हा ‘गौरवग्रंथ’ नाही, मराठी पत्रकारितेतील चार पिढ्यांवर पत्रकारितेचा ‘शुद्ध संस्कार’ करणाऱ्या एका वारकऱ्याचे हे नम्र स्मरण आहे!

पत्रकारितेतलं व्रतस्थ आणि झुंझार कर्तृत्व, पत्रकारितेविषयी तत्त्वनिष्ठ  धारणा, समाजवाद व महात्मा गांधी यांच्यावर अढळ श्रद्धा, मुस्लीम धर्म आणि जीवनशैलीचे अभ्यासक, निझामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्तीचा ध्यास घेतलेले स्वातंत्र्य सैनिक, निर्मोही, उत्कट आणि डोळस, संवेदनशील, वारकरी वृत्तीचा माणूस, असे अनंतराव भालेराव यांचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे जगणे आणि कर्तृत्व एखाद्या विशाल वृक्षासारखे आहे.......