मार्क्सवादी विचारसरणी सामूहिक हिताशी बांधलेली आहे, त्यात वैयक्तिक हिताचा बळी द्यावा लागतो. त्यामुळे या पक्षात कमावण्यापेक्षा गमावण्याचीच शक्यता जास्त असते. ती समजून घेण्यात कन्हैयाकुमार कमकुवत ठरला
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • राहुल गांधी आणि कन्हैयाकुमार
  • Thu , 30 September 2021
  • पडघम देशकारण कन्हैयाकुमार Kanhaiya Kumar जिग्नेश मेवानी Jignesh Mevani भगतसिंग Bhagat Singh काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi

शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी, २८ सप्टेंबर रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते कॉम्रेड कन्हैयाकुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वसाधारणपणे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असतानाच्या ज्या बातम्या आपण वाचतो, त्यातून आपणाला अशी सवय झाली आहे की, अमुक एक मोठा पुढारी ‘आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह’ अमुक एका पक्षात प्रवेश करत आहे. त्याचे जाहीरपणे प्रवेश सोहळेही आपण पाहिले आहेत. कन्हैयाकुमार त्याच्या लहानपणापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. शिवाय एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेत व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीत सहभागी असूनही या पक्षातून त्याला एकट्यालाच काँग्रेसमध्ये जावे लागले. हे त्याचे संघटनात्मक अपयशच आहे की, काय किंवा कसे, याचा त्याने विचार करावा.

त्यामुळेच कदाचित काँग्रेसने त्याच्यासोबत काँग्रेसच्याच पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आलेला गुजरातमधील दलित आमदार जिग्नेश मेवाणीलाही घेतले. उमेदवारीच्या काळापासूनच मेवानी मनाने काँग्रेसवासी झालेला आहे. कायदेशीर तांत्रिक अडचणीमुळे सध्याची आमदारकी जाऊ नये, यासाठी तनाने तो अजून काँग्रेसमध्ये गेलेला नाही इतकंच. पण पुढील निवडणूक तो काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

खरे म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही कारणाने पक्ष सोडावा लागला तरी, सर्वसाधारणपणे उजव्या पक्षात तर सोडाच, पण काँग्रेसमध्येही प्रवेश केल्याच्या फारशा घटना नाहीत. वाटल्यास ते त्याच पक्षात निष्क्रिय होऊन राहतील, पण इतर पक्षात प्रवेश करत नाहीत, असा काही अपवाद वगळता आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणूनच कदाचित कन्हैयाकुमारच्या काँग्रेस प्रवेशावर समाजमाध्यमांतून व विविध परिवर्तनवादी कार्यकर्त्यांतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बऱ्याच जणांनी कन्हैयाकुमारच्या कृतीचे स्वागत केले आहे. मुख्यत: समाजमाध्यमांतील संघ-भाजपविरोधी पत्रकारांनी स्वागत केले आहे. तसेच काहींनी आपली नापसंतीही व्यक्त केली आहे. या घटनेमुळे भाजपवाल्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. कारण ठिकठिकाणी त्यांचा जो काही थोडाफार मुकाबला होतो, तो भारतीय कम्युनिस्ट पक्षापेक्षा काँग्रेसशीच होतो. त्यामुळे त्यांना काँग्रेसची ताकद वाढणे, ही पसंत पडणारी गोष्ट नाही, हे उघड आहे. पण कन्हैयाकुमारच्या प्रवेशाने काँग्रेसची ताकद किती वाढेल, हा काँग्रेसवाल्यांपुढेही प्रश्नच आहे. पण ती वाढली नाही, तरी त्यात त्यांचे नुकसान काही नाही. पण भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसाठी मात्र हा मोठा झटका आहे, हे मान्य करावे लागेल.

कन्हैयाकुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश का केला असावा, असा प्रश्न सर्वच डाव्या कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाला आहे. पक्षप्रवेश करताना कन्हैयाकुमारने आताच्या सत्ताधारी प्रवृत्तींना जर पुढील काळात रोखायचे असेल, भारतीय संविधानाचे रक्षण करायचे असेल, त्याची धर्मनिरपेक्षता कायम ठेवायची असेल, तर ते काम सध्या बुडत असलेल्या मोठ्या जहाजाला वाचवूनच, म्हणजे काँग्रेसला वाचवूनच करता येईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. या वेळी त्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही, उलट या पक्षाचे आभारच मानले आहेत.

