१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन, भारत-पाक फाळणी आणि १४ ऑगस्ट
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, १५ ऑगस्ट, तिरंगा ध्वज आणि पाकिस्तानचा ध्वज
  • Mon , 23 August 2021
  • पडघम देशकारण १५ ऑगस्ट 15 August स्वातंत्र्य दिन Independence Day स्वातंत्र्य Liberty भारत India पाकिस्तान Pakistan नरेंद्र मोदी Narendra Modi

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथून पुढे ‘१४ ऑगस्ट’ ‘फाळणीच्या भीतीदायक आठवणींचा दिवस’ (‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’) म्हणून साजरा करण्यात येईल, असे जाहीर केले. लगोलग सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने तशी अधिसूचना काढून त्यात म्हटले - “स्वातंत्र्य दिन हा कोणत्याही राष्ट्रासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असतो. तो भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तथापि, स्वातंत्र्याचा गोडवा घेऊन फाळणीचे वार आले. नव्याने स्वतंत्र झालेला भारत फाळणीच्या हिंसक वेदनांनी जन्माला आला. त्याने लाखो भारतीयांवर कायमस्वरूपी जखमा करून सोडल्या आहेत. म्हणून फाळणीची वेदना आणि हिंसा देशाच्या स्मरणात खोलवर कोरलेली आहे. अशा परिस्थितीत, देशाने जगातील सर्वांत मोठी लोकशाही आणि तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी प्रगती करत असताना विभाजनाची वेदना कधीही विसरता कामा नये. आपल्या देशाचा स्वातंत्र्यसोहळा साजरा करताना एक कृतज्ञ राष्ट्र म्हणून, आमच्या प्रिय मातृभूमीच्या मुला-मुलींना आम्ही सलाम करतो. कारण त्यांना हिंसाचाराच्या उन्मादात आपले बलिदान द्यावे लागले.” 

खरं म्हणजे या वेळचा १५ ऑगस्ट हा आपला ७५वा स्वातंत्र्य दिन होता. गेल्या ७४ वर्षांत आपल्या देशांत विविध सरकारे व पंतप्रधान होऊन गेले. खुद्द भाजपचे अटल बिहारी वाजपेयीसुद्धा काही वर्षे पंतप्रधान होते. या सर्व पक्षांना आणि पंतप्रधानांना फाळणीची माहिती होती. तमाम भारतीय नागरिकांनाही ती आहे.

परंतु १४ ऑगस्ट हा दिवस पाकिस्तान आपला ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करत असतो, हे बहुतेक भारतीयांना माहीत असण्याचे कारण नाही. मात्र नेमका तोच दिवस ‘फाळणीचा स्मृतिदिन’ म्हणून आपल्या पंतप्रधानांना जाहीर करावासा वाटला, यातलं इंगित समजून घ्यायला हवं.

मोगलांनी म्हणजे मुस्लिमांनीच बांधलेल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा फडकावून पंतप्रधान देशाला संबोधित करतात. ज्या स्वातंत्र्यसंग्रामामुळे स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो, त्यात भाजपचा आणि त्याची मातृ-संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काडीचाही संबंध नाही. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनतेला संबोधित करणे, पंतप्रधानांच्या मनाला कुठेतरी बोचत असले पाहिजे. 

त्यातून त्यांना त्यांच्या मातृ-संघटनेचा फाळणीशी असलेला जैव संबंध दिसून आला असावा. आपल्या देशाला स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट या एका दिवसात मिळाले नाही, तशी देशाची फाळणीही केवळ १४ ऑगस्ट या एका दिवसातच झालेली नाही. या दोन्ही घटनांची प्रक्रिया कित्येक वर्षांपासून चालू होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास इथे सांगण्याचे जसे कारण नाही, तसेच हिंदू महासभेचे वि. दा. सावरकर यांच्या द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त, त्याला बॅरिस्टर जीना व त्यांच्या मुस्लीम लीगने उचलून धरणे आणि त्या सिद्धान्ताद्वारे पाकिस्तानची मागणी करणे व ती पूर्ण होणे, यासाठीही बराच काळ जावा लागला. शेवटी देशाची फाळणी झाली. पण या फाळणीचे खापर स्वातंत्र्यलढ्यात नेतृत्वस्थानी असलेल्या महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यावर फोडले गेले.

