ज्यांच्याकडे भरपूर भांडवल आहे, त्यांचा विकास सत्तेतून होत जातोय. पण साधे कामधंदेही नसल्याने जे बेकार आहेत, अशांचे काय? ते ‘रामभक्ती’त इतके मग्न आहेत!

ज्यांच्याकडे भरपूर भांडवल असते, त्यांचा विकास सत्तेतून होत जातो. पण साधे कामधंदेही नसल्याने जे बेकार आहेत, अशांचे काय? पण ते रामभक्तीत इतके मग्न आहेत की, त्यांना स्वतःच्या प्रश्नाचेही भान राहिलेले नाही. देशातील बेकारांचा प्रश्न फार गंभीर आहे असे सातत्याने म्हणतात, पण हेच बेकार युवक या सत्तेचे झेंडे खांद्यावर घेऊन, मिरवणुका काढून, राममंदिर झाल्याच्या आनंदात गल्लोगल्ली पताका लावण्यात आणि फटाके फोडण्यात मग्न आहेत.......

महिला आरक्षण : सत्ताधाऱ्यांना इच्छा नसताना हे विधेयक आणावे लागले, आणि विरोधी पक्षांना नाईलाजाने त्यास मान्यता द्यावी लागली, हा या सर्वांवरच काळाने उगवलेला सूड आहे!

या विधेयकाला मोदींनी ‘नारीशक्ती वंदन’ हे खूपच शक्तिशाली नाव दिले आहे. प्रत्यक्षात त्यात त्यांनी अशा गुंतागुंती करून ठेवल्या आहेत की, हा कायदा २०२४ सालातच काय, पण २०२९पर्यंतसुद्धा अमलात येऊ शकणार नाही. कारण त्यातील तरतुदीनुसार जनगणना होण्याची आवश्यकता आहे. त्या आधारावर लोकसभेच्या व विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्येच्या प्रमाणात पुनर्रचना करणे गरजेचे आहे. त्या नंतरच हा कायदा प्रत्यक्षात अमलात येईल.......

‘आरक्षण’वादी समाजांत कलह निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यमान राज्य सरकार अजून तरी या कोंडीतून मार्ग काढू शकलेलं नाही

मनोज जरांगे यांनी मात्र ‘मराठ्यांना आरक्षण दिल्याचा जीआर निघाल्याशिवाय’ आंदोलन मागे घेणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. निदान मराठवाड्यातल्या मराठ्यांना तरी ‘कुणबीं’चं प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसींच्या आरक्षणात करण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांच्या आरक्षणाचं काय? हे उपोषण केवळ मराठवाड्यातील मराठ्यांसाठीच आहे काय?.......

‘केरल में सामाजिक आंदोलन और दलित साहित्य’ : केरळमधील जातीव्यवस्थेची अमानुष प्रथा आणि ख्रिश्चन, ब्रिटिश आणि कम्युनिस्टांनी त्या विरोधात केलेल्या संघर्षाची गाथा…

जातीयतेचा अविभाज्य भाग असलेली अस्पृश्यता भारतात सर्वत्र असली, तरी केरळमध्ये तिची तीव्रता जरा जास्तच होती. तेथे अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या नजरेससुद्धा पडू नयेत, अशी व्यवस्था जातीयतेने केली होती. रस्त्याने समोरून कोणी स्पृश्य व्यक्ती येत असेल, तर अस्पृश्याने त्याच्या नजरेपासून दूर गेले पाहिजे, असा दंडक होता. कोणत्या जातीने कोणत्या जातीपासून किती दूर गेले पाहिजे, याचेही कडक नियम होते.......

ज्या देशावर साम्राज्यवाद्यांनी आक्रमण केले, ते देश बेचिराख झालेच, पण ज्यांनी आक्रमण केले, त्यांचाही म्हणावा तसा फायदा झाला नाही... तेही खिळखिळे झाले!

नेहमीप्रमाणे याही युद्धाच्या विरोधात जगाच्या विविध देशातील शांतताप्रिय नागरिकांनी मोठमोठी निदर्शने केली आहेत. काही ठिकाणी अजूनही ती चालू आहेत. खुद्द रशियातूनही या युद्धविरोधी भावना व्यक्त होत आहेत. व्हिएतनाम, इराक इत्यादी युद्धाच्या वेळेसही जगातील शांतताप्रिय नागरिकांनी अशी निदर्शने केली होती. पण साम्राज्यवादी देश आपल्या साम्राज्यवादी मनसुब्यासाठी अशा निदर्शनांची फारशी कदर करत नाहीत.......

देशात वाढत असलेली मोठ्या प्रमाणावरील बेकारी हे विद्यार्थ्यांतील आणि युवकांतील असंतोषाचे खरे कारण आहे, याची नोंद आपण घेतली पाहिजे

शेतकरी आंदोलनाप्रमाणे विद्यार्थ्यांचे आंदोलन संघटित नव्हते, ते उत्स्फूर्त आंदोलन होते. आणि कोणतेही उत्स्फूर्त आंदोलन दडपणे शासनाला सोपे जाते. म्हणून काही तात्कालिक निमित्ताने असे उत्स्फूर्त आंदोलन होत असले तरी, त्याची विद्यार्थ्यांनी नोंद घेतली पाहिजे. आपल्या संघटनांचा संघटितपणे उपयोग करून घेऊन किंवा नव्याने संघटनांची एखादी आघाडी बनवून आंदोलनाला संघटित स्वरूप देता येऊ शकते, आणि ते शांततेने चालवता येऊ शकते.......

मार्क्सवादी विचारसरणी सामूहिक हिताशी बांधलेली आहे, त्यात वैयक्तिक हिताचा बळी द्यावा लागतो. त्यामुळे या पक्षात कमावण्यापेक्षा गमावण्याचीच शक्यता जास्त असते. ती समजून घेण्यात कन्हैयाकुमार कमकुवत ठरला

जगभर फॅसिस्टांचा खरा मुकाबला कम्युनिस्टांनीच केलेला आहे. मग तो इटलीचा मुसोलिनी असो किंवा जर्मनीचा हिटलर. तेव्हा भारतातही फॅसिस्टांचा मुकाबला कम्युनिस्टांशिवाय करता येणार नाही. काँग्रेसशिवाय तो करावा असेही नाही. अशा मुकाबल्यात काँग्रेस सहभागी होऊ शकेल, पण ती त्याचे नेतृत्व करू शकत नाही, हे निश्चित. पण ज्यांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आहेत, अशा लोकांसाठी कम्युनिस्ट पक्ष कामाचाच नाही.......