काँग्रेसचा कर्नाटकी कशिदा! नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाराजीला कंठ फुटेल?
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 13 May 2023
  • पडघम देशकारण कर्नाटक Karnataka भाजप BJP काँग्रेस Congress बी.एस. येडियुरप्पा B. S. Yediyurappa डी. के. शिवकुमार D. K. Shivakumar सिद्धरामय्या Siddaramaiah बसवराज बोम्मई Basavaraj Bommai

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी बऱ्याच वर्षांनी शुभशकुनाच्या ओल्या रेषा ठरले आहेत. खरं सांगायचं तर काँग्रेसला निसटतं बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त मजल काँग्रेसनं मारलेली आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतपत मतदारांनी स्पष्टपणे मोठा  कौल दिलेला असल्यामुळे काँग्रेसला आता जनता दल सेक्युलरची मदत घ्यावी लागणार नाही. हे राजकीयदृष्ट्या काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. मात्र काँग्रेसला बेफिकीर राहून मुळीच चालणार नाही. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ७८ जागा मिळाल्या होत्या आणि त्यापेक्षा निम्म्यानं (३७) जागा मिळालेल्या जनता दल सेक्युलरसोबत मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत युती करून कर्नाटकात भाजपेतर सरकार स्थापन झालं होतं. मात्र भाजपनं काँग्रेसचे आमदार फोडून कर्नाटकात सत्ता स्थापन केली होती. याही वेळेस तशी शक्यता घडण्याचं नाकारता येणार नाहीच. म्हणून काँग्रेसला भविष्यात कोणताही राजकीय गाफीलपणा दाखवून मुळीच चालणार नाही.

भारतीय राजकारणाच्या पटलावर नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यावर म्हणजे गेल्या आठ-नऊ वर्षांत एखाद्या निवडणुकीत इतकं घवघवीत यश मिळण्याचा सुखद अनुभव काँग्रेसच्या वाट्याला प्रथमच येतो आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जवळपास ४० आणि जनता दलाच्या १४ जागा कमी झाल्या आणि हे सर्व सुमारे ५० मतदारसंघ काँग्रेसकडे वळले आहेत, ही फारच मोठी उपलब्धी मतदारांनी काँग्रेसच्या पदरात टाकली आहे. हा काँग्रेसनं विजयाचा विणलेला कर्नाटकी कशिदाच म्हणायला हवा!

या यशानं हुरळून न जाता पक्षबांधणीकडे नीट लक्ष देण्याची गरजही काँग्रेसनं पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवी. कर्नाटकचा गड राखण्यासाठी ज्या पद्धतीनं मोर्चेबांधणी करण्यात आली आणि प्रचाराची आखणी करण्यात आली, तसंच यापुढेही काँग्रेसला करावं लागणार आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह असंख्य नेत्यांनी कर्नाटकात ठाण मांडलं होतं. निवडणुकांत सतत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवांमुळे काँग्रेस पक्षाला आलेलं नैराश्य अखेर दूर झालं आहे, असं हे चित्र आहे. ते आणखी देखणं करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, तर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणाऱ्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असेल, हे निश्चित.

निकालाच्या कितीतरी आधीपासूनच जनमताचे जे काही कौल हाती येत होते, त्यानुसार कर्नाटकात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार येणार हे दिसत होतं. काँग्रेसनंही ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची केली होती. पक्षातील दिग्गजांची फौज कर्नाटकात उतरवली होती. शिवाय अशातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आलेले मल्लिकार्जुन खरगे यांचं कर्नाटक हे ‘होमपीच’, त्यामुळेही काँग्रेसला विजयासाठी संपूर्ण जोर लावणं आवश्यक होतं.

१९९०च्या दशकानंतर काँग्रेसचं नेतृत्व प्रथमच गांधी घराण्याचं अंगण ओलांडून मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे गेलेलं होतं. म्हणजे गांधी घराण्याच्या अध्यक्षाविना काँग्रेस पक्ष प्रथमच एखादी महत्त्वाची निवडणूक लढवत होता. ती कसोटीही काँग्रेस पक्ष उत्तीर्ण झाला आहे. कधी नव्हे ते सुमारे वर्ष-दीड वर्ष आधी काँग्रेसनं कर्नाटकात मोर्चेबांधणी सुरू केलेली होती. माजी मुख्यमंत्री असलेले जगदीश शेटर यांच्यासारखे काही भाजपचे बडे नेतेही काँग्रेसच्या गळाला लागलेले होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रारंभ कर्नाटकातूनच केला होता आणि या यात्रेला मिळालेला प्रतिसाद विधानसभा निवडणुकीतील विजयाचा संकेत देणारा होता. त्या वेळी भाजपनं मिळणारा प्रतिसाद लक्षात न घेता ‘भारत जोडो’ यात्रेची टवाळी करण्याची भूमिका घेतली होती. 

देशात सध्या भाजपच्या विरोधात अन्य राजकीय पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली (पुन्हा एकदा) सुरू झाल्या आहेत. भाजपविरोधातील राजकीय आघाडीचं नेतृत्व कुणाही प्रादेशिक पक्षाकडे नव्हे, तर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाकडेच असलं पाहिजे, अशी धारणा बहुसंख्यांच्या मनात आहे. मात्र काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारायला भाजपेतर विरोधी पक्षांतील  काही नेत्यांचा छुपा  विरोध आहे, कारण त्यांचा  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध आहे.