आता हा ज्याच्या त्याच्या काँग्रेसबद्दलच्या मापनाचा व विश्लेषणाचा प्रश्न आहे. कन्हैयाकुमारला मात्र काँग्रेसला आपण फॅसिस्टांशी मुकाबला करण्याच्या कामी समर्थ करू शकू, असा विश्वास वाटतो. याचाच अर्थ असा की, ज्या भारतीय कम्युनिस्ट पक्षात तो होता आणि त्या पक्षाचे जे इतर डावे मित्रपक्ष आहेत, ते सर्व या प्रवृत्तीपासून देशाचे आणि संविधानाचे रक्षण करू शकत नाहीत. तेव्हा भाकपला समर्थ बनवण्याचा प्रयत्न करून आणि देशातील तमाम डाव्या व परिवर्तनवादी शक्तींची एकजूट घडवून आणण्यात आपली शक्ती व्यर्थ घालवण्याऐवजी सरळ काँग्रेसमध्ये जावे असे त्याला वाटले, असे आपण धरून चालावे. भाकप व त्याचा मित्रपक्ष असलेल्या माकप यांच्यावरून कन्हैयाकुमारचा विश्वास उडाला आहे, असाही त्याचा अर्थ होतो.

तो अशा निष्कर्षाप्रत का आला असावा? याबाबतीत आपणाला काही आडाखे बांधावे लागतात. त्यापैकी एक म्हणजे, एक तर तो वैचारिकदृष्ट्या निश्चितपणे कमकुवत असला पाहिजे. ज्या भाकपमध्ये तो होता, त्याच्या मार्क्‍सवादी विचारसरणीबद्दल त्याचा अभ्यास कमी असावा किंवा मग त्याची कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, शोषित, पीडित, महिला यांच्यावर जी वर्गनिष्ठा (आणि पक्षनिष्ठासुद्धा) असावी लागते, ती कमकुवत असली पाहिजे. त्या शिवाय कोणीही कम्युनिस्ट कार्यकर्ता असा निर्णय घेऊ शकत नाही. कोणताही पक्ष, कम्युनिस्ट पक्षसुद्धा नुसत्या चुकाच नव्हे तर अत्यंत गंभीर चुका करू शकतो. भाकपचा तर तसाच इतिहास आहे. पण या चुका दुरुस्त करणे, पक्षातील कमकुवतपणा दूर करणे, यासाठी पक्षांतर्गत संघर्षसुद्धा चिकाटीने करावा लागतो. समजा अशा काही धोरणात्मक चुका भाकपमध्ये असतील तर त्या कन्हैयाकुमारने पक्षांतर्गत संघर्ष करून दुरुस्त करणे आवश्यक होते किंवा निदान त्यासाठी लढणे आवश्यक होते. पण तेही तो करू शकला नाही, यातही त्याचा कमजोरपणाच दिसून येतो.

आजपर्यंत जगभर कम्युनिस्ट विचारसरणीवर अनेक हल्ले झालेले आहेत. अजूनही होत आहेत. त्याचे भोगही कार्यकर्त्यांना भोगावे लागत आहेत. पण जे निष्ठावान आहेत, ते कितीही कठीण परिस्थितीत असे डळमळीत होत नाहीत, हाही जागतिक अनुभव आहे. भारतही त्याला अपवाद नाही.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

