‘कुठाँव’ : इतके दिवस व्यवस्थेनं ‘या’ विषयावरचा सोयीनं धरून ठेवलेला मौनाचा पडदा टराटरा फाडणारी कादंबरी!
दिवाळी २०२० - लेख
नीतीन वैद्य
  • अब्दुल बिस्मिल्लाह आणि ‘कुठाँव’चं मुखपृष्ठ
  • Thu , 19 November 2020
  • दिवाळी २०२० लेख अब्दुल बिस्मिल्लाह Abdul Bismillah कुठाँव Kuthanv झिनीबिनी चदरिया Jhini Jhini Bini Chadariya जहरबाद Jharbaad समर शेष है Samar Shesh Hai दंतकथा Dantkatha रावी लिखता है Raavi Likhata Hai अपवित्र आख्यान Apavitra Aakhyan

अब्दुल बिस्मिल्लाह हे इस्लामी पार्श्वभूमी असलेल्या पुस्तकांच्या शोधातलं ‘प्लिजंट सरप्राईज’ होतं. दीर्घकाळ रेंगाळलो असा हा थांबा. ‘अपवित्र आख्यान’ वाचनात आलं आणि पुढे मागच्या-पुढच्या  ठराविक काळानं आलेल्या त्यांच्या कादंबऱ्या, ‘गालिबच्या डायरी’ (दस्तंबू)सारखी संशोधनं असा पुढे सतत मागावरच राहिलो. निमित्त या रेंगाळण्यात केव्हाच विरून गेलं. अगदी सुरुवातीच्या काळातल्या कविता आणि अध्येमध्ये आलेले कथासंग्रह वगळता बहुतेक सगळं लेखन वाचलं…

वाराणसीतल्या विणकरांच्या दैन्यावस्थेचे दशावतार, त्यातही मोडून न पडता मूक संघर्षाच्या वाटेवरून त्यांचं चालणं घेऊन ‘झिनीबिनी चदरिया’ आली १९८६मध्ये, तर ‘कुठाँव’ आली २०१८मध्ये. तीन दशकांत ठराविक अंतरानं येत गेलेल्या सामान्य भारतीय मुस्लीम माणसाचं जगणंच नव्हे, तर मानसिकताही नेमकी घेऊन येणाऱ्या कृती.

‘जहरबाद’, ‘समर शेष है’सारख्या छोट्याशा आत्मचरित्रात्मक म्हणता येतील अशा कादंबऱ्यांतून आईवेगळं अभावग्रस्त एकाकी बालपण, अपमान, अवहेलना यांवर मात करत मनात पौगंडावस्थेत उमललेलं प्रेम येतं. वास्तव त्याला त्यात यशस्वी होऊ देत नाही, पण तरी परिस्थितीनं लादलेलं कडवटपण कमी करत ‘इस दुनिया में प्यार करनेवाले, प्यार में टुटनेवाले - मरनेवाले और प्यारही में जीनेवाले तमाम लोग बसते है’ या भानासह आयुष्याकडे परत घेऊन येते.

‘दंतकथा’च्या रूपाने एक वेगळं वळणही येऊन गेलं. खुराड्यातला एक कोंबडा आपल्याला आज कापणार आहेत, हे कळल्यावर मरणभयानं पळत सुटतो आणि एका नाल्याच्या अरुंद बोगद्यात लपून राहतो. तिथून त्याला मरणाच्या छायेत झालेलं जीवनदर्शन असं साधारण स्वरूप असलेली ही फॅंटसी नाही तरी काहीशी अतिवास्तववादी कथा.

‘रावी लिखता है’मध्ये गंगायमुनेच्या खोऱ्यातून जगभर पसरलेल्या चार पिढ्यांची कहाणी येते. अब्दुल बिस्मिल्लाहांच्या सगळ्या कादंबऱ्या मुस्लीम पार्श्वभूमी असलेल्या, तरी ती नसलेल्या अन्य कादंबऱ्यांपेक्षा कसलंही वेगळेपण न बाळगणाऱ्या. काही अंतर असलेलं तरी, लादलेपणातून नव्हे तर आपली मुळं एकाच मातीतली आहेत, या नकळत रुजलेल्या जाणीवेतून आलेलं हिंदू-मुस्लीम  सहजीवन त्यात दिसतं.

