बंगालमध्ये पुन्हा ममतादीदीच, केरळमध्येही पिनराई विजयनच, तामीळनाडूमध्ये मात्र एम. के. स्टॅलिन… आसाम, पाँडिचेरी भाजपकडे…
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • बंगालमध्ये पुन्हा ममतादीदीच, केरळमध्येही पिनराई विजयनच, तामीळनाडूमध्ये मात्र एम. के. स्टॅलिन…
  • Fri , 07 May 2021
  • पडघम देशकारण बंगाल West Bengal ममता बॅनर्जी Mamata Banerjee केरळ Kerala पिनराई विजयन Pinarayi Vijayan तामीळनाडू Tamilnadu एम. के. स्टॅलिन M. K. Stalin

नुकताच पश्चिम बंगालसह उर्वरित चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यात पश्चिम बंगालच्या निकालाला खास महत्त्व आहे. त्याचे कारण असे की, तेथे गेल्या दहा वर्षांपासून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेचीही केली होती. त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सीबीआय, एनआयए, ईडी आणि निवडणूक आयोग स्वायत्त संस्थेलाही कामाला जुंपले होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आसपासच्या राज्यांतील संपूर्ण फौजही त्यांच्या दिमतीला होती.

तशी भाजपने बंगालच्या निवडणुकीची तयारी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सुरू केली होती. कारण त्या निवडणुकीत त्यांना मतांची टक्केवारी बऱ्यापैकी मिळाली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमधल्या ४२ जागांपैकी भाजपचे १८ खासदार निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. परिणामी येत्या विधानसभेच्या (२०२१च्या) निवडणुकीत जर ताकद लावली तर आपण ममतादीदींचा पराभव करू शकू, असा विश्वास त्यांना वाटत होता. पण तो फाजील होता, हे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालावरून त्यांच्या लक्षात आले असावे.

भाजपची निवडणुकीची तयारी म्हणजे काय, तर वर उल्लेख केलेल्या सर्व शासकीय संस्थांमार्फत ज्या राज्यात निवडणुका असतील, त्या राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या निरनिराळ्या मंत्र्यांना, नेत्यांना त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल दाखवून ‘भाजपमध्ये येता की तुरुंगात जाता?’ असा एक प्रकारे दम दिला जातो. तसेच भाजपमध्ये आल्यास तुम्हाला निवडणुकांच्या तिकिटासह पुढील मंत्रिपदे व इतरही लालूच दाखवली जाते. भारतातल्या कुठल्याही राज्यातले सत्ताधारी पक्षातील बहुतांश नेते, मंत्री विविध प्रकरणांत लडबडलेले असतातच. परिणामी आजवर जे कमावले आहे, ते (ईडी किंवा सीबीआय किंवा एनआयए धाडीत) गमावण्यापेक्षा भाजपकडून आणखी काही मिळत असेल ते कमवावे, या विचाराने अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतात. याची कितीतरी उदाहरणे महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत पाहायला मिळाली आहेत. भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीचा हाच अनुभव राहिला आहे.

बंगाल व उर्वरित चार राज्यांतही भाजपने हा प्रयोग केलेला होताच. त्यातून तृणमूल काँग्रेसचे काही दिग्गज समजले गेलेले नेते, ममतादीदींचे डावे-उजवे हात व इतरही आणखी काही सहकारी भाजपच्या गळाला लागले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या प्रकारातून होते काय की, सुरुवातीपासून निवडणूक प्रचारामध्ये भाजपचा एक प्रकारे दबदबा तयार होतो. सत्ताधारी पक्ष बचावात्मक भूमिकेत जातो आणि याचा जनतेवरही काही प्रमाणात परिणाम होतो. पश्चिम बंगालमध्येही भाजपने हा प्रयोग केला होता, पण त्यांच्या या डावपेचांना ममतादीदींनी धुळीस मिळवले आहे.

या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालचे थोर साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते, बंगाली अस्मितेचे प्रतीक रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी दाढी व डोक्यावरील केसही वाढवले होते. आपण टागोरांप्रमाणे दिसू यासाठी मोदींनी आटोकाट प्रयत्न केला होता. महाराष्ट्रातही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे दिसण्याचा आणि त्याप्रमाणे आपल्या बगलबच्च्यांकडून प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता. तसाच प्रयत्न त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केला. पण तेथील जनतेने त्याला फारशी दाद दिली नाही. आता तेथील निवडणुका संपल्या आहेत, ममता बॅनर्जी यांनीही आपल्या पायाचे प्लॅस्टर काढून टाकले आहे, त्यामुळे मोदींनीसुद्धा आपली दाढी-कटिंग करायला हरकत नाही!