जगभर फॅसिस्टांचा खरा मुकाबला कम्युनिस्टांनीच केलेला आहे. मग तो इटलीचा मुसोलिनी असो किंवा जर्मनीचा हिटलर. तेव्हा भारतातही फॅसिस्टांचा मुकाबला कम्युनिस्टांशिवाय करता येणार नाही. काँग्रेसशिवाय तो करावा असेही नाही. अशा मुकाबल्यात काँग्रेस सहभागी होऊ शकेल, पण ती त्याचे नेतृत्व करू शकत नाही, हे निश्चित. पण ज्यांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आहेत, त्या कम्युनिस्ट पक्ष सध्याच्या काळात तरी पूर्ण करू शकत नाहीत. किंबहुना अशा लोकांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी कम्युनिस्ट पक्ष कामाचा नाही. मार्क्सवादी विचारसरणी ही सामूहिक हिताशी बांधलेली आहे, त्यात वैयक्तिक हिताचा बळी द्यावा लागतो. सध्याच्या स्वार्थी राजकारणात कम्युनिस्ट पक्ष न वाढण्याचे तेही एक कारण आहे. त्यामुळे या पक्षात कमावण्यापेक्षा गमावण्याचीच शक्यता जास्त असते. ती समजून घेण्यात कन्हैयाकुमार कमकुवत ठरला, म्हणून तो स्वतःच्या महत्त्वाकांक्षेला मुरड घालण्यातही अपयशी ठरला, असे म्हणावे लागते.

कन्हैयाकुमारने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी स्वतःला भाकपपासून वेगळे केले, असे त्या पक्षाने म्हटले आहे. त्यात निश्चितच तथ्य आहे. तसे असेल तर त्याने घेतलेला निर्णय योग्यच आहे, असेच म्हणावे लागेल. कारण त्याच्यासोबत असलेल्या जिग्नेश मेवानीकडे जरी पाहिले तरी ही बाब कोणाच्याही लक्षात येऊ शकते की, ‘हा अपक्ष राहूनही काँग्रेसच्या पाठिंब्यावर आमदार बनला’ पण आपण तर कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर उभे होतो. पण आपण प्रचंड बहुमताने पडलो. तेव्हा कम्युनिस्ट पक्ष आपल्या महत्त्वाकांक्षाशी अनुरूप नाही, हे त्याचे मत बनणे स्वाभाविक आहे.

हा झाला एक भाग. पण भाकपच्या मतेही काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहेच आणि फॅसिस्ट प्रवृत्तीची मुकाबला करत असताना त्याच्याशी दोस्ती केली पाहिजे, हा या पक्षाचा सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा विचारही राहिली आहे. ते काँग्रेसला भाजपशी मुकाबला करू शकणारा पक्ष आहे, असेच मानतात. तसाच त्यांचा व्यवहार राहिलेला आहे. सर्व निवडणुकीत शक्यतो काँग्रेसशी आघाडी करावी, असे या पक्षाला आतापर्यंत वाटत आलेले आहे. काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला कितीही धुडकावून लावले तरी त्यांच्याशी जुळवून घेण्याचा व्यवहार भाकपने केलेला आहे. अशा परिस्थितीत भाकपमध्ये राहून काँग्रेसवाल्यांशी जुळवून घेण्यापेक्षा खुद्द त्या पक्षातच का जाऊ नये, असे अनेक डाव्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना वाटते, तसेच कदाचित कन्हैयाकुमारलाही वाटले असावे.

आजवर अनेक डावे परिवर्तनवादी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेले आहेत किंवा पहिला मुक्काम म्हणून काँग्रेसची मैत्री करू इच्छिणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षात आले आहेत, असा सर्वसाधारणपणे अनुभव आहे. कन्हैयाकुमार तर आधीपासूनच भाकपमध्ये होता. स्वाभाविकपणेच त्याने त्याची पुढची वाटचाल काँग्रेसमध्ये प्रवेश करून पूर्ण केली, असे म्हणावे लागते. फरक फक्त एवढाच आहे की, कन्हैयाकुमार हा देशभर गाजलेला, वक्तृत्वकला व हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखी असणारा, त्याच्या या गुणामुळे प्रचंड समुदाय जमा करू शकणारा विद्यार्थी नेता व वक्ता आहे. त्याने एकेकाळी भाजप, संघ, मोदी-शहा यांच्या विरोधात जबरदस्त वक्तव्य केले असल्याने तो एक नामांकित व लोकप्रिय असा वक्ता आहे. म्हणून त्याच्या काँग्रेस प्रवेशाने समाजमनावर थोडे वेगळे परिणाम होतात, हे निश्चित.

