‘अ‍ॅड. आंबेडकरांच्या भाजपबरोबर वाटाघाटी झाल्या आहेत’ असं म्हणणं तर्कदृष्ट्या पटत नाही!
पडघम - राज्यकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
  • Wed , 01 May 2019
  • पडघम राज्यकारण प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi

सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. त्यातील तीन टप्पे पूर्ण झाले असून बाकी टप्पे मे महिन्याच्या मध्यापर्यंत संपणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी सभांचे आयोजन, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मुलाखती तर मुद्रित माध्यमांतून लिखाण केले जात आहे. यातून निवडणुकातील विविध पक्ष, युत्या, आघाड्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातील सत्य-असत्य काय ते जनतेला ठरवावे लागते. बऱ्याचदा त्यांची दिशाभूलही होऊ शकते. अशापैकीच महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर केला जाणारा ‘त्यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपशी डिलिंग केले आहे’ हा आरोप. या मूळ सूत्राला धरून जे ते कार्यकर्ते, राजकीय विरोधक, तथाकथित विचारवंत आपापल्या समजाप्रमाणे याबाबतच्या अफवा पसरवत आहेत. ज्यांची पोहोच वरील माध्यमांपर्यंत आहे, ते त्यामार्फत, तर उरलेले गप्पागोष्टींच्या स्वरूपात, काहीजण कुजबुजीच्या स्वरूपात तसा अपप्रचार करत आहेत.

वाईट याचे वाटते की, यात डाव्या, पुरोगामी, आंबेडकरवादी मित्रपरिवारातील काही कार्यकर्ते व त्यांची मुले यांचाही समावेश होतो. यातून त्यांचा अ‍ॅड. आंबेडकर यांच्याकडे पाहण्याचा तुच्छतेचा दृष्टिकोन स्पष्टपणे जाणवतो. यातही आश्चर्य म्हणजे ते ज्यांचे चाहते असतात, ते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असतात, याची त्यांना माहिती असते. पण त्याच्याशी यांना काहीच सोयरसुतक नसते. किंबहुना भ्रष्टाचार करणे हा त्यांचा हक्कच आहे असे ते मानतात. काही जण अ‍ॅड. आंबेडकरांवर विविध तर्काच्या आधारे ‘डिलिंग अथवा संगनमत, साटेलोटे’ असल्याचे सूचित करत असतात, तर काही जण सरळ तसा आरोप करतात. त्याची दोन उदाहरणे पाहू.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅड. आंबेडकरांबद्दल बोलताना ‘भाजपशी बहुतेक त्यांची बोलणी झाली असावी. मुख्यमंत्र्यांशी संगनमतानं त्यांचं काही तरी ठरलं असावं, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आमचं नुकसान करण्यासाठीच त्यांनी उमेदवार उभे केले आहेत,’ असं म्हटलं आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram

.............................................................................................................................................

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार, नामवंत पत्रकार, अनेक वृत्तपत्रांचे संपादक राहिलेले, जागतिकीकरणाच्या धोरणाचे खंदे समर्थक व एक विचारवंत म्हणून ज्यांना मान्यता आहे, अशा कुमार केतकरांनी ‘टीव्ही 9’च्या ‘न्यूजरूम स्ट्राईक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ‘अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या लोकप्रियतेबद्दल संशय नाही. संशय किंवा प्रश्न हा त्यांच्या भूमिकेबद्दल आहे. त्यांनी अजून आपला शत्रू निश्चित केलेला नाही. त्यांनी तो निश्चित केला पाहिजे. आपण जे पाऊल उचलतो आहोत, त्याचा नक्की फायदा कोणाला होणार आहे? त्याचा फायदा भाजपला होणार आहे की, काँग्रेसला की अन्य कोणाला?’

राज ठाकरे यांनी ज्याप्रमाणे मोदी आणि अमित शहा यांना टार्गेट केलं आहे, तसं अ‍ॅड. आंबेडकरांनी केलं नाही. त्यांनी आपली भूमिका मोघम ठेवली आहे. त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांचा फायदा जर भाजपला झाला तर ती भाजपाची ‘बी टीम’ आहे की नाही, हे त्यांनी व लोकांनी ठरवायचं आहे. ‘अ‍ॅड. आंबेडकरांच्या खाजगीतल्या वाटाघाटी या भाजपबरोबर किंवा अमित शहाबरोबर झाल्या आहेत’ असंही विधान केतकरांनी या मुलाखतीत केलं आहे. यासाठी त्यांनी बी.जी. कोळसे पाटलांची उमेदवारी मागे घेण्याच्या वेळेस त्यांनी काढलेल्या पत्रकाचा उल्लेख केला आहे.

