काँग्रेसच्या पिंजऱ्यातील पोपटांची फडफड!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘अ प्रॉमिस्ड लँड’चे मुखपृष्ठ आणि बराक ओबामा राहुल गांधींसोबत
  • Mon , 23 November 2020
  • पडघम देशकारण बराक ओबामा Barack Obama अ प्रॉमिस्ड लँड A Promised Land मनमोहनसिंग Manmohan Singh सोनिया गांधी Sonia Gandhi राहुल गांधी Rahul Gandhi कपिल सिब्बल Kapil Sibal पी. चिंदमबरम P. Chidambaram पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan काँग्रेस Congress भाजप BJP

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या एका कमेंटमुळे विरोधकांना जितका आनंद झाला, त्यापेक्षा जास्त आसुरी आनंद काँग्रेसमधील काही ‘पोपटां’ना झालेला असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. ‘उत्सुक पण पुरेशी तयारी नसलेला विद्यार्थी’ अशा ज्या बातम्या प्रकाशित या संदर्भात प्रकाशित झाल्या आहेत, त्या संदर्भ सोडून आहेत. जे विधान माध्यमात आले, ते ओबामा यांच्या २००८मधील निवडणुकीच्या संदर्भात आहे. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील स्मरणांवर आधारित असलेल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकातील त्या पानावरील पूर्ण मजकुराचा अनुवाद असा-

“त्या रात्री मेजवानीच्या वेळी सोनिया गांधी बोलण्याऐवजी ऐकतच जास्त होत्या. जेव्हा जेव्हा धोरणांबद्दल उल्लेख होई, त्या वेळी त्या मनमोहनसिंग यांच्याशी सहमती दाखवत होत्या. बऱ्याच वेळा त्या आमचं संभाषण त्यांच्या मुलावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत होत्या. मला हे स्पष्ट जाणवलं की, त्या एक धूर्त आणि समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्याइतपत चाणाक्ष होत्या. राहुल मला हुशार आणि उत्सुक वाटला. तो त्याच्या आईसारखाच देखणा होता. त्यानं त्याच्या राजकारणासंबंधी पुरोगामी विचार आणि भविष्याबद्दल मत मांडलं. अधूनमधून तो २००८मधील माझ्या निवडणुकीच्या मोहिमेबद्दल थांबत थांबत भेदक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आणि अपरिपक्वता जाणवली. जसं काही त्याने अभ्यासाची उत्तम तयारी केलेली होती आणि आपल्या शिक्षकावर प्रभाव टाकण्याची त्याची इच्छा होती, पण कुठेतरी खोलवर त्याच्यामध्ये मला क्षमता किंवा योग्यतेचा आणि ध्यासाचा अभाव वाटला.

जसं जसा आम्हाला उशीर होत होता मनमोहनसिंग झोपी न जाण्याची धडपड करत होते. दरवेळी आपला चष्मा चेहऱ्यावरून काढायचे आणि जागं राहण्यासाठी घोट घोट पाणी प्यायचे. मी मिशेलला म्हणजे माझ्या पत्नीला, खुणेनं निरोप घ्यायची वेळ झाली असं सूचित करत होतो. पंतप्रधान मनमोहनसिंग आपल्या पत्नीसोबत आम्हा दोघांना आमच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी सोबत आले. अंधुक प्रकाशात सिंग अशक्त आणि वयाच्या ७८ वर्षांच्या मानानं वयस्कर वाटत होते.

आम्ही गाडीतून निघालो तसं मला आश्चर्य वाटत होतं की, भविष्यात ते पंतप्रधान नसतील, तेव्हा काय होईल? सत्ता सरळ राहुलच्या हातात जाईल का? त्याच्या आईनं त्याचं भविष्य तसं अधोरेखित केलेलं होतं आणि काँग्रेस पक्षाचं वर्चस्व अबाधित राहिल का? का भाजपच्या देशाच्या विभाजनवादी राष्ट्रीयतेच्या बळजबरीला बळी पडेल? काही का असेना माझ्या मनात शंका होती. तो दोष मनमोहनसिंग यांचा नव्हता. त्यांनी त्यांचं कर्तव्य चोखपणे बजावलं होतं. या मुक्त लोकशाहीचा बाजा वाजवणाऱ्या शीतयुद्धाच्या पश्चात, त्यांनी आपलं काम भारताच्या संविधानानुसार पार पाडलं. दैनंदिन गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा जीडीपी वाढवण्याच्या तांत्रिक बाजू सांभाळत, त्यांनी सामाजिक सुरक्षिततेचं जाळं चांगलचं सांभाळलं. आमच्या दोघांना खात्री होती की, लोकशाहीकडून आपण एवढीच अपेक्षा करू शकतो. विशेषत: एका मोठ्या, विविध सांस्कृतिक आणि धार्मिक समाज भारत आणि अमेरिकासारख्या देशात क्रांतिकारक झेप किंवा महत्त्वाच्या सांस्कृतिक पुनर्बांधणीने नव्हे! प्रत्येक सामाजिक रोग बरा करणं किंवा शाश्वत उत्तर त्यांच्या आयुष्यात उद्देश आणि अर्थ शोधत असतात. फक्त नियमांचं पालन. ज्यामुळे आपण आपल्या समोरील प्रश्न सोडवू शकलो किंवा निदान परस्परांमधील भेदभाव (फरक) सहन करणं आणि सरकारी धोरणं यांमुळे आपली जीवनपद्धती सुधारली आणि शैक्षणिक प्रगती साधली तर ते मानवाच्या हीन आवेशाला लगाम लावेल.”

