‘निर्मला पाटील यांचे आत्मकथन’ : या कादंबरीत स्त्रीवाद आहे, वर्णव्यवस्थेची चिकित्सा आहे, वसाहतवाद आहे, लिंगभावाचे राजकारण आहे…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नीतीन वैद्य
  • ‘निर्मला पाटील यांचे आत्मकथन’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 30 December 2023
  • ग्रंथनामा शिफारस निर्मला पाटील यांचे आत्मकथन Nirmla Patil Yanche Aatmakathan शांता गोखले Shanta Gokhale

२०२३चे सोलापूरचे ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यातील एका पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा हा परिचय...

............................................................................................................................................

शांता गोखले यांच्या ‘रीटा वेलिणकर’ या पहिल्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर गीव पटेल यांचे तीन स्त्रियांचे ‘काँग्रॅच्युलेशन्स’ या शीर्षकाचे चित्र आहे. शांताबाई आत म्हणतात, ‘नाव कन्सोलेशनही असू शकेल. कोणत्याही झगड्यात अखेरीस हाती येणारी व्यर्थता.’ बाईंची नवी कादंबरी ‘निर्मला पाटील यांचे आत्मकथन’ वाचताना हे वाक्य आठवत राहिले. एकमेकांना बळकट-कोमल शक्तीने सांभाळणाऱ्या बायका वाटतात या त्यांना.

‘रीटा वेलिणकर’ला सार्वत्रिकपणे महत्त्वाची स्त्रीवादी कादंबरी म्हटलं गेलंय. मराठी कादंबरीचा प्रदेश तिनं विस्तृत केला असंही. ‘रिटा…’ची प्रथमावृत्ती १९९०मधली. शांताबाईंची दुसरी कादंबरी ‘त्या वर्षी’ आली २००८मध्ये, म्हणजे ‘रिटा...’नंतर तब्बल १८ वर्षांनी. कलेची अभिव्यक्ती, त्यासाठीचे स्वातंत्र्य म्हणतो आपण ते कितपत निर्विवाद असते?

दुसऱ्या बाजूने सर्जनशील असणारे, म्हणवणारे कलावंतही मुखवट्याने वावरतात. स्वातंत्र्याच्या बाजूने स्पष्टपणे उभे असतानाही शांताबाई हत्ती अनेकांगांनी दाखवतात. संगीत, चित्रकला असं कलावंतांचं सर्जनाचं मनस्वी जग, त्यातच माणूस म्हणून कलेबाहेर व तीतही कराव्या लागणाऱ्या तडजोडी, हे सगळं कलाक्षेत्रात पत्रकार म्हणून वावरताना जवळून पाहिलेलं होतं शांताबाईंनी.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली इराक, अफगाणिस्तान, भारतात गुजरातेतली हिंसा या सगळ्याची पार्श्वभूमी आहे कादंबरीला. कुठलीही हिंसा, तिचं दोन्ही बाजूनं होत असलेलं दुटप्पी राजकारण, तसेच कला आणि तिचा व्यापारी उपयोग यामधली दिवसेंदिवस धूसर होत चाललेली नैतिकतेची सीमारेषा हे सगळं ‘त्या वर्षी’मध्ये परिणामकारकपणे उमटल्यावरही शांताबाई तिला कुठल्याही वादात बसवत नाहीत. लिहिलं ते मला वाटलं म्हणून, मिळणाऱ्या आनंदासाठी, असंच म्हणतात.

दोन्ही कादंबऱ्या वाचून बराच काळ झाला, त्यांचा काही प्रभाव शिल्लक आहे, असणारही आहे, तरी तपशील विस्मृतीत विरून गेले आहेत. आता त्यांची आठवण झाली ती शांताबाईंची अलीकडेच आलेली तिसरी कादंबरी ‘निर्मला पाटील यांचे आत्मकथन’. डिसेंबर २०२२मध्ये म्हणजे पुन्हा ‘त्या वर्षी’नंतर १५ वर्षांनी ती आली.

