अहमद पटेल नावाची ‘काँग्रेसी’ दंतकथा!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • सोनिया गांधी, अहमद पटेल आणि राहुल गांधी
  • Sat , 28 November 2020
  • पडघम देशकारण सोनिया गांधी Sonia Gandhi अहमद पटेल Ahmed Patel राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress

राजकारणातल्या वाचाळवीरांना, तसंच पिंजऱ्यातल्या पोपटांसुद्धा ‘चाणक्य’ म्हणण्याची फॅशन सध्या प्रसारमाध्यमांत आलेली आहे. ‘दाते शब्दकोशा’त ‘चाणक्य’ या शब्दाचा अर्थ आहे- ‘जात्या धूर्त, चतुर आणि उत्तम वक्ता इत्यादी गुणांनी युक्त.’ हे आठवण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हंगामी पक्षाध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचं नुकतचं झालेलं निधन. पटेल जात्या धूर्त होते, चतुर होते, मात्र उत्तम वक्तृत्व त्यांच्याजवळ नव्हतं. त्यांच्या निधनानं समकालीन भारतीय राजकारणातला ‘सर्वार्थाने’ एक चाणक्य काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि त्यांची जागा घेणारा आज तरी काँग्रेस पक्षात कुणी दिसत नाही.

गव्हाळ वर्ण, काहीसा स्थूल बांधा, डोईवरचे केस मागे वळवलेले, कायम सस्मित आणि मिठ्ठास वाणी, असं पटेल यांचं एकंदरीत व्यक्तिमत्त्व होतं. पण त्यांच्या स्मितातून त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा समोरच्याला मात्र अंदाज कधीच येत नसे. दिल्लीच्या दरबारी राजकारणात डोक्यावर बर्फ, जीभेवर खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती हलू न देता राजकारण करणारा यशस्वी होतो, असं म्हटलं जातं.

त्यात चेहऱ्यावरीच सुरकुती न हलू देतानाचा अपवाद वगळता कायम सस्मित राहत काँग्रेसच्या राजकारणात यशस्वी झालेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे पटेल होते. ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे कान आणि डोळे होते. पक्षातले नेते, कार्यकर्ते आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात ते कायम ‘कुशन’ म्हणून वावरले तरी सत्तेपासून कायमच लांब राहिले. काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर अव्यभिचारी निष्ठा हे पटेल याचं एक वैशिष्ट्य. शिवाय वादविवाद, चर्चा, आरोप–प्रत्यारोपासून ते कायम लांब राहिले.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

याचा अर्थ त्यांना कुठलेच वाद चिकटले नाहीत किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले नाहीत, असं नव्हे. सत्तेच्या राजकारणात आणि देशातल्या एका सर्वांत मोठ्या पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या प्रदीर्घ काळ हातात असल्यामुळे, शिवाय ज्यांना शब्द पक्ष व सत्तेत प्रमाण मानला जातो, अशी शक्ती असलेले पटेल अनेकदा वादग्रस्तही ठरले.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांचं सरकार विश्वास-मताला सामोरं गेलं, तेव्हा लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सभागृहात विरुद्ध पक्षांकडून नोटांची चळत सादर झाली. नोटांची ती चळत सादर होण्यामागे पटेल यांचाच हात होता, अशी चर्चा तेव्हा झाली. देशातल्या एका बड्या उद्योग समूहात पटेल यांची आर्थिक गुंतवणूक असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. महाराष्ट्रातल्याही एका उद्योग समूहात काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांसोबत पटेल यांचीही आर्थिक गुंतवणूक असल्याची बोलवा मोठ्या प्रमाणात होती. इतकंच कशाला देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे आर्थिक संबंध असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात (दबक्या आवाजात का असेना) होतीच की!

या सर्व चर्चा खऱ्या की खोट्या याची खातरजमा करणारी कोणतीही यंत्रणा प्रस्तुत पत्रकाराकडे नाही. मात्र अशा चर्चा रंगल्या होत्या, हे मात्र कधीच नाकारता येणार नाही. ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नाही, म्हणून देशातल्या इतर बहुसंख्य सर्वपक्षीय राजकारण्यांप्रमाणे पटेल हेही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नव्हते, असं म्हणण्यास जागा आहे. ते काहीही असो, त्यांची पक्षावरची घट्ट पकड आणि त्यांच्या शब्दाला प्राप्त झालेलं वजन, ही समकालीन राजकारणातली एक दंतकथा होती आणि ती दंतकथा वास्तवात वावरत होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पटेल मूळचे गुजरातमधले. भडोच जिल्ह्यातले. भडोच लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा ते विजयी झाले. १९७७ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचं देशात सर्वत्र पतन झालेलं असतानाही पटेल मात्र भडोच मतदारसंघातून लोकसभेवर विजयी झाले होते. त्यानंतर सलग तीन वेळा ते लोकसभेवर आणि १९९३ नंतर अखेरचा श्वास घेईपर्यंत राज्यसभेवर सदस्य होते.

