निकालानंतरची धुळवड!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राहुल गांधी, शरद पवार आणि इम्तियाज जलील
  • Sat , 08 June 2019
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi शरद पवार Sharad Pawar इम्तियाज जलील Imtiyaz Jaleel

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. केंद्रात नवीन सरकार अस्तित्वात आलं आणि नेहमी जे घडतं, ते म्हणजे निवडणुकीनंतरचं कवित्व म्हणा की धुळवड आता सुरू झाली आहे. यात आधी परस्परांविषयी व्यक्त केलेल्या अति(?)आपुलकी/आदराच्या भावना आणि आता व्यक्त केलेला उद्वेग, तळतळाट असा विरोधाभास आहे. (अशा दोन परस्पर विरोधी भावना एकत्र व्यक्त केल्या जाण्यासाठी इंग्रजीत ‘ऑक्सिमोरॉन’ (OXYMORON) असा शब्द आहे. उदाहरणार्थ- Seriously Funny. त्यात गमतीत ‘Happily Married’चाही उल्लेख केला जातो. असे अनेक शब्दप्रयोग आहेत, पण ते असो.) विरोधाभास असला तरी त्यामुळे काहींना आक्रोश केल्याचा, काहींना चूक सुधारल्याचा तर काहींना कुणावर तरी दोषारोप करण्याचं समाधान मिळतं आणि इकडं लोकांचं मात्र झकास मनोरंजन होतं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्ष किती गोंधळलेला आहे, याचं सुरस उदाहरण म्हणून राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपद सोडण्याचा व्यक्त केलेला मनोदय आणि आणि त्यांची सुरू असलेली मनधरणी असून तीदेखील एक प्रकारची धुळवडच आहे. पक्षाच्या राज्य शाखांनी राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी काम राहावं यासाठी केलेले ठराव, हा तर हुजरेगिरीचा कळसच म्हणायला हवा. पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा क्रूस उचलण्यासाठी राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त एकही कर्तृत्ववान म्हणा की धमक असणारा म्हणा, नेता काँग्रेसमध्ये नाही हे समोर आलेलं चित्र विदारक आहे. हा पक्ष ‘गांधी’विना किती विकलांग, अगतिक आणि लाचारही आहे, ही या चित्राची दुसरी बाजू या पक्षाला असणारं भवितव्य किती अंधारलेलं आहे, हे दाखवणारी आहे. म्हणूनच बहुदा तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या १८ पैकी १२ सदस्यांनी पक्षांतर केलं असावं... गोव्यातील चार आणि महाराष्ट्रातले दहापेक्षा जास्त विधानसभा सदस्य भाजपच्या गळाला लागलेले आहेत, या बातम्यात तथ्य असावं!

देशातले एक बहुआयामी, चतुर, दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काही कमी धुळवड साजरी केली जातेय असं नाही. ‘कन्या हरली तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल’, असं म्हणून त्यांनी निकालाआधीच धुळवड साजरी केली. लोकसभा निवडणूक जिंकायची होती, म्हणून भाजपनं चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकात पराभव ओढावून घेतला, असं अगम्य विधान त्यांनी केलं. मतदान यंत्राबद्दल संशय येण्याचे झटके आजकाल शरद पवार यांना अधूनमधून येतात, मात्र मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल अजित पावर नि:शंक आहेत. सांगलीच्या संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दल वाचाळवीर जितेंद्र आव्हाड सतत टीकेचा जोरदार सूर लावतात, तर उदयनराजे आणि जयंत पाटील भिडेंचे समर्थक आहेत. शरद पवार या संदर्भात काहीच बोलत नाहीत. भिडेंसह आशा अनेक मुद्द्यांबद्दल पक्षाची नेमकी भूमिका काय किंवा नेमकं कोण बरोबर आहे, याबद्दल खुलासा होत नसल्यानं कार्यकर्ते काम गोंधळलेले असतात... हा असा कधीच न शमणारा गोंधळ धुळवडच नाही का?  

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4901/Startup-marnarach-mi-udyojak-honarach-mi

...............................................................................................................................................................