सतीश आळेकर त्यावरच्या एका तातडीच्या प्रतिक्रियेत ‘‘स्त्रीवाद, स्त्रीवादी लेखन, चातुर्वर्णाची स्त्रीवादी चिकित्सा, वसाहतवाद, दलित साहित्य, उत्तरवसाहतवादी लेखन, वैश्विक लिंगवाद, इ संज्ञांचे रसाळ आणि वाचनीय अस्तित्व निर्मला पाटील यांच्या आत्मवृत्तात आहे.” असे म्हणालेत, ते खरेच आहे.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

तरी मला जाणवले ते या कथनातले अशा सर्व वाद वा इझम्सपलीकडले नितळपण. देवटाक्यातल्या पाण्याइतके शीतल पारदर्शीपण. ‘साधने’च्या (२०२२) दिवाळी अंकात शांताबाईंची दीर्घ मुलाखत आली आहे. अलीकडे त्यांनी आवर्जून इंग्रजीत लिहिलेलं ‘वन फूट ऑन द ग्राऊंड’ हे आत्मकथनात्मक पुस्तक आलंय आणि त्या समेवर ‘निर्मला पाटील यांचे आत्मकथन’ ही कादंबरी. तीत त्यांनी म्हटलंय, “कलेने राजकीय असणं, त्यात समाजाचं भान असणं, हे मी केवळ मानत नाही, तर कोणत्याही सकस लेखनाची ती महत्त्वाची ओळख आहे असं धरून चालते. मी लेखन करते ते राजकीय-सामाजिक दृष्टीकोनातून केलेलं असतं, असा माझा विश्वास आहे. तरीही मी कादंबरी लिहिते, तेव्हा एक कलावस्तू निर्माण करते आहे, याचं भान प्रामुख्याने मला असते. ‘रीटा वेलिणकर’वर ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये पानभर परीक्षण आलं, त्यात वाहवा होती, पण तिच्याकडे कादंबरी म्हणून न पाहता एक ‘फेनिमिस्ट टेक्स्ट’चा उत्तम नमुना म्हणून फक्त बघितलं होतं. या राजकीय वादाच्या भिंगातून केलेल्या लेखनाने मला काहीच दिलं नाही, वाचकालाही त्यातून काही मिळालं, असेल असं वाटत नाही.”

हे महत्त्वाचं आहे. उत्तम विज्ञानकथा ही आधी उत्तम कथा असली पाहिजे असं म्हणतात, तसं कथात्म साहित्य आधी उत्तम कथात्म ऐवज म्हणून पोचलं पाहिजे. राजकीय दृष्टीकोन तिथे नसतो असं नाही, पण त्याच अपेक्षेनजरेची चौकट वाचनाला असेल, तर बाकीचे अंडरकरंट्स दुर्लक्षित होतात सहज, इतकेच. असो.

या कादंबरीतल्या निर्मला पाटीलचा जन्म तमाशाच्या बोर्डावर झाला, (तिची ‘मेंटॉर’ म्हणता येईल, अशी आजी तिला यावरून ‘बोर्डी’ अशीच हाक मारते) हे रचित सामाजिक दृष्टीनेच आलेय, कारण त्यातूनच ती पुढच्या जगाच्या पटलावर विस्तारत गेलेल्या आपल्या आयुष्याला धैर्याने सामोरी जाते, याला वेगळे महत्त्व येते. पण तीकडे अधिक व्यापक परिप्रेक्ष्यात पाहिले तर लक्षात येते, निर्मलेचा हा एखाद्या जिवलग मैत्रीणीशीच होऊ शकेल, असा दीर्घसंवाद जिच्याबरोबर होतो, ती चित्रा बोडस ही‌ कोकणातल्या चित्पावन कुटुंबातून आलेली आहे. तिचेही आयुष्य असेच जगाच्या पटावर अनेक हेलकाव्यांतून पसरलेले आहे. या वळणावर दोघी एकाच पडावात आहेत.