या संपूर्ण कालखंडात त्यांच्याही राजकीय आयुष्यात अनेक चढउतार आले, पण डोळ्यात पाणी येऊ न देता पायात रुतलेला काटा काढावा, अशा शांतपणे सगळे चढउतार पटेल यांनी पचवले. वचावाचा बोलणं, फुशारक्या मारणं, प्रसिद्ध मिळवणं अशा कोणत्याच बाबींना त्यांच्या राजकीय जीवनात थारा नव्हता. २४ तास हा माणूस फक्त काँग्रेसचं राजकारण करत होता; अतिशय धूर्तपणे इकडच्या सोंगट्या तिकडे हलवत आणि त्याचा कोणालाही पत्ता लागू न देता कार्यरत होता. गांधी घराण्याशी असणारी पटेल यांची निष्ठाही काँग्रेस वर्तुळात कायमच असूया आणि अप्रूपाचा विषय होता.

‘अहमदभाईंनी शब्द दिला म्हणजे ते काम होणारच’, अशी त्यांची काँग्रेस पक्षात प्रतिमा निर्माण झालेली होती आणि ती खरीही होती. मात्र यातही एक विरोधाभास आहेच. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जेव्हा प्रवेश केला, तेव्हा पटेल यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं, असं दस्तुरखुद्द राणे यांनी अनेकदा सांगितलं. मात्र  त्यांना काँग्रेस पक्षात असेपर्यंत मुख्यमंत्रीपदानं कायमच हुलकावणी दिली. राणे यांनी अनेकदा उच्चार करूनही याच नाही, तर आणि कोणत्याही ‘दिल्या घेतल्या वचनां’चा कधीही कोणताही  खुलासा पटेल यांनी केला नाही. हे असं सोयीस्कर म्हणा का धूर्त म्हणा मौन बाळगून वावरणं, हे पटेल यांचं एक खास वैशिष्ट्य होतं.

१९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटेल यांचा पराभव झाला, तोवर ते गांधी कुटुंबाच्या फार जवळ गेलेले होते. १९८४ नंतर ते राजीव गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य बनलेले होते. तेव्हापासून गांधी-नेहरू कुटुंबाशी असणाऱ्या सर्व संस्थांवर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्या संस्थांचे एका अर्थाने ते सूत्रधारही आहेत. तरीही १९८९ मधला पराभव ते टाळू शकले नाहीत. मात्र पुन्हा पक्षातली पाळंमुळं बळकट करण्याची संधी शांतपणे शोधत राहण्यासाठी पुढची दोन-तीन वर्षं पटेल यांनी खर्च केली.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंहराव यांच्याकडे आधी पक्षाध्यक्ष आणि पाठोपाठ पंतप्रधानपदही आलं. तेव्हा नरसिंहराव यांच्या विरोधात जे पक्षांतंर्गत विराधक होते, त्यात एक पटेल होते.  तेव्हा ज्या पद्धतीने नरसिंहराव यांचं स्थान बळकट होत गेलेलं होतं, त्यामुळे तर पटेल यांच राजकीय भवितव्य तर आता अंधुक झालेलं आहे, असंच समजलं गेलेलं होतं. मात्र ते सर्व समज पटेल यांनी खोटे ठरवले. त्या काळात त्यांनी त्यांची पक्षांतंर्गत पाळंमुळं घट्ट केली आणि गांधी घराण्यावरील निष्ठेची वीण मुळीच विसविशीत होऊ दिली नाही. १९९२ मध्ये नरसिंहराव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पटेल यांचा समावेश केला. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर जी काही अस्वस्थता देशभर निर्माण झाली, त्याचा परिपाक म्हणून पटेल यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्याचा राजीनामा दिला. मात्र नरसिंहराव यांनी शिष्टाई करून तो राजीनामा परत घ्यायला लावला.

१९९३मध्ये नरसिंहराव यांनीच त्यांना राज्यसभेवर संधी दिली. हे असं घडत असलं तरी गांधी घराण्याचे प्रवक्ते किंवा किचन कॅबिनेटचे प्रमुख या पदापासून पटेल लांब होते आणि याचं एक सर्वांत महत्त्वाचं कारण व्हिंसेंट जॉर्ज हे होते. त्या काळात जॉर्ज यांचा शब्द म्हणजे गांधी कुटुंबाचा शब्द समजला जात असे. ते स्थान मिळवण्यासाठी कोणताही उतावीळपणा न करता पटेल संयमानं कार्यरत राहिले.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर एका आर्थिक प्रकरणात जॉर्ज यांचं नाव समोर आलं. त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आणि हळूहळू जॉर्ज यांची गांधी कुटुंब आणि पक्षातील जागा पटेल यांनी काबीज केली. तेव्हापासून पटेल अधिकाधिक प्रबळ होत गेले. त्यांनी जर कुणाला शब्द दिला तर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी तो दिलेला आहे, असं समजण्याची पद्धत अगदी शेवटपर्यंत कायम राहिली.