आपण ‘असली’ तुर्की वंशाचे आहोत अशी वंशवादी जाणीव असलेली, त्यातून फारसी शब्द आवर्जून वापरणारी पात्रं आहेत, पण सामान्य मुस्लिमांचं त्यांच्यापासूनचं तुटलेपणही दिसतं. त्यामुळे त्यांच्याशी, त्यातल्या पात्रांशी, त्यांच्या सुख-दुःखांशी, त्यातल्या प्रेमभावनेशी सहजच जोडून घेता येतं. इथल्या हिंदू मानल्या जाणाऱ्या संस्कृतीतली मिथकं, पौराणिक कथा यांचे संदर्भ सहजच येतात, आपले म्हणून. इतके की रावीला (‘रावी लिखता है’) सातासमुद्रापलीकडे गेल्यावर बापाची अनावर आठवण येते. त्यातून रडताना त्याला देवयानी-शुक्राचार्य या बापलेकीतला भावबंध आठवतो. वाटतं, मी देवयानी आहे? चार पिढ्यांची ही कथा सांगताना त्याला हिंदू संस्कृतीतलं चार युगांचं प्रतीक आठवतं. हे आपल्या सांस्कृतिक संचिताशी कुठेही, जराही प्रचारकी न होता सहज जोडलेलं असणं फार लोभस आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

‘अपवित्र आख्यान’मध्ये बिस्मिल्लाह हिंदू-मुस्लीम तणावाची नोंद करतो, तीही कसलीच, कुणाचीच बाजू न घेता कडेकडेनं. जमीलला उच्चशिक्षण हिंदी वा संस्कृतमधून घ्यावं अशी आस, तर नोकरीच्या प्रयत्नात त्यावर अविश्वास दाखवत त्याच्या धार्मिक वेगळेपणाची अप्रत्यक्ष जाणीव करून देत प्रत्येक ठिकाणी उर्दू वा फारसीमधून शिकायला हवं होतंस असे धडे त्याला मिळतात... त्याच वेळी फारसं शिक्षण न घेतलेल्या यास्मिनचं मात्र नोकरी देण्याच्या मिशानं ‘आपलेच’ पुढारी कसं शोषण करतात, याचंही समांतर चित्र येतं. काय बरोबर काय चूक याबाबत अजिबात जजमेंटल न होता केलेलं लेखन वाचताना अस्वस्थतेची बारीक कळ येते.

या पार्श्वभमीवर ‘कुठाँव’ हा खरंच मर्मावर केलेला आघात आहे. हा धक्का इतका जबरदस्त आहे की, ‘रावी लिखता है’नंतर तीनेक वर्षांत लिहून पुऱ्या झालेल्या या कादंबरीला प्रकाशनासाठी त्यापेक्षा मोठा वनवास भोगावा लागला. इतके दिवस व्यवस्थेनं या विषयावरचा सोयीनं धरून ठेवलेला मौनाचा पडदा त्यांनी त्यात धाडसानं उघडला आहे.

इद्दन, ईदच्या दिवशी जन्मलेली म्हणून इद्दन. तिचा नवरा ‘शबे बारात’च्या महिन्यात जन्मलेला म्हणून सुबराती. दोघंही मुस्लिमांतल्या ‘हेला’ (मेहेतर) जातीतले. इद्दनचे आईबाप राहत त्या लहानशा खेड्यातले स्वतंत्र खड्ड्याचे संडास असलेले काही थोडे जमीनदार मुस्लीम फाळणीनंतर ‘यांच्यावर उपकार करत जणू’ पाकिस्तानात गेलेले. त्यामुळे इद्दनच्या कुटुंबाच्या वाट्याला स्वतंत्रपणे ‘मोलमजुरीनं पोट भरण्याचं’ भाग्य आलेलं.

पण सुबरातीच्या गावात असं एक जमीनदारी असलेलं मोठं घर. तेराव्या वर्षी लग्न होऊन सासरी आलेल्या इद्दनने प्रथमच बाहेर ठेवलेलं लोखंडाचं मोठं तसराळं, शेजारी राख आणि छोटं खुरपं पाहिलं. त्यातून विचित्र दुर्गंध येत होतीं. खड्ड्याचे संडास घरातल्या मागच्या बाजूला, पडदे असलेल्या भागात, तिथं बायकांचा वावर असल्याने पुरुषांना प्रवेशबंदी. त्यामुळे हे काम फक्त स्त्रियांनाच करावं लागे.