‘तमाशाच्या बोर्डावर जन्माला आलेल्या कोल्हाटी समाजातल्या कुणा एका निर्मलाची ही कथा’, असं एक वाक्य या पुस्तकाच्या पाठराखणीत (ब्लर्ब) सुरुवातीला आहे. पण तशी ही कुणी एक निर्मला नव्हे. विठाबाईप्रमाणेच तमाशाच्या बोर्डावरच पडद्यामागे बाळंत होते निर्मलाची आई. तेव्हा तुटलेली तिची नाळ आईशी पुन्हा जोडली जात नाही.‌ स्वत्वाचे भान न राखता आल्याने आईच्या दुर्दैवाचे दशावतार होतात. तिच्यापाठी निर्मलाला बोर्डावर नाचावे लागू नये, म्हणून आजी निगुतीने सांभाळत तिला वेळेवर घराबाहेर काढते. पुढे ती सामोरी जाते, ते आयुष्य अनपेक्षित वाटावळणांचे, विलक्षण वेगळे, समद्ध आहे. त्यातला तिचा चुकतमाकत स्वीकारशील शहाणीवेकडे घेऊन जाणारा वावर, हे तिची पार्श्वभूमी पाहता मोठेच कर्तृत्व वाटावे.

साठीपलीकडे पोचलेली निर्मला आपल्या आयुष्याची संगती लावत आठवणीतून मोकळेपणी जिला तिची गोष्ट सांगतेय, त्या चित्रा (बोडस)ची तिच्याशी आधीची तोंडओळखही नाही. एका छोट्याशा अपघाताने दोघींना एकत्र राहणे काहीसे भाग पडले आहे. चित्राचेही आयुष्य वेगळे तरी समांतर म्हणावेसे, जगभर पसरून शेवटी आवरते घेताना भारतात आलेले. दोघी ‘आपल्या माणसाची’ वाट पाहताहेत. स्त्रीत्वाबरोबर हाही जोडणारा धागा असावा.

निर्मला निमित्ताने मोठी, रूंद होत जाते. भारतातले आपलं सामाजिक स्थान, आईची त्यापायी झालेली दुर्दशा, भेदभावाचे अनुभव हे सगळं आहेच मनात, पण आता तिला त्याचा आपल्यापुरता अर्थ लावता येतो. आफ्रिकन देश, ब्रिटनचे तिथले वासाहतिक राजकारण, इदी अमिनची कारकीर्द, अरब - इस्राएल संघर्ष, त्यातली ब्रिटनची भूमिका, त्याचे तिथल्या जनजीवनावर होत असलेले परिणाम पार्श्वभूमीला, संदर्भाने येतात, त्यातून कथेला वैयक्तिकतेपलीकडचे व्यापक परिमाण लाभते. यथावकाश दोघांचा लंडनमधला रहिवास निमित्ताने संपतो.

निर्मला या गप्पांच्या सुरुवातीलाच म्हणते, “ऐकणारी बहाद्दर असते, तेव्हा कथाकार आपोआप बहाद्दर होते.” चित्रा निर्मलाबाईंचे प्रथम दर्शनातले वर्णन करते, चकचकीत सावळ्या चेहऱ्यात हिरवेगार दोन डोळे, साठीच्या पुढची उंच, सरळ, सणसणीत बाई. म्हणते, आम्ही आजच्या तरुणांच्या भाषेत ‘क्लिक’ झालो नसतो, तर तिची गोष्ट कदाचित तिच्या पोटातच राहिली असती. अशा एकमेकींना ‘क्लिक’ झालेल्या दोघींच्या या माजघरातल्या म्हणाव्या अशा, तरी त्या मर्यादेला ओलांडून जाणारा समजुतीचा व्यापक पैस असलेल्या गप्पा.

