु, अशा गढुळलेल्या परिस्थितीतही गावातील समाजवादी विचाराचा एक निष्ठावान सक्रिय कार्यकर्ता मात्र आपल्या पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिला. वातावरण बदलले, तसे सोबतचे लोक पक्ष सोडून इतर पक्षाच्या मोठमोठ्या पदावर गेले. पण या निष्ठावंत कार्यकर्त्याने समाजवादी डावा विचार सोडला नाही. सोबतचे मोठे झाले, पैसेवाले झाले म्हणून त्यांच्याबद्दल तिरस्काराचा विचारही त्याला शिवला नाही.
अशातच गावातल्या मुलांनी त्याच्या घरावरही झेंडा लावलाय. परंतु, तरुण मुलांना नाराज न करता आपल्या विचाराशी तो प्रमाणिक राहिला. लेखकानेही असाच जबरदस्ती घरावर झेंडा लावण्याचा अनुभव घेतला होता. झेंडा लावायला आलेल्या मुलांना लेखकाने विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. परंतु, मुलांच्या समाधानाकरिता लेखकाने तो झेंडा घेतला खरा पण तिसऱ्याच दिवशी कॉलनीत लेखकाच्या घरासह सगळ्याच घरावर डौलाने झेंडा फडकत होता.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
‘बक्षिसी’ या लेखात नित्याच्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर प्रकाश टाकत उपरोधिकपणे सरकारला विचारलेले प्रश्न विचारप्रवर्तक आहेत. ‘न पाठवलेल्या पत्रातून’ या लेखात लेखक ख्यातकीर्त नाटककार विजय तेंडुलकर यांच्या आठवणीने गलबलून गेला आहे.
ललितलेखनातून आलेला हा मेळा कधी कथेच्या वळणाने जातो, तर कधी कवितेशी असणारे आपले अंगभूत नाते प्रस्थापित करतो, तर कधी वैचारिकतेची कास धरतो, तर कधी आत्मप्रकटीकरणाचा बाज घेऊन अवतरतो.
लेखकाच्या सूक्ष्मनिरीक्षण शक्तीमुळे ‘मेळा’तील लेख अधिक उत्कट आणि जिवंत झाले आहे. क्षीण होत चाललेला मराठी ललितलेखनाचा प्रवाह पुनरुर्जीवित करण्याचे महत्त्वाचे कार्य या संग्रहाने केले आहे.
‘मुराळी’ या मासिकाच्या मे २०२३च्या अंकातून (संपादित स्वरूपात) साभार.
.................................................................................................................................................................
‘मेळा’ - दासू वैद्य
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | पाने - १५० | मूल्य - ३५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment