भाजपप्रमाणेच काँग्रेसचीही संघटनात्मक स्थिती फारशी चांगली नाही?
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • भाजप आणि काँग्रेसचे ध्वज
  • Mon , 05 July 2021
  • पडघम देशकारण भाजप ‌BJP काँग्रेस Congress नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah राहुल गांधी Rahul Gandhi प्रियंका गांधी Priyanka Gandhi

पश्चिम बंगालचा निवडणूक प्रचार थांबल्यामुळे मोदी-शहा जसे दिल्लीला परत आले, तसेच योगी आदित्यनाथ लखनौला परतले. तोपर्यंत करोनाच्या दुसऱ्या लाटेने आपला कहर दाखवणे सुरू केले होते. दरम्यानच्या काळात हरिद्वारचा कुंभमेळाही उरकण्यात आला. तेथून परतणाऱ्यांनी करोना व्हायरस आपापल्या गावी नेऊन त्याचा प्रसार केला. उत्तर प्रदेशातील पंचायतीच्या निवडणुका संपल्या. त्याचे आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकाचे निकाल लागले. पंचायत निवडणूक कौल योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातच गेला, तर पश्चिम बंगालमधील निकाल मोदी-शहा यांच्याविरोधात लागले. पण यामुळे करोनाचा कहर वाढण्यास आणखीच मदत झाली. कारण त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले.

असाच जर निकाल पुढील वर्षी येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा लागला, तर २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा काय परिणाम होईल, यादी धास्ती आता मोदी-शहा यांना वाटू लागली आहे. त्यामुळे करोनाची साथ हाताळण्यातील गलथानपणाची व झालेल्या राजकीय पराभवाची जबाबदारी कोणावर तरी टाकणे भागच होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

करोनाने देशात सगळ्यात जास्त कहर उत्तर प्रदेशमध्ये माजवला होता. तेथील गंगा-यमुना या नद्यांच्या प्रवाहात करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची प्रेते तरंगत होती. तसेच या नद्यांच्या पात्रात अनेकांना दफन करावे लागले. त्यामुळे बराच गहजबही माजला होता. म्हणून याची जबाबदारी योगी आदित्यनाथ यांच्यावर टाकून (कारण एरवीही मोदी-शहा व योगी यांच्यात फारसं सख्य नाही, असं बोललं जातं!) त्यांना त्रस्त करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवायला आणि त्यांना आळा घालायला सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांचे आवडते माजी उच्चपदस्थ नोकरशहा अरविंद शर्मा यांना उत्तर प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री करण्याचा विचार होता. पण योगी आदित्यनाथ यांनी तो यशस्वी होऊ दिला नाही. मग त्यांना निदान मुख्यपदावर तरी घेण्यात यावे, असा प्रयत्न केला गेला. पण तोही योगी आदित्यनाथ यांनी यशस्वी होऊ दिला नाही. योगी आदित्यनाथ यांनी शर्मा यांना साधी भेटसुद्धा नाकारली. शेवटी त्यांना उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष पद देण्यात आले.

या घडामोडीनंतर योगी आदित्यनाथ यांना दिल्लीला बोलावण्यात आले. त्यांनी मोदी-शहा यांच्या भेटी घेतल्या आणि लखनौला परत आले आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या हालचाली सुरू ठेवल्या. त्याच वेळेस मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे पण बाजूला फेकले गेलेले केशव प्रसाद मौर्य यांची - ज्यांना या काळात अजिबात महत्त्व दिलेले नाही - योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने घरी जाऊन भेट घेतली. तेथे त्यांच्यासह छायाचित्र काढून, ते संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध करून एक प्रकारे संतुलन साधण्याचा प्रयत्न केला.

२०२२मधील उत्तर प्रदेश विधानसभा व २०२४मधील लोकसभा निवडणुकीत जर आपल्याला सावरायचे असेल, तर काहीतरी हालचाली केल्या पाहिजेत, याची जाणीव संघालासुद्धा झाली असावी. अर्थात ती मोदी-शहा यांच्यपेक्षा वेगळ्या पद्धतीने.

संघाचे एक महत्त्वाचे नेते श्री होसबळे यांनी दरम्यानच्या काळात त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पक्षांतर्गत वादात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपला तळ काही काळ लखनौमध्येच ठेवला. आता तर विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत आपण लखनौमध्येच राहू असेही त्यांनी जाहीर केले आहे. मोदी-शहा व योगी आदित्यनाथ यांच्यातील विसंवाद आणखी वाढून त्याचे वेगळेच काही दुष्परिणाम होऊ नयेत, याची काळजी घेण्याचा संघ आटोकाट प्रयत्न करत आहे.

या सर्व घडामोडींवरून एवढे मात्र निश्चित होते की, भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे, मोदी-शहा यांचा हुकूम सर्वत्र चालतो, असे जे चित्र पूर्वी होते, तसे आता अजिबात राहिलेले नाही. संघसुद्धा त्यांच्या मताप्रमाणे सर्व काही करेल, अशी स्थिती उरलेली नाही. तरीही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली होईल, तेच तिथले स्टार प्रचारक राहतील आणि पुढील मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार म्हणूनही त्यांचेच नाव राहील.