निर्मलाची आजी ही या कथेची आद्य नायिका म्हणायला हवी. तमाशाच्या फडात आपलं स्वत्व राखून असलेली, बोर्डावर नाचताना फिदा झालेल्या धन्वंत पुरुषांनाही ‘मी तुमच्या मागे येणार नाही, तुम्हीच यायचे तर या’ असे ठणकावून सांगणारी… माझी गोष्ट सांगून पोट आणि मन हलकं करूनच मी मरणार असं म्हणणारी ही विलक्षण बाई. पूर्ण पिकल्यावर फळाने सहज गळून पडावे, तशी पूर्ण पिकून जगाला आपली विलक्षण गोष्ट सांगून आपलं मनावरचं ओझं उतरवते आणि हसत हसत जाते.

निर्मलाकडे ‘मनस्वी विलक्षण’पण आले ते आजीकडून. निर्मलेला घर सोडताना ती दोन मंत्र देते. नेहमी पाऊल पुढे टाकायचे आणि पुरुषांपासून सावध राहायचे. कोणताही प्रसंग असो, तिच्याकडे दृष्टांतासारखी गोष्ट असे. त्या कथांनी निर्मलेची आयुष्यभर साथ केली. याव्यतिरिक्त कसलेही संस्कार वा त्यातून नकळत तयार झालेली भूमिका निर्मलाजवळ नाही, तरी हेच बलस्थान व्हावे, अशी वेगळ्याच परिस्थितीची देन कदाचित, अशी स्वीकारशीलता निर्मलाजवळ आहे.

‘बाळगी’ म्हणून काम करायचं निमित्त करून ती बाहेर पडते, तोवरचं आजीचं घर, नंतर काम करते ती वैराग, मुंबई ते थेट लंडन इथली घरं यातला अनुल्लंघनीय फरक ती सहज ओलांडते, ते या स्वीकारशीलतेच्या, आणि वेळोवेळी आठवते त्या आजीच्या आठवणींच्या, दृष्टान्तांच्या बळावर.

चित्राशी बोलता बोलता तिच्या आईची दुर्दशा सांगताना म्हणते, “आपला जन्म अपघात. मागून घेतलेला नसतो. सवर्णबाईच्या वाट्याला असं काही आलं, तर तिला सावरणारं प्रेमाचं कोंडाळं असतं. भोवती वर्ण, वर्ग, शिक्षण, पैसा, विवाहसंबंध अशी अनेक जाळी असतात, हे लोक दुर्घटनेत पार आपटत नाहीत कधीच. आमच्यासारख्या भटक्यांची कुठली जाळी? आमची हाडं सरळ कुंटणखान्यात जातात…”

निर्मलापुढे आयुष्याचे मनोहारी रंग असेच धीम्या गतीने उलगडत जातात. ‘वर्ड्स’ या जुन्या, दुर्मीळ पुस्तकांच्या दुकानातली कसलाच काच नसलेली नोकरी, तिथं ‘द अवेकनिंग’सारखी अनवट पुस्तकं वाचनात येणं, वर्डर्स्वर्थची ‘डॅफोडिल्स’ मराठीत करून शशीसह टेकडीवर बसून ती म्हणणं, म्हटला तर स्वतंत्र तरी हवा, तेव्हा ‘सह’ असा रहिवास, फॅशन शो, फुटबॉल वर्ल्डकप, नॉटिंग हिल्स कार्निव्हलपासून लता मंगेशकरांच्या लाईव कॉन्सर्टपर्यंत अनेक अनुभव पाहत, घेत लंडनच्या मोकळ्या रस्त्यांवरून शशीसह कुंद पावसाळी हवेतली भटकंती…

यातला उद्वेग आत आहेच, तरी आजीचं सांगणं लक्षात ठेवून माणसं ओळखत, संशय आला की संधी मिळताच रस्ते बदलत, पण चांगल्यांना धरून ठेवत बाय चॉईस एकटीनेच राहत, तरी आपली अशी जाळी निर्माण करत जाते निर्मला, त्याची ही मनोहारी गोष्ट आहे.

