छ. संभाजीराजांची मृत्यूनंतरही त्याच निष्ठेने सेवा करणारे गोविंद गोपाळ गायकवाड कोण होते?
संकीर्ण - पुनर्वाचन
कॉ. भीमराव बनसोड
  • गोविंद गोपाळ गायकवाड आणि त्यांच्याविषयीचे पुस्तक
  • Wed , 30 December 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन छ. शिवाजी महाराज Shivaji Maharaj छ. संभाजीमहाराज Sanbhaji Maharaj स्वराज्य Swarajya गोविंद गोपाळ गायकवाड Govind Gopal Gaikwad

भीमा कोरेगाव प्रकरणातून बहुतेकांना नव्याने माहीत झालेले वढू बुद्रुक येथील गोविंद गोपाळ गायकवाड (महार) यांचा १० ऑगस्ट हा जन्मदिन.

छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य टिकवण्याचा व त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीमहाराज करत होते. त्यावेळेस त्यांचा प्रमुख शत्रू मोगल सम्राट औरंगजेब हा होता. त्याच्या अनेक प्रयत्नांचा संभाजीराजांनी यशस्वीपणे मुकाबला केला होता, पण त्यांचे मेहुणे गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे शेवटी त्यांना संगमेश्वर येथे पकडण्यात औरंगजेबाच्या मुकर्रबखान या सरदाराला यश आले. नंतर औरंगजेबाच्या आदेशाने संभाजीराजांना ठार करण्यात आले. जो कोणी त्यांचे अंत्यसंस्कार करेल त्याचा शिरच्छेद केला जाईल असे फर्मान औरंगजेबाने काढले होते. तरीही गोविंद गोपाळ गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अग्निदाह करून अंत्यसंस्कार केले होते, हा इतिहास आहे.

वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या अनेक इतिहासकारांपासून तर विश्वास पाटलापर्यंतच्या ऐतिहासिक कादंबरीकारांनीसुद्धा ही बाब मान्य केली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाविषयी मी ‘भीमा कोरेगाव ते वडु बुद्रुक’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते लिहिण्यासाठी मला बराच अभ्यास करावा लागला. त्यातून वरील सर्वमान्य बाब लक्षात आली. परंतु गोविंद गोपाळ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संभाजीराजांवर इतकी निष्ठा का दाखवली असेल, हे मात्र मला समजले नव्हते. हीच स्थिती बहुतेकांची असेल असे मला वाटते. गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज राजेंद्र गायकवाड यांनी माझे पुस्तक वाचल्यानंतर मला अभिनंदनाचा फोन केला आणि त्याच वेळेस त्यांनी मला व्हॉट्सअॅपवर एक पुस्तक पाठवले.

हे सिद्धाप्पा मोरे (बेळगाव) यांनी लिहिलेले ‘शिवकालातील शूरवीर महार योद्धे - गोविंदा गोपाळ व रायप्पा महार चरित्र’ (१९६७) पुस्तक मी वाचले. त्यातून गोविंद गोपाळ आणि संभाजीराजे यांच्यातले  जिव्हाळ्याचे, विश्वासाचे व निष्ठेचे संबंध लक्षात आले.

शिवाजीमहाराज जातपात मानत नव्हते. त्यांच्या सैन्यात अठरापगड जातींचे, तसेच मुस्लीम सैनिकही मोठमोठ्या पदावर होते. त्यांच्यावर त्यांच्या कुवतीप्रमाणे जबाबदाऱ्याही टाकल्या जात होत्या. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकात हे सविस्तरपणे आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू असताना गोविंद गोपाळ यांचे वडील त्यातील दगडधोंड्याची शक्तीची कामे करण्यात आघाडीवर होते. त्याच काळात शिवाजीमहाराजांनी गायकवाड यांच्या वडिलांची भेट घेतली. गोविंद गोपाळ त्यावेळेस तरुण होते. धष्टपुष्ट व बलदंड होते. शिवाजीमहाराजांनी त्यांचे बलदंड शरीर पाहून त्यांना आपल्या सैन्यात दाखल करून घेतले. त्यानुसार ते सैन्यात दाखल झाले. गोविंद गोपाळ यांच्या वडिलांच्या व शिवाजीमहाराजांच्या देहान्तानंतर त्यांचे संभाजीराजांशी दृढ संबंध निर्माण झाले.

शिवाजीमहाराजांप्रमाणेच संभाजीराजांचाही औरंगजेब हा शत्रू होताच, शिवाय त्यांच्या जातीयवादविरोधी, समतावादी विचारांमुळे ब्राह्मण्यवादीही त्यांच्याशी आतून शत्रूसारखेच वागत. त्यांच्याच दरबारातील ब्राह्मण मंत्र्यांकडून विविध प्रकारे कट-कारस्थाने करून संभाजीराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा कटांचा जेव्हा सुगावा लागला, तेव्हा त्यांनी गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या… काहींना चाबकाचे फटके मारण्याच्या तर काहींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याच्या शिक्षाही दिल्या. काही शिक्षांची (मुख्यतः फटके मारण्याच्या) अंमलबजावणी गोविंद गोपाळ यांच्यावर सोपवण्यात आली होती.