(ज्येष्ठतम अनुवादक प्रा. संतोष भुमकर यांनी हा अनुवाद केलेला आहे.)

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्यावर टिपणी करावी आणि त्याच वेळी राहुल यांचं नाव न घेता त्यांच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर काही काँग्रेस नेत्यांनी (?) पुन्हा एकदा आडून वार करावा हा योगायोग असू शकत नाही! ‘पिंजऱ्यातल्या पोपटा’चं बंड केवळ पंख फडफडवण्यापुरतंच मर्यादित असतं. एकदा का पंख फडफडवून थकवा आला की, पिंजऱ्यातली मिरची आणि डाळ खाऊन धन्याची कवणं गाण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्यासमोर नसतो!

हे आठवण्याचं निमित्त म्हणजे पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध केलेली वक्तव्यं. त्या सुरात महाराष्ट्राचे पृथ्वीराज चव्हाण यांनीही सूर मिसळला आहे. काँग्रेस पक्षाच्या वाताहतीची इतकी चिंता आहे, तर या तिघांसह ते ‘शूरवीर’ २३ नेते पुढे येऊन नेतृत्वाची सूत्रे हाती घेऊन काँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचा क्रूस का पेलत नाहीयेत, हा खरा प्रश्न आहे.

पक्षाला उभारी देण्याऐवजी राहुल यांना बळ प्राप्त करून देण्याऐवजी काँग्रेसमधले हे ‘पोपट’ बेजबाबदारपणे वागत आहेत. पक्षाची वाईट स्थिती झालेली आहे, याचं भान या ‘पोपटां’ना आलं हे चांगलंच आहे, असं म्हणता आलं असतं, पण अशी स्थिती निर्माण होण्यासाठी गांधी घराणं वगळता, या ‘पोपटां’पैकी कोणी कोणती जबाबदारी पेलायला हवी होती आणि ती पेलण्यात त्यांना अपयश कसं आणि का आलेलं आहे, याबद्दल आत्मपरीक्षण करायला हवं. इतकी वर्षं पक्षात पदं आणि सत्तेत प्रदीर्घ काळ खुर्ची ऊबवूनही यापैकी (शरद पवार यांचा ठोस अपवाद वगळता!) एकही ‘पोपट’ किमान राज्यात तरी किमान जनाधार मिळवू शकलेला नाही, याची प्रामाणिकपणे कबुली देण्याचं धाडस या ‘पोपटां’नी दाखवलेलं नाही.

गेल्या सहा-सात वर्षांत राहुल गांधी देशभर फिरून मोदी आणि भाजपच्या विरोधात उठवत असलेल्या मोहिमेत हे ‘पोपट’ का सहभागी झाले नाहीत, असा प्रश्न विचारला तर हे सर्व निरुत्तर होतील. राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हतं तरी किती वेळा या नेत्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले, विविध संसदीय अस्त्रांचा वापर करून किती प्रसंगात सत्ताधारी भाजपची कोंडी लोकसभा आणि राज्यसभेत केली, याही प्रश्नांची उत्तरं जर या नेत्यांनी दिली असती तर चांगलं झालं असतं!

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

भाजपकडून होणाऱ्या गळचेपी विरुद्ध, फिरवल्या जाणाऱ्या वरवंट्याविरुद्ध, घाईत लादलेल्या नोटबंदी व वस्तू आणि सेवा कराविरुद्ध, राफेल विमानाच्या खरेदीच्या संदर्भात रान पेटवत राहुल यांनी पुकारलेल्या लढाईत काँग्रेसच्या यापैकी कोणत्या पोपटानं समीधा टाकण्याचा कधी प्रयत्न केला, याचंही उत्तर मिळायला हवं.

राहुल गांधी यांचे काही आरोप अंगलट आले हे खरं आहे. राजकारणात असं घडतच असतं, पण त्याचसोबत त्यांच्यामागे यापैकी किती ‘पोपट’ पूर्ण ताकदीनं उभे राहिले, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. त्या लढाईत पूर्ण ताकदीनं सहभागी न होऊन या बहुसंख्य ‘पोपटां’नी अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत केलेली आहे.