मुंबईतल्या मुक्कामात ती माणसांचा सागर पाहते, वैभव-श्रीमंती पाहते. राहणे आणि पोटपाणी याची सोय आहे, तरी आजीचा स्वत्व राखण्याचा मंत्र घोकत, इंग्रजी शिकत, आपला हक्काचा बसायचा पाट तयार करण्याची खटपटही करते. लंडनमधल्या मोकळ्या वातावरणात मात्र निर्मलाची कळी पाकळीपाकळीने उमलत जाते. सत्तरीच्या दशकात सुरू झालेल्या स्त्रीवादाशी, लिंगभावातल्या पुरुषसत्ताक राजकारणाची तिची ओळख होते. आपल्याला आलेले अनुभव वैयक्तिक समजायचं कारण नाही, पुरुषसत्ताक सामाजिक, राजकीय व्यवस्थेचा ते भाग आहेत, याचं भान येतं.

शशीसारखा सर्वार्थाने सखा म्हणता येईल असा मित्र भेटतो. त्यांच्या मैत्रीला मर्यादा नाहीत, तशीच तिला कुठल्याही नावाची चौकट द्यावी, असंही दोघांना वाटत नाही. त्यातून आपापली ‘स्पेस’ जपत समृद्ध होत जातात दोघं. त्याच्याशी शारीर जवळिकीच्या आठवणीनंही निर्मला मोहरून जाते.

म्हणते, “त्या रात्रीचा संग धीम्या गतीने उलगडत गेला. एखाद्या पदार्थातले बारकावे शोधून त्यांचा स्वाद चवीनं घेत जेवावं तसा. हेतू ताट साफ करणं हा नसून ते साफ करण्याच्या प्रक्रियेतला आनंद घेणं हा आहे. ताट साफ होणारच, ती मजा आहेच, पण तोवरही तेवढीच मजा.”

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

शांता गोखले : “मन उद्विग्न होते, पण धीर धरून आहे...”

भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट, वालचंद टेरेस आणि छबिलदास मुलांची शाळा

शांता गोखलेकृत मराठी कादंबरीचा फसवा आढावा हा साहित्यातल्या अदृश्य ‘शीतयुद्धा’चाच परिपाक आहे…

..................................................................................................................................................................

निर्मलापुढेही आयुष्याचे मनोहारी रंग असेच धीम्या गतीने उलगडत जातात. ‘वर्ड्स’ या जुन्या, दुर्मीळ पुस्तकांच्या दुकानातली कसलाच काच नसलेली नोकरी, तिथं ‘द अवेकनिंग’सारखी अनवट पुस्तकं वाचनात येणं, वर्डर्स्वर्थची ‘डॅफोडिल्स’ मराठीत करून शशीसह टेकडीवर बसून ती म्हणणं, म्हटला तर स्वतंत्र तरी हवा, तेव्हा ‘सह’ असा रहिवास, फॅशन शो, फुटबॉल वर्ल्डकप, नॉटिंग हिल्स कार्निव्हलपासून लता मंगेशकरांच्या लाईव कॉन्सर्टपर्यंत अनेक अनुभव पाहत, घेत लंडनच्या मोकळ्या रस्त्यांवरून शशीसह कुंद पावसाळी हवेतली भटकंती…

त्यात एका प्रसंगी तिने सहजच अदांसह लावणी सादर करणेही येते हे अन्वर्थक. भारतातल्या सामाजिक व्यवस्थेपासून शशीच्या नात्यातल्या लता पागनीसच्या समलिंगी असण्यातून होत असलेल्या घुसमटीपर्यंत अनेक विषयही तिच्यासमोर उलगडत जातात. नकारांचे प्रसंग येतच नाहीत, असे कसे होईल?  वैरागपासून, मुंबई, लंडनला जाताना बोटीपासूनच अशी माणसं भेटतात. पण आजीचं सांगणं तिच्या लक्षात आहे, माणसं ओळखायची. रस्ता बदलताना ती त्यातून येऊन शकणारी नकारात्मकताही मागे टाकत जाते.

