म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

अविश्वास ठराव मांडून विरोधकांनी स्वत:चेच हसे करून घेतले आहे, असा दावा सत्ताधारी पक्षाने केला आणि तो राहुल गांधी यांच्या ‘फ्लाईंग किस’ने खरा करून दाखवला!

भारतीय राजकारणात आणि जागतिक पातळीवर मुरब्बी राजकारणी म्हणून ठसा उमटवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मौनव्रतभंग’ करण्याचा चंग विरोधी पक्षांनी बांधला आणि रणनीतीत ते पुन्हा उघडे पडले. अविश्वास ठरावादरम्यान आपण विरोधकांचे बारसे जेवलो आहोत, हे दाखवून देत नमोंनी विरोधकांच्या ऐक्याच्या ‘कॉफीन’वर शेवटचे खिळे ठोकले. मोदी सरकारने काँग्रेसची खेळी त्याच्यावरच उलटवली, हे मान्य करावेच लागेल.......

ठरवून विरोधकांची ‘मोट’ बांधण्याची आणि ‘सत्ताप्राप्ती’पर्यंत ती टिकवून ठेवण्याची कसरत, ही ‘अनेक मारक्या म्हशी दूध देईपर्यंत एकाच गोठ्यात सांभाळण्यासारखे’ आहे!

एकीकडे काँग्रेस सत्ता असणारी राज्ये गमावण्याचा पराक्रम करत सुटली आहे, तर दुसरीकडे एखाद्या राज्यातली आपली सत्ता जाण्याची शक्यता गृहीत धरून भाजप एखादे नवे राज्य हाती घेण्याची खेळी करत आलेले आहे. समूहाचे मानसशास्त्र आणि भारतीय राजकीय संस्कृती लक्षात घेता राज्यात स्थानिक पक्षांकडे आलटून-पालटून सत्ता गेली, तरी सर्वसामान्य माणसाला फारसा फरक पडत नाही. हा बदल त्याला रुचतो, पण.......

‘तुम्ही आम्हाला चांगलं म्हणायचं अन आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊन गोजारायचं’ असा सत्ताधाऱ्यांचा शुद्ध ‘राजकीय’ व्यवहार असतो!

सगळेच सत्ताधारी आपल्या बाजूनं बोलणाऱ्यांचं कोडकौतुक करत असतात, त्यांना गोंजारून ठेवतात, त्यासाठी त्यांच्यावर पुरस्कारांचीही बरसात करतात. त्यामुळे असे पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती पात्र आहे का, वगैरे प्रश्न निरर्थक ठरतात. या पुरस्कारांच्या निमित्तानं सत्ताधारी आपल्या अवतीभोवती रेंगाळणारं एक वलयांकित कोंडाळं, आपल्या बऱ्या-वाईटाचा (बहुदा वाईटाचाच) उदो-उदो करणाऱ्या लोकांवर अशी बरसात करत असतात.......

खुद्द न्यायपालिकेनेच आजची ही सगळी अवस्था, अनागोंदीचे वातावरण, राजकीय घटकांची तोंडपाटीलकी अन निलाजरेपणाचे वर्णन ‘राष्ट्रीय आणीबाणी’ असे केले, ते एक बरे झाले!

करोनाची पहिली लाट आपण कशी थोपवून धरली, याच्या कौतुकात सरकार एवढे मग्न झाले की, दुसरी लाट आली असून ती पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे, याचाच विसर पडला असावा. जी गोष्ट जीवरक्षक औषधांची, तीच लसीकरण मोहिमेची. जगाच्या आणि प्रगत देशांच्या तुलनेत देशात राबवण्यात आलेला लस विकसित करण्याचा कार्यक्रम खरोखरीच कौतुकास्पद आहे, मात्र लस विकसित करण्यात दाखवलेली त्वरा लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीत दिसली नाही.......

पूर्वीच्या सरकारच्या चुकांचा पाढा वाचण्यासाठी जनतेने आपल्याला सत्ता दिलेली नाही, इतकी साधी बाबही सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येत नाही?

देशातील बेरोजगारांची संख्या तशी संख्या प्रचंड आहे. पण बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला की, भाजप काँग्रेसकडे (काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी लक्ष दिले नाही) बोट दाखवणार आणि काँग्रेसकडे बोट दाखवले की, ते भाजपला (मोदी सत्तेत आल्यापासूनच बेरोजगारी वाढलीय) दूषणे देणार! बेरोजगारीचा विषय समोर आला की, त्याला कुठले तरी अन्य मुद्दे उपस्थित करत वेगळी  कलाटणी दिली जाते, हा या विषयावरील चर्चांचा सार्वत्रिक अनुभव आहे.......

अन्यथा प्रियांका गांधींची मुलेच अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून समोर यायचे आणि पक्षातील नेते ‘काँग्रेसचे नेतृत्व आता तरुण नेत्यांकडे गेले’ म्हणून गजर करायचे!

मोदींसमोर राहुल गांधी हे पर्याय होऊ शकत नाहीत, हे समजण्यासाठी वा ही बाब सोनिया गांधी यांना कळवण्यासाठी या मंडळींनी एवढा वेळ का घेतला? अर्थात निव्वळ पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व बदलून काँग्रेसला बरे दिवस येणार नाहीत, त्यासाठी पक्षाच्या सर्वच स्तरावर आमूलाग्र परिवर्तन करावे लागणार आहे. संघटनात्मक बदलासोबतच पक्षाला निश्चित असे धोरण, विचारधारा, स्वतंत्र असा जाहीरनामा असे अनेक पैलू स्वीकारावे लागतील.......