..................................................................................................................................................................

हे असलं काम करत असतानाही आपल्या शरीराला असलेले उभार इद्दनला काचतात, नवरा कायम नशेत पडलेला. याही कामात तिला ‘पाहणाऱ्या’ मालकाच्या परगावहून शिकून आलेल्या मुलाच्या वासनेला बळी पडावं लागतं सतत. पुढे नशेतच केव्हातरी नवऱ्याचा जीव जातो, तेव्हा इद्दन गर्भवती असते. पोटी आलेल्या सुंदर मुलीचा बाप अस्लम आहे, हे इद्दनला माहीत असतं. सासू, सासरे, नवरा असे कुटुंबाचे सगळे पाश एकेक करत तुटून जातात. इतके दिवस केलेल्या या घृणास्पद कामाला ती विटून गेलेली असते. अस्लम पुन्हा शहरात निघून जातो. तिच्यापुढे आता एकच ध्येय आहे- ‘सितारा को खाँसाहब की बेटी साबित कर के रहेगी…’

..................................................................................................................................................................

(पंढरपुरात शाळकरी वयात गेलो होतो, त्या वेळी तिथली चार-पाच फूट उंच जोते असलेली, दोन मोठ्या घरांत मागच्या बाजूने जेमतेम दोन फुटांचा दुर्गंधीनं भरलेला सामायिक बोळ असलेल्या घरांची रांग पाहिली होती. त्या बोळात ठराविक अंतरानं दोन्ही बाजूंनी तीन-चार फूट उंचीचे पत्र्याचे दरवाजे होते. या बोळातला भयंकर लज्जास्पद व्यवहार माहीत होता तरी तपशीलाने पुढे अवचटांच्या लेखात वाचताना शरम वाटलेली!)

पुरुष त्यांच्या कमाई (त्याला ‘कमाई पर जाना’ असंच म्हणत ही केवढी विटंबना!) वर जगण्याव्यतिरिक्त कुटुंबाचा आकार वाढवणं इतकंच करतात आणि दिवसभर चुलीवर रटरटणाऱ्या ‘मदक’च्या नशेत पडून राहतात. (हे मदक म्हणजे अफू गाळल्यानंतर त्या फुलांच्या उरलेल्या पाकळ्यांचा पाचोळा उकळलेलं पेय, अफू परवडत नाही म्हणून.)  

सासूच्या आजारपणात पहिल्यांदा आणि नंतर कायमच इद्दनला ‘कमाई’वर जावं लागतं. हे ‘असलं’ काहीच माहीत नसलेल्या इद्दनचा झालेला नाईलाज डोळ्यात पाणी आणतो. त्या पहिल्या दिवसाचं तपशीलानं आलेलं वर्णन वाचणं हीही शिक्षा वाटते. सुसंस्कृत म्हणवणाऱ्या प्रत्येकानं स्वतःवर लादून घेतली पाहिजे एकदा तरी, अशी शिक्षा. त्या कामातल्या अनंत अडचणी, त्यातले प्रसंगी अंगावर किळसेचे शहारे येणारे तपशील सांगत बिस्मिल्लाह ही शिक्षेची मात्रा क्रमाक्रमानं वाढवत नेतात.

आपल्याकडची दामोदर नायक यांची फक्त बीभत्स रसाचा आविष्कार करण्यासाठीच लिहिलेली ‘अल्फान्सो अल्बुकर्क’ ही कथा वाचलेली होती, पण इथं ज्या पद्धतीनं कथेत मुरून गेलेला, कारुण्याचे अस्तर घेऊन आलेला बीभत्स रसाचा आविष्कार आला आहे, तो अगदी ‘या सम हा’ म्हणावा असा! आपल्याकडे याविषयावरची कथात्म, सामाजिक अशा दोन्ही प्रकारातली पुस्तकं वाचली, तरी त्यात हे विश्व ‘एवढं’ भयावह, किळसवाणं असल्याचा ‘फील’ येत नाही.