एरवीही कन्हैयाकुमारचे वादळ ऐनभरात असताना, जेएनयुला बदनाम करण्यासाठी संघपरिवाराने उघडलेली मोहीम, त्यात पोलिसांचा हस्तक्षेप, त्याला न्यायालयात झालेली मारहाण, देशद्रोही म्हणून त्याच्यावर झालेले आरोप, त्याची तुरुंगात झालेली  रवानगी, तुरुंगातून सुटल्यानंतरचे त्याचे जेएनयूमध्ये झालेले ऐतिहासिक भाषण, इत्यादी प्रसंगांत त्याने जो संघर्ष केला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यातूनच त्याचे नेतृत्व उदयाला आले, हे निर्विवाद.

त्यानंतर कन्हैयाकुमारच्या देशभर अनेक ठिकाणी प्रचंड जाहीर अथवा हॉलमधील सभा झाल्या. या सभा होऊ नये यासाठीही संघ-भाजपशी संबंधित प्रतिगामी शक्तींनी सर्वतोपरी आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना धुडकावून लावून या सभा जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर घेण्यात तो व त्याचे सहकारी यशस्वी झाले आहेत. या सर्व संघर्षात काँग्रेसने मदत केली आहे. डावपेच म्हणून ते योग्य होते. भाजपसारख्या मग्रूर पक्षाशी मुकाबला करताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणे, यात गैर काहीही नाही. त्यामुळेच पुण्या-मुंबईतील त्याच्या सभा असो किंवा औरंगाबाद, परभणीच्या जाहीर सभा असो, जितेंद्र आव्हाड (मुंबई), सतीश चव्हाण (औरंगाबाद), आमदार बाबा जानी दुर्रानी (परभणी) अशा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी कन्हैयाकुमारला व पर्यायाने भाकपला मदत केली आहे. किंबहुना या सभांच्या आर्थिक खर्चाचे वहनही राष्ट्रवादी काँग्रेसनेच केले आहे. दिल्लीत कन्हैयाकुमारवर झालेली राष्ट्रद्रोहाची केस चालवण्यातही कपिल सिब्बल यांच्यासारख्या काँग्रेसच्या दिग्गज वकिलांची मदत झाली आहे. या सर्व बाबींचा कन्हैयाकुमारवर मानसिक परिणाम व काँग्रेसवाल्यांच्या दोस्तीत वाढ होणेही शक्य आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................

त्याचबरोबर या सर्व सभांतून ज्यांनी कन्हैयाकुमारची भाषणे मन लावून ऐकली असतील, त्यांच्या हे लक्षात आले असेल की, त्याने कधीही काँग्रेसच्या धोरणावर तसूभरही टीका केलेली नाही. आता भाजप केंद्रात व अनेक राज्यांत सत्तेत आलेला आहे, त्याला काँग्रेसची धोरणेही काही प्रमाणात जबाबदार आहेत, याचा त्याने चुकूनही, कधीही, कुठेही उल्लेख केलेला नाही, याचीही नोंद सर्व डाव्या पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. कदाचित एकाच वेळी दोन शत्रूंशी लढता येत नाही. त्यापैकी एक तर आपणाला सद्यस्थितीत मदत करणारा आहे, अशा परिस्थितीत डावपेचाचा भाग म्हणून त्याने असे केले असेल, असे धरून चालले तरी डावपेच म्हणून एखादी बाब मान्य करणे आणि पुढे चालून तीच बाब धोरण म्हणून स्वीकारणे, यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. त्यामुळे त्या वेळी ते कसे चुकीचे होते, हे आता कन्हैयाकुमारच्या काँग्रेस प्रवेशाने लक्षात आणून दिले आहे. त्या वेळी काँग्रेस पक्ष त्याचा वापर करत आहे की, कन्हैयाकुमार व भाकप काँग्रेसवाल्यांचा वापर करत आहे, असा ज्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल, त्यांना आता काँग्रेसच कन्हैयाकुमारचा व भाकपचा वापर करत होता, हेही लक्षात आले असेल.

