‘इतकं दिलंत तुम्ही मला’ असं पाडगावकरांचं एक बोलगाणं आहे. आपल्यात जे काही थोडंफार चांगलं आहे, ते सगळं पुस्तकांचं देणं आहे, या जाणिवेनं ते मला पुस्तकांना उद्देशून गावंसं वाटतं…

आज जवळपास चार दशकांत ‘वाचणं आणि त्यातून समजून घेणं’ हीच जीविका किंवा जीवनशैली कधी झाली ते लक्षातच आलं नाही, जणू यापेक्षा वेगळं काही होणारच नव्हतं. घरही या काळात आमच्या इतकंच किंबहुना काकणभर जास्तच पुस्तकांचं झालं. बरेच लेखक, वाचकही पुस्तकं पाठवायला लागले. वाचनातून मिळालेलं सौहार्दाचं हे देणं अद्भुत आहे. त्यामुळे हा सन्मान मला व्यक्तिगत माझा नाही, तर एकंदर पुस्तकांचा, वाचनाचा सन्मान वाटतो.......

‘मेळघाट : शोध स्वराज्याचा’ या पुस्तकात मिलिंद बोकील ‘स्वशासन’ ही संकल्पना स्पष्ट करतानाच आपल्याकडच्या प्रशासकीय विटंबनेचा उल्लेख करतात, तेव्हा पटतंच ते!

मागील वर्षाच्या सुरुवातीला आलेलं ‘मेळघाट : शोध स्वराज्याचा’ हे मिलिंद बोकील यांचं पुस्तक आदिवासींच्या स्वशासनाच्या प्रयोगावरचे तिसरं आणि सर्वांत महत्त्वाचं पुस्तक. या पुस्तकात तिथल्या अशा प्रयोगांची पुनरावृत्ती टाळून प्रत्येक प्रयोगातलं वेगळेपण, त्यात असू शकणाऱ्या शक्यता बोकील सांगतातच, पण यात लोकशाहीतील सर्वांत खालच्या म्हणजे ‘ग्रामसभा पातळीवरील ‘स्वशासन’ या संकल्पनेमागचा विचार विस्तारानं मांडतात.......