संभाजीराजांना पकडण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत दाखल झाला. त्याने नाशिक जवळील रामसेज किल्ला ताब्यात घेण्याची जबाबदारी शाहबुद्दीन, फिरोजनंग या सरदारावर सोपवली होती. तेव्हा संभाजीराजांनी हा किल्ला लढवण्याची जबाबदारी गोविंद गोपाळ यांच्यावर टाकली. ती त्यांनी समर्थपणे पेलून औरंगजेबाच्या सरदारांचा पराभव केला. या कामगिरीवर खुश होऊन संभाजीराजांनी त्यांना किल्लेदाराचे वस्त्र व इतरही काही इनाम दिले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

संभाजीराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या चौदा दिवसांतच त्यांनी बऱ्हाणपूर येथे हल्ला करून मोठी लूट मिळवली. या लुटीच्या वेळी गोविंद गोपाळ हे त्यांच्याबरोबर होते. ही संपूर्ण लूट सुरक्षितपणे रायगडावर पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण विश्वासाने पार पाडली.

अशी कितीतरी उपयुक्त माहिती या चरित्रात्मक पुस्तकात आहे. ती सर्व मी येथे सांगत नाही. ते चरित्र आपण वाचावे, अशी मी सूचना त्यानिमित्ताने करतो.

अशा या पराक्रमी व संभाजीराजांचा विश्वासू असलेल्या गोविंद गोपाळ यांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करत असताना एक गोष्ट मात्र निश्चितपणे पुन्हा सांगितली पाहिजे. संभाजीराजे संगमेश्वर मार्गे जेव्हा रायगडाला जात होते, तेव्हा त्यांच्यासोबत संताजी घोरपडे व इतरही काही ठराविक लोकांबरोबर गोविंद गोपाळ हेसुद्धा होते. संभाजीराजे संगमेश्वर भागातील काही शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी तेथे काही काळ थांबले, तेव्हा त्यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांना पुढे जाण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार उर्वरित मंडळी रायगडाच्या दिशेने पुढे गेली. परंतु गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे मुकर्रबखान या सरदाराने संगमेश्वर येथे संभाजीराजांना पकडले. ही बातमी जेव्हा त्यांच्या पत्नी येसूबाई यांना कळाली, तेव्हा त्यांना कोठे नेले असावे, याचा शोध घेण्यासाठी जी दोन पथके बनवली होती, त्यात संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक होते, तर दुसऱ्या पथकात गायकवाड हे होते.

संभाजीराजांना बहादूरगडावर नेल्याची बातमी संताजी घोरपडे यांना कळाली. त्यांनी बहादूरगडावर गनिमी काव्याने हल्ला केला, पण त्यापूर्वीच त्यांना तेथून रायाराव नावाच्या एका ब्राह्मण सल्लागाराच्या सल्ल्याने तुळापुरला हलवण्यात आले होते. तेथेच त्यांना ठार करण्यात आले. त्यांच्या देहाचे तुकडे इतस्ततः विखरून टाकले गेले.

हा वृत्तांत गोविंद गोपाळ यांना एका स्त्रीकडून मिळाला. त्या माहितीच्या आधारे त्यांनी संभाजीराजांचा मृतदेह एकत्र गोळा केला आणि वढू बुद्रुक येथील त्यांच्या नात्यातील काही महार मंडळींच्या आणि काही मराठा मंडळींच्या साहाय्याने एका छत नसलेल्या पडक्या घरात त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार केले. (तूळापुर व वडु बुद्रुक ही दोन्ही गावे जवळजवळ आहेत. या दोन गावांच्या मध्ये भीमा नदी वाहते.) नंतर ही सर्व बित्तंबातमी त्यांनी रायगडावर जाऊन येसूबाई यांना दिली.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गोविंद गोपाळ यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या व शिवाजीमहाराज-संभाजीराजांच्या कार्यावरून आपण व आताच्या समाजाने कोणता बोध घ्यावा? त्यांचे विचार विषमतेविरुद्ध व जातीयवादाविरोधात होते. म्हणूनच त्यांनी विविध धर्माच्या आणि शोषित पीडित जातींच्या लोकांनासुद्धा आपल्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात सामिल करून घेतले होते. हे अठरापगड जातीधर्माचे लोक निष्ठेने स्वराज्याची सेवा करत होते.

त्याचाच एक भाग म्हणून गोविंद गोपाळ यांनी संभाजीराजांची मृत्यूनंतरसुद्धा त्याच निष्ठेने सेवा केली. त्यामुळे आताच्या मराठा, मुस्लीम अथवा पूर्वाश्रमीचे महार (आताचे नव बौद्ध) या सर्व समाजांनी आपापसांत शत्रूभाव न ठेवता सर्व शोषकांविरुद्ध एकजुटीने, निष्ठेने संघर्ष केला पाहिजे. तेच खरे गोविंद गोपाळ गायकवाड यांना अभिवादन होईल.

प्रथम प्रसिद्धी - १० ऑगस्ट २०२०

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......