इतर चार राज्यांची निवडणूक तीन-चार टप्प्यांत आटोपली, पण बंगालची मात्र आठ टप्प्यांत पार पडली. इतके टप्पे का? देशात करोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असताना आणि शेवटचे तीन टप्पे एकाच टप्प्यात उरकण्याची ममता बॅनर्जी यांनी मागणी केलेली असतानाही, त्याकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले. कारण हे टप्पे अशा प्रकारे करण्यात आले होते की, एका भागातला मतदान संपले की, दुसर्‍या भागातला प्रचार चालू राहील आणि पंतप्रधानांना भाषण करण्याच्या जास्त संधी मिळतील. उदाहरणार्थ या निवडणूक टप्प्यांदरम्यान पंतप्रधानांनी बंगालला लागूनच असलेल्या बांगलादेशचा दौरा केला आणि तिथे मतुआ नावाच्या एका विशिष्ट मागास जातीच्या मंदिराला भेट दिली. जेणेकरून बंगालमधील दलित समूहांच्या मतदानावर प्रभाव पडावा. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

आत्मचरित्र हा वाचकप्रिय वाङ्मय प्रकार आहे. I-Transform आयोजित आमच्या ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळेत सहभागी व्हा!

आपण सगळे मिळून चर्चा करूया. लेखन सगळ्यांना जमेल असं नाही. पण या वाङ्मय प्रकाराविषयी सजग होऊया. खूप आत्मचरित्रांविषयी ऐका. कदाचित तुमच्या आयुष्यातल्या समस्यांची उत्तरं सापडून जातील. कदाचित तुमच्या लेखनाचा मार्ग सापडेल.

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

भाजपकडे निवडणुकीसाठी प्रचंड साधनसामग्री होती, पण बंगालच्या जनतेच्या हिताचे कोणतेच मुद्दे नव्हते. या पक्षाच्या नेत्यांनी ‘सोनार बांगला’ वगैरे म्हणून पाहिले, पण त्याचा उपयोग झाला नाही. कारण भाजपशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांचे काय हाल आहेत, हे बंगालच्या जनतेला असणार! सुरुवातीपासूनच नेहमीचा नामी मार्ग म्हणून हिंदू-मुस्लीम अशी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. ‘जय श्रीराम’ ही घोषणा देण्याचा आणि ती तेथील जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला गेला. ‘ ‘जय श्रीराम’ आम्ही इथे म्हणू नये, तर काय पाकिस्तानात म्हणावे?’ असे म्हणून पाकिस्तानलाही निवडणुकीत खेचण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पश्‍चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात उतरवले गेले. त्यांच्याकडेही सांगण्यासारखे काहीच नव्हते. म्हणून मग त्यांनी पश्चिम बंगालच्या महिलांना सुरक्षिततेचे आश्वासन देण्यास सुरुवात केली. पश्चिम बंगालमधील महिला सुरक्षित नाहीत, असे त्यांनी त्यांच्या उत्तर प्रदेशच्या अनुभवावरून गृहीत धरले. पण अनेक शिक्षित, नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलाखती ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या पत्रकारांनी घेतल्या, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बंगालमध्ये आमच्या सुरक्षिततेला कसलाही धोका नाही.

ममतादीदींनी बंगाली जनतेच्या अस्मितेला खास महत्त्व दिले. बाहेरच्यांना आपल्यावर राज्य करण्याचा अधिकार नाही, तो फक्त बंगाली जनतेलाच आहे, ही बाब जनतेच्या मनावर बिंबवण्यात त्या यशस्वी झाल्या. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण, हे सांगण्यासाठी भाजपकडे कोणीच नव्हते, तर ममतादीदी या स्वतः ‘बंगाल की बेटी’ होत्या!