केतकरांच्या वरील विधानाची सत्यता पडताळण्यासाठी मी बी.जी. कोळसे पाटलांच्या यू-ट्यूबवरील मुलाखती पाहिल्या आणि फेसबुकवरील त्यांच्या पोस्टही तपासल्या. मला कोठेही त्यांचं तसं विधान अथवा लिखाण सापडलं नाही. उलट अ‍ॅड. आंबेडकरांशी चांगले संबंध असून त्यांच्याशी मैत्री कायम राहील असंच त्यांनी सांगितलं आहे. म्हणून खुद्द कोळसे पाटलांनाच याबाबत फोन लावून विचारणा केली असता, ‘असा कोणताही आरोप व असलं कोणतंही विधान मी कोठेही केलं नसल्याचं’ त्यांनी सांगितलं. आणि ‘टी.व्ही. 9’ची मुलाखत त्यांनी माझ्याकडून मागवून घेतली.

अशा प्रकारे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून, त्यांच्या लाभार्थ्यांकडून व काही चाहत्यांकडूनही मुद्दामून अशा अफवा पसरवल्या जात आहेत. प्रसारमाध्यमांत त्यांचं काही खास स्थान असल्यानं त्यांना तशी प्रसिद्धीही मिळते. पण अशा बाबींचा ते कोणताही पुरावा देऊ शकत नाहीत. किंबहुना अशा बाबींचा काही पुरावा असतो काय, असंही ते म्हणू शकतात. तेव्हा ते आपला मुद्दा तर्काच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. मग यातील तर्क काय? ‘ज्या अर्थी अ‍ॅड. आंबेडकर यांच्यामुळे काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं, त्याअर्थी भाजपनं त्यांच्याशी डिल केलं आहे,’ असा साधा सोपा अर्थ ते काढतात. त्यांच्या मते ‘काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. तोच भाजपशी मुकाबला करू शकतो. म्हणून त्याच पक्षाला मदत केली पाहिजे’ हा एक मोठ्या प्रमाणातील ‘विचार’ म्हणून आपण त्याचा आदर करू शकतो. तसाच आदर त्यांनी काँग्रेसबद्दलच्या इतरांच्या विचाराचा केला पाहिजे. ‘काँग्रेस विरोध म्हणजे भाजपकडून डिलिंग’ एवढंच सूत्र मांडणं हे संविधानानं दिलेल्या विचारस्वातंत्र्यालासुद्धा मारक आहे. निदान केतकरांसारख्या विचारवंताकडून तशी अपेक्षा नाही.

खरं म्हणजे त्यांच्यासारखा विचारवंत असाही तर्क करू शकतो -

१) या निवडणुकांच्या पूर्वी २०१४ नंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी राज्यभर जातीअंताच्या परिषदा घेतल्या आहेत. त्यातून त्यांनी भाजपची मातृसंघटना असलेला रा.स्व. संघ, त्याचे प्रमुख मोहन भागवत यांच्या विचार व्यवहारावर कडाडून हल्ले केले आहेत. संघाला भारतीय संविधान रद्द करून ‘मनुस्मृती’वर आधारित वेगळं संविधान लागू करायचं आहे, असं विधान त्यांनी अहमदनगर येथील जातीअंताच्या परिषदेत केलं आहे. तिथंच त्यांनी मोहन भागवतांशी याबाबत जाहीर वादविवाद करण्याचं आवाहन केलं आहे. नागपूर येथील त्यांच्या संघ कार्यालयावर मोर्चे काढले आहेत.

२) त्यालाच वैतागून संघाच्या कटकारस्थानानं रत्नाकर गायकवाड यांना हाताशी धरून मुंबई येथील आंबेडकर भवन पाडण्यात आलं. तेथील प्रबुद्ध भारत प्रेस, अ‍ॅड. आंबेडकरांची कार्यालयं जमीनदोस्त करण्यात आली.