राजकारणात पक्षनिष्ठा महत्त्वाच्या असतातच, पण त्यासोबत वेळोवेळी प्रतिस्पर्धी पक्षाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेतली, हेही त्या इतकंच महत्त्वाचं असतं, अशा भूमिकातून प्रत्येक नेत्याचं नेतृत्व आणि पक्षाची प्रतिमा झळाळून उठत असते.

खरं तर पक्षाविषयी एवढी कळकळ आणि अंगात धमक असेल तर सरळ सरळ आम्हाला राहुल गांधी यांचं नेतृत्व अमान्य असल्याचं जाहीर करून या ‘पोपटां’नी पक्षाची सूत्रं हाती घ्यावीत, पण ते तसं करणार नाहीत, कारण गांधी नावाचं नेतृत्व असल्याशिवाय यापैकी एकही ‘पोपट’ नगरपालिकेच्या निवडणुकीतही निवडून येऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

प्रतिस्पर्धी असलेला भारतीय जनता पक्ष देशात पाळंमुळं कशी घट्ट करतो आहे, याचा अभ्यास तरी या पोपटांनी केला आहे का आणि तशी प्रदीर्घ काळ सत्तेशिवाय राहून पक्षासाठी पूर्ण झोकून देण्याची तयारी या पोपटांनी आजवर कधी दाखवली आहे का, असेही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. सरकार आलं की, सत्तेची खुर्ची उबवणं आणि स्वत:ची आलिशान निवासस्थानं उभारणं या पलीकडे यापैकी बहुसंख्य काँग्रेसी ‘पोपटां’नी काहीही केलेलं नाही. असं असताना या नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजी म्हणा की, असंतोष म्हणजे पिंजऱ्यातली फडफड आहे!

आणखी एक, राहुल गांधी अभ्यासात कमी पडतात, या बराक ओबामा यांच्या मताशी सहमत होता येणार नाही, पण ते राजकीय गांभीर्यात कमी पडतात, हे मात्र मान्य करायला हवंच. त्यांना खरंच जर अध्यक्षपदात रस नसेल तर त्यांनीही ते स्पष्ट करायला हवं आणि त्या पदासाठी एखाद्या उमेदवाराचं नाव सुचवण्याचा उमदेपणा दाखवायला हवा किंवा सलग तिसऱ्या पराभवाची भीती न बाळगता, पक्षातील सर्व धूर्त आणि वृद्ध ‘पोपटां’ना जबाबदाऱ्यांतून मुक्त करत अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेत पक्षाची नव्यानं बांधणी करायला हवी, सर्व स्तरावर नवे चेहरे देत पक्षाचा चेहरा तरुण करायला हवा.

राफेल प्रकरणात आपला अभ्यास कमी पडला याचं भान त्यांनी बाळगायला हवं. त्यामुळे नाहक बदनामी पदरी पडली आणि भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं. लोकसभेत पंतप्रधान मोदी यांना अलिंगन देण्याचा प्रकार बालिशपणा ठरला, असे सल्ले देणाऱ्यांपासून त्यांनी सावध राहायला हवं. राजीव गांधी वर्षातून एकदा सुटी घेत, कारण तेव्हा काँग्रेसकडे बहुमत होतं, हे राहुल गांधी यांनी विसरू नये, आता परिस्थिती तशी नाही.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

बिहारच्या निवडणुका रंगात आलेल्या असताना राहुल पर्यटनाला गेले, नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकरी विरोधी कायदे करत होतं, तेव्हा राहुल विपश्यना करण्यासाठी ५७ दिवस गायब होते... असे बरेच दाखले देता येतील. राजकारण हा पूर्ण वेळ देण्याचा आणि गंभीर विषय आहे, याचा विसर राहुल यांनी पडू देऊ नये, तरच काँग्रेसला कायम विरोधी बाकावर बसण्याची वेळ येणार नाही. 

शेवटी, बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकात मोदी यांचा उल्लेखही नाही, तसंच भाजपला ओबामा यांनी ‘विभाजनवादी’ (Divisive) म्हटलं आहे, हे राहुल गांधी यांच्यावर केलेल्या एका कथित प्रतिकूल टिपणीमुळे ‘आनंदी’ झालेल्या भाजपच्या समर्थकांनीही विसरू नये!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Mon , 23 November 2020

तुम्ही या 23 नेत्यांना पोपट म्हटले आहे ते योग्य असले तरी त्यांच्यावर राहुल गांधी देशभर फिरून मोदी आणि भाजपच्या विरोधात उठवत असलेल्या मोहिमेत हे ‘पोपट’ सहभागी झाले नाहीत हा आरोप करणे योग्य नाही. कारण हे नेते जर सहभागी गत जयराम रमेश यांसारखी झाली असती. कोंग्रेसला पर्यायी सोनिया, प्रियाङ्का व राहुल यांना या नेत्यापैकी कोणीही राहुलच्याबरोबरीने असावा असे वाटत नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......