(अ‍ॅड. आंबेडकरांना विरोध करून अथवा पाठिंबा न देऊन) कम्युनिस्टांनी पुन्हा विरोधकांच्या हाती कोलीत देऊ नये!
पडघम - राज्यकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर, नरसय्या आडम, आडम मास्तर आणि सुशीलकुमार शिंदे
  • Tue , 26 March 2019
  • पडघम राज्यकारण अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar नरसय्या आडम Narsayya Adam आडम मास्तर Adam Master सुशीलकुमार शिंदे SushilKumar Shinde

बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे येत्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. २४ मार्च रोजी त्यांनी रितसर आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. अ‍ॅड. आंबेडकरांच्या या खेळीमुळे सोलापुरातील काँग्रेसचे पारंपरिक उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत भर पडणार म्हणून अ‍ॅड. आंबेडकरांनी निदान सोलापुरातून फॉर्म भरू नये, असे प्रयत्न काँग्रेसच्या वतीने चालू होते. पण त्याला यश आल्याचे दिसत नाही. तेव्हा काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांची काय अडचण व्हायची असेल ती होईल, पण त्यांच्याहीपेक्षा जास्त अडचण डाव्यांची आणि त्यातल्या त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची होणार आहे असे दिसते.

कारण सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर आतापर्यंत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत खरी लढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व आडम मास्तर यांच्यातच झाली होती. त्यात ते पराभूत झाले असले तरी ते दुसऱ्याच क्रमांकावर होते. २०१४ च्या निवडणुकीत मात्र ते सरळ चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. असे असले तरी त्यांचे त्या भागात बऱ्यापैकी काम आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत विचारमंचावर जाऊन तेथे त्यांनी त्यांच्या गृहप्रकल्पाच्या संदर्भात मोदी व फडणवीस यांची स्तुती केली होती. त्या कारणाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना पक्षाच्या केंद्रीय समितीतून निलंबित केले आहे. असे असले तरी ते त्या पक्षाचे राज्य सेक्रेटरी आहेत. तेव्हा त्यांनी व त्यांच्या पक्षाने अ‍ॅड. आंबेडकर यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे.

अन्यथा ‘अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा सेना-भाजप युतीला होईल. वंचित बहुजन आघाडी करताना त्यांनी आम्हाला विचारले नाही, एमआयएमशी आघाडी केली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आमचा उमेदवार असताना बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार उभा केला. तेथे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही,’ वगैरे कोणत्याही निमित्ताने विरोध केल्यास अथवा पाठिंबा न दिल्यास कम्युनिस्ट विरोधकांच्या हाती पुन्हा एकदा कोलित दिल्यासारखेच होईल. आणि केवळ ‘कोलिता’च्या धाकामुळे नव्हे तर बहुजन वंचित आघाडीकडे असलेला भटक्या विमुक्त, दलित, आदिवासी, अठरापगड जातीतील बहुजन समुदाय केवळ वर्गदृष्ट्या नव्हे तर जातदृष्ट्याही परंपरेने शोषित आहे, तर मुस्लिम समुदाय सद्यस्थितीत धार्मिकदृष्ट्या पीडित आहे. फारसे परिचित नसलेले, आर्थिक बाबतीत कमकुवत असलेले उमेदवार त्यांनी दिले आहेत. विरोधी आघाडीतील शिक्षणसम्राट, साखरसम्राट यांसारख्या निखळ शोषकांपैकी ते नाहीत. त्यांच्यात घराणेशाही निर्माण व्हायला आणखी काही पिढ्या जाव्या लागतील.

तेव्हा पुन्हा एकदा ‘कोलित’ यासाठी की, १९५२ सालच्या स्वतंत्र भारतातील पहिल्याच निवडणुकीमध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे होते. त्यांच्या विरोधात बराच काळ त्यांचेच स्वीय सहाय्यक राहिलेले नारायण सदोबा काजरोळकर यांना काँग्रेस पक्षाने उभे केले होते. ते केवळ दलित नव्हते तर दलितांतीलही ‘महार’ समाजाचे होते. डॉ. आंबेडकरांनी त्यावेळचे समाजवादी नेते साथी अशोक मेहता यांच्याशी आघाडी केली होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांच्या विरोधात जाहीर सभा घेऊन काजरोळकरांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत काजरोळकरांनी डॉ. आंबेडकरांचा १५,००० मतांनी पराभव केला.

त्यावेळी (एकच असलेल्या) कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. डांगे यांनी डॉ. आंबेडकरांना दुसऱ्या पसंतीची मते देऊ नका असे सांगून ती मते कुजवली व म्हणूनच डॉ. आंबेडकरांचा पराभव झाला असा कम्युनिस्टविरोधी प्रचार तेव्हापासून सतत सुरू आहे. कॉ. डांगे यांनी मते कुजवून गंभीर चूक केली हे सत्य आहे. पण त्यापेक्षाही गंभीर चुक करणारा, सरळसरळ डॉ. आंबेडकरांच्या विरोधात त्यांच्या स्वीय सहाय्यकाला फोडून काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, त्यांचा जाहीर प्रचार केला, १९७० साली काँग्रेस सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला.

त्यानंतर १९५४ साली भंडारा येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसनेच बोरकर नावाच्या एका दलित (महार) उमेदवाराला उभे केले आणि त्याही वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला. या पराभवाशी कम्युनिस्टांचा काहीही संबंध नव्हता. असे असूनही काँग्रेस विरोधात, पंडित नेहरू विरोधात, दलितच असलेल्या बोरकर विरोधात, दलित व दलितेतरांतील तथाकथित विचारवंत तेवढ्याच तीव्रतेने बोलत वा लिहीत नाहीत. त्याची कारणे काय आहेत, तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तोही कधीतरी हातावेगळा करूच.

तूर्त सोलापूर येथे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना विरोध करून कम्युनिस्टांनी पुन्हा एकदा अशा विरोधकांच्या हाती कोलीत देऊ नये इतकेच.

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......