शशीबरोबर ती गॅब्रीएला कॉर्नवॉलला जाते. त्याच्या वर्णनातला हा भाग तिच्या शब्दांतच वाचायला हवा. म्हणते, “एका सकाळी वातावरण इतकं पारदर्शक होतं की, नजर थेट क्षितीजापर्यंत पोचत होती. मध्ये फक्त सेंट मायकल्स माऊंटचं विलक्षण बेट. शशी म्हणाला, त्या क्षितिजापलीकडे अमेरिका. मला मुंबईतलं अरबी समुद्राचं पहिलं दर्शन आठवलं. किसना म्हणाला होता, पलीकडे आफ्रिका. सागर सनातन, आपण बुडबुडे. क्षणभर आहोत, क्षणभरात नाही. पण आहोत तोवर असा निसर्ग अनुभवणं म्हणजे मन, मती रूंदावणं. इतक्या प्रचंड निसर्ग घटनेचं आकलन करायचं, तर आपल्यालाही थोडं मोठं व्हावं लागतं…”

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

निर्मला अशी निमित्ताने मोठी, रूंद होत जाते. भारतातले आपलं सामाजिक स्थान, आईची त्यापायी झालेली दुर्दशा, भेदभावाचे अनुभव हे सगळं आहेच मनात, पण आता तिला त्याचा आपल्यापुरता अर्थ लावता येतो. आफ्रिकन देश, ब्रिटनचे तिथले वासाहतिक राजकारण, इदी अमिनची कारकीर्द, अरब - इस्राएल संघर्ष, त्यातली ब्रिटनची भूमिका, त्याचे तिथल्या जनजीवनावर होत असलेले परिणाम पार्श्वभूमीला, संदर्भाने येतात, त्यातून कथेला वैयक्तिकतेपलीकडचे व्यापक परिमाण लाभते. यथावकाश दोघांचा लंडनमधला रहिवास निमित्ताने संपतो.

ती मुंबईत राहते आहे. शशी यायचा आहे, त्याची वाट पाहात. नाव, जैविक वारसा, जात-धर्म-गाव-देश, रक्ताची नातीगोती, कुटुंब, आर्थिक स्थैर्य यातलं काही वा काहीच असलं वा नसलं तरी ते न विसरता, न दुर्लक्षिताही आयुष्य समृद्ध अर्थपूर्ण करता येते याचा वस्तुपाठ म्हणून या आत्मकथनाकडे पाहता येते. होय, या कादंबरीत स्त्रीवाद आहे, वर्णव्यवस्थेची चिकित्सा आहे, वसाहतवाद आहे, लिंगभावाचे राजकारण आहे.

यातली बारीकसारीक सामाजिक घटितं या आणि अशा वादांच्या प्रकाशात पाहत, या कादंबरीची अनेक वाचनं संभवतात, तरी यापलीकडे हे सगळं असण्याला ठोस कारणं असूनही त्यांची चिकित्सा करत, तरी त्यातून व्यक्तिगत आयुष्यात येऊ शकणाऱ्या नकारात्मकतेला, नीरसतेला मागे ठेवत निर्मला आयुष्याला कडकडून भेटण्यासाठी आपले बाहू पसरत सकारात्मक सम गाठते हे मला आवडून गेले फार…

‘निर्मला पाटील यांचे आत्मकथन’ - शांता गोखले

मौज प्रकाशन गृह, मुंबई | पान - १८८ | मूल्य – ३५० रुपये

.................................................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......