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध प्रादेशिक, राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी, मुख्यमंत्र्यांनी, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ममतादीदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांनीही (ममतादीदींच्या प्रचाराला म्हणून नव्हे पण) भाजप हा शेतकरीविरोधी पक्ष आहे, तो कामगार-कष्टकरी जनतेच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजपला मते देऊ नका, हे सांगण्यासाठी काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्याचाही थोडाफार परिणाम झाला असावा.

बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच झाली. सुरुवातीपासून या निवडणुकीचे तसेच चित्र होते. डाव्या आघाडीचे उमेदवारही या निवडणुकीत उभे होते, पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर या निवडणुकीत डाव्या आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. गेल्या १० वर्षांत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्यात उतरत्या क्रमाने डाव्यांचे उमेदवार निवडून येत होते. पण आता तर तो उतरता क्रमही बंद झाल्यासारखी स्थिती आहे. दुसरीकडे मात्र भाजपचे ७७ आमदार निवडून आल्याने त्याने विरोधी पक्ष म्हणून स्थान बळकावले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या निवडणुकीमध्ये ‘भाकपा माले लिब्रेशन’ (Communist Party of India (Marxist–Leninist) Liberation) यांनीही स्वतंत्रपणाने आपले १२ उमेदवार उभे केले होते. अर्थात बंगालमध्ये त्यांची बिहारसारखी ताकद नसल्याने त्यांचाही एकदेखील उमेदवार निवडून आला नाही. इतरत्र त्यांनी डाव्या आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. पण त्यांनी डाव्या आघाडीत सामील न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढवून भाजप व तृणमूल काँग्रेस विरुद्ध आपली भूमिका या निवडणुकीत मांडली. पूर्वी त्यांच्या पक्षात असलेला एक उमेदवार या वेळी तृणमूल काँग्रेसमध्ये जाऊन निवडून आला. पण त्याच्या निवडून येण्यात लिब्रेशनचा काहीही संबंध नाही, असे दिसते.

केरळमध्ये मात्र मुख्यमंत्री पिनराई विजयन, त्यांचे सरकार व त्यांच्या पक्षाने पूरस्थिती, करोनाची पहिली लाट व आताची, दुसरी लाट या तीन आपत्तींमध्ये अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही तेथील जनतेने पूर्वीची परंपरा बाजूला सारून डाव्या आघाडीलाच पसंती दिली. डाव्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे, असे म्हणावे लागेल. भाजपने तेथे शबरीमाला मंदिर प्रकरणापासून शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता, पण याही वेळेस भाजपला तिथे आपले खातेही उघडता आलेले नाही. पूर्वी त्यांचा एक आमदार होता, तीही जागा भाजप राखू शकला नाही. या वेळी काँग्रेसनेही बऱ्यापैकी जोर लावला होता, पण त्याचीही डाळ शिजली नाही.  

तामिळनाडूमध्ये जो सत्ताबदल झाला, तो मात्र स्वागतार्ह आहे. तेथे पूर्वी अण्णा द्रमुकचे सरकार होते. केंद्रातील भाजप सरकारचे जणू काही पिट्टू सरकार असल्यासारखेच त्याचे वर्तन होते. तेथील जनतेने अण्णा द्रमुकला बाजूला सारून दिवंगत द्रमुक नेते करुणानानिधी यांचे चिरंजीव स्टॅलिनला बहुमताने निवडून दिले आहे. त्यांच्याशी आघाडी करून तेथील लढाऊ दलित पक्ष-संघटनांचे चार आमदार या निवडणुकीत निवडून आले, हीसुद्धा एक चांगलीच घटना आहे. तेथे भाजपचे फक्त चार आमदार निवडून आले आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आसाम आणि पाँडिचरीमध्ये पूर्वीचेच भाजपचे सरकार पुन्हा निवडून आले आहे. पाँडिचेरीमध्ये मध्यंतरी काँग्रेसचे सरकार होते, पण आपल्या कट-कारस्थानी स्वभावानुसार केंद्रातल्या भाजप सरकारने ते पाडण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत त्यात त्यांना यश आले.

या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये सर्वांत जास्त दयनीय स्थिती जर कोणाची झाली असेल, तर ती काँग्रेसची. एकेकाळी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केलेला, केंद्रातही आणि विविध राज्यांत बराच काळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष अशा गलितगात्र अवस्थेत यावा, ही काँग्रेस प्रेमींसाठी भलतीच वाईट गोष्ट आहे.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......