कन्हैयाकुमारच्या काँग्रेस प्रवेशाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निश्चितच नुकसान झाले आहे. देशभर गाजलेला वक्ता व विद्यार्थी नेता त्यांच्या पक्षातून गेल्याने त्यांच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचली आहे. हे जरी खरे असले तरी त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आताच्या डुबत्या जहाजाला कन्हैयाकुमार वाचवू शकेल आणि काँग्रेसला आता खूपच उभारी येणार आहे, या पक्षात आता अधिक लोक प्रवेश करणार आहेत आणि तो बळकट होणार आहे, अशा भ्रमात कोणीही राहण्याचे कारण नाही. याचे साधे कारण असे आहे की, कन्हैयाकुमार त्याच्याबरोबर भाकपमधील अथवा त्याच्या विद्यार्थी संघटनेतील एकही कार्यकर्त्याला सोबत नेऊ शकला नाही. उलट ज्या दिवशी कन्हैयाकुमार काँग्रेसमध्ये गेला, त्याच दिवशी पंजाबमध्ये कित्येक वर्षे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. नवज्योत सिंग सिद्धूनेही पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर गोव्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईजिन्हो  फिलेरो यांनीही काँग्रेस सोडली आहे. इतकंच नव्हे तर अनेक लोक काँग्रेस सोडत आहेत. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात केवळ कन्हैयाकुमारच्या प्रवेशाने काँग्रेसचे डुबते जहाज तरंगणार आहे, असे म्हणणे ही अतिशयोक्तीच म्हणावी लागेल.

इतकेच नव्हे तर कन्हैयाकुमार खुद्द भाकपमध्ये व एआयएसएफमध्ये असतानाही त्याच्याबद्दल देशभरातील विद्यार्थी व युवकांमध्ये निश्चितपणे आकर्षण तयार झाले होते. पण त्यामुळे एआयएसएफमध्ये तरुणांची खूप भरती झाली, असेही घडले नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

काँग्रेसच्या जहाजाला भगदाड पडण्यामागे खुद्द काँग्रेसची धोरणे जशी कारणीभूत आहेत, तशीच संघ-भाजपने आपल्या सत्तेचा गैरवापर करून ईडी, इन्कम टॅक्स, एनआयए यांसारख्या संस्थांचा वापर करत आहे, हेही आहे. तसेच काँग्रेसमध्ये असलेल्या बर्‍याचशा लोकांची विचारसरणी व भाजपची विचारसरणी यात फारसा फरक नाही, हेही आहे. ही बाब आसामचे आत्ताचे मुख्यमंत्री व पूर्वीचे काँग्रेसचे पुढारी हेमंत बिस्वा सरमा यांनी अतिक्रमणाच्या प्रश्नावरून मुस्लिमांवर केलेल्या दडपशाहीतून सिद्ध होते. अशी शेकडो उदाहरणे देता येतील. अर्थात काँग्रेसची अधिकृत विचारसरणी तशी नाही, हे जरी खरे असले तरी त्या विचारसरणीच्या लोकांचा मोठा भरणा या पक्षात आहे, हे उघड आहे. आणि म्हणूनच काँग्रेसमधील बहुसंख्य पुढारी न कचरता भाजपमध्ये जातात.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे राहुल गांधी म्हणतात उजव्या प्रवृत्तीच्या लोकांनी काँग्रेस पक्ष सोडून जावे आणि इतर समाजघटकांत व पक्षांत असलेल्या भाजप व संघविरोधी लोकांनी काँग्रेसमध्ये यावे. परंतु आता काँग्रेसला तिच्याच धोरणामुळे, मुख्यत: आर्थिक धोरणामुळे उतरती कळा लागलेली आहे. किंबहुना या आर्थिक धोरणाच्या परिणामांमुळेच भाजपने तिला ‘ओव्हरटेक’ केले आहे. २०१४पर्यंत काँग्रेस जी धोरणे मवाळपणे राबवत होती, तीच धोरणे नंगाटपणाने भाजप राबवत आहे. (उदाहरणार्थ शेती कायद्याबद्दलची धोरणे) तेव्हा अशा परिस्थितीत कन्हैयाकुमारने काँग्रेसच्या केवळ सामाजिक प्रश्नावर विचार करण्याऐवजी आर्थिक प्रश्नाबद्दलसुद्धा विचार करायला हवा होता. सामाजिक प्रश्न व आर्थिक प्रश्न यांचे शत्रुत्वाचे नाते नाही, तर मित्रत्वाचे आहे, ही बाब ध्यानात घेणे आवश्यक आहे.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......