काँग्रेस आणि राहुल विरोधाची ती धार कर्नाटकातील या विजयामुळे नक्कीच बोथट होईल. या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधातली काँग्रेसची आणि विशेषत: राहुल गांधी यांची मोहीम आणखी तीव्र होणार आहे. याचा अर्थ लगेच २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवर येईल असं नव्हे, पण कर्नाटकातला हा विजय काँग्रेसला उभारी देणारा, तसंच लोकसभा निवडणुकीत शंभरी गाठण्याचा विश्वास देणारा आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कर्नाटकच्या निवडणुकीत लिंगायत आणि रेड्डींचा पाठिंबा निर्णायक ठरतो. शिवाय खाण मालक आणि मद्य लॉबीही कळीची भूमिका निभावतात, असा आजवरचा अनुभव आहे. (पक्षी : सोनिया गांधी यांच्या विरुद्ध भाजपच्या सुषमा स्वराज यांनी लढवलेली किंवा त्याही आधी इंदिरा गांधी यांनी चिकमंगरुळ लोकसभा मतदारसंघातून लढवलेली पोटनिवडणूक आठवा.) कर्नाटकातले हे ‘कळी’चे मतदार आपल्याकडे वळवण्यात अपयश का आलं, याचा विचार भाजपला करावा लागणार आहे.

वाढती महागाई आणि बेरोजगारी शिवाय बोम्मई  सरकारचा निराशाजनक कारभार आणि केडरमधील अनेकांना बाजूला सारण्याचा बेमुरर्वत आतातायीपणा, अशी भजपच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. अर्थात मतदारांचा कौल विरोधात जातो आहे, हे काही भाजपच्या लक्षात आलं नाही असं नव्हे. म्हणूनच ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं सर्व शक्ती पणाला लावली होती.

नेहमीप्रमाणे मोदी आणि अमित शहा प्रचार आणि शक्तीप्रदर्शनात आघाडीवर होते. ‘द केरला स्टोरी’ हा एकतर्फी प्रचारकी चित्रपट, ‘जय बजरंग बली’ची घोषणा अशा काही भावनिक मुद्द्यांना प्रचारात प्राधान्य देऊन बहुसंख्याकवादी आणि जातीयवादीही राजकारण खेळण्याच्या परंपरेला भारतीय जनता पक्ष जागला होता. तरीही कर्नाटकातल्या मतदारांवर या वेळी ‘या’ गारुडाचा प्रभाव पडला नाही, असंच म्हणावं लागेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

निकालाच्या आधी ‘जनता दल (सेक्युलर)शी संपर्क साधून भाजपनं सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केल्याच्या वार्ता खऱ्या असू शकतात, कारण राजकारणात कुणीच कायमचा शत्रू आणि कुणीच कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे ती राजकीय चतुराई क्षम्यही आहे, पण कर्नाटकातल्या मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट कौल देत सत्तेसाठी अशी एखादी संधिसाधू युती होण्यास सुरुंगच लावला आहे.

२०१४पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या नावानं मतं मागितली आणि अनेकदा सत्तेचा सोपान चढण्यासाठी कौल मिळवलाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर २०१४नंतरच्या सर्व निवडणुकांत नरेंद्र मोदी हे ‘पोस्टर बॉय’ होते. लक्षात घ्या, २०१८च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. हा आकडा जवळजवळ ३५नं घटला आहे.

याचा अर्थ एकहाती निवडणुका जिंकून देण्याची मोदी यांची ‘पोस्टर बॉय’ ही प्रतिमा या पुढील निवडणुकांत यशस्वी होईल किंवा नाही, याविषयी आता उघडपणे शंका निर्माण होईल. सर्वोच्च नेत्याविरुद्ध कोणत्याही राजकीय पक्षात नाराजीची भावना काही प्रमाणात असणं, ही एक स्वाभाविक आणि अपरिहार्य प्रक्रिया आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीविषयी तशी नाराजी आहेच; ते नाकारणं ही आत्मवंचनाच ठरेल. या नाराजांना कर्नाटकच्या या निकालामुळे संघटित होण्याचं आणि कंठ फुटण्याचं बळ मिळालं, तर आश्चर्य वाटायला नको.  अर्थात, कर्नाटकातल्या निवडणुकीच्या निकालाचा अर्थ म्हणजे या राज्यातून भाजपचं उच्चाटन झालं, असं सवंग विधान मी तरी करणार नाही.

‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चं या निवडणुकीतलं अपयश मराठी माणसासाठी चिंताजनक आहे. अलीकडच्या काही निवडणुका एकीकरण समितीच्या सदस्यांची विधानसभेतील सदस्य संख्या कमी होत चालली आहे. मराठी माणसांची एकजूट राखण्याला प्राधान्य न देता राजकीय पक्षांच्या आहारी जाण्याची भूमिका तर याला कारणीभूत नाही ना, याबद्दल ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’लाही कठोर आत्मपरीक्षण करावं लागणार आहे, हेही या निकालानं दाखवून दिलेलं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......