उत्तर प्रदेशमध्ये जशी भाजपअंतर्गत स्थिती आहे, तशीच बिहारमध्ये जेडीयू व भाजप यांच्या आघाडीमध्येही निर्माण झाली आहे. तेथील विधानसभेच्या निवडणुकीत एकप्रकारे भाजपचे ‘टूल’ म्हणून काम केलेले चिराग पासवान यांची मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अत्यंत वाईट स्थिती करून टाकली आहे. लोक जनशक्ती पार्टीमध्ये फूट पडून, पासवान यांना वेगळे काढून, उरलेले पाचही खासदार वेगळे झाले आहेत. त्यापैकी चिराग पासवानचे काका पशुपति पारस यांना नितीशकुमार यांच्या दबावामुळे केंद्रात मंत्रिपदावर घेण्याच्या हालचाली चालू आहेत. एक तर ते जेडीयूमध्ये सामील होतील किंवा मग लोकसभेत आपला स्वतंत्र गट बनवू शकतील. आता चिराग पासवान विरोधी आघाडीतील तेजस्वी यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

तिकडे उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत व विद्यमान मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांच्यातील संघर्षही बऱ्यापैकी आकार घेऊ लागला आहे, असे दिसते. विद्यमान मुख्यमंत्री श्री तीरथ सिंह रावत यांना तेथील विधानसभेचे आमदार होणे आवश्यक होते. पण पुढील वर्षी तिथे निवडणूक असल्यामुळे आता पोटनिवडणूक होणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आले. त्याचीच वाट माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत पाहत होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या नऊ आमदारांनी केली आहे. भाजपचे आमदार सुदीप रॉय बर्मन यांच्या नेतृत्वाखाली या ९ आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारले असून हे सर्व आमदार दिल्लीत भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा व अन्य वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी धडकले आहेत. ६० सदस्य असलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजपचे ३६ आमदार असून त्यापैकी ९ आमदारांनी बंड पुकारले आहे. त्यामुळे सरकार संकटात येऊ शकते. बंडखोरी करणारे चौधरी व बर्मन हे दोन आमदार २०१७मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले आहेत.

याशिवाय सत्ताधारी आघाडीत असलेल्या एका पक्षाच्या काही आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. त्यामुळे सरकार पडेल असे नाही, पण कुरबुरी वाढत आहेत एवढे मात्र नक्की.

काँग्रेसचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. पंजाब व राजस्थान या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तिथे पक्षांतर्गत बऱ्याच कुरुबुरी चालू आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात नवज्योत सिंग सिद्धू यांनी बंड पुकारले आहे. तिथेही २०२२मध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. अशा वेळी हे बंड काँग्रेससाठी धोक्याचे ठरू शकते. काँग्रेस ‘हायकमांड’ प्रियंका व राहुल गांधी यांनी लक्ष घालूनही ते यातून मार्ग काढू शकले नाहीत. किंबहुना त्यांचीच या बंडाला फूस आहे, असे म्हटले जाते. खरे म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू यांना तसा (माजी क्रिकेट खेळाडू याव्यतिरिक्त) फारसा जनाधार नाही. मात्र ते मुख्यमंत्र्यांना त्रस्त करू शकतात एवढं नक्की. त्यामुळे त्यांनी राज्यातील विविध समाजघटकांच्या बैठका घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.

तर राजस्थानमध्ये विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करून काहूर माजवणे सुरू केले आहे. मागच्या वर्षीही त्यांनी तसे करून पाहिले होते. पण त्या वेळी त्यांची डाळ शिजली नाही. आत्ता काँग्रेस ‘हायकमांड’ने गेहलोत यांना सचिन पायलट यांच्या मागण्या मान्य करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. पण त्या त्यांनी ऐकल्या नाहीत आणि पायलटही आता फारसे काही करू शकणार नाहीत, अशा रीतीने हे बंड जागच्या जागीच जिरण्याची शक्‍यता आहे, अशी स्थिती दिसतेय.

विविध राज्यांत कुरबुरी सुरू असतानाच मधल्या काळात गुलाब नबी आजाद, कपिल सिब्बल यांसारख्या २७ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाविरोधातच बंडखोरी केली होती. काश्मीरमध्ये याबाबतच्या बैठका झाल्या होत्या. नंतरच्या काळात या २७ नेत्यांपैकी काहींनी स्वतःला अलग करून घेतले असले तरी केंद्रीय नेतृत्वाबद्दल काँग्रेसमध्ये मोठा असंतोष आहे, हे नक्की.

थोडक्यात भाजपप्रमाणेच काँग्रेसचीही संघटनात्मक स्थिती फारशी चांगली नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अर्थात अशा बाबी अनेक पक्षांत सातत्यानं चालूच असतात. विशेष बाब एवढीच की, २०१४नंतर मोदी- शहा ‘अजिंक्य’ वाटत होते, आता ते तसे राहिलेले नाहीत. मुख्यतः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे व करोनाने घातलेल्या धुमाकुळामुळे हे दोन्ही नेते एकप्रकारे हतबल झाले आहेत.

चिंतेची बाब एवढीच आहे की, भाजप व काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांच्या विद्यमान स्थितीचा देशातील कामगार-कष्टकरी-श्रमिक वर्ग राजकीय फायदा करून घेण्याच्या स्थितीत नाही. कारण संघटनात्मकदृष्ट्या तो फारसा बळकट नाही. म्हणून याचा फायदा विविध राज्यांतील लहान-मोठे पक्ष घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......