‘चाणक्य’ ही उपाधी सार्थ ठरवत पटेल यांनी स्वत:ला सत्तेपासून कटाक्षानं लांब ठेवलं. खरं तर राजीव गांधी पंतपधान होते, तेव्हाच त्यांना मंत्रीपदाची संधी चालून आलेली होती. परंतु ती नाकारून त्यांनी पक्षाचा ‘कर्ताकरविता’ हे स्थान मिळवण्यासाठीच प्राधान्य देण्याचं ठरवलं. सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि सोनिया गांधी यांच्यातला दुवा म्हणून पटेल उदयाला आले. ते चोवीस तास काम करतात असं त्यांच्या लाभार्थींकडून सांगितलं जाऊ लागलं. पक्षात आणि सरकारात इतकं महत्त्वाचं स्थान संपादन केल्यानंतरही ते प्रसिद्धीपासून कायम लांब राहात असत. दिल्लीच्या वास्तव्यात एक पत्रकार म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न मी पाच-सहा वेळा केला, परंतु त्यांनी भेटण्यास कोणतीही अनुकूलता दर्शवली नाही.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : काँग्रेसच्या पिंजऱ्यातील पोपटांची फडफड!

.................................................................................................................................................................

मात्र एकदा भेटण्याची उत्सुकता असल्याचं माझं म्हणणं मान्य करून ते भेटले खरे, पण बोलले फारच कमी. त्या आठ–दहा मिनिटांच्या भेटीत आमच्यात जो काही संवाद झाला, त्यात मीच जास्त बोललो आणि सस्मित चेहऱ्यानं अहमद पटेल यांनी ते ऐकून घेतलं, चहा पाजला आणि माझी बोळवण केली!

पटेल यांचं हे जे माध्यमांपासून दूर राहण्याचं वैशिष्ट्य होतं त्यामुळे तर त्यांच्याविषयी कायम कुतूहल असायचं. मात्र ते कुतूहल शमवण्यासाठी पटेल यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. ते किती  ‘वर्कोहोलिक’ होते, याची अनेक उदाहरणं काँग्रेस नेत्यांच्या बोलण्यात यायची. त्यांनी अनेकांना रात्री ११-१२ किंवा मध्यरात्री दोन वाजताही भेटीसाठी वेळ दिल्याच्या कहाण्या कानावर यायच्या. ते असं का करतात आणि ते खरंच इतके कामात व्यस्त असतात का, असा प्रश्न कधीच कुणाला पडला नाही, कारण त्यांच्या पक्ष आणि गांधी घराण्याच्या निष्ठेविषयी कुणाच्याही मनामध्ये शंका नव्हती.

असं म्हणतात आणि ज्यात तथ्य असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जातं. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातलं सरकार दोन वेळा स्थापन होण्यात पटेल यांचा वाटा मोठा होता. सत्तेसाठी आवश्यक असणारी ‘जुळवाजुळव’ करण्यात अतिशय माहीर असल्याची त्यांची ख्याती होती. ही अशी जुळवाजुळव करण्याचं कसबच पक्षाचं कोषाध्यक्षपद त्यांच्याकडे येण्यासाठी कारणीभूत ठरलं आणि देशातल्या उद्योगपतींशी असणाऱ्या त्यांच्या संबंधांची चर्चा झाली, तरी त्यासंदर्भात माध्यमांचे रकाने मात्र कधीच रंगले नाही, हेही तेवढंच खरं.

सध्या सतत पराभवांच्या मालिकेला काँग्रेस पक्ष सध्या सामोरा जातोय. पक्षातल्या ‘२३ पोपटां’नी पक्षनेतृत्वाच्या सक्षमतेविषयी शंका उपस्थित केलेली आहे. काँग्रेस पक्षात त्यामुळे बरीच अस्वस्थता आहे. अशा परिस्थितीत ‘ते’ २३ आणि गांधी घराणं याच्यात एक असणारा महत्त्वाचा दुवा पटेल यांच्या निधनाने निखळून पडला आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

काही माणसं सत्तेतल्या पदासाठी नाही तर, पक्षातल्या जबाबदारीसाठीच जन्माला येतात आणि आयुष्यभर त्यासाठीच झिजत जातात. ४०-४५ वर्षांच्या राजकारणात काँग्रेस पक्षासाठी पटेल एक चाणक्य म्हणून असे झिजले. सध्याच्या अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांचं निधन म्हणूनच काँग्रेस पक्षासाठी एक मोठा धक्का आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष उभारी घेण्याचा प्रयत्न करत असताना, ‘नरेंद्र मोदी यांना पर्याय मीच आहे’, हे ठसवण्यात राहुल गांधी यशस्वी ठरलेले असताना भारतीय समकालीन राजकारणातला खऱ्या अर्थानं चाणक्य असलेला हा मोहरा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आता राहुल गांधी यांचे पक्षांतंर्गत विरोधक आणखी सक्रिय आणि प्रबळ होतात का, हे येत्या काही दिवसांत कळेलच. पक्षांतर्गत विरोधक प्रबळ झाल्याच्या परिस्थितीत गांधी कुटुंबाला अहमद पटेल यांची उणीव सतत भासेल.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......