ज्यांच्या चड्डीची कायम हेटाळणी केली त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकासारखं चिकाटीनं काम करायला हवं, असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना देत आणखी एक गोंधळ उडवून दिला आहे. ‘आता आम्ही काय प्रात:शाखेत जाऊन चिकाटी आणि शिस्तीचे धडे गिरवायचे का’, असा सवाल राष्ट्रवादीतल्या आमच्या एका मित्रानं केला. पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात मान-पानावरून संशयकल्लोळ निर्माण करणार्‍या साहेबांना तर आता उपरोधही समजेनासा झालाय. नथुराम गोडसेचा राष्ट्रभक्त म्हणून होणारा गवगवा आणि त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांना मिळालेलं यश पाहता, या देशाला आता महात्मा गांधी यांची गरज नसणारं, उपरोधानं ठासून भरलेलं एक ट्विट करणार्‍या सनदी अधिकार्‍यावर कारवाईची मागणी शरद पवार यांनी करणं हा याचा कडलोट होत. पण त्यापुढे जात शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे त्यामुळे समोर आलं, ते फारच वाईट व पवार यांच्या प्रतिमेला तडा देणारं ठरलं. (महा)राष्ट्रवादीचे समर्थक असणार्‍या बुद्धीजीवींची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. 

औरंगाबाद वगळता मुस्लिमांची मतं बहुजन वंचित आघाडीला मिळालेली नाहीत, असे आरोपांच्या रंगाचे फुगे उडवत (शरद पवार यांना बारामतीचे नेते ठरवून मोकळे झालेले) अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निकालानंतरच्या निवडणुकीत नाराजीचा राग आळवला आहे. बहुजन वंचित आघाडीच्या वाट्याला अपयश का आलं, या बद्दल प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या मीमांसेवर अद्याप एमआयएमनं प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, पण ती आली की, ही धुळवड आणखी रंगत जाणार यात शंकाच नाही. एकंदरीत काय तर बहुजन वंचित  आघाडीत ‘ऑल इज नॉट वेल अँड विल नॉट बी वेल’ हेच संकेत या धुळवडीतून मिळालेले आहेत. तिकडे उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यांच्यातही राजकीय धुळवड सुरू झालेली आहे. समाजवादी पार्टीसोबतची युती न तोडता पोटनिवडणुका स्वतंत्र लढवण्याचा मनोदय व्यक्त करतानाच यादवांची मतं न मिळाल्याचा आक्रोशी रंग मायावती यांनी उधळले आहेत. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष तिकडे ‘जय बांगला’ची पोस्टकार्डस पाठवण्याची धुळवड (इकडे आपण मात्र ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं की, सगळ्यांचं पित्त खवळतं!) खेळतोय. ही देशभर सुरू असलेली अशी सर्वपक्षीय धुळवड लक्षात घेता, हे सर्व नेते आणि त्यांचे पक्ष नरेंद्र मोदी-अमित शहा तसंच भाजपच्या विरोधात एकत्र येणार कधी आणि लढणार कधी, असा प्रश्न पडतो.   

महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या पराभवापेक्षा जास्त धुळवड रंगली आहे, ती औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाची. हिंदू विरुद्ध मुस्लिम विरुद्ध मराठा असे अनेक रंग त्यात मिसळवले जात आहेत. या मतदार संघातून एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा झालेला विजय अनेकांना खुपला आहे, पण त्यांचा हा विजय अनपेक्षित नाही. गेल्या निवडणुकीच्या आधीपासून चंद्रकांत खैरे (आणि काँग्रेसच्या राजेंद्र दर्डा) यांच्या पराभवाची उघड चर्चा औरंगाबादेत होती. २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेत तरले तरी खैरे यांनी त्या विजयात दडलेली पराभवाची टांगती तलवार गंभीरपणे घेतलीच नाही. मे २०१५त दिल्ली सोडून आम्ही औरंगाबादला स्थायिक झालो, तेव्हापासून खैरे यांच्या संभाव्य पराभवाबद्दल (तोपर्यंत राजेंद्र दर्डाही विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले होते) ऐकत होतो. त्यातच रावसाहेब दानवे यांच्या जावयानं केलेल्या विरोधाला तुच्छ लेखण्याची चूक चंद्रकांत खैरे यांना भोवली. या सर्व चुकांना जातीय आणि धार्मिक रंग देणं गैर आहे. त्यामुळे या शहराच्या शांततेला तडे जाऊ शकतात. शिवाय एमआयएमला अनेकांनी मतं दिलेली नाहीत. इम्तियाज जलील नावच्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तीला अनेक मुस्लिमेतरांची मतं मिळालेली आहेत, ही वस्तुस्थिती एकदा नीट समजून घ्यायला हवी.

निकालानंतरची ही धूळवड आता आणखी पाच-सहा महिने उडतच राहणार आहे. होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड खेळतांना शरीराला अपायकारक रंग न उधळण्याची दक्षता घ्यावी लागते. राजकीय धुळवडीत जात आणि धार्मिक द्वेषाचे रंग उधळले जाऊ न देण्याची दक्षता सर्वांनीच घ्यायला हवी कारण त्यापेक्षा सामाजिक सौहार्द जास्त महत्त्वाचं आहे!

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......