हे असलं काम करत असतानाही आपल्या शरीराला असलेले उभार इद्दनला काचतात, नवरा कायम नशेत पडलेला. याही कामात तिला ‘पाहणाऱ्या’ मालकाच्या परगावहून शिकून आलेल्या मुलाच्या वासनेला बळी पडावं लागतं सतत. पुढे नशेतच केव्हातरी नवऱ्याचा जीव जातो, तेव्हा इद्दन गर्भवती असते. पोटी आलेल्या सुंदर मुलीचा बाप अस्लम आहे, हे इद्दनला माहीत असतं. सासू, सासरे, नवरा असे कुटुंबाचे सगळे पाश एकेक करत तुटून जातात. इतके दिवस केलेल्या या घृणास्पद कामाला ती विटून गेलेली असते. अस्लम पुन्हा शहरात निघून जातो. तिच्यापुढे आता एकच ध्येय आहे- ‘सितारा को खाँसाहब की बेटी साबित कर के रहेगी…’

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

अर्थात हे सोपं नसतं. अस्लमचा पत्ता नाही, गाव याआधी कधी सोडलेलं नाही. शहरात ओळख लपवून राहणं आणि सुंदर सिताराचं एखाद्या ‘खानदानी’ घरात लग्न ‘घडवणं’... यापुढची - खरं तर पुरीच, कारण इथवरची गोष्ट फक्त पार्श्वभूमी आहे - पूर्ण कादंबरी ही इद्दनच्या किमान प्रतिष्ठेनं जगता यावं यासाठी केलेल्या अफाट अपयशी संघर्षाची, त्यातल्या अनघड वाटावळणांची गोष्ट आहे.

त्यात हा विषय सामाजिक अंगानेही येतो. मुघल काळातली - बहुतांश इथल्या सामाजिक जाचाला कंटाळून ‘समते’च्या आशेनं झालेली मागास जातींची - धर्मातरं, त्यात मूळची जात आणि तिला चिकटलेलं काम दोन्ही नव्या धर्मातही कायमच राहिल्याचा कटु अनुभव, त्याची सामाजिक इतिहासाच्या अंगानं विद्यापीठीय अभ्यासाच्या संदर्भात झालेली चर्चा, मुख्य समाजात याबाबत पाळलं जाणारं सूचक मौन, झाकापाकीचा प्रयत्न असं बरंच काही येतं.

इद्दन शेवटच्या तडाख्यानंतर आकाशातल्या अल्लाशी करते, तो छोटासा आक्रोश भरलेला संवाद तर वाचायलाच हवा असा. अशा सामाजिक कादंबऱ्यांचा शेवट ओढूनताणून का होईना आशादायी करण्याचा प्रघात आहे. (‘वो सुबह कभी तो आएगी!’) पण बिस्मिल्लाह इथंही ‘फाऊल’ करतात.

पराभूत इद्दन अखेर सितारासाठी आपल्याच जातीतला एक मुलगा आणि बहुसंख्य भारतीय मुस्लीम लग्न करतात त्या  ‘शव्वाल’च्या महिन्यातला मुहूर्त शोधते. हमीद - सिताराचा मोठा भाऊ - आवाक्याबाहेर जाऊन या लग्नाची मोठी तयारी करतो. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही प्रकारची पक्वान्नं शिजतात. नवऱ्या मुलाला लवकरच सेहरा बांधला जाणार असतो. अशा वेळी नईम (जो सिताराने नाकारल्यावर, दुसरीकडे केलेलं लग्नही अपयशी झाल्यानं धर्मप्रचारक झाला आहे, तरी मनात सुडाची आग वागवतो आहे) चोरमार्गानं त्याला गाठून खऱ्याखोट्या हकिकती सांगून संशयाचं बीज सोडून निघून जातो.

लग्न मोडतं. नवरीला न घेताच वरात परत जाते. इद्दनला हा धक्का सहन होत नाही, उत्सवी माहोल सुतकात बदलतो. दुसऱ्या दिवशी सुतकी वातावरणातल्या सगळ्या आवराआवरीत भल्या मोठ्या भांड्यातली नासलेली, दुर्गंधी येत असलेली पक्वान्नं पाहताना तिला वाटतं, आपण वाड्यामागच्या पायखान्यात उभ्या आहोत… तिला घेरी येते. तिला पडलेल्या स्वप्नांनी कादंबरी संपते.