३) ३१ डिसेंबर २०१८ च्या पुणे येथील एल्गार परिषदेचे अ‍ॅड. आंबेडकर अध्यक्ष होते. १ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या दलितांवरील हल्ल्याला एल्गार परिषद व त्याचे अध्यक्ष अ‍ॅड. आंबेडकर यांनाच जबाबदार धरण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी नेमलेल्या आयोगातील मी एक साक्षीदार असल्यानं सरकार, पोलीस खाते व सरकारच्या पोशिंद्या असलेल्या एनजीओ संघटनांच्या वकिलांचा सर्व रोख अ‍ॅड. आंबेडकर यांच्यावरच आहे, हे मी खात्रीनं सांगू शकतो.

४) अ‍ॅड. आंबेडकर हे नक्षलवादी आहेत, असा त्यांच्यावर पुणे पोलिसाकडून आरोप केला गेला. पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात ते सामील होते, असं पत्र टीव्ही चॅनलवर ‘गोदी मीडिया’नं झळकवलं आहे.

५) त्यांचे मेव्हणे आनंद तेलतुंबडे यांच्या घरावर पोलिसांनी धाडी घातल्या. त्यांच्यावरही वरील कटात सामील असल्याचा, युएपीए कलमाखालील देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. कोणत्याही क्षणी त्यांची रवानगी तुरुंगात होऊ शकते.

६) एके 47 सारखी केवळ सैन्यदलाकडे असणारी शस्त्रास्त्रं विनापरवानगी संघाकडे कशी असू शकतात? त्यांची ते पूजाअर्चा करून, मिरवणुका कशा काय काढू शकतात? असे प्रश्न केवळ अ‍ॅड. आंबेडकर यांनीच उपस्थित केले आहेत. दसऱ्याच्या दिवशी याविरोधी ते दरवर्षी मोर्चे काढून, निदर्शनं करून संघाला आव्हान देत असतात. 

७) संघाला संवैधानिक चौकटीत आणा अशी मागणी फक्त त्यांनीच लावून धरली आहे.

८) याशिवाय भाजपच्या आर्थिक धोरणावर, संघाच्या सामाजिक व्यवहारावर कशाचीही पर्वा न करता तर्कशुद्ध टीका ते स्वत: जाहीर सभांतून करत असतात. त्यात ‘आम्ही सत्तेत आल्यास मनोहर भिडे, मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू’ असा इशाराही ते देत असतात.

९) अशा प्रकारे भाजप, संघावर जोरदार हल्ला फक्त अ‍ॅड. आंबेडकर हेच करत आहेत. दुसरं नाव घ्यायचं झाल्यास कन्हैय्याकुमारचं घेता येईल. बाकी त्यांच्यानंतर.

या सर्व बाबी जगजाहीर असतानाही भाजपला मदत करण्यासाठी ‘अ‍ॅड. आंबेडकरांच्या खाजगीतल्या वाटाघाटी या भाजपबरोबर किंवा अमित शहाबरोबर झाल्या आहेत’ असं म्हणणं प्रत्यक्ष पुरावा तर सोडाच, पण तर्कदृष्ट्याही पटत नाही. तेव्हा निदान विचारवंतांनी तरी विचार करून आपले विचार मांडावेत एवढीच माफक अपेक्षा.

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 02 May 2019

आम्हाला माहितीये प्रकाश आंबेडकर कुंपणावरची भूमिका का घेतात ते. त्याचं काये की प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहेत. त्यामुळे त्यांची पंचाईत झालीये. नक्षलवादी भारतीय राज्यघटना मानीत नाहीत. पण आंबेडकरांना तर संघाला घटनेच्या चौकटीत आणायचंय. म्हणजे नक्की काय करायचंय हे आंबेडकरांनाही माहित नाही, ही बाब अलहिदा! पण पेचप्रसंग उत्पन्न होतो. एकीकडे नक्षलवाद तर दुसरीकडे राज्यघटना अशा दोन डगरींवर तंगड्या फाकवून उभं राहायची वेळ आलीये. स्वखुशीने पाय फाकवण्याचे धंदे कोण करतो ते सगळ्यांना माहितीये. तितकीच प्रकाश आंबेडकरांची किंमत आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......