त्यामुळे भारतीयांचा स्वातंत्र्यलढा विस्मृतीत घालवण्यासाठी किंवा निदान त्याला बट्टा लावण्यासाठी फाळणीमध्ये घडलेल्या दुःखद घटनांना उजाळा देणे, त्यात झालेल्या जिवित व मालमत्तेच्या हानीला अधोरेखित करणे, हा तर मागे हेतू नाही ना?

१५ ऑगस्टशी भाजप व संघपरिवाराचा काहीही संबंध नसला फाळणीशी, त्या वेळी झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीशी, त्यात झालेल्या जीवित मालमत्तेच्या हानीशी आमचा संबंध आहे, हेच या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ते दृष्टोत्पत्तीस आणून देऊ इच्छितात की काय? पण फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीमध्ये केवळ हिंदूंचीच जीवित व मालमत्तेची हानी झाली का? नाही, तर मुस्लिमांचीसुद्धा झालेली आहे. 

हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करण्यासाठी आणखी एक मुद्दा समोर आणणे हाच यामागचा हेतू दिसतो आहे. २०२२मध्ये उत्तर प्रदेशच्या व २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशा परिस्थितीत फाळणीच्या निमित्ताने झालेल्या जखमेवर मीठ चोळून हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल.

दुसर्‍या महायुद्धानंतर जगभरातील अनेक देशात स्वातंत्र्य व मुक्ती लढ्यांना जोर चढला. ते लढे पुढे यशस्वीही झाले. पण हे यश पदरात पाडून घेत असताना फाळणीसारख्या काही दु:खद घटनाही घडल्या. या दुःखद घटनांना ज्या त्या देशातील अंतर्गत परिस्थिती, ज्या त्या देशातील नेतृत्वस्थानी असलेल्या व नसलेल्या विविध संघटनांच्या नेत्यांच्या हालचाली, त्या वेळी लयास जात असलेला ब्रिटन हा साम्राज्यवादी देश व उदयोन्मुख साम्राज्यवादी अमेरिका या शक्तींचाही मोठा सहभाग, अशी विविध कारणे होती.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

फाळणी काय फक्त भारत-पाकिस्तान यांचीच झाली आहे का? नाही. जगभरातल्या विविध देशांत अशा फाळण्या साम्राज्यवादी शक्तींनी केलेल्या आहेत. कोरियाची उत्तर व दक्षिण अशी फाळणी झाली. जर्मनीची पूर्व व पश्चिम अशी फाळणी झाली. उत्तर व्हिएतनाम व दक्षिण व्हिएतनाम अशी फाळणी झाली. साम्राज्यवादी देशांनी वासाहतिक देशांच्या नुसत्या फाळण्याच नव्हे, तर इस्त्राईलसारखी काही नवीन राष्ट्रेही निर्माण केली.

साम्राज्यवादी देशांच्या विघटनकारी कारवायांमुळे कितीतरी देशांना अनेक जीवघेण्या, भयंकर अशा युद्धांच्या रूपात त्याचे भोग भोगावे लागले आहेत. अशा युद्धग्रस्त देशांना आपली संहारक शस्रास्त्रे विकून गडगंज नफा या देशांनी कमावला आहे. या सर्वांतून साम्राज्यवादी देशांचाच फायदा होत आहे. हे विभागलेले देश विभाजितच रहावेत, असाही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असतो. उत्तर व्हिएतनाम-दक्षिण व्हिएतनाम एकत्र व्हावे, यासाठी तेथील जनतेने केलेल्या प्रयत्नाला कशा अमेरिकेने उधळून लावण्याचा प्रयत्न केला, हे जगजाहीर आहे. शेवटी अमेरिकन सैन्याला आपला गाशा गुंडाळून (आताच्या अफगाणिस्तानप्रमाणेच) माघार घ्यावी लागली, हा इतिहास सर्वज्ञात आहे.

तेव्हा साम्राज्यवादी देश केवळ फाळणी करून थांबत नाहीत तर झालेली फाळणी अव्याहत टिकावी असाही त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो, हेही विसरून चालणार नाही.

अशा साम्राज्यवादी देशांशी ‘अखंड भारत’वाल्या भाजप सरकारचे संबंध कसे असावेत? तर स्वतःला जगाचा दादा समजणाऱ्या अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी देशाशी आणि त्यांनी निर्माण केलेल्या इस्त्राईलसारख्या अरब देशांवर कायमस्वरूपी युद्ध लादणाऱ्या देशाशी आपल्या केंद्र सरकारचे सध्या अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......