..................................................................................................................................................................

शेवटच्या स्वप्नात ती पतंग झाली आहे, आकाशात उडते आहे, आकाश मोकळं, स्वच्छ आहे, तिला काटू शकणारा एकही पतंग आसपास नाही. उडत वर वर जात बिंदूवत होत जात प्रत्यक्षातला तारा होत जाते सितारा… ब्लर्बवर शेवटी एक वाक्य आहे – ‘हम जान पाते है कि, ये सपने ही है जो अंततः हमें मुक्ती की मंजिल की और ले जाते है…’ बदलांची स्वप्नं टिकायला हवीत हे खरंच, पण स्वप्नांवरचे शेवट म्हणजे प्रत्यक्षातली मुक्ती दृष्टीपथात नसल्याची कबुलीच नसतात का?  

..................................................................................................................................................................

सितारा स्वप्नात पाहते, कुठल्या तरी मोठ्या शहरात ती मुलींच्या शाळेत शिक्षिका आहे. वर्गात मागच्या बाकावर एक गोड, निरागस मुलगी बसते, ती गप्प गप्प आहे. ‘आई-वडील काय करतात?’ सितारा तिला वर्गाबाहेर गाठून विचारते. ‘आई शेजारीपाजारी कामं करते, वडील रिक्षा चालवतात.’ ‘माझ्या घरी राहायला येशील?’ पुढच्या दृश्यात तुबा एक गाठोडं घेऊन सिताराबरोबर तिच्या घराकडे निघाली आहे.

....

नईमचं तिच्याकडे येणं, माफी मागणं, सिताराचं त्याला उत्तर देणं, मला आता आधारासाठी कुठल्याही पुरुषाची गरज नाही असं सांगत त्याला घालवून देणं...

......

शेवटच्या स्वप्नात ती पतंग झाली आहे, आकाशात उडते आहे, आकाश मोकळं, स्वच्छ आहे, तिला काटू शकणारा एकही पतंग आसपास नाही. उडत वर वर जात बिंदूवत होत जात प्रत्यक्षातला तारा होत जाते सितारा…

ब्लर्बवर शेवटी एक वाक्य आहे – ‘हम जान पाते है कि, ये सपने ही है जो अंततः हमें मुक्ती की मंजिल की और ले जाते है…’ बदलांची स्वप्नं टिकायला हवीत हे खरंच, पण स्वप्नांवरचे शेवट म्हणजे प्रत्यक्षातली मुक्ती दृष्टीपथात नसल्याची कबुलीच नसतात का?  

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘कुठाँव’ म्हणजे ‘मर्म’. व्यवस्थेचं वर्म उघडं करणं सोपं नाही. अर्पणपत्रिकेत, जी सितारासारख्या मुलींसाठी आहे, बिस्मिल्लाह या कादंबरीला ‘एक बदसुरत किताब’ म्हणतो. त्याच्यासाठीही हे सोपं नव्हतं. २०१३ साली जवळजवळ सलग, मधून मधून येणारं आजारपण वगळता, पुरी झालेली ही कादंबरी. तिचा प्रवास याआधीच्या कादंबऱ्यांसारखा थेट प्रकाशकाकडे सहज झाला नाही. पाच वर्षं अनेकांकडे अभिप्राय, पुनर्लेखनाचे, दुरुस्तीचे सल्ले घेत ती फिरत राहिली आणि अखेर २०१८च्या अखेरीस प्रकाशित झाली, तिची ही छोटीशी निर्मितीकथाही भाष्यच वाटू लागते, व्यवस्थेवरचं.

अब्दुल बिस्मिल्लाह... माझ्या वाचनप्रवासातला हा सहोदर त्याच्या कादंबऱ्यांतून धार्मिक वेगळेपण बाजूला ठेवत त्यापलीकडच्या व्यापक शहाणीवेसाठी सतत संवादाची साद घालत राहिला आहे... हे मला फार मोलाचं वाटतं.

............................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......